Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वृषभ रास / वृषभ लग्न

व
विजुभाऊ
Wed, 01/05/2011 - 10:10
🗣 52 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
27855 वाचन

💬 प्रतिसाद (52)
अ
अवलिया Wed, 01/05/2011 - 10:13 नवीन
विजुभाउंना सगळी माहिती फुकटात हवी असते
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/05/2011 - 10:27 नवीन
विजुभाउंना सगळी माहिती फुकटात हवी असते पिसे द्यायची तयारी आहे. घेणाराने ओळख पटवून घेवून जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 01/05/2011 - 10:28 नवीन
गुंडोपंत आणि युयुत्सुरावांना खवमधे लिंक दिली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सूर्यपुत्र Wed, 01/05/2011 - 10:18 नवीन
आम्ही खूप वांडपणा करायचो. म्हणून मास्तर आम्हांला "नालायक राशीचे" म्हणायचे. या राशीविषयी सुद्धा अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 01/05/2011 - 10:39 नवीन
*आणि कुंभ राशीची स्त्री ही लग्नाला निघाली तरी सकाळी दूध आणायला जावे अशा अवतारात जाते. असेही आइकलेय कि "कुंभ रास म्हणजे विद्येने भरलेला घडा !!!" कर्क राशिच काही सन्ग्ता अले तर बघा.. मी कर्क राशीची आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 01/05/2011 - 19:24 नवीन
कर्क राशीच्या लोकांना शुद्ध लिहिण्याचा ज sssssss रा प्रॉब्लेमच असतो असे कुठूनसे समजले...अभ्यासुंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सुहास.. Wed, 01/05/2011 - 10:43 नवीन
मी कर्क राशीची आहे. >>> कर्क राशीचे लोक अतिशय शुध्द बोलतात म्हणे खरे आहे का ?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/05/2011 - 10:44 नवीन
वाक्यात "त्यांच्या मते" हा शब्द राहिला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
स्वतन्त्र Wed, 01/05/2011 - 11:59 नवीन
वृषभ राशीचे लोक दिसायला सुंदर असतात. खूप कष्टाळू असतात . उदा:माधुरी दीक्षित-नेने
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 01/05/2011 - 19:42 नवीन
स्वतन्त्र - तुझी रास काय????? :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र
स
स्वतन्त्र गुरुवार, 01/06/2011 - 06:16 नवीन
वृषभ . यादीत अजून काही नावे. विचारवंत असतात :लेओनार्डो दा विन्ची,कार्ल मार्क्स,विलयम शेक्सपीयर. अजून एक मोठा नाव राहिलंच:अडोल्फ हिटलर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र
व
विजुभाऊ गुरुवार, 01/06/2011 - 08:55 नवीन
सद्दम हुसेन चे नाव देखील अ‍ॅड करा. कृष्ण हा वृषभ राशीचा होता असे उपाध्ये म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र
प
प्रीत-मोहर Fri, 01/07/2011 - 10:04 नवीन
मी सुद्धा वृषभचीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्वतन्त्र Fri, 01/07/2011 - 13:46 नवीन
वरील वृषभचे गुण असतीलच ! सूचना:हे फक्त राशीचे तथाकथित गुण जुळतात का हे पाहण्यासाठी आहे.इतर कोणताही उद्देश यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
ग
गणेशा Wed, 01/05/2011 - 12:49 नवीन
माझ्याच मकर राशि बद्दल काही माहित नाही .. इतर राशींबद्दल आपल्याला काहीच माहित नाहि .. उलट आम्हालाच कोणॅए फुकटात मकर बद्दल माहीती द्या की राव ...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Wed, 01/05/2011 - 13:28 नवीन
कुंभ राशीचे लोक सहनशील असतात....
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/05/2011 - 14:05 नवीन
समस्त मानवजातीला अवघ्या १२ राशीत बसवून त्यांचे असे ठोक वर्णन करणे हे उथळपणापेक्षा पैसा मिळवण्याच्या क्लुप्त्या आहेत. ज्योतिष शास्त्रात जी कुंडली असते त्या बारा घरात एकाच राशीत इतकी परम्युटेशन्स आणि काँबिनेशनस शक्य आहेत की एकाच राशीत सुध्दा 'व्यक्ति तितक्या प्रकृती' ही म्हण लागू पडते. अधिक माहिती युयुत्सु, गुंडोपंत वा अन्य तज्ञ व्यक्तिच देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 01/05/2011 - 15:35 नवीन
बैल आणि कोणत्या तरी ग्रहाची सांगड घाला. त्यावरील कथा बनवा अन वाचा. अवघड काय आहे त्यात?
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Wed, 01/05/2011 - 16:05 नवीन
वृषभ राशीची व्यक्ती हि श्रुन्गारीक असते. नटणे थटणे अगदी जन्मसिद्ध हक्क असल्यासारखी. फार बोलके असतात. त्यांचा स्वभाव हा मनमिळाउ असतो! वरील विधाने ही आजवर इथुन तिथुन कानावर पडलेल्या माहितीवरुन लिहिलेली आहेत.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 01/05/2011 - 16:19 नवीन
वृषभ हे एकंदर राजेशाही काम असतं. या लोकांचे स्वभावविशेष खालील उतार्‍यात ठळक केले आहेत. _______________ वृषभ राशीची एक स्त्री माझ्या ओळखीतली होती नेहमी खूप छान नटत असे. भारतात असताना तिने केस ब्लाँड करून घेतले होते. ती गोरी असल्याने तिला छान दिसले पण भारतात आपल्याला पहायची सवय नसल्याने जरा विचीत्र वाटायचं. खाणं पीणं अगदी सांभाळून खात असे. म्हणजे कॅलरी कॉन्शस होती पण तिला खाण्याची आवड होती. _______________ माझे बाबा याच राशीचे. बाबांमध्ये खूप म्हणजे कमालीची सहनशीलता (इनफायनाइट पेशन्स) आहे. बाबांना अत्तरे, नियमित झोप, नियमित माफक व्यायामाची आवड आहे. ही हॅज अ ग्रीन थंब. खूप सुंदर झाडं / बोन्साय ते करतात. खाण्यापीण्याची आवड आहे. छंद म्हणून वाईन बनवतात. ____________ माझी रूममेट याच राशीची होती. ती कपडे घेण्याबाबत खूप चोखंदळ होती. रंग भडक नाही तर अतिशय आल्हाददायक असे ती निवडत असे. सूतदेखील मऊ लागत असे. ती स्वतः खूप चांगले खाणं बनवत असे. कानातले आदि बनवत असे मुद्दाम मणी, साहीत्य आणून. ते मणीही अतिशय चोखंदळपणे निवडणार. स्वभाव खूप गोड होता. आय मिस हर :( _________________
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 01/05/2011 - 17:01 नवीन
धन्यवाद!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Wed, 01/05/2011 - 17:27 नवीन
:) ह्म्म तू वृषभ राशीची दिसतेस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
उ
उपास Wed, 01/05/2011 - 23:23 नवीन
उपरोक्त बरेच गुण अस्मादिकात दिसतात असं लोकं म्हणतात :प आम्ही चंद्र आणि सूर्य दोन्हीकडून वृषभ राशीचे बैलोबा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Wed, 01/05/2011 - 19:24 नवीन
कुंभ राशीचे लोक माणूसघाणे असतात असा माझा अनुभव आहे. म्हणजे आत्मकेंद्रित अथवा स्वार्थी अप्पलपोटेपणातून आलेला माणूसघाणेपणा नसून उलट खूपसं त्यांना इतर लोक समजू शकत नाहीत या भावनेतून आलेला हा माणूसघाणेपणा असतो. जिथे इतर लोक छानछोकी, कपडेलत्ते, दागदागीने आदिच्या आहारी गेलेले असतात तिथे कुंभ राशीच्या लोकांचे मन सामाजिक समस्या, बौद्धिक कोडी उकलण्यात रममाण झालेले असते. त्यामुळे पेहेराव आदि क्षुल्लक गोष्टींकडे त्यांचा ओढा अजिबातच नसतो हे माझं नीरीक्षण. यांच्या स्वतःच्या थिअरीज असतात फक्त पोपटपंची नसून त्यांची स्वतःची मतं असतात. ही वायू (बुद्धीप्रधान) राशीतील सर्वात शेवटची रास. पर्सनल स्पेस (व्यक्तीस्वातंत्र्य) मला वाटतं ही कन्सेप्ट या लोकांनी पहील्यांदा शोधून काढली असावी. याची कारणं २ - हे व्यक्तीस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले मी पाहीले आहेत दुसरं संशोधक वृत्ती अंगी पुरेपूर बाणलेली असते. ही झाली माझी नीरीक्षणं.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 01/05/2011 - 19:48 नवीन
कुंभ राशीचे लोक माणूसघाणे असतात असा माझा अनुभव आहे. सहमत म्हणजे आत्मकेंद्रित अथवा स्वार्थी अप्पलपोटेपणातून आलेला माणूसघाणेपणा नसून उलट खूपसं त्यांना इतर लोक समजू शकत नाहीत या भावनेतून आलेला हा माणूसघाणेपणा असतो. असु शकेल. जिथे इतर लोक छानछोकी, कपडेलत्ते, दागदागीने आदिच्या आहारी गेलेले असतात तिथे कुंभ राशीच्या लोकांचे मन सामाजिक समस्या, बौद्धिक कोडी उकलण्यात रममाण झालेले असते. त्यामुळे पेहेराव आदि क्षुल्लक गोष्टींकडे त्यांचा ओढा अजिबातच नसतो हे माझं नीरीक्षण. तुझी रास काय आहे??????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
क
कवितानागेश Wed, 01/05/2011 - 21:05 नवीन
कुंभेच्या लोकांना 'माणूसघाणे' म्हटल्याबद्दल णिषेध! मला कधीच माणसांची घाण वाटत नाही. ( तशी तर पालींची/ झुरळांचीही वाटत नाही ;) ) फक्त कधीकधी कंटाळा येतो माणसांचा, जाम बोअर करतात! (लग्नाला जाउन दूध घेउन येणारी, एक तृतियांश कुंभ) माउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
वेताळ गुरुवार, 01/06/2011 - 05:21 नवीन
आपण कुंभ लोक असतोच असे,माणुसघाण..... मला गर्दी अजिबात आवडत नाही. पण कपड्यांच्या बाबत हे सत्य आहे. माझे कपडे खुप दिवस टिकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश गुरुवार, 01/06/2011 - 11:46 नवीन
माझे कपडेपण खूप दिवस टिकतात. ...कारण माझ्याकडे खूप कपडे असतात! ;) कपाट उघडले की अंगावर कोसळतात. माझी बिचारी तूळ राशीची आई ते मधूनच आवरते. ....आणि माझे लाडके-जुने जुने कपडे गपचुप गायब करते. अशा वेळेस मी पुस्तकात डोके खुपसून माझी ज्ञानाची भूक भागवत असते! --निर्लज्ज सदासुखी माउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ग
गणेशा गुरुवार, 01/06/2011 - 11:08 नवीन
तुमचे वाचुन मी माझ्या मित्र आणि बहिन यांची ही कुंभ रास आहे त्यांचे वागणॅ बघितले तंतोतंत जुळते आहे .. जरा मकर बद्दल सांगा की आता.. मी बर्याच दा पाहिले आहे सगअ‍ॅळ वृश्चिक-वृशभ , कुंभ-मेष , आणि सिंह ह्याच राशिबद्दल बोलतात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
विलासराव Wed, 01/05/2011 - 19:36 नवीन
चला आता फुकटात माझ्या राशीबद्दल वाचायला मिळणार तर.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 01/05/2011 - 19:38 नवीन
माझी एक रास वृषभ अन दुसरी वृश्चिक आहे असे समजते...याचा काय अर्थ घ्यावा?
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत गुरुवार, 01/06/2011 - 05:46 नवीन
जन्मकाळी ज्या राशीत चंद्र आहे ती तुमची रास. पाश्चात्य पद्धतीनुसार जेथे सूर्य ती तुमची रास. (पण माझ्या अनुभवा प्रमाणे चंद्र रास नेमकी असते कारण चंद्र म्हणजे तुमचे मन.) कुठे चंद्र आहे ते पाहा म्हणजे नेमकी रास कोणती हे कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
व
वाटाड्या... Wed, 01/05/2011 - 19:46 नवीन
>> व्यक्तीस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले मी पाहीले आहेत दुसरं संशोधक वृत्ती अंगी पुरेपूर बाणलेली असते. - एकदम बरोबर.. ह्या लोकांना कुठल्याही गोष्टीच्या अंतापर्यंत जाण्याची खाजच असते. कुठल्याही गोष्टीचं सहजासहजी उत्तर देत नाहीत कारण विचार करण्याची शक्ती आणि त्यासाठी लागणारा पेशन्स हा अंगभुत गुणच असतो. ही लोकं साधारण संशोधक किंवा क्रिमीनल इनवेस्टिगेशन मधे चांगलं कार्य करु शकतात. असाधारण काम करण्याची क्षमता, त्यासाठी वाट्टेल तेवढा तन, मन धन देण्याची तयारी हे ह्यांची काही वैशिष्टे आहेत. - (जवळ पोपट नसलेला) वाटी भविष्यवाला
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/06/2011 - 05:34 नवीन
वा वा छा न . ज्ञानात भर पडत आहे अमोल
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 01/06/2011 - 11:11 नवीन
सगळ्या ज्ञान पाजळणार्‍यांसाठी हा टोमणा समजायचा का हो ज्योतिषीबुवा? अवांतरःकन्या रास अहे का हो तुमची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
आ
आत्मशून्य गुरुवार, 01/06/2011 - 05:57 नवीन
.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 01/06/2011 - 06:06 नवीन
म्हणजे नक्की काय.
  • Log in or register to post comments
म
मी ऋचा गुरुवार, 01/06/2011 - 08:40 नवीन
तुळ राशीबद्दलही बोला की कुणी :( सगळे फक्त हे लोक संतुलित असतात यवढंच सांगतात...यापेक्षा वेगळही काही सांगा कुणी तरी प्लीज.....
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/06/2011 - 10:55 नवीन
तुळ राशीला सध्या साडेसाती चालू झाली आहे . अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
N
Nile गुरुवार, 01/06/2011 - 11:50 नवीन
धंद्यात हुशार दिसता ज्योतिषबुवा, नव्या गिर्‍हाईकाला थेट साडेसाती सांगुन पार टरकवला आता साडेसात वर्ष तुमचा खिसा गरम.. क्काय्य्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
स
सूड गुरुवार, 01/06/2011 - 11:57 नवीन
धंद्यात हुशार दिसता ज्योतिषबुवा :D +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
अमोल केळकर Fri, 01/07/2011 - 05:11 नवीन
:) ++१ अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विजुभाऊ गुरुवार, 01/06/2011 - 10:03 नवीन
नवर्‍याची रास वृषभ आणि पत्नीची रास कुंभ असे एक जोडपे माझ्या पहाण्यात आहे. नवर्‍याला जेंव्हा रसीक पण करावासा वाततो नेमके त्याच वेळेस बायकोला "सीक" पण करावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 10:09 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/06/2011 - 11:11 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
N
Nile गुरुवार, 01/06/2011 - 11:51 नवीन
अरे हे ब्येस आहे की विजुभाउ, नवर्‍याचा सीक अन बायकोचा रसिक मुड असेल तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
उ
उपास गुरुवार, 01/06/2011 - 16:29 नवीन
susan miller monthly horoscope असा सर्च मारला गुगल मध्ये तर तुम्हाला ह्या बाईंचं महिन्याभराचं सूर्य राशी (इंग्लीश महिन्या)नुसार भविष्य दिसेल, अतिशय रंजक. .:) (हापीसातून लिंक देता येत नाहीये त्याबद्दल क्षमस्व..)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 01/06/2011 - 20:03 नवीन
"जिथे इतर लोक छानछोकी, कपडेलत्ते, दागदागीने आदिच्या आहारी गेलेले असतात तिथे कुंभ राशीच्या लोकांचे मन सामाजिक समस्या, बौद्धिक कोडी उकलण्यात रममाण झालेले असते. त्यामुळे पेहेराव आदि क्षुल्लक गोष्टींकडे त्यांचा ओढा अजिबातच नसतो हे माझं नीरीक्षण " "अगदी बरोबर - चिंतामणी यांच म्हणन बरोबर आहे"
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/08/2011 - 07:38 नवीन
वृषभ राशीच्या व्यक्तीना नटण्यासजण्याची हौस असते. आरसे वगैरे लावून सजवलेली रिक्षा असेल तर त्या रीक्षाचा चालक्/मालक वृशभेचा आहे असे नक्की समजा. वृषभ राशीच्या व्यक्तीना विरुद्ध लिंगी व्यक्तीचे आकर्षण असते. ते स्वपत्नीची जास्त काळजी घेतात. वृषभ व्यक्तींचे बोलणे वागणे समोरच्यावर छाप पाडणारे असते. वाचन कला संगीत वगैरे मध्ये वृषभ व्यक्तीना रस असतो. वृषभ व्यक्ती या स्थैर्याची अपेक्षा ठेवतात. त्याना अधिकाराने नाही तर प्रेमाने वश करता येते.... इति. - शरद उपाध्ये
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sat, 01/08/2011 - 11:27 नवीन
एकदा एक वृषभ राशीच्या बाई पंक्तित वाढप करत होत्या. खाली मान घालून जेवणारी माणसे पानावर हात आडवा धरुन मानेनेच नको नको म्हणत होती. बाईंनी , "घ्या ना हो ! " असा लडिवाळ आग्रह केल्यावर आडवा हात धरुन जेवणारी माणसे एकदम चमकून वर बघून " आँ ! तुम्ही होय ? मग वाढा वाढा...... " म्हणत होती. बाई पंक्तित मीठ फिरवित होत्या. :) अनुमान १ - वृषभ राशीच्या व्यक्तिना मिरवणे फार्फार आवडते अनुमान २ - पुरुष त्यांच्यापुढे गुढगे टेकतात. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा