धन्यवाद!
@आत्मशुन्यः फोटोबरोबर आलेली माहिती ठेवली इतकेच. त्यात लॅटीट्यूड/लाँजिट्यूड देखील, होती. गंमत म्हणजे आता जर (17.550000° N, 74.333333° E) असे गुगलले तर मिपाचा दुवा येतो. :-)
टारझन
01/11/2011 - 15:45
(17.550000° N, 74.333333° E) असे गुगलले तर मिपाचा दुवा येतो.
ऑस्स्स्समंच ... हे अगदी एक नंबर झकास काम झालं बघा ... :)
पक्षांच्या प्रणयक्रिडेत व्यत्यय आणणार्या विकास रावांचा निषेध. बाकी साळुंक्यांची परवाणगी घेतली होतीत काय फोटु टाकण्याआधी ? नसल्यास सांळुंक्यांतर्फे मी तुमचा पुण्ह्यांदा निषेध करतो.
तसं पहाता फोटु मधे अप्रतिम म्हणावं असं काही नाही, परंतु जाणकार आणि ज्येष्ठ संपादकांनी टाकलेला फोटु असल्याने उत्तम फोटु आहे असे म्हणतो. बाकी गगनबिहारींसारखे जानकार प्रकाश टाकतीलंच !
माझा विश्वास नाही, पण माझ्या एका मित्राला दोन साळुंक्या दिसल्या की दिवस चांगला जातो असं वाटतं. आताच त्याना हा फोटो धाडून देते.
स्वातीताईने लिहिलं आहेच, आणि मला कविता महाजनांनी 'ब्र' मध्ये दिलेली कविता आठवली.
"एक एकटी दु:खाची
दोन दोघी सुखाच्या
तीन दिसल्या पत्र येणार
चार दिसल्या खेळायला मिळणार
पाच पाची पक्वान्न देणार"
झक्कास टायमिंग :)
आहे काय ?
मस्त फोटू टीपलाय
मस्त फोटो.
मस्त टिपलाय क्षण. :)
फोटो मस्त आलाय.
किती वर्षांनी साळुंकी पाहिली....
धन्यवाद!
@आत्मशुन्यः फोटोबरोबर आलेली माहिती ठेवली इतकेच. त्यात लॅटीट्यूड/लाँजिट्यूड देखील, होती. गंमत म्हणजे आता जर (17.550000° N, 74.333333° E) असे गुगलले तर मिपाचा दुवा येतो. :-)
ऑस्स्स्समंच ... हे अगदी एक नंबर झकास काम झालं बघा ... :)
चित्र छान आहे.
(माझ्या दुसर्या संगणकावर रवाळ-पिक्सेलेटेड दिसत होते, या संगणकावर चांगले दिसते आहे. काय फरक आहे, कोणास ठाऊक...)
विकासराव आता एक कविता देखील लिहा की या फोटोवर :-) भारतभेटीची आठवण ताजी झाली. धन्यु.
धन्यवाद सहजराव!
अहो त्या फोटोतच काव्य आहे ते वाचा की. ;)
बाकी मी काही कवी नाही पण सुधीर मोघ्यांच्या चार ओळी या निमित्ताने आठवल्या:
ना सांगताच तू मला उमगले सारे
कळतात तुला ही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध?
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद
बघण्याचा कार्यक्रम चालू असावा साळुंक्यांचा.
माझी खात्री आहे ती उजवीकडची साळुंकी स्वतःला गरुड समजतेय ....खी: खी:
अहो बघण्याचा कार्यक्रम इतक्या जवळून करतात असे वाटत नाही. :-)
अहो, ते अंतर माणसातलं असावं. इथं या साळुंक्या आहेत ना... ;)
;)
छान फोटो, विशेषतः टायमिंग छान तुमचं आणि साळुंक्यांचही.
अतिशय धन्यवाद.
हर्षद.
तरीच म्हटले आजकाल विकासराव दिसत नाहीत...
छान फोटो.
पक्षांच्या प्रणयक्रिडेत व्यत्यय आणणार्या विकास रावांचा निषेध. बाकी साळुंक्यांची परवाणगी घेतली होतीत काय फोटु टाकण्याआधी ? नसल्यास सांळुंक्यांतर्फे मी तुमचा पुण्ह्यांदा निषेध करतो.
तसं पहाता फोटु मधे अप्रतिम म्हणावं असं काही नाही, परंतु जाणकार आणि ज्येष्ठ संपादकांनी टाकलेला फोटु असल्याने उत्तम फोटु आहे असे म्हणतो. बाकी गगनबिहारींसारखे जानकार प्रकाश टाकतीलंच !
- || :) :) :) ||
हा हा... छान फोटो विकास भौ!
अवांतर - हाच धागा अवलिया ह्यांनी काढला असता तर कश्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या असत्या?
-परामिक
If you don't learn from your bottles, there is no sense in making pegs.
चांगल्या आल्या नसत्या. विकास हे संममधले लाडोबा आहे हे आम्ही मागेच ओळखले होते.
- आंबोण कांदे
वन फॉर सॉरो,टू फॉर जॉय.. आठवले,:)
विकास, फोटो मस्त !
स्वाती
अगदी.
मस्तं फोटो .
माझा विश्वास नाही, पण माझ्या एका मित्राला दोन साळुंक्या दिसल्या की दिवस चांगला जातो असं वाटतं. आताच त्याना हा फोटो धाडून देते.
स्वातीताईने लिहिलं आहेच, आणि मला कविता महाजनांनी 'ब्र' मध्ये दिलेली कविता आठवली.
"एक एकटी दु:खाची
दोन दोघी सुखाच्या
तीन दिसल्या पत्र येणार
चार दिसल्या खेळायला मिळणार
पाच पाची पक्वान्न देणार"
फोटोतल्या साळुंक्या
१)साळुंका + साळुंकी
२)साळुंका + साळुंका
३)साळुंकी + साळुंकी
यापैकी नक्की काय आहेत हे कसे ओळखायचे?
ते लाँजीट्युड आणि लॅटिट्युड वरुन ओळखायचे असते. गगनबिहारींसारखे जाणकारंच फक्त ते ओळखु शकतात. कॄपया प्रकाष टाका