'बार्डसाँग्ज' - पौर्वात्य तत्त्वज्ञानाचं आख्यान
💬 प्रतिसाद
(11)
श
शिल्पा ब
Sun, 01/09/2011 - 20:41
नवीन
चित्रपट ओळख आवडली. बघते मिळतोय का.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sun, 01/09/2011 - 21:32
नवीन
छान वर्णन.
(हेवा वाटला.)
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 01/10/2011 - 02:01
नवीन
सुंदर ओळख.
चिंजं धन्यवाद!
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 01/09/2011 - 22:04
नवीन
चिंता, अॅलेक्स ग्रे हा माझा आवडता चित्रकार. मी त्याचे सॅक्रीड मिररस हे पुस्तक वाचलेले आहे. यामध्ये एका उतारा- पेरेनिअल तत्वज्ञान असे सांगते की स्त्री आणी पुरुष यांना कमीत कमी ३ प्रकारची ज्ञानप्राप्तीच्या वाटा उपलब्ध असतात- (१) अस्थि मज्जामय चक्षू (Eye of Flesh)ज्यायोगे मूर्त, भासमान, पंचेंद्रियजन्य जगताचे ज्ञान होते. (२) ज्ञानचक्षू (Eye of Mind)- ज्यायोगे अमूर्त अशा प्रतीकात्मक , काल्पनिक, शाब्दीक जगाचे ज्ञान त्यांना होते तर (३) अंतरचक्षू (Eye of Contemplation)- या योगे अधिभौतिक, पारलौकिक जगाचे दर्शन होऊ शकते . आणि ही सर्व जगं वेगवेगळी नाहीत तर ती एकमेकांत गुंफलेली असून ते एकाच जगाचे वेगवेगळे पैलू आहेत.
हे तीन चक्षू व्यक्तीत वेगवेगळ्या प्रमाणात उघडे अथवा बंद असतात. सांगायचा मुद्दा हा की हाच सिनेमा मी पाहीला असता तरी आपण उधृत केलेली सौंदर्यस्थळे मला दिसलीच असती याची शाश्वती नाही. कारण माझ्या वरील ३ चक्षूंच्या मर्यादा.
आपण फार चित्रांचे तसेच चित्रपटांचे अतोनात सुंदर रसग्रहण नेहमीच करत आला आहात. ते नेहमी करावे ही विनंती. माझ्यासारखी अतिसामान्य माणसे कोणताही चित्रपट अथवा चित्र हे ९५% अस्थि-मज्जामय चक्षूने आणि ५% ज्ञानचक्षूने पहात असतील पण आपल्यासारखे विद्वान लोक नक्की ३३.३३% तीनही चक्षूनी आस्वाद घेत असावेत असे वाटते.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/10/2011 - 03:15
नवीन
शुचिच्या प्रतिसादाचा धागा पकडूनः
मी ५% ही ज्ञानचक्षू वापरत नाही, तेव्हा असेच सुंदर धागे येऊ द्यात.
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 01/10/2011 - 03:52
नवीन
चिंजंबरोबर सिनेमा पहायचे भाग्य व नंतर त्यांच्याकडून त्या कलाकृतीचे रसग्रहण प्रत्यक्ष ऐकायची सुसंधी मिळाली आहे त्यामुळे अनुभवाने सांगतो की चिंजं यांचे ज्ञानचक्षू, अंतरचक्षू इ. प्रभावी आहेतच पण आपल्यासारख्या सामान्य लोकांपुढे ते ज्ञान समजेल अश्या प्रकारे सांगायची हातोटी / कला देखील लाजवाब!
- Log in or register to post comments
ग
गणपा
Sun, 01/09/2011 - 22:44
नवीन
सध्या मिपावर विविध भाषेतल्या/देशांतल्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या परिक्षणाची फिस्ट मिळतेय.
मित्रहो जमल्यास सोबत या चित्रपटांच्या टोरेंटची लिंक दिलीत तर दुधात साखर पडल्यांचा आनंद मिळेल. :)
मस्त :)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 01/10/2011 - 00:00
नवीन
टोरेंट डाउनलोड अमेरीकेत कायदेशीर आहे का?
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/10/2011 - 05:50
नवीन
जंतु! _/\_ !!!
एकापेक्ष एक सरस आणि सुंदर चित्रपटांची ओळख करून देऊन मेजवानी देत आहात. दुर्दैवाने मुंबई / पुण्यात असूनही महोत्सवाचा लाभ घेता येत नाहीये. पण तुम्ही काही अंशी ते भाग्य आम्हाला देत आहात त्याबद्दल शतशः धन्यवाद!
शिवाय, एखाद वेळेस हे चित्रपट बघताही येतील, पण तुमच्यासारखी तरलपणे ते चित्रपट आणि त्यातले बारकावे समजून घेणे हे खरे तर शिकायचे आहे. तुम्ही बारकावे उलगडून दाखवता, एका अर्थाने तुमच्या नजरेतून चित्रपटच दाखवता याबद्दल विशेष धन्यवाद.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 01/10/2011 - 06:05
नवीन
"....त्या अजस्र हिमालयाच्या कुशीत राहणार्या खडबडीत माणसांत मोबाईलधारकांचं मोबाईलवर्तन हे आपल्या सवयीच्या शहरी सुशिक्षित माणसांसारखंच बावळट आणि गावंढळ असतं. ..."
~ हे धमालच आहे. असे चित्रपट सातत्याने पाहात राहिल्यास रसिकाची 'टेस्ट' नकळत कशी बदलत जाईल हे पाहणार्यालादेखील कळणार नाही. भाषेची अडचण कधीही जाणवणार नाही याचे उदाहरण म्हणजे या पठडीतील चित्रपट होय. सुरेख परिचय.
इन्द्रा
- Log in or register to post comments
न
निनाद
Tue, 01/11/2011 - 06:49
नवीन
कथा आवडली आहे... सादरीकरणासाठी नक्की पाहीन.
छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
कधी कधी हे साधे दिसणारे चित्रपट भलतेच परिणामकारक असू शकतात.
- Log in or register to post comments