‘मेजॉरिटी’ - बहुमतात सामील होण्याचं प्रशिक्षण
💬 प्रतिसाद
(21)
ध
धनंजय
Mon, 01/10/2011 - 22:04
नवीन
आणि चित्रपटातील स्थिरचित्रे बघता वातावरणनिर्मितीसाठी निळ्या रंगाचा प्रभावी वापर केलेले दिसत आहे.
- Log in or register to post comments
क
क्रेमर
Tue, 01/11/2011 - 17:22
नवीन
चांगली ओळख. धन्यवाद.
खाली कोणीतरी चित्रपटाच्या नावाबद्दल विचारलेलं आहे. मर्तकान बहूसंख्य असलेल्या तर्की मुस्लिम समाजाचा आहे तर गुल अल्पसंख्यांक कुर्द. चित्रपटाच्या नावामुळे बहूसंख्येमुळे येणारी सुलभ प्रवाहपतितता (पारखे झालेले व्यक्तिस्वातंत्र्य) आणि अल्पसंख्य असल्याने स्विकारलेली खडतर स्वतंत्रता हा विरोधाभासही अधोरेखित करायचा असावा असे वाटते.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 01/10/2011 - 22:12
नवीन
थोडा फार रणबीर कपुरच्या 'वेक अप सिड' सारखा असावा अस वाटतय.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 01/10/2011 - 22:36
नवीन
हे चीत्रपट तरळत होते
या चीत्रपटाचे नाव मेजॉरिटी असे असण्याचे काही वीशेश कारण/संदर्भ ?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/10/2011 - 22:24
नवीन
अजून एक उत्तम चित्रपटओळख. जाणकाराच्या नजरेतून चित्रपट समजून घेण्याचा आनंद व्यक्त करायचा का ही कलाकृती बघितलेली नाही याचं दु:ख?
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 01/10/2011 - 23:32
नवीन
आवडली. कथानक वाचताना ओरहान पामुकच्या लेखनाची आठवण येत होती. युरोप-आशियाच्या संस्कृती-देवाणघेवाणीत मध्यभागी सापडलेला देश; अर्मेनियन वंशसंहाराला नाकारणारा, 'फॉल ऑफ कॉन्स्टँटिनोपल' या संज्ञेला आक्षेप घेणारा आक्रमक, राष्ट्रवादी वर्ग या पार्श्वभूमीवर मर्तकानचं कुटुंब आणि गुलमधला फरक नजरेत भरतो.
अवांतर - बादरायण होईल कदाचित - पण शेवटी बहुमतापुढे मान तुकवणं (तसा शेवट असल्यास), एकंदरीत परात्मभाव (एलियनेशन) हे कोसलाची आठवण करून देणारं. ("मग आपणच खुंटीवर उभं येऊन राहिलेलं काय वाईट?")
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 01/11/2011 - 02:17
नवीन
पाहीला पाहीजे.
- Log in or register to post comments
न
निनाद
Tue, 01/11/2011 - 06:39
नवीन
मस्त आणि विस्तृत परिक्षण.
चित्रपट पाहण्याचा नक्की प्रयत्न करेन.
आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. हे वाक्य पश्चिम युरोप आणि काही अमेरिकेचा भाग सोडला तर सर्वत्रच लागू आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/11/2011 - 10:35
नवीन
इनो घेतो आहे!!!
_/\_
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 01/11/2011 - 10:42
नवीन
छान ओळख.
गणपानी म्हणल्याप्रमाणे 'वेक अप सिड'ची आठवण झालीच.
- Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे
Tue, 01/11/2011 - 11:41
नवीन
फार फार सुरेख ओळख.
तिन्ही सिनेमे नोंदवून ठेवले आहेत. संधी मिळाली की लगेच पाहणार.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 01/11/2011 - 12:07
नवीन
नेहमीसारखे खास चिंजं परीक्षण आणि तेही असे की वाचणार्याला वाटावे की कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाचा आनंद घ्यावा. अगदी खास भारतीय मुशीतील "खानदानकी इज्जत" टाईपचे कथानक दिसते, शिवाय त्यात 'जातपातीच्या दृष्टीने आपण मोठे ते कनिष्ठ...' हा सूरही नायकाच्या बापाच्या शेर्यात डोकावतोच.
जगभरातील मध्यमवर्गीयांच्या ललाटी अटळ जे लिहिले आहे ते घडतेच, म्हणजे मागील पानावरून पुढे चालू...."काहीतरी क्रूर वक्तव्य करून बापाच्या पावलावर पाऊल टाकण्याची त्याची सज्जता दाखवून देतो...." लेखातील हे वाक्यदेखील चित्रपटाचे 'मेजॉरिटी' या शिर्षकाची यथार्थता पटविते.
इन्द्रा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 01/11/2011 - 12:17
नवीन
भारतासरख्या देशात हा चित्रपट कुठे मिळेल.
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Tue, 01/11/2011 - 14:11
नवीन
चित्रपटाच्या लेखकाने/दिग्दर्शकाने अतिशय नाजूक विषय हाताळला आहे.
विषय मनाला भिडला - एकेक सुटी सुटी संवेदनशील व्यक्ती समूहात वावरताना निर्ढावलेली होत जाते आणि एक बेमुर्वतखोर 'बहुसंख्य समाज' निर्माण होतो. (त्याचे पितृसत्ताक असणे हा एक योगायोग आहे की मातृसत्ताक समाज खरोखरीच मातृहृदयाचा झाला असता?)
- वा,वा ! खूपच दर्जेदार चित्रपट परीक्षण.
चित्रपट कुठे पहायला मिळेल?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 05:34
नवीन
चिंतातूर जंतू यांचे पुणे चित्रपट महोत्सवातील चित्रपटांच्या परीक्षणाखातर हार्दिक धन्यवाद.
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 01/11/2011 - 14:25
नवीन
परीक्षण आवडले. नोंद करुन ठेवली आहे. धन्यवाद.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Tue, 01/11/2011 - 16:25
नवीन
सर्वप्रथम , या सर्व चित्रपटांच्या करून दिलेल्या सुरेख ओळखीबद्दल आभार. ( म्हणजे हा प्रतिसाद जंतुंच्या सर्व चित्रपटविषयक धाग्याना लागू !)
मेजॉरिटी, पीअर प्रेशर , ट्रेंड्स , प्रवाहपतित्व , वेगवेगळ्या स्वरूपाचे साचे, त्या साच्यात स्वतःला बसवण्याची खटपट ही सगळी आधुनिक जगातली कंपल्शन्स आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरच काय, जवळजवळ प्रत्येक दिवशी "आपल्याला काय वाटते ते करावे की जनरीत पाळावी" , "नैतिकदृष्ट्या योग्य ते करावे की जनरीत पाळावी" , "आपल्या किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या आयुष्यातल्या सर्व टप्प्यांवर त्या त्या व्यक्तीला हवी ती दिशा घेऊ द्यावी की जनरीत पाळावी" याचे छोट्यामोठ्या पातळीवरचे निर्णय - कधीकधी आपल्याही नकळत - आपण घेत असतो. ही कंपल्शन्स हाच चित्रपटाचा विषय होऊ शकतो याबद्दल कौतुक वाटते. या थीमची चित्रपटमाध्यमाद्वारे करायची हाताळणी कशी असेल याबद्दल कुतुहल वाटते आहे.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 01/11/2011 - 16:45
नवीन
तुमच्या बहुतेक समीक्षणांतून चित्रपटाचं सार गवसल्याचं जाणवतं. निदान काय प्रश्न मांडले आहेत ते तरी. मात्र या ओळखीतून मला तरी चित्रपटाचं नाव मेजॉरिटी का असावं याचा अंदाज आला नाही. सर्वसाधारण यशस्वी माणसाचं (बापाचं) आयुष्य कसं काहीसं दुटप्पी असतं व त्याच्या मुलाचं कसं गोंधळलेलं असतं असा काहीसा संदेश आहे का? म्हणजे आदल्या पीढीने तत्वांना औष्ठ्यसेवा देऊन प्रत्यक्षात स्वार्थी कठोरपणाने तत्वांना मुरड घालून यश मिळवल्यामुळे पुढच्या पीढीत दिशाहीनता, चंगळवादी प्रवृत्ती येते का?
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Tue, 01/11/2011 - 20:26
नवीन
सर्वांसारखं होणं हा 'पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स' असतो. काही केलं नाही तर ते आपोआप होतं आणि मग बहुमतात असल्याचे फायदे आयुष्यभर चापता येतात. चित्रपटात हे विविध पध्दतीनं दिसतं. मित्रांबरोबर तासनतास काही न करता बसणं, डिस्कोमध्ये नाचणं या सर्वांत एक भकास रितेपण आहे आणि कळपातलं व्यक्तीचं हरवून जाणं आहे. तसंच वडिलांनी आखून दिलेल्या 'करिअर'चं आहे. एका प्रसंगात मर्तकान बांधकामाची देखरेख करताना कामगारांवर खेकसतो कारण त्याच्या लक्षात येतं की कामाचा दर्जा सुमार आहे. पण हा इतका का चिडला आहे ते कामगारांना कळतच नाही. निम्न दर्जाची सामग्री वापरून स्वस्तात उभी केलेली इमारत काय दर्जाची असणार? ती त्याच्या वडिलांची बांधकामाची चाकोरी आहे. तशीच त्याच्या वडिलांची संगोपन पध्दतीही आहे. अशा संगोपनानं मुलगा व्यक्तिमत्वहीन आणि चारचौघांसारखाच होणार. गुल येण्यानं याला छेद जातो आणि काही वेगळ्या शक्यता मर्तकानला दिसू लागतात. पण त्यासाठी चालत आलेलं सर्व काही 'जैसे थे' ठेवू पहाणार्या पितृसत्ताक पध्दतीला आव्हान द्यावं लागतं, सामोरं जावं लागतं आणि होणारे परिणाम झेलावे लागतात.
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 01/12/2011 - 01:28
नवीन
आता चित्र जास्त सुस्पष्ट झालं. या आपल्या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा परीक्षण वाचलं आणि जिस्ट कळलं. आपले समर्पक, सुस्पष्ट उत्तराबद्दल आणि घासकडवी यांचे प्रश्नाबद्दल आभार.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 01/11/2011 - 17:12
नवीन
मस्त ओळख करून दिलीत.
बाकी ‘मेजॉरिटी’ - बहुमतात सामील होण्याचं प्रशिक्षण यावरून असं वाट्तंय की याचा शेवट कदाचित मर्तकानने वडीलांचाच मार्ग सरधोपटपणे स्वीकारण्यात झालेला असावा..
- Log in or register to post comments