कायद्याचे पुस्तक आणि "copyright"
💬 प्रतिसाद
(4)
प
प्रसन्न केसकर
Mon, 01/17/2011 - 10:12
नवीन
मी या विषयातला तज्ञ नाही पण जी थोडीफार माहिती आहे ती देऊ शकतो.
कायद्याच्या पुस्तकात महत्वाचे भाग म्हणजे - १) मुळ कायद्याची कलमे (बेअर लॉ/ लेजिस्लेशन), २) त्या कलमांचे अर्थ (इंटरप्रिटेशन/ अॅप्लीकेशन स्कोप/ कॉमेंट्री/ एक्सप्लनेशन्स इ.) व ३) त्या कलमांचे विविध न्यायालयांनी कसे अर्थ लावुन निवाडे दिले त्याचे दाखले (केस लॉज/ सायटेशन्स/ ऑथॉरिटीज इ.)
यातील पहिला भाग म्हणजे मुळ कायदा हे विधीमंडळाने संमत केलेले व प्राधिकृत झालेले विधेयक असते. त्यामुळे बेअर लॉ प्रताधिकार मुक्त असतो. बहुतेक सर्व बेअर लॉजची सरकारने छापलेली पुस्तके नाममात्र किंमतीत उपलब्ध आहेत. परंतु संकलित स्वरुपात एकापेक्षा अधिक बेअर लॉजचे पुस्तक जर कोणी काढले तर तो लेखक संकलक ठरत असल्याने त्याचा प्रताधिकार त्यावर येईल. पुस्तकामध्ये जर इंटरप्रिटेशन, अॅप्लीकेशन स्कोप, कॉमेंट्री, एक्सप्लनेशन्स, केस लॉज, सायटेशन्स, ऑथॉरिटीज इ असतील तर त्या परिस्थितीतही याच न्यायाने प्रताधिकार लागु होईल.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 01/17/2011 - 11:33
नवीन
+१
याच तर्काने मेडिकल सायन्सवर येणारी माहितीपर पुस्तके किंवा आयुर्वेदिक (घरचा वैद्य, मधुमेहासाठी पथ्यकर आहार इ इ) सुद्धा कॉमन नॉलेज वापरत असूनही कॉपीरायटेड असतात..
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 01/18/2011 - 23:55
नवीन
प्रत-अधिकारमुक्त पाठ्य, आणि त्या पाठ्यावर नवीन टिपणे, असे पुस्तकाचे स्वरूप असेल, तर टिपणांवर प्रत-अधिकार असू शकतो.
- Log in or register to post comments
व
विकाल
Mon, 01/17/2011 - 11:44
नवीन
Copyrights Act 1957 हा कायदा वरील प्रश्नाचे उत्तर देईल.
सेक्शन १४ प्रताधिकार म्हणजे काय ते सान्गतो. त्याप्रमाणे प्रताधिकार कोणाला कसा लागू होतो ते सान्गीतले आहे.
- Log in or register to post comments