Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण का जगतो?

अ
अवलिया
Mon, 01/17/2011 - 08:30
🗣 95 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21026 वाचन

💬 प्रतिसाद (95)
ट
टारझन Mon, 01/17/2011 - 08:32 नवीन
मला अजुन एक प्रश्न पडला आहे , "आपण खरंच जगतो का ? "
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Mon, 01/17/2011 - 09:20 नवीन
नान्याचा धागा हायजॅक नको व्हायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 08:50 नवीन
संध्याकाळी पाणवठ्यावर जाता यावे म्हणुन. खरे सांगायचे तर ह्या प्रश्नावर मिपा सदस्य श्री. स्पा ह्यांच्याशिवाय अधिक अधिकारवाणीने कोणी बोलु शकेल असे वाटत नाही. त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 01/17/2011 - 10:55 नवीन
माझ्यामते सर्व जण जन्माला आलेत म्हणून जगत आहेत, बाकी काही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
S
sagarparadkar Mon, 01/17/2011 - 14:22 नवीन
अगदी हेच खरं उत्तर आहे ... १०००% सहमत ... उगाचच लंब्या चौड्या बाता मारण्यात काहीच अर्थ नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Mon, 01/17/2011 - 14:43 नवीन
धन्स सागर....... तूच जीवनाचं रहस्य जाणलं आहेस... बाकी चाललेल्या चर्चा वाचत आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
न
नरेशकुमार Mon, 01/17/2011 - 08:56 नवीन
मी पन खुप खुप विचार केला, (हो मी खरंच विचार केला ) पण काहीही निष्पण्ण झाले नाही. आपन खरेच जगलो नाही तर आपल्याला काय फरक पडतो ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Mon, 01/17/2011 - 08:58 नवीन
एक दिवस मरण्यासाठी...
  • Log in or register to post comments
य
यकु Mon, 01/17/2011 - 09:03 नवीन
प्र.का.टा.आ. !
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Mon, 01/17/2011 - 09:16 नवीन
जन्म होतो जो आपल्या हातात नसतो. पुढे रासायनिक प्रक्रिया जो पर्यंत थांबत नाहित तो पर्यंत मरण येत नाही. मधला काळ मग समय विमोचनात घालवतो ज्या ला आपण जगणे म्हणतो.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 01/17/2011 - 09:21 नवीन
मनोगतावर नुकताच मृत्युसंबंधी एक लेख वाचला होता. तिथे काही उत्तर मिळेल. http://www.manogat.com/node/21354
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/17/2011 - 09:31 नवीन
"जगतो म्हणजे काय ? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय "का जगतो?" हे सांगणं. नुसता विचारही करणं अवघड आहे. "साठी" आणि "मुळे" हे दोन गंमतीदार शब्द आहेत. पूर्ण विरुद्ध. कशासाठी जगतो की कशामुळे जगतो हे आधी ठरवलं पाहिजे. (म्हणजे, काहीतरी व्हायचे/करायचे म्हणून जगतो, की काहीतरी झाले/केले म्हणून जगतो..) गहन आहे विषय. (फिलॉसॉफिकल स्माईली)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 01/17/2011 - 09:34 नवीन
>>तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत? जगण्याची 'खाज' आहे म्हणुन जगतो, जगणे 'आवडते' म्हणुन जगतो. बाकी ह्याशिवाय इतर कारणे देणे महत्वाचे वाटत नाही, असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/17/2011 - 10:45 नवीन
+१ आम्हाला जगणे परवडते आहे म्हणून जगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Mon, 01/17/2011 - 10:48 नवीन
'परवडणे' हे कारण पण पुरेसे आहे. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 11:11 नवीन
सहमत. डान्रावांसारखे आणि द्येसमुखांसारखे मित्र जोवर बीलं भरत आहेत तोवरच जगण्यात अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/17/2011 - 11:40 नवीन
आणि त्यातही जगण्याची परवानगी आहे किंवा अनुमती आहे म्हणूनही जगतो आहे. परवडत असतं पण परवानगी नसती तर काय केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 11:43 नवीन
परवडत असतं पण परवानगी नसती तर काय केले असते.
हे म्हणजे 'खाते आहे पण आयडी ब्लॉक' असे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्पा Mon, 01/17/2011 - 11:44 नवीन
हे म्हणजे 'खाते आहे पण आयडी ब्लॉक' असे झाले असते. मग डू आयडी घेऊन यावे लागले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नरेशकुमार Wed, 04/27/2011 - 07:35 नवीन
डू आयडी म्हनजे काय ? आनि तो का घ्यायचा ? वरच्या सग़ळ्याम्नि लाईटली घेने रे बाबांनो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ज
जोशी 'ले' Mon, 01/17/2011 - 10:09 नवीन
आपण खरेच जगतो का? का आपण जन्म आणि म्रुत्यु च्या मधील वेळ जगणे समजायला लागलोय
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 01/17/2011 - 10:19 नवीन
दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही नाव आहे चाललेली, कालही अन् आजही!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Mon, 01/17/2011 - 10:31 नवीन
जगने हे साध्य नाही साधन आहे. वेगवेगळ्या इच्छा, हेतु पुर्न कराय्चे. कधी आनन्द स्वतःला मिळवनयासाठी, तर कधी जवळच्याना देन्यासाठी आहे , कधी गरजा पुर्न करन्यासाठी, काही मिळवन्यासाठी, अनि कधी तरी वरुन बोलावने येत नाहित म्हनुन. मी म्हनाले ते अगदी खरे नसेल हि पन मला असे वाटते.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Mon, 01/17/2011 - 10:44 नवीन
हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
न
नावातकायआहे Mon, 01/17/2011 - 10:32 नवीन
>>आपण का जगतो? आसले विचार करुन हाय तो दिवस खराब करायला.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 01/17/2011 - 10:36 नवीन
? नाना, अध्यात्मिक पातळीवरन विचारतो आहे की शास्त्रीय , वैश्विक की स्वार्थाने की परमार्थाने , सामाजिक की राजकीय ?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/17/2011 - 10:42 नवीन
सर्वच दृष्टीने विचार करायला हरकत नाही. त्यानिमित्ताने सकस निकस दृष्टीकोन समजुन घेता आला तर फायदाच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
५
५० फक्त Mon, 01/17/2011 - 11:14 नवीन
हे एक कारण होईल का पहा, अर्थात हे माझे मत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 01/17/2011 - 11:19 नवीन
आपण म्हणजे कोण?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 01/17/2011 - 11:23 नवीन
>>आपण म्हणजे कोण? :) अवलियाकाका, बोला आता. होऊन जाऊ द्या तुमचा आणि थत्तेचाचांचा सामना. बाकी नशिबाने मिळालेला असा 'हाफवॉली' थत्तेचाचा वाया घालवतील असे आम्हाला वाटत नाही ;) चर्चा वाचतो आहे. - (अवलियाकाका आणि थत्तेचाचांचा फॅन)छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
N
Nile Mon, 01/17/2011 - 11:26 नवीन
संपादकांचे असले वागणे पाहुन, आपण संपादन का करतो असा प्रश्न का पडला नाही असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अवलिया Mon, 01/17/2011 - 12:44 नवीन
>>>आपण म्हणजे कोण? अतिशय उत्तम प्रश्न. आपण हा स्वतःला निर्देशित करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. स्वतः या अर्थाने जसा मी स्वतः बोललो. तू स्वतः बोलला. तो स्वतः बोलला. ती स्वतः बोलली. या वाक्यांमधे स्वतः याअर्थाने निर्देशित होणारे चैतन्य जे देहरुपाने कार्यमग्न असते ते आपण याअर्थाने अपेक्षित असुन सध्या आपण या शब्दाचा परिघ केवळ मानववंशापुरता मर्यादीत आहे. कारण इतर प्राणीवंश जे स्वतः या अंशाने प्रतिबिंबित होऊ शकतात परंतु भाषेच्या अभावामुळे त्यांच्या अनुभव/जाणीवांची कल्पना किमान मला तरी नाही. सबब आपण या शब्दाचा अर्थ प्रत्येक मानवी जीव असा घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 01/17/2011 - 13:05 नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
S
sagarparadkar Mon, 01/17/2011 - 14:30 नवीन
लय आवडला हा प्रश्न ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मदनबाण Mon, 01/17/2011 - 11:55 नवीन
मी प्रेमा साठी जगतो आणि जगण्यासाठी प्रेम करतो... ;) अवांतर :--- श्री श्री श्री अवलिया उर्फ नाना उर्फ नानुडी... आपल्याला सुस्पष्ट उत्तर मिळालेच आणि खात्री पटली तर आम्हालाही कळवा... कसे ? ;) (लव्हर बॉय) ;)
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Mon, 01/17/2011 - 12:15 नवीन
कारण आपण मरत नाही म्हणून......
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 01/18/2011 - 13:35 नवीन
पण आपण (!/?) मरत का नाही?! ;) अवांतरः 'आपण का जगतो' हा प्रश्न मुंग्याना पण पडत असेल का? त्यांची 'जगण्याची' धडपड माणसांइतकीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
स
स्वानन्द Tue, 01/18/2011 - 13:54 नवीन
हे शाब्बास!! चेक-मेट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
इ
इन्द्र्राज पवार Mon, 01/17/2011 - 12:34 नवीन
चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता || या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर जाळते. याच अनुषंगाने "मी का जगतो?" आणि "मी का जगलो?" असा केवळ एका शब्दाच्या बदलाने प्रश्न स्वतःलाच विचारला तर माझ्यापुरते मी म्हणू शकेन की "मी अनुभव घेण्यासाठी जगतो". जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने ज्याचा त्याने आपल्या वाटेला आलेल्या खात्यावरील जमाखर्चाचा लेखाजोगा तपासून 'जगण्या' चे वल्हे कसे हाताळावे हे ठरवून आपले तारू अनुभवाच्या विशाल दर्यात न्यावे. या अखंड प्रवासातील संचित धन हेच त्याला जीवनाविषयी उभारी देण्यास कारणीभूत होत असल्याने ते मिळविण्यासाठी तरी त्याने "जगले" (च) पाहिजे; अन्यथा मानव आणि पशू यात फरकच राहणार नाही. निसर्गाने माझ्यासाठी H2O आणि O2 चा पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवला असला तरी त्यामुळे मी जगू शकेन हे खरे पण त्या जगण्याला जर 'जगणे' म्हणत असेल तर ते एखादी वनस्पतीही सहजगत्या करू शकते. पण 'जगण्याची तृष्णा' फार विलोभनीय आहे ही गोष्ट संतमंडळीही नाकारू शकत नाहीत. कोणतीही कारणमीमांसा द्या वा उपमा लावा....थोरांचे प्रेम, पत्नी प्रेम, अपत्य वात्सल्य, मित्र प्रेम...पण शेवटी उरते ते हेच सार की दिवसभराचे आपले सारे झगडणे अखेरीस जगण्याची उर्मी आणि त्याबद्दलची रत्तीभरही कमी न होणारी तृष्णा हेच होय. "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" हे दाखल्यापुरते ठीक आहे, पण या संज्ञेची रचना करणाराही जगण्याच्या तृष्णेपायी खाटल्यावरून हमखास उठला असणारच आणि मग त्याबाबतच्या शोधउत्खननाचीही गरज नाही इतके ते प्रखर आहे. नैराश्येपोटी आत्महत्येचे विचार मनी बाळगणारा रावसाहेब त्याच रात्री आमटीत आमसुल ज्यादा पडले म्हणून बायकोवर वस्स्कन ओरडतो, ते ह्याच कारणासाठी की जगण्यावरचे त्याचे प्रेम रत्तीभरही कमी झालेले नाही. 'कास्ट अवे' मधील फेडेक्सचा एक्झेक्युटिव्ह चक नोलँड चार वर्षे एकांतवासात त्या अज्ञात बेटावर अटळपणे राहतो...पण "जगतो"....आपण 'मेलेलो नाही म्हणून जगलो आहोत" असे चुकूनही त्याच्या मनी येत नाही. उलटपक्षी 'अरे, हा तर एक अनुभव आहे, जगण्याचा....आणि मी जगून दाखविनच, पाहतो कोण मला अडवे तो !" चक आणि बेटावरील त्याच्या कल्पनेतील सखा "विल्सन" हे जगण्याच्या अनुभवाचे प्रतीक आहेत. मनुष्यप्राण्यातील ही कट्टरतेचीच भावना आणि निसर्गाने जन्मजात दिलेली जगण्याची लालसा, ओढ यासाठी आणि ती सार्थअर्थाने भोगण्यासाठीच 'आपण जगतो' असे मी म्हणेन. इन्द्रा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/17/2011 - 12:50 नवीन
उत्तम प्रतिसाद. किंचित शंका जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने कंसातील वाक्य सध्यापुरते बाजुला ठेवु. जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता जन्मजात असते की भाषेच्या संवादामुळे/लेखनामुळे इतर मानवांच्या अनुभवाच्या /विचारांमुळे असे विचार मनात येतात हा प्रश्न आहे. कारण जर अशी क्षमता जन्मजात असेल तर प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ग
गवि Mon, 01/17/2011 - 12:58 नवीन
जन्मजात नसावी.. पण बुद्धिमत्ता हाच माणूसप्राण्याचा इतका अविभाज्य भाग आहे की ही विचारक्षमता किंवा इच्छा इतरांकडून (अ‍ॅक्वायर्ड) असते की बुद्धी विकसित होताना सोबत आपोआप पडणार्‍या प्रश्नांपैकी (स्वनिर्मित) तो प्रश्न आहे हे सांगणे कठीण. सर्वांनाच हे प्रश्न पडतात असं दिसतं.. इथे असलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी पडला असेल हे ते सांगू शकतील. जनरली पंधरावीस वर्षे वयादरम्यान पहिल्यांदा आणि तीव्रतेने पडतात असं वाटतं. म्हणजे त्या वयात मित्रांमधे चर्चा झडलेल्या आठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
स्वानन्द Mon, 01/17/2011 - 13:16 नवीन
क्षमता असल्याशिवाय... आपण विचार करू शकणारच नाही! असं म्हणता येईल की तिचा वापर करण्यासाठी उपरोल्लिखित कारणे कारणीभूत होतात. पण या लेखनाची सुरूवात पण कुणीतरी पहिल्यांदा केली; ती तशी क्षमता असल्यामुळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अर्धवटराव Mon, 01/17/2011 - 23:55 नवीन
>>प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला. हो. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. किंबहुना सर्व प्रश्नांचं मूळ कारण तेच असतं. ते प्रत्येकाला प्रत्येकवेळी प्रकर्षाने जाणवत नाहि हा भाग निराळा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आत्मशून्य Mon, 01/17/2011 - 13:04 नवीन
. पण आता असे पण वाटालेय की राष्ट्रपतींकडे अर्ज पेंडींग असेल तर पण जगता येते....
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 01/17/2011 - 12:55 नवीन
माझी स्वाक्षरी पहा, कारण कळेल.. हर्षद.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/17/2011 - 13:07 नवीन
मला या प्रश्नाचे उत्तर माहित नाहीये. पण गेल्या काही दिवसापासून आमचे मित्र श्री. प.रा.-जी यांना "मी अजून जिवंत कसा?" असा प्रश्न स्वतःबद्दलच पडला आहे.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 01/17/2011 - 13:13 नवीन
चांगला प्रश्न आहे. वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा खाण्यासाठी जगतोय. निखिल
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 13:31 नवीन
वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा खाण्यासाठी जगतोय.
काय ? जरा संपुर्ण वाक्यात लिहित जा. उगाच मनात नको नको ते विचार येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
न
निखिल देशपांडे Mon, 01/17/2011 - 13:38 नवीन
वरील वाक्य असे वाचावे वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा ,खाण्यासाठी जगतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
आ
आत्मशून्य Mon, 01/17/2011 - 13:48 नवीन
जर वर काही चांगली कारणे आली आहेत असे तूम्हाला वाटते आहे तर तूम्ही खाण्यासाठी जगताय असे सांगून तूमचे कारण चांगल्या कारणापासून वेगळे का करत आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा