Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[कोडे] स्त्रीमुक्ती आणि जीवशास्त्र

य
युयुत्सु
Mon, 01/24/2011 - 03:59
🗣 36 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5266 वाचन

💬 प्रतिसाद (36)
श
शिल्पा ब Mon, 01/24/2011 - 05:17 नवीन
पुन्हा तुम्ही का? बारं... साधी गोष्ट आहे, स्त्रिया प्रेम करतात अन त्यासाठी काय वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात...पण त्याचा परिणाम आपण पाहतोच आहे...म्हणून आता पुन्हा असल्या प्रकारातून मुक्त व्हायचा प्रयत्न चालू झाला आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 01/24/2011 - 06:01 नवीन
स्त्रिया प्रेम करतात अन त्यासाठी काय वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात
म्हणजे डोके गहाण ठेऊन प्रेम करतात असं सूचवायचं आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Mon, 01/24/2011 - 18:40 नवीन
हो...अन तोच मुर्खपणा अंगाशी आला दुसरे काय!! बाकी पुरुष कॅलक्युलेटेड प्रेम करतात हे तुम्ही मान्य केले हे काही कमी नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
ट
टारझन Mon, 01/24/2011 - 05:29 नवीन
" अखिल अंतरजालिय म्हैला मुक्ती मोर्चा " चे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :) -( डबल एक्स प्रेमी) टारझन कोण्या आघाव ने गुगल वर "डबल एक्स" सर्च केले असता वेगळे रिझल्ट हाती लागले असता टारझन जबाबदार नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 01/24/2011 - 06:07 नवीन
अरे व्वा युयुत्सु काकांचा स्वत्:ची काहीच कॉमेन्ट नसणारा हा आणखी एक एकोळी धागा. ( और ये लगा शिक्षर ...) अर्र थोडी सुधारणा या वेळी रेफरन्स ची लिंक धरून तब्बल चार ओळी झाल्यात की. युयुत्सु काका हल्ली निसर्गाची कोडी सोडवायला लागलेत. ज्या दिवशी पुरुषाच्या जन्मा मागील कार्यकारण भावाचे कोडे उलगडेल त्या दिवशी तुमचे कोडे उलगडेल
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/24/2011 - 06:12 नवीन
मधे पुरुषांच्या मेंदूचा साईझ मोठा म्हणून तो अधिक बुद्धिमान असेही एक संशोधन येऊन वावटळ करुन गेलं होतं. आता हे जीन्सच्या अनुषंगाने आलेलं दिसतंय. जास्त एक्स म्हणजे जास्त बुद्धी असं आहे का? पण सध्या वादापुरतं असं आहे हे मानू. म्हणजे जनरली सर्व स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त बुद्धिमान अतएव युक्तिवान असे मानू. आणि पुरुष जास्त शक्तिमान आणि थोडे कमी युक्तिवान मानू. आता.. "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ" हे तेव्हाच खरं असतं जेव्हा शक्तीवाला बैलबुद्धीचा आणि युक्तीवाला तैलबुद्धीचा असतो. जेव्हा दोघांच्या बुद्धीत थोडासाच (संशोधन करुन शोधण्याइतका सूक्ष्म) फरक असेल तर शक्तीच श्रेष्ठ ठरते. हे उघड आहे की अधिकच्या शक्तीच्या जोरावर पुरुषाने स्त्रीला व्यवस्थेत आपल्या इच्छे आणि सोयीनुसार वाकवलं. इथे मर्जिनल अधिक बुद्धिमत्तेचा उपयोग होता असं वाटत नाही. जोपर्यंत स्त्रीकडे शक्ती (नव्या संदर्भात पैसा वगैरे) येत नाही तोपर्यंत काही स्वातंत्र्य वगैरेची अपेक्षा अनैसर्गिक आहे. शक्ती असूनही ज्या स्त्रिया पारतंत्र्य मान्य करतात त्यांच्या युक्तीक्षमतेविषयी जबरदस्त शंका येते.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 01/24/2011 - 07:00 नवीन
कोडे सोडविन्यात अयशस्वी.... अ‍ॅक्चुली कोडे सोडविण्याचा विचार केलाच नाही. (तसे मला विचारच करता येत नाही म्हनाना.) अधांतर : दोन एक्स चे कोडे इतके अवघड आहे तर तीन एक्स चे कोडे कित्ती कित्ती अवघड असेल.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/24/2011 - 07:31 नवीन
आदम : देवबाप्पा, तू हव्वाला इतकी सुंदर का बनवली? देवबाप्पा : तुझे तिच्यावर प्रेम जडावे म्हणून. आदम : पण मग तिला इतकी मूर्ख का बनवली? देवबाप्पा : तिचे तुझ्यावर प्रेम जडावे म्हणून. - - - श्रेय- (आणि शिव्या-) अव्हेर : हा पीजे मी आजच "प्रेरी होम कंपॅनियन" या रेडियो कार्यक्रमात ऐकला.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/24/2011 - 07:49 नवीन
:-) (युयुत्सुंच्या धाग्यावर प्रतिसाद दिल्याशिवाय रहावत नाही, पण लिहावं काय ते ही कळत नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पैसा Mon, 01/24/2011 - 16:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Mon, 01/24/2011 - 08:43 नवीन
अरेव्वा.......... कुठेतरी तुम्ही निशःब्द झालात हे वाचुन डोळे जलजीवा झाले
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 01/24/2011 - 13:15 नवीन
जेव्हा दोघांच्या बुद्धीत थोडासाच (संशोधन करुन शोधण्याइतका सूक्ष्म) फरक असेल तर शक्तीच श्रेष्ठ ठरते
स्त्रीयांचे मेंदूपण पुरुषांच्या मेंदू पेक्षा जास्त जोड्ण्यानी जोडले गेलेले असतात, असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 01/24/2011 - 13:55 नवीन
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली.
या विधानात पुरुषाकडे बुद्धिमत्ता असते हे गृहित धरले आहे. :( हे योग्य नाही. पुरुष या प्राण्याकडे बुद्धिमत्ता नसल्याने त्याच्या दुप्पट नसलेली बुद्धिमत्ता स्त्रियांकडे असते असा कुणी प्रतिवाद केला तर?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 01/24/2011 - 14:17 नवीन
पुरुष या प्राण्याकडे बुद्धिमत्ता नसल्याने
कृपया या विधानाला शास्त्रीय आधार द्यावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Mon, 01/24/2011 - 14:26 नवीन
मी असा कुणी प्रतिवाद केला तर असा प्रश्न विचारला आहे, विधान केलेले नाही. बुद्धिमत्ता आहे असे विधान आपण केलेले असल्याने आपणच शास्त्रीय आधार द्यावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
व
वाहीदा Mon, 01/24/2011 - 14:23 नवीन
पुरषांकडे फक्त AXE factor असतो की काय अन बाकी बुध्दिमत्तेचे X कमी असते ;-) ?? अग प्रियालीताई पुरुष या प्राण्याकडे बुद्धिमत्ता कमी असते, नसते असे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/24/2011 - 14:13 नवीन
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली.
पण स्त्रीची बुद्धीमत्ता देखील 'एक्स' वरच अवलंबुन असते कशावरुन ?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 01/24/2011 - 14:18 नवीन
मी दिलेला संदर्भ बारकाईने वाचा म्हणजे कळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/24/2011 - 14:34 नवीन
ते मराठीत कुठे वाचायला मिळेल ? आमचे इंग्रजी ज्ञान म्हणजे भयाण ह्या प्रकारात मोडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
स
सूड Mon, 01/24/2011 - 14:35 नवीन
>>असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. अति तेथे माती, दुसरं काही नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/24/2011 - 14:38 नवीन
!@%$^*(())_+_+
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 01/24/2011 - 16:25 नवीन
स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त बुद्धीवान्,दयाळु,मायाळु व सहनशील आहे म्हणुनच मुल जन्माला घालण्यासारखे सर्वात कठीण काम निसर्गाने (देवाने )स्त्रीवर सोपविले आहे .आणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती चुक ठरललेली नाही म्हणुनच तर स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाबरोबर किंवा त्यांच्याहुन पुढे आहे ,स्त्री पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी पड्ली होती पण आता नाही .
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 01/24/2011 - 16:32 नवीन
स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त बुद्धीवान्,दयाळु,मायाळु व सहनशील आहे म्हणुनच मुल जन्माला घालण्यासारखे सर्वात कठीण काम निसर्गाने (देवाने )स्त्रीवर सोपविले आहे .
सहमत आहे. स्त्रीयांची सहनशिलता पुरुषांपेक्षा कैक पटीने जास्त आहे.
आणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती चुक ठरललेली नाही म्हणुनच तर स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाबरोबर किंवा त्यांच्याहुन पुढे आहे
दोन पावलं पुढं जाउन मी तर म्हणेन , स्त्रीयांनी पुरुषांना कधीच ओव्हरटेक केलंय , आणि आता तर स्त्री-पुरुषाची काँपिटिशनंच नाही.
,स्त्री पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी पड्ली होती पण आता नाही .
अतिशय महत्वाचे आणि सत्य विधान. पण अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा ला अजुन ह्या सत्याची उकल झालेली नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
ज
जयदीप Mon, 01/24/2011 - 16:38 नवीन
बहुदा एका x ने स्त्रीचा तोल गेला असता म्हणुन २ x दिले असावेत. उजवा x आणि डावा x.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/24/2011 - 17:10 नवीन
असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. कलियुग बाबा!!! दुसरं काय!!! :-P
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Mon, 01/24/2011 - 17:13 नवीन
लहानपणी आई तुडवायची , आता बायको बुकलते. युक्ती तर सोडाच पण शक्तीच्या बाबतीत ही स्त्रीच श्रेष्ठ आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 01/24/2011 - 17:15 नवीन
;) नसल्यास लवकरच लेक होवो असा आशीर्वाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
प
पैसा Mon, 01/24/2011 - 17:17 नवीन
त्यांच्या म्हातारपणाची सोय काय याचा आताच विचार करून ठेवतेस काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Mon, 01/24/2011 - 17:21 नवीन
त्यांच्या म्हातारपणाची सोय काय याचा आताच विचार करून ठेवतेस काय?
अगदी असेच नाही पण जवळपास... तुडवणे आणि बुकलणे झाले, बडवणे राहून गेले असे वाटले एवढेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
N
Nile Mon, 01/24/2011 - 17:28 नवीन
मला एक कळत नाही, पुरुष जर बुद्धिमान असता तर त्याने स्वतःप्रधान असलेल्या संस्कृतीत लग्न नावाची संस्था आणलीच कशाला? नक्कीच कुठल्यातरी हुशार बाईचे कारस्थान असेल. ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 01/24/2011 - 17:38 नवीन
हा धागा दोन ठिकाणी का दिसतोय? (Node 16431, 16432)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 01/24/2011 - 17:42 नवीन
डब्बल धागे ;) मला वाटलं की बायकांकडे एक्स-एक्स अशी डब्बल गुणसुत्रे असतात त्यामुळे त्या असली डब्बल कामे करत असाव्या.
स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली.
अरेच्चा! इथे तर युयुत्सु डब्बल धाग्यांचे चालक झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्राजु Mon, 01/24/2011 - 17:53 नवीन
डब्बल कलियुग बाई!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
आ
आत्मशून्य Mon, 01/24/2011 - 17:49 नवीन
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. "अती तेथे माती", कीव्हां "विष ही विषको मारता है"... या न्यायाने डबल वाहक असून सूध्दा परीणामकारक Result येत नसावेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 01/24/2011 - 18:55 नवीन
या धाग्याचा विषयच काय , या धाग्याकर्त्याचे नाव पाहूनच हा धागा उघडावा वाटेना. असे डझनावारी धागे न उघडताच गेले. हा धागा उघडल्यावर , त्यातला प्रस्ताव वाचल्यावर हा कशाकरता उघडला याचा पश्चात्ताप होतो आहे. धागाकर्ते , आम्हाला हे वाचताना इतका कंटाळा येतो. तुम्हाला इतक्या वेळा तेच ते लिहायचा कंटाळा कसा हो येत नाही ?
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/25/2011 - 01:57 नवीन
उत्तमकुमारचे (तेच ते) गाणे रिपीड मोड मधे चालू आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा