श्री. थत्ते यांच्याशी त्रिवार सहमत. बोगस हिंदुत्त्ववाद्यांच्या तोंडी लागणे हा मूर्खपणा आहे. डुकराशी मस्ती करताना आपलेच कपडे घाण होतात. मात्र डुकराला त्यात मजा वाटते अशा अर्थाचा एस एम एस आठवला.
साहेब त्यांची आठवण सदोदीत असते. ह्यावर लेख लिहीला नाही म्हणजे त्यांचे महत्व कमी झाले किंवा कमी वाटले म्हणून नाही लिहीले असे नाही. नेताजी सुभाष सगळ्या भारतीयांचे स्वातंत्र्य सेनानी आहेत. त्यांना प्रणाम. नेहमीच प्रणाम.
श्री. थत्ते यांचे निरीक्षण आणि थिअरी अचूक आहे.
स्वातंत्र्य मिळून ६० वर्षं होऊन गेली तरी या क्रांतिकारकांच्या तथाकथित भक्तांना अजून अक्कल आलेली दिसत नाही. कोणतीही भरीव आणि ठोस कृती न करता जयंत्या, पुण्यतिथ्या आणि नेत्यांच्या नावाने दिन साजरे करण्याने, "उचललेस तू मीठ मूठभर आणि साम्राज्याचा खचला पाया" अशा कविकल्पना करण्याने, नेहमी सत्याग्रह, चरखा चालवणे वगैरे प्रतीकात्मक कृती करण्यानेच देशाचे नसले तरी त्या नेत्यांचे आणि त्यांच्या भक्तांचे कोटकल्याण झालेले दिसत असूनही हे लोक आपापल्या क्रांतिकारी नेत्यांचा नीट प्रचार करू शकत नाहीत, त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना जोरदार भाषणे, लेख ठोकू शकत नाही म्हणजे मूर्खपणाचा आणि अव्यवहारीपणाचा कळस झाला.
नाहीतर आमचे नेते पाहा. आमचे बापू देशाचे पिता झाले, नोटांवर त्यांचाच चेहरा झळकतो. आमचे चाचा आणि त्यांचे कुटुंबीय या देशावर बरीच वर्ष राज्य करत आहेत. हे सगळं आम्ही जमवलंय ते जयंत्या, पुण्यतिथ्या दणक्यात साजर्या करून आणि एकमेकांचा जमेल तिथे उदोउदो करूनच.
असो. देशप्रेमाच्या आणि क्रांतिच्या वगैरे वाट चुकलेल्या कल्पना डोक्यात घेऊन अव्यवहारी जगात जगणार्या लोकांना हे कधीच समजणार नाही.
मला तर वाटतं की अन्य आर्थिक, राजकीय कारणांच्या उपद्रवाने ब्रिटिशांनी भारत सोडला असला तरी त्याखेरीज सर्वाधिक उपद्रव त्यांना सुभाषबाबूंचाच झाला असणार. त्यामुळे सुभाषबाबू हे निर्विवादपणे ब्रिटिशांना सर्वात जोरदार धक्का होते.
बाकी म. गांधींच्या विचारसरणीने संख्याबळ बरेच जमवले आणि सामान्य जनतेचेही मत आपल्या बाजूला नाहीये याची मानसिक जाणीव ब्रिटिशांना दिली. तो ही एक ब्रिटिशांचे मानसिक खच्चीकरण करणारा प्रकार होताच.
एकूण स्वातंत्र्यात सर्वच प्रामाणिक विचारसरणींचा वाटा होता आणि स्वातंत्र्य हा सर्वांच्या विविध बाजूंनी आलेल्या रेट्याचा आणि इतरही बाह्य घटकांचा मिळून एकूण परिणाम होता.
<बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.>
थत्ते साहेब,
सशस्त्र क्रांतिकारकांवरील एकुण लेख; त्यापैकी केवळ त्यांच्यावर काही निमित्ताने लिहिलेले लेख आणि सत्याग्रह आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांवर लिहिलेल्या लेखांना वा त्या लेखांच्या नायकांना नामोहरम करण्यासाठी / बदनाम करण्यासाठी लिहिलेले लेख यांच्या संख्येचा काही तपशिल आपण देउ शकाल का?
तो द्या मग आपण़ पुढे बोलु.
बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.
१०० % सहमत आहे. ज्यांनी आयुष्यात मुंगीसुद्धा मारलेली नाही त्या लोकांच्या तोंडी गांधीजी कसे नेभळट होते अशा पद्धतीची विधाने नेहमी कानावर येतात. या संदर्भात पु.ल. देशपांडे यांच्या खिल्ली या पुस्तकातले 'एका गांधी टोपीचा प्रवास' हे प्रकरण जरुर वाचावे.
नेताजींचे कर्तुत्व मोजक्या शब्दात सांगायचे तर
एकटा माणूस देशाबाहेर जातो .सशस्त्र सेना उभारतो .त्यासाठी निधी उभारतो .
सर्वात महत्वाचे म्हणजे १८५७च्य लढ्यानंतर भारतीय सैन्य /पोलीस हे ब्रिटीशांची एकनिष्ठ होते .
नेहरू /गांधी अगदी क्रीन्तिकारक सुद्धा त्यांची निष्ठा विचलित करू शकले नव्हते .
ते नेताजींनी करून दाखवली .
सावरकरांनी सैन्यात भरती व्हा ह्या संदेशामागील गर्भित अर्थ तोच होता .
आज जपान ने हाराकिरी केली नसती (अर्थात अनु बोंब हा त्यावेळी जगात एक चमत्कार होता .त्यांची निर्मितीने जगाचा त्यावेळचा व आताचाही इतिहास बदलला .किंबहुना प्रत्यक्ष युद्धाची कल्पना संपुष्टात येऊन शीत युद्ध व आता प्रोक्सी वॉर जे अतिरेकी करतात .ते उदयास आले )
तर इतिहास वेगळा असता .
१९४२ च्या चलेजाव च्या चळवळीत नाविक दलातील बंड हे आझाद हिंद सेनेचा पराक्रम व त्याला देशभरातून मिळणारी साथ ह्यामुळेच शक्य झाला नाहीतर राजकीय संताच्या मिठापासून इतर सत्याग्रहात भारतीय जनतेवर लाठीचार्च करणारे भारतीय वंशाचे भारतीय पोलीस होते .हे विसरून न चालणार नाही
नेताजींचे कर्तृत्व?
मलेशियात अजुन जीवंत असणार्या आझाद हिंद सेनेत स्वतःला झोकुन दिलेल्या महिला सांगतील त्यांच कर्तृत्व. पुर जन गण मन म्हनुन दाखवतात त्या अजुन. जेम्व्हा माघार घ्यायची वेळ आली तेम्व्हा स्वतः नेताजी त्यांना सुखरुप परत आणण्यात सहभागी कसे होते, हे ही सांगतील त्या तुम्हाला. आपण त्या दिव्याच्या छायेच्याही आसपास नाही फिरकु शकलोम्हनुन कदाचित आपल्याला फक्त वाचलेल्या गोष्टींनी एव्हढ प्रभावित होण जमत नसाव.
वर जपान च्या भु भागा बद्दल चर्चा वाचली, ब्रिटीशांचा भु-भाग फार मोठा होता का?
कुठल्याश्या पिक्चर मध्ये एक वाक्य ऐकल होत एका कोम्रेडच्या तोंडुन' आजादी अगर इनके तरीकेसे मिलती तो वो आजादी कुछ और ही होती, हम आज कुछ और होते।' अन पटलही होत.
चर्चा प्रस्तावकांनी (मा. थत्त्यांना) सुभाषचंद्रबाबूंना स्वतःच्या लेखात केवळ "नामके वास्ते" देखील आदरांजली वाहीलेली दिसली नाही पण "सत्याग्रहाला डिसक्रेडीट.." वगैरे म्हणलेले आहे. त्यावरून खालील पैकी एक अथवा एका पेक्षा अधिक निष्कर्ष निघू शकतात असे वाटते. ;)
निष्कर्ष १: त्यांना सुभाषबाबू आणि त्यांच्या (म्हणजे सुभाषबाबूंच्या) स्वातंत्र्य चळवळीतील योगदानापेक्षा "सत्याग्रहाला डिसक्रेडीट" करणारे महत्वाचे वाटतात...
निष्कर्ष २: सुभाषबाबू हे कधी काळी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने एका काँग्रेसच्या नेत्याची आठवण ठेवली गेली नाही म्हणून त्यांचे मन दुखावले गेले असावे.
निष्कर्ष ३: ज्या महात्म्याशी झालेल्या वैचारीक मतभेदामुळे सुभाषबाबूंनी काँग्रेस सोडली त्यांच्या पुढच्या काही दिवसातच येणार्या पुण्यतिथीच्या वेळेस येथे काही वादावादी होऊ नये या उदात्त हेतूने "जस्ट इन केस" असा वैचारीक "प्रिएम्प्टीव्ह स्ट्राईक" केला असावा. ;)
चर्चाप्रस्ताव वाचून झिरो सम गेम या प्रकाराची आठवण येते.
"झिरो सम गेम" मॉडेल मधून विचार करणारे इतरांचा फायदा तो आपला तोटा नि इतरांचा तोटा तो आपला फायदा अशा सोप्या तत्वाने जगाकडे पाहतात. या सर्व प्रकरणात "आपण" विरुद्ध "ते" असा सगळा सोपा प्रकार असतो.
सुभाषचंद्रांवर श्रद्धांजली नाही म्हणजे खरा अजेंडा "सुभाष-आणि-इतर-सशस्त्र-मार्गाक्रमणी यांचा सन्मान" नसून "गांधीप्रणित-मार्गाचा-विरोध" हा आहे हे थोडेसे वरील मॉडेलमधे बसवता येते.
थत्तीजींनी नेमकं मर्मावर बोट ठेवलं. सशस्त्र क्रांतीवाल्यांचं योग्य मुल्यमापन देशाने केलं नाहि, आणि ज्यांचं केलं ते केवळ हार-तुरे वाहण्यापुरते.
अर्धवटराव
स्वॅट (SWAT) मुव्ही मधिल सुरुवातीचा एक सिन आठवला.
त्यात एक स्वॅट सैनिक एका महिलेस आपल्या जिवाची बाजी लावुन वाचवितो. पण तीच महिला तिला झालेल्या किरकोळ दुखापतिबद्दल त्याच्याच विरुद्ध केस ठोकते. तेव्हा तीला वाचविलेल्या त्या सैनिकाचे वाक्य ऐकन्यासारखे आहे.
Captain Fuller, we get two seconds to make a decision. You get to sit there for two months and tear it apart ?
इथे ऐका
http://www.youtube.com/watch?v=OlrdR94d4Ck&feature=related
वरिल सिनेमातील वेळ ९.०० ते ९.१४ दरम्यान ते वाक्य ऐकता येइल.
एक वेळ असा मनात विचार येतो,
जे सगळे लढले (कसेही, हातात चाकु सुरे घेउन, बंदुक घेउन कि लाठि घेउन), त्यांचा असा कीस काढला जातो, भविष्यात पुन्हा स्वातंत्र्य मिळविन्याची वेळ आली तर पुन्हा असा कीस काढुन घेन्यासाठि कोण जीव धोक्यात घालणार आहे ?
भविष्यात पुन्हा स्वातंत्र्य मिळविन्याची वेळ आली तर पुन्हा असा कीस काढुन घेन्यासाठि कोण जीव धोक्यात घालणार आहे
अगदी बरोबर नाही घालणार जीव कोणीही धोक्यात. पण असेच लोक क्रांतिकारकांचा जयघोष करत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गांधीजी कसे बावळट असे सिध्द करायचा जो प्रयत्न करतात. स्वत:ला क्रांतिकारकांचे मुकुटमणी समजून सुभाषबाबूंनी स्वातंत्र्य कसे मिळवले हे दाखविण्याऐवजी ते गांधींनी कसे मिळवले नाही हे दाखवून द्यायची अनेकांची धडपड चालू असते.त्या प्रवृत्तीला विरोध म्हणून तर इतके रामायण लिहिले.मला वाटते थत्ते साहेबांच्या मूळ चर्चा प्रस्तावाचा उद्देशही तोच आहे.
चर्चेचा रोख घसरलाय
विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही.
बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.
यवर चर्चा व्हावी. गांधींच्या मार्गाने स्वातन्त्र्य मिळाले कारण गांधींच्या कडे बहुसंख्य लोकाना त्याना जमेल त्या मार्गाने चळवळीत सहभागी करण्याची जादू होती.
सशस्त्र मार्गाने क्रान्ती करण्याची कल्पना भारतात सर्वमान्य होणे अवघड होते.
समजा सशस्त्र मार्गाने क्रान्ती झाली असती तर ....ती नेमकी कोणाच्या प्रयत्नाने झाली असती आणि त्यानन्तर देशाची परिस्थिती कशी झाली असती.
सावरकरांची हिन्दुमहासभा ( हिन्दुत्व वादी ), भगतसिंग ( कम्युनिस्ट ) ,जिन्नांची मुस्लीम लीग , खलीफाचे राज्य प्रस्थापीत व्हावे म्हणून झालेली खिलाफत चळवळ ,स्वातन्त्र लढ्याला विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे सम्स्थानीक
या सर्वानी भारतावर कसे राज केले असते?
सुभाषचंद्रांच्या थोरपणाबद्दल कोणीच शंका घेण्याचे कारण नाही.
थत्त्यानी योग्य मुद्द्यावर बोट ठेवले. सुभाषचंद्रांची आठवण केवळ वादवितन्डा साठीच होते
>>गांधींच्या मार्गाने स्वातन्त्र्य मिळाले कारण गांधींच्या कडे बहुसंख्य लोकाना त्याना जमेल त्या मार्गाने चळवळीत सहभागी करण्याची जादू होती.
गांधींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
गांधींनी लोकमान्यांच्या लोकसंग्रहाच्या बीजाचे महावृक्षात रुपांतर केले. गांधींची स्टाईल टिळकांपेक्षा अगदी भिन्न होती, पण टिळकांच्या लोकसंग्रहाचे महत्व गांधींना पण अवगत होते आणि म्हणुनच टिळक वारल्यानंतर भारतीय जनमानसाला पोरकेपणा जाणवला नाहि कारण त्यांना आता राष्ट्रपीत्याचा आधार होता. सशस्त्र क्रांतीची पूर्ण तयारी नसताना इंग्रजांविरुद्ध हत्यार उचलून स्वातंत्र्य चळवळीचा घात करुन घेण्यापेक्षा सर्वसामान्य माणुस त्याच्या ऐपतीने मनापासुन स्वातंत्र्यसंग्राम करु शकेल अशी नवीच टेक्नीक गांधींनी वापरली. त्याने लोकमानस तयार तर झाले पण त्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले/भविष्यात मिळू शकले असते याची शक्यता नाहि. कारणे...
१) गांधींचा इंग्रजांच्या हृदयपरिवर्तनावर जो भर होता तोच मुळी चुकीचा होता. क्रूर, रानटी, संतापी माणसाचे हृदय परिवर्तन करता येईल, व्यापार्याचे नाहि. व्यापार्याचे हृदयपरिवर्तन त्याचा नफा निघुन गेल्यावरच होते अन्यथा नाहि
२) चौरीचौरा सारख्या घटनांनी गांधींनी आपल्या चळवळी मागे घेतल्या. जनतेने असा सेटबॅक नेहमी सहन केला नसता
३) अनुयायांच्या बाबतीत गांधीसुद्धा इतर लोकोत्तर पुरुषांप्रमाणे कमनशीबी होते... गांधींसारखी आत्मशक्ती आणि व्हिजन त्यांच्या कुठल्याही शिष्यात नव्हते. परिणामी गांधींनंतर त्यांच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा त्याच ताकतीने लढल गेला नसता. या बाबतीत सशस्त्र क्रांतीवाले नशीबवान म्हणावे लागतील... जगात सशस्त्र क्रांतीचे हवी तेव्हढी उदाहरणे आहेत. एखादा योग्य सेनापती भारतात उपजायचे चान्सेस एखादा नवा गांधी उपजण्यापेक्षा खूप जास्त होते.
४) गांधींची मोहिनी भलेही वादातीत होती, त्यांचा "संतपणा"हि निर्विवाद सिद्ध होता, पण राजकारणाच्या बाबतीत गांधींचे पायही मातीचेच होते. आणि त्यांना सुभाषबाबुंनी सक्सेसफूल काटशह दिला होता. गांधी पुरस्कृत उमेदवाराला सुभाषबाबुंनी कोंग्रेस अध्यक्षीय निवडणुकीत पराजीत केले होते. थोडक्यात, गांधी इफेक्ट सदा-सर्वकाळ चालणारा नव्हता.
५) सशस्त्र क्रांतीवाल्यांच्या बाबतीत एक गैरसमज उदंड आहे कि त्यांना रक्तपाताशिवाय आणाखी काहि कळत नव्हतं. हे निखालस चूक आहे. सुभाषबाबु सारख्या लोकांना सशत्रक्रांती म्हणजे "एका देशाच्या सैन्याने आपल्या देशाच्या रक्षणार्थ दिलेला लढा" याच न्यायाने अभित्रेत होती. स्वतंत्र भारताचा कारभार कसा असावा याच्या रुपरेखा त्यांच्या मनात पक्क्या होत्या. किंबहुना कुठलेही राष्ट्र सैन्यशक्तीशिवाय स्वतंत्र्य राहु शकत नाहि आणि भारताचा देशपातळीवर सैन्यदलाचा अभाव हेच परतंत्र्याचे मुख्य कारण आहे, हा जगमान्य, इतीहासमान्य नियम (सुभाषबाबु, सावरकरांसारख्या) सशत्र क्रांतीवाल्यांना समजला होता. सशस्त्र क्रांतीकडे याच चौकटीतून बघायला हवे.
६) गांधींचा स्वातंत्र्य संग्राम, त्यांच्या राजकीय खेळी अजुनपर्यंत पूर्णपणे लोकांसमोर आलेल्या नाहि, जनमानसात समजलेल्या नाहि, तर गुप्त स्वरूपाच्या सशस्त्र क्रांतीवाच्या चळवळींवर योग्य प्रकाश पडणे किती दुरापास्त असेल. काहि प्रमाणात (नव्हे प्रचंड प्रमाणात) स्वतंत्र भारतात एका गांधी मार्गाचा उदोउदो केला गेला आणि बाकी इतरांकडे (जाणुनबुजून ??) दुर्लक्ष्य केले गेले. याचाच परिणाम म्हणजे सशत्र क्रांतीवाले हे निव्वळ धोरणरहीत, विस्कळीत, चुकीच्या मार्गाने जाणारे असा काहिसा गैरसमज आपल्यात पसरला आहे. आग्र्यात कैदेत जर शिवाजीचा काटा काढला गेला असता (तशी सिद्धता बहुतेक झाले होती, पण महाराज योग्य वेळी निसटले) तर आज त्यांच्याबद्दलही असाच प्रचार झाला असता.
विषयाचा आवाका फार मोठा आहे, आणि आमचा अभ्यास फार तोडका... मुख्य म्हणजे हा धागा वेगळ्याच विषयावर काढलेला आहे. पण भरकटणे हा आमचा स्वभाव आहे... काय करणार...
(भरकटलेला) अर्धवटराव
अर्धवटराव यांनी चांगले विश्लेषण केले आहे म्हणून खरेतर यावर उत्तर देणार नव्हतो पण विकास यांना "म्हैस खाटा उडवून पळून गेली" असे वाटल्यामुळे हा प्रतिसाद देत आहे.
>>काहि प्रमाणात (नव्हे प्रचंड प्रमाणात) स्वतंत्र भारतात एका गांधी मार्गाचा उदोउदो केला गेला आणि बाकी इतरांकडे (जाणुनबुजून ??) दुर्लक्ष्य केले गेले.
यावर उत्तर म्हणून माझे परममित्र अवलिया यांच्या प्रतिसादातील पुढील परिच्छेदाकडे लक्ष वेधू इच्छितो.
एकही लेख लिहिला गेला नाही किंवा धागा काढला गेला नाही म्हणजे आठवण झाली नाही हे म्हणणे बरोबर नाही. भगतसिंग, सावरकर, बोस, राजगुरु ही मंडळी आम्हाला सदैव आदर्श वाटतात. त्यांनी निवडलेले मार्ग हे त्या त्या परिस्थितीत त्यांना जे करावे वाटले त्यानुसार त्यांनी केले. त्यांच्या देशभक्तीबद्दल कुणाच्याही मनात काहीही शंका कधीच नव्हती. नसेल. राहता राहीला आठवणींचा प्रश्न. आठवण तेव्हाच येते जेव्हा विसर पडतो. ह्या महान लोकांचा आम्हाला कधीही विसर पडत नाही त्यामुळे "अरे हो .. बरे झाले आठवण आली... " असे कधीही होत नाही.
सदरहु मंडळींचा उदोउदो झाला नाही म्हणजे त्यांना विसरले गेले असे समजायचे कारण नाही असे अवलिया यांचेही मत दिसते. ;)
सशस्त्र क्रांतीवाल्यांना भारतवासी किती स्मरण करतात आणि त्यांचा उदोउदो होतो कि नाहि हा माझ्या करता गौण मुद्दा आहे. तसबीरींवर हार-तुरे चढवून मानवंदना देउन मनाचे समाधान होईल एक वेळ... पण स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्वाची आणि तेव्हढीच इफेक्टीव्ह विचारधारा म्हणावी तेव्हढी अभ्यासली गेली नाहि याचं जास्त दु:ख आहे. ते लोक सरफिरे कत्तलबाज नव्हते, आताताईपणे जीव गमावणारे वेडे नव्हते आणि त्यांच्या चळवळी फुसके बार देखील नव्हते. शिवाजीच्या गनिमी काव्याला आणि राजनितीला उशीरा का होईना थोडाफारतरी दखलपात्र न्याय मिळाला, पण सुभाषबाबुंसारख्यांकडे अक्षम्य डोळेझाक झाली ही खंत आहे...
चालायचच.
अर्धवटराव
एकंदर रागरंग पाहून या धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते. परंतु आमचे परममित्र यांनी आमचाच परिच्छेद त्यांच्या सोईनुसार वापरला आहे म्हणून खुलासा.
नितीन थत्ते यांनी लिहिलेल्या
सदरहु मंडळींचा उदोउदो झाला नाही म्हणजे त्यांना विसरले गेले असे समजायचे कारण नाही असे अवलिया यांचेही मत दिसते.
ह्या वाक्याला आमच्या परिच्छेदातील
ह्या महान लोकांचा आम्हाला कधीही विसर पडत नाही त्यामुळे "अरे हो .. बरे झाले आठवण आली... " असे कधीही होत नाही.
हे वाक्य आधार वापरले असावे असे वाटते.
सबब खुलासा असा की, आमच्या वाक्यातील "आम्हाला" हा शब्द केवळ प्रथमपुरुषी एकवचनी "मी" या शब्दाने सुचित होणार्या अर्थाला पर्याय म्हणुन वापरला आहे. सुज्ञांना ते आधीच समजले असेल, इतरांना आता कळले असावे अशी अपेक्षा आहे.
बाकी चालू द्या !!
सुभाषबाबुंना जयंतीनिमीत्त अभिवादन. ते एक महान स्वातंत्र्यसेनानी होते. एवढ्या प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी देशविदेशातले दौरे करुन तिकडुन मदत मिळवली होती.
पण इथले लोकं त्यांच्याही नावाचे राजकारण का करत आहेत ?
वरील चर्चा वाचत असताना (आणि अंशतः सहभागी पण झालो आहे), मला एकदम पुलंच्या "म्हैस" या कथेची आठवण झाली आणि त्यातील शेवट आठवला: ज्या म्हशी मुळे सर्व चाललेले असते ती "नायिका" खाटा उडवून निघून देखील गेलेली असते. ;)
डिसक्लेमरः यात मी सुभाषबाबू,अथवा इतर कुणाचीही म्हशीशी तुलना करत नाही आहे. प्रहारप्रिय नितीनरावांची तर नाहीच नाही. ;)
रंगून येथील आझाद हिंद बँक किंवा बँक ऑफ ईंडीपेंडन्स तर्फे जारी केलेली हि नोट.
आताच्या नोटेवरचा फोटो बघून कंटाळा आलाय,येत्या काळात भारतीयांच्या खिश्यात नेताजींचे चित्र असलेल्या नोटा असतील हीच आशा आर.बी.आय. कडून !
१९४३ साली नाझी जर्मनी मध्ये तयार करण्यात आलेलं नाणं, यावर आर्झी हुकुमत ए आझाद हिंद असं कोरलेलं आहे
असल्याने हा प्रतिसाद उशीरा देत आहे.
सुभाषबाबुंनी जपानशी केलेल्या हातमिळवणीबाबत मला नेहमीच उत्सुकता वाटत राहिलेली आहे. त्यात आत्तापर्यंत जेव्हढी माहिती जगासमोर आली त्यापेक्षा बरीच अधिक अद्याप लपुन राहिल्याची शक्यता मला वाटते. आत्तापर्यंत जगासमोर आला आहे तो फक्त जेत्यांनी लिहिलेला जेत्यांचा इतिहास.
दुसर्या महायुद्धात जपान्-जर्मनी-इटलीशी हातमिळवणी करुन स्वातंत्र्य मिळविण्याचा मानस फक्त सुभाषबाबुंचाच नसावा तर त्याखेरीज अन्य अनेक भारतीय घटकांनी त्या दृष्टीने पाऊले उचलली असावीत व सुभाषबाबु हे त्यावर प्रत्यक्ष कारवाई करणारे पहिले नेते असावेत.
असे मत मी प्रतिपादन करण्याचे कारण म्हणजे जपान्-जर्मनी-इटलीशी भारतातील अन्य काही घटकांनी हातमिळवणी करण्यासाठी चर्चा केल्या असल्याचे काही दाखले आहेत. पतियाळा संस्थानचे राजे भुपिंदर सिंग (हे तत्कालिन क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष देखील होते.) व कपुरथला संस्थानच्या तत्कालीन राजाने हिटलर व मुसोलिनी यांच्याशी या संदर्भात बोलणी केली होती असे या दोन्ही संस्थानांमधे काम केलेले दिवाण जर्मन दास यांच्या आठवणींमधे नमुद केलेले आहे. १९३० नंतर या संदर्भात बोलण्यांच्या किमान पाच सहा फेर्या झाल्या व त्यातील काही चर्चांमधे आपण स्वतः उपस्थित होतो, इंग्रजांना भारतातुन हाकलुन दिल्यावर एतद्देशीय माणसांकडे स्थानिक सत्ता सोपवायची व भारतामधील व्यापारातुन जपान्-जर्मनी-इटलीने पैसे कमवायचे तसेच उपखंडातील व अफ्रिकेतील अन्य देशांमधे भारताच्या सहकार्याने वर्चस्व/ सत्ता प्रस्थापित करायची असे ठरत होते असा त्यांचा दावा आहे. अर्थात हे यथावकाश इंग्रजांच्या ध्यानात आले व त्यांनी संबंधितांना तंब्या देखील दिल्या.
दिवाण जर्मन दास यांच्या आठवणींनुसार त्या सुमारास इंग्रज अधिकार्यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला अनेक स्थानिक संस्थानिक विटले होते. विषेशत: ड्युक ऑफ वेलिंग्टन व त्याच्या पत्नीविरुद्ध त्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे सदर ड्युकला इंग्लंडला परत देखील बोलावुन घेण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर संस्थानिकांचे धाडस बळावले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात हिटलरने दक्षिण अशीयामधे आपले प्रतिनिधी प्राथमिक टेहेळणीसाठी पाठविलेले होते.
दुसर्या बाजुला तुर्कस्तानच्या खलिफाला पदच्युत करण्याच्या प्रकरणामुळे दक्षीण अशीयातील मुस्लीम देखील इंग्रजांच्या विरोधात होते. १८५७ चे बंड थोपविण्याकरता इंग्रजांनी केलेले अमानुष अत्याचार, इंग्रजी राजवटीत त्यापुर्वी सत्ताधारी असलेल्या मुस्लिमांची झालेली पीछेहाट इ. परिस्थिती देखील मुस्लीम्-इंग्रज संबंधात दुरावा आणण्यास पोषक असावी.
त्याखेरीज तेव्हा अनेक भारतीय सैनिक इंग्रजांच्या वतीने अनेक महिने परदेशात लढत होते व मृत्युमुखी पडत होते. त्यामुळे सैन्यामधेही चलबिचल असण्याची शक्यता होती. हे सैन्य जर भारत स्वतंत्र झाला असता तर तटस्थ राहिले असते व त्यायोगे युद्धाचे पारडे संपुर्ण फिरु शकले असते. भारत स्वतंत्र होण्याने रशीयावर देखील दबाव येऊ शकला असता हा भाग वेगळा.
ही परिस्थिती अर्थातच अमेरिका युद्धात सक्रिय होण्याआधीची. अमेरिका युद्धात उतरण्यापुर्वी युद्ध हे जर्मनी-इटली व इंग्लंड-फ्रान्स या दोन गटातच पेटले होते व फ्रान्सची शक्ती जर्मनीच्या तुलनेत खुपच कमी होती हे देखील लक्षात घेणे अपरिहार्य ठरते.
प्रतिक्रिया