Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज्ञार्थी वाक्ये आणि व्यक्तीस्वातंत्र्य

श
शुचि
Mon, 01/24/2011 - 19:35
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3578 वाचन

💬 प्रतिसाद (17)
इ
इंटरनेटस्नेही Mon, 01/24/2011 - 19:55 नवीन
काहीच कळले नाही.. :( - (खुलासाप्रेमी) इंट्या.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 01/25/2011 - 04:38 नवीन
अ बिग बौणसर !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
अ
अंतु बर्वा Mon, 01/24/2011 - 20:06 नवीन
सहमत आहे... आमच्या ऑफशोर च्या मॅनेजर ला काही काम करुन हवे असेल तर सरळ हे आज संध्याकाळपर्यंत करा असे सांगायचा (मग मला ते काम संपवण्यासाठी रात्रीचे १० वाजले तरी हरकत नाही). त्याउलट माझी इथली अमेरिकन मॅनेजर म्हणते, आज संध्याकाळ पर्यंत एवढ काम करायचं आहे, Do you think you'll be able to do it? If not we can discuss. (इथे अमेरिकन लोकांची विचारसरणी भारतीयांपेक्षा कशी उदात्त आहे हे दाखवण्याचा उद्देश नाही... एक निरीक्षण म्हणून मांडलं...)
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 01/24/2011 - 20:10 नवीन
त्यांचे काही तोटे सुध्धा आहेत कोकेन च्या आहारी जाणे किंवा अश्या अनेक गोष्टी करणे ह्यापासून पालक त्यांच्या मनात असून सुद्धा काही करू शकत नाही .कारण इट्स माय लाइफ ह्या गाण्यावर त्यांनी सुद्धा तरुणपणी ताल धरला होता . भारतीय पालक व अमेरिकन पालक हे दोन्ही टोकाची भूमिका आहेत .ह्यातील सुवर्ण मध्य हवा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
प
प्रियाली Mon, 01/24/2011 - 19:58 नवीन
येथे आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 01/24/2011 - 20:04 नवीन
शुचिताई अगदी योग्य निरीक्षण आहे. मला तरी अमेरिकन सहकार्‍यांशी बोलताना ह्याचा प्रत्यय नेहमीच येतो. - पिंगू
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 01/24/2011 - 20:56 नवीन
बाकी ह्या अमेरिकन लोकांचा जेव्हा देशाबाहेर उर्वरित जगाशी संपर्क होतो तेव्हा उर्मट व उद्दामपणा सर्रास प्रत्ययाला येतो .अर्थात युरोपात त्यांची पत्रास ठेवली जात नाही . पण आपल्याला सगळ्यातील सगळे कळते व प्रत्येक गोष्टीबद्दल स्वताचे मत उर्वरित लोकावर त्यांना ठसवायला आवडते . अर्थात ह्यांचे एक उदाहरण वेगळ्या अर्थाने बोयल साहेब आपल्या सिनेमातून देतात .स्लम डॉग मध्ये अमेरिकन कुटुंब जेव्हा नायकाला बालपणी मार खातांना पाहते .तेव्हा त्याला प्रत्यक्ष मदत करण्या पेक्षा त्याला पैसे देऊन स्वताचा कार्य संपल्याचा थाटात पोबारा करतात .
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/25/2011 - 00:06 नवीन
होय, निरिक्षण मान्य आहे. आज दुपारीच योगायोगाने हा प्रश्न माझ्याही मनात येऊन गेला. त्याला उत्तर असे मला तरी मिळाले नाही. सुवर्णमध्य साधणे शक्य आहे पण अवघडही.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 01/25/2011 - 02:44 नवीन
जगात सर्वत्र थोड्याफार फरकाने समाज शास्त्रांद्यांची उपेक्षा होते. .समाजाचे भूतकाळातील वर्तन व वर्तमान काळातील घडामोडींचा समाजावर भविष्यात काय परिणाम होईल. ह्याचा विचार हि मंडळी करतात पण कॉमर्स (व्यापार ) सायन्स (प्रगती ) आर्ट (कला ) ह्यांना जगात डिमांड आहे पण भारतात कला शाखेत अंतर्भाव असलेला हा विषय अक्षम्य रित्या दुर्लक्षिला जातो . समाजाचे वर्तन ह्यावर संशोधन करावे म्हणजे का एखादा राज्य समाज श्रीमंत आहे .तर एखादा पुरोगामी तर सनातनी व कच्चे दुवे कसे मजबूत करायचे ह्यावर अजिबात संशोधन होत नाही, ,मग सुर्वण मध्य साधायचा म्हंजे नेमके काय करावे इथ पासून सुरवात होते व तीचा शेवट आमच्या वेळी असे नव्हते किंवा आमच्या परंपरा आमच्या रूढी अश्या वाक्यांनी होतो, .पूल देशपांडे ह्यांनी असामी असामी मधून शहरी जीवनाचे चाळकरी पिढीचा एक प्रबंध आपल्या समोर मांडला आजही त्या पिढीचे राहणीमान /मुल्ये आपल्यासमोर उभी राहतात . मारवाडी समाजाचे असेच सुंदर दर्शन गिरुश जखदिया ह्यांनी एका मारावाद्यांची गोष्ट ह्यातून केला आहे. .फ़ॉर हिअर ऑर टू गो मधून अपर्णा वेलणकर ह्यांनी अमेरिकन अनिवासी संस्कृतीचा लेखाजोगा उत्तम मांडला गेला आहे . पण भारत हा खंडप्राय व विविध परंपरेने नटलेला देश आहे .जो एकाच वेळी अनेक शतकात व दशकात जगात आहे .तेव्हा अश्यावेळी समाजाला मूल्यशिक्षण /समाजसुधारक / आणि समाज शाश्त्रज्ञ ह्यांची नितांत गरज आहे
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 01/25/2011 - 04:07 नवीन
लेखात मांडलेला विचार आवडला . घटना आणि परीणाम फक्त एका संवादात समोरासमोर मांडले. त्यांचा अन्वयार्थ/सांगड लावून अनुरूप कृती करण्याचे स्वातंत्र्य मुलावर सोपविले. ही खरच चांगली कृती आहे आणि काही प्रमाणात अनुकरणीय आहे. कारण कृती करण्याचे स्वातंत्र्य आपण ज्याच्यावर सोपवणार आहोत त्याची निर्णय घेण्याची क्षमता अजून वादातीत नसेल तर असे स्वातंत्र्य देणे गैर ठरेल कारण त्या मुळे नुकसान होउ शकते. उदा. - मी माझ्या मुलाला सांगीतले कि परिक्षेसाठी थोडाच अवधी आहे आणि पोर्शन खूप कव्हर करायचा आहे . तु WII games खेळलास किंवा कॉमिक्स वाचत बसलास तर तुला परिक्षा अवघड जाईल .. आणि आता या वर काय करायचे ते त्याच्यावर सोपवले तर, (माझ्या अनुभवा वरुन) मला खात्री आहे कि तो म्हणेल मी थोडा वेळ कॉमिक्स वाचेन मग अगदी थोडा वेळ WII खेळेन मग आभ्यास करीन ..( आणि तो थोडा वेळ बराच काळ चालेल) म्हणजे तुमच्या थेअरी प्रमाणे योग्य निर्णय काय हे त्याला कदाचित माहित असेल पण तो दूसरा पर्याय स्विकारेल कारण तो त्याला जास्त आकर्षक वाटतो .. अशा वेळी आज्ञार्थी बोलणे .. म्हणजे " तु आता आभ्यास कर " हेच योग्य आणि हिताचे असेल असे वाटते. पण अर्थात काही वेळा असे स्वातंत्र्य देणे हे व्यक्ती विकासाच्या संदर्भात खूप उपयोगी पडत असेल असे वाटते. पण ते कधी आणि कसे द्यायचे हे विचारपूर्वक ठरवले पाहिजे... म्हणजे controlled freedom
  • Log in or register to post comments
म
मराठे Tue, 01/25/2011 - 14:57 नवीन
लहान मुलांशी बोलताना त्यांना 'कृती आणि परिणाम' यांचा संबंध समजाउन दिला पाहिजे (असं सांगतात.. आणि आम्ही ऐकतो).. मी माझ्या मुलाशी बोलताना शक्यतो तसं करण्याचा प्रयत्न करतो.. पण कित्येक वेळा पेशंस संपतो आणि मग 'बाप' जागा होतो... अर्थात अजून तो (७) लहान आहे त्यामुळे आम्ही सांगितलेलं... रडत-कढत का होईना... तो ऐकतो. कॉम्प्युटर गेम्स जर त्याला खेळायचे असतील तर ते सुरू करण्याच्या आगोदरच मी त्याला टाईम लिमिट देतो.. मग वेळ झाली की त्याला बंद करायला सांगतो. .. पण जर गेम मधेच असेल तर त्याला ती लेवल पूर्ण करण्याची मुभा पण देतो. (आणखी १-२ म)नीटं)... . पण वेळ संपली की निदान तो उठून त्याच्या पुढच्या कामाला सुरूवात करतो..हे माझं वागणं बरोबर की चूक ते माहित नाही.. पण ह्या प्रकारामुळे अजूनतरी समाधानकारक रिझल्ट्स मिळताहेत. उलट जर मी त्याला टाईम लिमिट दिलं नाही तर तो बराच वेळ खेळेल आणि जर त्याला उठायला सांगितलं तर खळखळ करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
अ
अवलिया Tue, 01/25/2011 - 04:12 नवीन
त्या बॅगेकडे लक्ष न देणार्‍या मुलाचे वय काय होते?
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/25/2011 - 06:03 नवीन
हेच विचारतो. लेखातले विचार खूप खूप अपील झाले. पण प्रत्यक्षात लहान मूल वाढवताना आधी ठरवून घेतलेल्या अशासारख्या असंख्य आदर्श थियरीजची आणि विचारांची अशी काही धूळधाण उडते (किंवा माझ्या बाबतीत उडाली आहे) की ज्याचे नाव ते. किती वर्षाचा होता तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शुचि Tue, 01/25/2011 - 12:29 नवीन
लहान होता - ८ वय असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 01/25/2011 - 14:52 नवीन
भलताच प्रगल्भ !! वयाच्या आठव्या वर्षी त्याला चोरी म्हणजे काय? जबाबदारी म्हणजे काय कळत होते? चोरी म्हणजे नक्की काय होते हे त्याच्या आईने कसे समजावून सांगितले? जबाबदारी कशी असते आणि काय केले म्हणजे जबाबदार म्हटले जाते हे कसे समजावून सांगितले? आनी येवढ्या लहान वयात तो इकडे तिकडे नक्की काय पहात होता? (च्यामारी अर्धी लाकडे मसणात गेली माझी पण चोरी म्हणजे काय सांगू शकत नाही मी. जबाबदारीचा तर प्रश्नच नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रसन्न केसकर Tue, 01/25/2011 - 14:35 नवीन
इंग्रजीत आज्ञार्थी वाक्ये नाहीत. मला तर बुवा इंग्रजीत आज्ञार्थी वाक्ये भारतीय भाषांपेक्षा जास्तच दिसली. अमेरिका म्हणजे तो युरोपात हिणकस असंस्कृत समजल्या गेलेल्या लोकांचा देश ना? तिथे आज्ञार्थी वाक्ये नसतील तर ऐकायला लावायचे दुसरे प्रकार असतील की. का तिथले सगळे लोक जन्मल्यापासुनच चतुरस्त्र, सारासार विचार करतात. अन तसा विचार करत असतीलच तर मग त्यांना बाकी सगळे जग असंस्कृत का म्हणते बुवा?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 01/25/2011 - 14:54 नवीन
तुम्हाला भलतेच प्रश्न पडतात ब्वा ! सभ्यता आणि सुसंस्कृतता याचे मापदंड असलेल्या अमेरिका आणि युरोप मधील महामानवांबद्दल वाटेल ते बोलणार्‍या प्रसन्न केसकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी माझी मागणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा