Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मीठावरच्या कराची कहाणी...

अ
अवलिया
Wed, 01/26/2011 - 07:43
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2188 वाचन

💬 प्रतिसाद (8)
न
नरेशकुमार Wed, 01/26/2011 - 08:16 नवीन
काही म्हणा, पण आज शुभेच्छा देण्याची इच्छाच होत नाहीये !
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 01/26/2011 - 10:08 नवीन
तुमच्या लेखमुळे ज्ञानात भर पडली नाहीतर बागडविषयी जास्त माहिती नव्हती ,फोटो दिसु शकला असता तर अजुनच ज्ञानात भर पडली असती .बाकी तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा .
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 01/26/2011 - 13:02 नवीन
शीर्षकाने दिशाभूल झाली राव
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/26/2011 - 16:36 नवीन
विशाल.. जबरदस्त!! खूप सुंदर परिक्षण लिहिले आहेस. नाना, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
असुर Wed, 01/26/2011 - 18:14 नवीन
हा विशेष लेख आहे. म. गांधींना त्यांची महत्वाची कामे सोडून मिठाचा सत्याग्रह व दांडीयात्रा का कराविशी वाटली या प्रश्नाच्या खर्‍या उत्तराकडे नेणारा लेख आहे हा! तसेच अ‍ॅलन ह्युम या मनुष्याबद्दलही नवीन माहीती मिळाली. त्याने भारतीयांच्या मुलभूत हक्कांसाठी सरकारकडे खूप प्रयत्न केले आणि लो. टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होम रुल चळवळ' चालवली इतकाच इतिहास शिकला होता शाळेत. हाच मनुष्य मिठासारख्या मुलभूत पदार्थावर कर लावून त्याची अंमलबजावणी आणि वसुली व्यवस्थित व्हावी म्हणून असा काही विशेष प्रयत्न करु शकतो हे माहीतीच नव्हते. पक्का इंग्रज व्यापारी! ही विलक्षण माहीती वाचायला दिल्याबद्दल विशाल यांचे मन:पूर्वक आभार! --असुर
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/27/2011 - 07:06 नवीन
असुराच्या मताशी सहमत आहे. इंग्रज धोकादायक होते ते खरे यात. म्हणजे स्वतःला उदारमतवादी भासवून वागणं मात्र हिणकसच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
S
sagarparadkar गुरुवार, 01/27/2011 - 13:19 नवीन
>> तसेच अ‍ॅलन ह्युम या मनुष्याबद्दलही नवीन माहीती मिळाली. त्याने भारतीयांच्या मुलभूत हक्कांसाठी सरकारकडे खूप प्रयत्न केले आणि लो. टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होम रुल चळवळ' चालवली इतकाच इतिहास शिकला होता शाळेत. हाच मनुष्य मिठासारख्या मुलभूत पदार्थावर कर लावून त्याची अंमलबजावणी आणि वसुली व्यवस्थित व्हावी म्हणून असा काही विशेष प्रयत्न करु शकतो हे माहीतीच नव्हते. पक्का इंग्रज व्यापारी!<< हीच तर खरी गंमत आहे ... जे लोक असे म्हणत की १८५७ सारख्या हिंसक प्रतिसादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच ह्या 'होम रूल' चे प्यादे पुढे करण्यात आले, त्यांच्यावर आपण सहज 'अज्ञानी' म्हणून शिक्का मारून टाकतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली गेली नाही की ह्या 'होम रूल' चे प्रस्थ पद्धतशीरपणे वाढवून पुढे तिचीच 'काँग्रेस' बनवण्यात आली. आणि आपल्या जुलमी सत्तेला होणारा विरोध देखील 'विधायक' मार्गानेच होईल (म्हणजे ह्या शूर भारतीयांशी परत लढाई ? नको रे बाबा ...) ह्याचीपण खबरदारी इंग्रजांनी घेतली ... आपल्या विरोधकांना अशा प्रकारे नियंत्रित करणे हे जगात फक्त ब्रिटिशांना इथेच भारतातच शक्य झाले असेल ... किती आम्ही महान ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
ग
गवि गुरुवार, 01/27/2011 - 07:20 नवीन
यावर दिवाळी अंकात सविस्तर लेख वाचला होता. तेव्हाही असेच एकदम इंटरेस्टिंग वाटले होते. पण काही शंका त्यावेळी मनात आल्या. इथे त्या लिहितो: १) इतकी लांब भिंत (फिजिकल बॅरियर) बांधणे ही प्रचंड गोष्ट उल्लेखित उद्देशासाठी आवश्यक होती का? २) ही बागड फक्त मार्किंगसाठी होती की प्रत्यक्ष त्याच्यामुळे पलीकडे जाणे अडवता यावे (फिजिकल रिस्ट्रिक्शन) हा उद्देश होता? ३) जरी दोन्हीपैकी कोणताही उद्देश असेल तरी ती बागड दगडी, कठीण मटेरियलची बनवण्याऐवजी झुडुपांची का बनवली..? लागवड, मशागत, छाटणी, मुळात ती झुडुपे हजारो किलोमीटर लांबीच्या बागडीत मधे कुठल्याही भागात मरु न देणे (जेणेकरून गॅप पडेल) ... कोरड्या भागात पाण्याअभावी ती मरू न देणे.. इ इ इ.. अशी सर्व खबरदारी घेणे हे खूप जास्त किचकट आणि दगडी भिंतीपेक्षा जास्त खर्चिक काम नव्हते का ? (दीर्घ मुदतीची रनिंग / मेंटेनन्स कॉस्ट धरता..) शिवाय, झुडुपाच्या गुंत्याने बनलेली भिंतवजा रचना ही तरीही तोडण्यास / घुसखोरीस कठीण भिंतीपेक्षा जास्त सोपी नाही का? त्यामुळे स्मगलिंगला आळा बसेल का? मग असे विचित्र जैविक मटेरियल का वापरले? आणि इतक्या लांब बागडीचे अवशेष आता अजिबातच कसे उरले नाहीत? तसे त्या लेखात काही दगडांची रास सदृश फोटो आहेत, पण अगदी तशाच दिसणार्‍या दगडाच्या ढीगवजा राशी ब्रिटिशकालीन फॉरेस्ट डिपार्टमेंटने देशातल्या सर्वच जंगलांत मोजणी / मार्किंगसाठी रचल्या होत्या. अनेक ठिकाणच्या (दक्षिणेत, महाराष्ट्रातही, ) जंगलात फिरताना त्या पाहिल्या आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा