अवांतर
💬 प्रतिसाद
(22)
न
नीलकांत
Fri, 01/28/2011 - 05:59
नवीन
नमस्कार,
अवांतर लिहीण्यावर आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे की ज्या हेतूने मूळ लेखकाने घागा सुरू केला तो विषय बाजूला राहतो आणि अन्य विषयांवर चर्चा जाते. कधी कधी आपले वैयक्तीक स्कोअर सेटल करण्यासाठी संपुर्ण धागाच हायजॅक केलेला दिसून येतो. असे करण्या ऐवजी एखाद्या धाग्यावर कुणाच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला अवांतर लिहायची इच्छा झाल्यास तेथे न लिहीता सरळ घागा काढावा. म्हणजे लोकांना त्याही विषयावर चर्चा करता येईल. अश्या धाग्यांचे अनेक उदाहरणे देता येतील. अगदी ताजे उदाहरण म्हणजे गणपाचा रंजना देशमुख हा धागा. असे केल्याने त्यांचे ह्या विषयावरचे लेखन स्वतंत्र लेख म्हणून कायम राहीले.
बुलेटीन बोर्ड किंवा अन्य कुठलीही जागा असु द्यात. वैचारीक वैविध्य किंवा मतभेद हे असणारच. खरं तर ह्याच मतभिन्नतेमुळे चर्चा रंगतात. मात्र असं असलं तरी कुठल्याही सामाजीक जागेवर किमान काही तरी नियम नको का? उद्या काथ्याकुट (चर्चा) विभागात कुणी कवीता टाकायला लागलं तर त्याला तसं करू द्यावं का? आणि कौलाच्या धाग्यावर कलादालनातील फोटो टाकू द्यावेत का?तर उत्तर आहे नाही. जसं आपण आपली इच्छा म्हणून किंवा आपल्याला आपलं मत मांडता यावं ही आवड आहे म्हणून येथे लिहीतो तसंच येथील अन्य सदस्यांचं सुध्दा असतं. लेखाचे नाव, मूळ लेख आदींवर अधीक चर्चा म्हणून आपण प्रतिक्रियांकडे वळतो. अनेकदा प्रतिक्रिया ह्या लेखापेक्षा मोठ्या झालेल्या दिसतील. मात्र हे सर्व लेखाशी आणि मूळ विषयाशी संबंधीतच असावे हा आग्रह आहे. किंचीत अवांतर होईल ते ठीक मात्र मुद्दामच अवांतराला धरून तिरके प्रतिसाद नाही चालणार. यापुढे असे अवांतराचे नवीन धागे तयार व्हावेत अशी इच्छा आहे. मात्र कुणी कंपूबाजी करीत धागे बिघडवण्याचा प्रयत्न करील तर ते प्रतिसाद उडवल्या जातील.
उद्या ७०% लोकांनी ठरवले तर मिपावर इंग्रजीतून लेखन येऊ द्यायचे का? तर उत्तर आहे नाही.
मिपा लोकांचं आहे. त्यांनीच हे येथे पर्यंत आणलंय. मात्र या संकेतस्थळाला येथ पर्यंत आणण्यासाठी संपादन मंडळाचे मोलाचे योगदान आहे. संपादकांनी कित्येकदा वैयक्तीक पातळीवर टीका सहन केलेली आहे. मात्र मिपा आपल्या नियमाप्रमाणेच चालावं असा सर्वांचाच विचार आहे. मिपाचं वेगळे पण असं आहे की मूळ चौकट कायम ठेवून आपण हवा तो बदल सुचवू शकता. या अवांतराच्या विषयावर इतर सदस्यांचे मत सुध्दा ऐकूण घेण्यास उत्सुक आहे.
दुसरा विषय सदस्यं होण्याचा. तर मिसळपाव येत्या काळाशी सुसंगत असावं हाच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त नवीन सदस्यं यावेत आणि त्यांनी लिहीतं व्हावं अशी अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी मिपाचं ऑर्कुट करण्याची इच्छा नाही.
इतर कुणी काहीतरी फॉलो करतो म्हणून आपण तेच करतोय असं नाही. जसं तुम्ही अवांतराबाबत आपलं मत मांडता तसं अन्य बाबींबाबत सुध्दा लिहू शकता. व्यवस्थापनाबाबत काही विचार असतील तर ते व्य. नि. करू शकता. सर्व मोकळीक आहेच. मात्र काही तरी ठराविक दिशा ही हवीच.
- नीलकांत
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 01/28/2011 - 12:29
नवीन
नमस्कार कांता !!
मला आक्षेप/प्रश्न आहेत, (आधी ही फोनवर बोलणे झालेच होते. त्या वेली व्यनी करण्यास वेळ मिळाला नाही हे तुला वेगळ सांगायची गरज नसावी.)
अवांतर लिहीण्यावर आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे की ज्या हेतूने मूळ लेखकाने घागा सुरू केला तो विषय बाजूला राहतो आणि अन्य विषयांवर चर्चा जाते. कधी कधी आपले वैयक्तीक स्कोअर सेटल करण्यासाठी संपुर्ण धागाच हायजॅक केलेला दिसून येतो. असे करण्या ऐवजी एखाद्या धाग्यावर कुणाच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला अवांतर लिहायची इच्छा झाल्यास तेथे न लिहीता सरळ घागा काढावा. म्हणजे लोकांना त्याही विषयावर चर्चा करता येईल. अश्या धाग्यांचे अनेक उदाहरणे देता येतील. अगदी ताजे उदाहरण म्हणजे गणपाचा रंजना देशमुख हा धागा. असे केल्याने त्यांचे ह्या विषयावरचे लेखन स्वतंत्र लेख म्हणून कायम राहीले. >>>
तु उदाहरण दिलेल्या धाग्यात खुद्द संपादकानेच स्कोअर सेटल केलेला स्पष्ट दिसत आहे, बाकीच्यांच कश्याला मी माझच उदाहरण देतो. माझ्या प्रतिसादाचा उत्तरार्ध हा मुळ धाग्याबाबतच होता. पण तो उडविला आहे. मग त्याचप्रमाणे निनादचा एक संपुर्ण(अवांतर=http://misalpav.com/node/16488#comment-281882) प्रतिसाद, मग तो रंजना आणि अशोक सराफ बद्दल का असेना ? तो का उडविला गेला नाही ,याची काही कारण मिमांसा नाही आणि त्यावर धमकीवजा संपादकीय प्रतिसाद!! असे असेल तर माझ्या मनात संपादकाने निनादला झुकत माप दिले आहे असा विचार येणे साहजिकच आहे. याचाच अर्थ यु आर सपोर्टिंग टु द राँग पर्सन !! उद्या जर निनादने 'चला संपादक मंडळ ' आपलच आहे असा समज करुन अवांतर केले तर ?
माझ्या मते तो अवांतरच !! कारण वियाला अनुसरुन नाही . दुसर म्हणजे तिथेच छोटा डॉनचा प्रतिसाद, संपादकाला तिथे अवांतर करण्याची गरजच नव्हती , गणपासारखा किंबा गोगोल सातखा वेगळा धागा काढता आला असता की
, त्या धाग्यावर जाऊन लांबलचक शहाणपण शिकविणे म्हणजे माझ्या लेखी उगाच शायनिंग मारतो आहे असे आहे.
बुलेटीन बोर्ड किंवा अन्य कुठलीही जागा असु द्यात. वैचारीक वैविध्य किंवा मतभेद हे असणारच. खरं तर ह्याच मतभिन्नतेमुळे चर्चा रंगतात. मात्र असं असलं तरी कुठल्याही सामाजीक जागेवर किमान काही तरी नियम नको का? उद्या काथ्याकुट (चर्चा) विभागात कुणी कवीता टाकायला लागलं तर त्याला तसं करू द्यावं का? आणि कौलाच्या धाग्यावर कलादालनातील फोटो टाकू द्यावेत का?तर उत्तर आहे नाही. जसं आपण आपली इच्छा म्हणून किंवा आपल्याला आपलं मत मांडता यावं ही आवड आहे म्हणून येथे लिहीतो तसंच येथील अन्य सदस्यांचं सुध्दा असतं. लेखाचे नाव, मूळ लेख आदींवर अधीक चर्चा म्हणून आपण प्रतिक्रियांकडे वळतो. अनेकदा प्रतिक्रिया ह्या लेखापेक्षा मोठ्या झालेल्या दिसतील. मात्र हे सर्व लेखाशी आणि मूळ विषयाशी संबंधीतच असावे हा आग्रह आहे. किंचीत अवांतर होईल ते ठीक मात्र मुद्दामच अवांतराला धरून तिरके प्रतिसाद नाही चालणार. यापुढे असे अवांतराचे नवीन धागे तयार व्हावेत अशी इच्छा आहे. मात्र कुणी कंपूबाजी करीत धागे बिघडवण्याचा प्रयत्न करील तर ते प्रतिसाद उडवल्या जातील. >>>>
धन्यवाद , हे लिहील्याबद्दल !!
सर्वात आधी कंपूबाजी कोण करत आहे ? का करत आहेत ? हे समजुन घ्यायला हवे. समविचारी लोकांच ग्रुपिझम होण स्वाभाविक आहे आणि त्याच प्रकारे टु ईज कंपनी अॅन्ड थ्री इज अ क्राऊड हे ही स्वाभाविक आहे. म्हणुन दंगा होणारच त्याला थोपवु शकत नाही. हो त्यावर थोडाफार 'कंट्रोल' जरुर करता येऊ शकतो. पण कंट्रोलिंग बॉडी जर कंपुबाजी करत असेल तर ? तिरकस प्रतिसाद देत असेल तर ? बॉडीत समविचारी नाहीत हे कसे शक्य आहे ?आणि ते थ्री , फोर, फाईव्ह च्या संख्येत नाहीत हे तरी कशावरून , माझ्या मते आधी कंट्रोंलिग बॉडीने निश्पक्ष होवुन काम करणे आवश्यक आहे. इथे मला पाचशे तरी उदाहरणे देता येतील. ते तर सोडुनच दे , मध्यंतरी मला एका संपादकाने अरे तो आयडी नवीन आहे, ब्लॉगर आहे, जरा त्याला गोंजारून घ्या असे सांगितले होते. गोजांरुन घ्या ! काय शब्द आहे. तात्या मिपावर असताना त्याने कोणाला गोंजाराल्याचे मला आठवत नाही, उलट लोकांना उत्फुर्तपणे लिहायला लावले आहे. मग आता असे का होते, याचा तु एकदा खरच शोध घे.
मिपा लोकांचं आहे. त्यांनीच हे येथे पर्यंत आणलंय. मात्र या संकेतस्थळाला येथ पर्यंत आणण्यासाठी संपादन मंडळाचे मोलाचे योगदान आहे. संपादकांनी कित्येकदा वैयक्तीक पातळीवर टीका सहन केलेली आहे. मात्र मिपा आपल्या नियमाप्रमाणेच चालावं असा सर्वांचाच विचार आहे. मिपाचं वेगळे पण असं आहे की मूळ चौकट कायम ठेवून आपण हवा तो बदल सुचवू शकता. या अवांतराच्या विषयावर इतर सदस्यांचे मत सुध्दा ऐकूण घेण्यास उत्सुक आहे.>>>>
संपादक मंडळाचे ? मला वाटते की आधी पंचायत कमिटी मग संपादक मंडळ !! खर तर मिपाचा इतिहास पहाता संपादकांच्या नावाने सर्वात जास्त वेळा खडी फोडणारी मंडळी (हे लिहुशी वाटत नाहीय्ये, पण काय करू , माझ्यातला लेखन-प्रामाणिकपणा गप्प बसु देत नाही- )आज केवळ तुझ्या जवळची आहेत म्हणुन संपादक मंडळीत जाऊन बसली आहेत.ज्या संपादकांनी टिका न एकता कार्यवाही केली होती ते संपादक आज मिपावर केवळ याच मंडळीमुळे ढूंकून ही पहात नाही.राहिली गोष्ट मुळ चौकटीची,त्या चौकटीला केव्हाच तडा गेला आहे. यात केवळ कोणा एकाची चुक आहे असे नाही. पण ज्यांच्या चुका आहेत त्यांना मुळात अजुन त्या चुका आहेत हेच कळलले नाही. मग बदल कुठुन सुचविणार ? गोगोलच कौतुक वाटल ! पण क्षणभरच, कारण पुन्हा अवांतर होणारच, अति पण होणार ? कारण प्रत्येकाच्या "जे थांबण वगैरै " लिहीलय ना, त्याच्या कक्षा, सीमारेषा वेगवेगळ्या आहेत.
शेवटचे दोन्ही मुद्दे मान्य !!
केवळ एक खटकतय.
व्यवस्थापनाबाबत काही विचार असतील तर ते व्य. नि. करू शकता >>>
माझ्या व्यनीचे, एका साध्या विचारणेचे गेली चार महिने संपादक मंडळाने उत्तरच दिलेले नाही.
तरीही पुन्हा असो..हेच चालु रहाणारा.
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Fri, 01/28/2011 - 13:26
नवीन
नमस्कार,
तुझी प्रतिक्रिया अनपेक्षीत नाहीच. तर एक एक करून उत्तर देतो. निनाद यांच्या प्रतिसादाला बगल देण्याचे काही विशेष कारण नाहीये. काही प्रतिसाद मी काढले काही राहीले एवढंच. तुझ्या या उल्लेखामुळे ते लक्षात आले तर ते सुध्दा काढेन.
बाकी संपादकांनी अवांतर चाललेल्या धाग्यावर अवांतर लिहू नका असे लिहीने हे अवांतर असेल तर मी त्याला काय म्हणू? त्यांचं काम आहे ते , आणि ते ते करत आहेत. मला तर त्यांनी सरळ अवांतर उडवीने अपेक्षीत आहेत. तरी त्यांची संवाद साधण्याची इच्छा असेल तर मी नाही कसे म्हणू? आणि हो उद्या अश्या प्रकारे उडवलेल्या प्रतिक्रियांचे जाब विचारणारे येतीलच याची खात्री आहे. असो. पहिला मुद्दा मान्य, निनाद यांची अवांतर प्रतिक्रिया उडवतो, दुसरा मुद्दा अमान्य, संपादकांचं कामंच ते आहे तसे ते करताहेत.
तुला नेमके काय म्हणायचे आहे ते सांग? कंपुबाजी चांगली व नैसर्गीक म्हणतो आहेस का? की संपादकीय एकोपा हा अनैसर्गीक कंपुबाजी आहे असं म्हणायचंय?
खरं तर संपादकांचा गट जो एकदिलाने येथे काम करतो त्यामुळेच मिसळपाव ठीक चाललेलं आहे.
कंट्रोलींग बोर्ड किती निष्पक्ष राहून काम करतो हे येथे कसं सांगू? सर्व संपादक एकमेकांना जवाबदार आहेत. आणि केलेलं संपादन एकमेकांसमोर मांडतात. किंवा कधी कधी तर संपादन करायच्या आधी एकमेकांचं मत सुध्दा घेतात. त्यामुळे यात काही चुक आहे असं वाटत नाही.
मिसळपाव मध्ये कुणाचं किती योगदान आहे हे सर्वांसमोर आहेच. त्यात वादाचा काहीच प्रश्न नाहीये. संपादकांच्याच काय माझ्या सुध्दा नावाने शिमगा करणारी मंडळी माझ्या जवळची आहेत. तु सुध्दा जवळचाच आहेस की ! हे मला काही नवीन नाहीये. तुला माझ्या जवळची म्हणून जी मंडळी माहिती आहे ती मला मिपानेच दिली आहेत की ! मुळ चौकटीची पकड पक्की आहे याबाबत मी ठाम आहे.
खरं तर तुझ्या या प्रतिक्रियेला सुध्दा जरा तक्रारीपुर्ण न झाल्याने चिडलेला असं म्हणून मी बाजुला करू शकलो असतो. मात्र मागे सुध्दा आपलं बोलणं असंच अर्धवट राहीलं होतं. आज ते पुर्ण करण्याची संधी घेतोय. बाकी तुझ्या लेखनात अनेक वैयक्तीक संदर्भ आहेत. ते टाळता आले असते तर छान झालं असतं.
मिसळपाववर एकही असा संपादक असा नाहीये की ज्याने मला संपादक व्हायचं आहे असं म्हटलं असेल. उलट कित्येक लोकांना मी विनंती केल्यावर त्यांनी तशी मान्यता दिली. अश्या वेळी तुझं उगाच कुणावरही असं बोलणं योग्य नाही. काही व्यक्तीगत असेल तर व्य.नि. कर किंवा तु कधीही फोन करू शकतोस.
मी आता पर्यंत व्य. नि. ला उशीरा उत्तर देत होतो त्याला कारण मी खूप कामात होतो. आता वेळ मिळतोय तो मिसळपाववर थांबलेली कामे पुर्ण करण्यासाठी वापरतोय.
- नीलकांत
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 01/28/2011 - 14:31
नवीन
आता जरा मलाच काम लागल आहे ..काही प्रश्नांची समाधानकारक तर काही अजुनही असमाधानकारक ..आलोच जरा हातच काम संपवुन .
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 01/28/2011 - 06:27
नवीन
सहमत आहे.
च्यायला काय स्नो पडला आज नार्थइस्टात..एकदम रेकार्ड ब्रेक साला! बाकी आज पर्याचा बड्डे आहे म्हणे, म्हणजे काय एकदम टांगा पल्टी घोडं फरार का? शिंचं ते डान्या कुठे गेलं कुणास ठावुक, क्रिकेट वर लिहणार होतं त्याचं काय झालं, काय लेकाचा मुहुर्त शोधतोय का काय! सहजकाकांची डायट दारु नाय आली बरेच दिवसात...रेग्युलर घ्यायला लागले का काय ते बी आता? मोरक्कन रेस्तरांची काय खबर नाय नंदनकडुन आजकाल.. फिलिपन, चायनीज वगैरेच्या तर नादी नाय ना लागला? विक्षिप्त काकुंच्या पगारी सुट्या चाल्ल्यात म्हणे आजकाल.. सालं सरकार अशानेच खड्ड्यात जातंय अन तिकडे थत्ते काका बाजारात नियंत्रण आणायच्या गोष्टी करताहेत. बाकी मिभोकाका कुठं गायब आहेत कुणास ठावुक सद्ध्या... तसे बकरे पण लै जमलेत आजकाल कोणी कापणाराच नाय राह्यला राव. प्रभुमास्तर काय समुपदेशन पण नाय करुन राह्यलेत... शिंच्या मेव्याच्या संस्कृत सुभाषितांचं काय झालं कुणास ठावुक.. अवलियाला सुरस पौराणीक कथा तरी लिहायला सांगा कुणीतरी... साला आजकाल काय दंगापण होत नाही राव.. नुसतं घाल पाणी अन कर कालच्यावानी...
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Fri, 01/28/2011 - 06:29
नवीन
आय सी वॉट यू डीड देर
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/28/2011 - 07:02
नवीन
ते प्रतिसाद उडवल्या जातील.
साहेब व्याकरण चुकतय... "
"तर ते प्रतिसाद उडवले जातील असे लिहा न!"
प्रतिसाद हा पुल्लिंगी शब्द आहे. तो प्रतिसाद = ते प्रतिसाद
प्रतिसाद हा शब्द जर " तक्रार" या शब्दाप्रमाणे स्त्री लिंगी असता तर "त्या तक्रारी उडवल्या जातील "अशी वाक्य रचना बरोबर होईल.
अवांतरः वाक्य रचनेत चूक आढळली म्हणून लिहिले आहे. विषय मूळ धाग्याला थोडासा सोडून आहे
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 01/28/2011 - 07:08
नवीन
विजुभाउ, तुम्ही विकीवर खात्री करुन घेतली आहे का?
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Fri, 01/28/2011 - 11:08
नवीन
नमस्कार,
यापुढे काळजी घेतल्या / घेतली जाईल. मी जसं बोलतो तसंच लिहीतो. आणि मला या मराठीशिवाय कुठल्याच शतकातील मराठी येत नाही. ;)
अवांतरः - माझ्या शुध्दलेखना ऐवजी माझ्या अवांतराच्या लेखनाशी सहमत आहात का ते कळवा.
- नीलकांत
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 01/28/2011 - 13:12
नवीन
"उडवल्या जाणे", "केल्या जाणे" यांसारखी रूपे ही मराठीच्याच काही प्रादेशिक बोलींमधील प्रस्थापित रूपे आहेत, आणि महाराष्ट्राच्या काही भागांत तरी ती लिखाणातसुद्धा प्रस्थापित आहेत. त्यांत काहीही गैर नाही.
(केवळ बोलीरूपातच नव्हे, तर नागपूरकडील वर्तमानपत्रांत वगैरे अशी रूपे लेखीस्वरूपात - आणि अधिकृतपणे, संपादकीयांत वगैरे - सर्रास वापरलेली पाहिलेली आहेत. उलट "उडविला/ली/ले जाणे", "केला/ली/ले जाणे" यांसारखी रूपे वापरली गेल्याचे माझ्या तरी निरीक्षणात आलेले नाही.)
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 01/28/2011 - 23:44
नवीन
ही रूपे काही प्रादेशिक बोलींमध्ये प्रस्थापित आहेत, असेच माझे स्वल्प अनुभवावरून मत आहे. (फक्त नागपुरात, की महाविदर्भात आणि मराठवाड्यातही?)
माझ्या रोज-बोलण्यातल्या मित्रमंडळात ही रूपे कोणी वापरत नाहीत, म्हणून अनुभव स्वल्प आहे. मात्र या रूपांबद्दल मला फार कुतूहल आहे. या रूपांचा संबंध संस्कृतातल्या पदान्वयाशी समांतर आहे, अशी मला शंका आहे. पण ही शंका/कल्पना तपासून बघण्यासाठी अशा शब्दप्रयोगाची वेगवेगळ्या परिस्थितीत उदाहरणे हवीत. ती उदाहरणे मला स्वतःला आत्मविश्वासाने बनवता येत नाहीत :-( -- कारण माझ्या कुटुंबाच्या बोलीत, किंवा शाळेत शिकलेल्या प्रमाणबोलीत त्या रूपांबद्दल काहीच सराव झालेला नाही.
म्हणून अशी वेगवेगळ्या काळांत-प्रयोगांतली लहान-मोठी वाक्ये उदाहरणे म्हणून मिळाली, तर मला हवी आहेत.
(पंगा यांची खरडवही उपलब्ध नसल्यामुळे हे अति-अवांतर येथे लिहीत आहे. क्षमस्व.)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 01/28/2011 - 23:08
नवीन
विजुभाऊ, तुम्ही सॉल्लिड पार्शालिटी करता आहांत असं माझं स्पष्ट आणि खरं मत आहे!
तो टारझन जिकडेतिकडे ण चा टणत्कार करत फिरत असतो ते चालतं तुम्हाला!!
चुचुचं दानवनागरी लिपीमधलं मराठी चालतं तुम्हाला!!
आणि आमच्या गरीब बिचार्या नीलकांतावर मात्र तुमची आगपाखड!!
ते काही नाही, तू बिंदास "उडवल्या जाईल" असं लिही रे नीलकांता!
आजपासून आम्हीसुद्धा तसंच लिहिणार!!
विजुभाऊंचे आक्षेप फाट्यावर "मारल्या जातील"!!!!
:)
अवांतरः स्पष्ट आणि खरं बोलायला आपण स्वतःची बायको सोडून कुणालाच भीत नाही, काय समजलेंत!!
:)
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 01/28/2011 - 23:21
नवीन
ह्या बाबतीत पिडांकाकांचे अनुकरण केल्या जाईल. आक्षेप फाट्यावर मारल्या जातील.
सगळीकडे खरं अन स्पष्ट बोलणारा ;-)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 01/29/2011 - 01:33
नवीन
वाचुन मज्जा आली.
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Sat, 01/29/2011 - 03:22
नवीन
आवरा हे अवांतर... धागा अवांतराचा असला म्हणून काय झालं? येथे सुध्दा अवांतर केलेच पाहीजे का? :)
- नीलकांत
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Fri, 01/28/2011 - 07:14
नवीन
अभिनव कल्पना.
पत्ता द्या. चेक करुन पाहतो.
- Log in or register to post comments
P
Pearl
Fri, 01/28/2011 - 07:50
नवीन
हम्म. चांगली सूचना. काही प्रमाणात सहमत.
१. हे बरोबर आहे की काही सदस्य जे धाग्याचा उपयोग खरडवही सारखा करतात त्यांच्या वैयक्तिक गप्पांमध्ये बाकी लोकांना काहीच रस नसतो. त्यांना त्या वैयक्तिक चर्चेचा (संदर्भ माहिती नसल्याने) फारसा बोधही होत नाही. म्हणून धाग्यावर प्रतिक्रिया देताना सर्रास वैयक्तिक गप्पा मारणे बरोबर नाही. (त्यासाठी खरडवही, खरडफळा अशा चांगल्या सोयी उपलब्ध आहेत.)
२. प्रतिक्रियेच्या खाली तळटीप म्हणून 'अवांतरः' शिर्षकाखाली काही प्रमाणात(१/२ वाक्यात) अवांतरची गंमत जंमत केली तर त्याबद्दल लोकांना काहीच हरकत नसावी असे वाटते. पण सर्रास अवांतरच वाढत गेले (तेही दिशाहिन आणि फक्त टाइमपास म्हणून केलेले अवांतर) आणि मूळ लेख बाजूला राहिला तर मग धागाकर्त्याची/धागाकर्तीची आणि धागाशिर्षक पाहून आलेल्या वाचकांची निराशा होते.
३. आणि काही धागे टाइमपास म्हणून काढलेले असतात (गंमत म्हणून) ते त्या धाग्याच्या content वरून कळतेच अशा धाग्यांवर फुल्लटू टाइमपास करावा ना :-)
असं आपलं माझं मत आहे.
आणि अजून १.
नवनविन लोकांचे, त्यांच्या जीवनातील किंवा विविध क्षेत्रातील अनुभव वाचायला आवडतील. म्हणूनच सर्वांना इथे लिहावेसे वाटेल असे वातावरण इथे असावे असं पण वाटतं. कोणालाही इथे आपण परके आहोत असे वाटू नये असं वाटतं.
[व्यक्तिशः मला इथे लिहिताना परकं असं काही वाटत नाही :-) आणि मी वाटून घेत पण नाही ;-) पण माझ्या मनात (नुकतेच सभासद झालेल्या) नवीन सदस्यांबद्दल, त्यांच्या इथे लिहिण्याच्या comfort बद्दल जे विचार आले ते मी इथे मांडले आहेत. ]
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 01/28/2011 - 07:39
नवीन
आपले मिसळपाव वरील प्रेम दिसुन येते आहे लिखाना वरुन .. पन मांडलेली सर्व मते पटलेली नाहित...
अवांतर लिहिण्याला सहसा कोणाचा ना नसतो, परंतु तीच तीच माणसे मुद्दामुन कायम अवांतर करत असतील तर नक्की इमॅच्युअर कोण .. मुळ धागा काढणारा की धागा कायम भरकटवणारा.
विचार कोठेही मांडावेत पण ते विचार बाजार नाही वाटले पाहिजेत असे मनापासुन वाटते.
असो बाकी जास्त लिहित नाही, सहसा अश्या भरकटलेल्या धाग्यांवर किंवा वादसदृष्य धाग्यावर मी माझे मत देत नाही, अआणि दिले तरी मुळ मुद्द्याला धरुनच देतो.
धागा भरकटवणार्या लोकांचा राग मात्र मला नाही, पण त्यांचे उत्तम संघटन कौशल्य आणि हजरजबाबी पणा .. लिहिण्याचे कौशल्य , त्यांनी आपल्या स्व लिखानात वापरले तर ते आनखिन खुलुन दिसतील असे वाटते.
जसे आपण मनापासुन लिहिले आहे तसेच हे ही मनापासुन लिहिले आहे.
वाद नसावा
- गणेशा
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 01/28/2011 - 07:47
नवीन
भयंकर विनोदी लेखन वाचुन गडाबडा लोळतोय =))
श्री. गोग्गोल आपली मिपावरील एकुण भरीव कामगिरी पाहिली आणि डोळे पाणावले :)
ह्यालाच अनुसरुन असे विचारावेसे वाटते की :-
१) माझ्या आणि नानाच्या पर्सनल गप्पा गोष्टींमुळे
२) संपादकांनी एखाद्या धाग्यावर आगपाखड केल्यामुळे
३) नविन लोकं मिपा जॉईन न करण्यामुळे
४) इतर मराठी संस्थळाना मिपा ने फॉलो न केल्यामु़ळे.. इ.इ.
तुम्हाला काय फरक पडतो ??
मिपाची काळजी घ्यायला बरेच लोक सक्षम आहेत. त्यांनी ह्या आधी देखील काळजी घेतली आहे आणि पुढे देखील घेतील. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद.
आणि हो तुम्हाला टार्गेट करायचा हेतू नाही. असे बरेच लोक इथे आहेत परंतु आत्ता माझ्या डोक्यात फक्त तुम्हीच पटकन आलात. आणि बाद वे, तुम्हीही चांगले लेख लिहु शकता. त्यामुळे मी कोणत्या ही वैयक्तिक आकसापोटी तुमच्यावर टीका करत नाही.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Fri, 01/28/2011 - 09:30
नवीन
'अवांतर लिहिण्याला सहसा कोणाचा ना नसतो, परंतु तीच तीच माणसे मुद्दामुन कायम अवांतर करत असतील तर नक्की इमॅच्युअर कोण .. मुळ धागा काढणारा की धागा कायम भरकटवणारा.'
मी सहमत !
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 01/28/2011 - 14:56
नवीन
रंजना ह्या अभिनय संपन्न अभिनेत्री विषयी मला आस्था आहे .मी तिचा पंखा आहे .पण त्याच बरोबर माझ्या प्रतिसादातील माझ्या भावना ह्या बर्याच वर्षापासून मनात होत्या तो सल .तिच्याविषयी मिपा वर लिहिले गेल्याचे पहिले आणि उस्फुर्त पणे तो प्रतिसाद दिला केला .माझ्या हातून मिपा वर अवांतर लेखनाचा प्रमाद घडला .
बाकी नियम पाळण्यासाठी हे असतात अशी आमच्या गोर्या साहेबाची आम्हाला परदेशी शिकायला नोकरी करत असतांना नेहमीच विनंती वजा सूचना केलि आहे . ( युके मध्ये आज्ञार्थी वाक्याश्या शेवटी प्लीज असे म्हणतात .
आणि एखादी गोष्ट करशील का हे विचारण्यासाठी अमुक अमुक गोष्ट माझ्यासाठी करशील का ? असेही विचारायची पध्धत आहे .) असो.
आम्ही स्वताला स्वयंघोषित रावबहादूर समजतो .(पणजोबांना हि पदवी मिळता मिळता राहिली .ते पुण्यनगरी इंग्रजी रेल्वेचा गाडा हाकायचे.)
तात्पर्य ह्या पुढे नियमाचे काटेकोर पालन होईन असे आपणस आश्वस्त करतो .व नियमभंग झाल्यावर साहेबांसारखे विनयशील रित्या ( माफी मागून मोकळा होईन )
साहेबी काव्यात तज्ञ
मुक्काम पोस्ट जर्मनी
- Log in or register to post comments
A
ashvinibapat
Sat, 01/29/2011 - 13:33
नवीन
आता जानेवारी महिना संपेल ,तेव्हा जरा मुखप्रुष्ठ बदला आता............
प्लिज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज
- Log in or register to post comments