Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओल्या काजूंची उसळ

य
यशोधरा
Fri, 01/28/2011 - 12:06

प्रतिक्रिया द्या
10343 वाचन

💬 प्रतिसाद (50)
अ
अवलिया Fri, 01/28/2011 - 12:29 नवीन
काजु? बरं परवडतं येवढ्या महागाईत? मजा आहे (वाटाण्याची उसळ खाणारा) नाना
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 12:59 नवीन
तुम्ही हाच मसाला वाटाण्याच्या उसळीत वापरा. हाकानाका. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विंजिनेर Fri, 01/28/2011 - 12:33 नवीन
वा! अस्सल कोकणी पाकृ! @ अवलिया - ओले काजू आणि पॉलिश्ड काजू - दोघांच्या किमतीत बराच फरक असतो
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 01/28/2011 - 12:45 नवीन
वा! अस्सल कोकणी पाकृ!
अस्स्च म्हणतो. ओल्या काजुची असो वा फणसाची या भाज्या म्हणजे कोकणच्या खाद्य परंपरेची शान आहे. दुर्दैवाने आज वर नुसत ऐकुनच आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
म
मेघवेडा Fri, 01/28/2011 - 12:52 नवीन
अरेरे. "येवा विंग्लंड आपलाच आसा!" या एकदा! ;) पाकृ झकास गो यशोदामाई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
अ
असुर Fri, 01/28/2011 - 15:57 नवीन
आम्ही आहोत इंग्लंडात, आम्हाला बोलवा की! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:05 नवीन
बघ म्हंजे झालं रे असुरा :D तो गणप्याला बोलावतोय कारण मग त्यालाच सांगेल हे बनव अन् ते बनव, आणि हे महाशय हादडतील! तुला जमतंय का गणप्याभौ सारखं पाकनिष्पत्ती करायला? आलं का काही ध्यानात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 12:58 नवीन
अरेरे, येवा, पुणेही आपलाच आसा. फक्त येताना तू जेवढ्या पाकृ टाकल्या आहेत, तेवढ्या सगळ्या बनवून आणणे. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
स्वाती दिनेश Fri, 01/28/2011 - 14:59 नवीन
फ्राफु पण आपलाच असा... फक्त ओले काजू इथे मिळत नाहीत,:( तेवढे घेऊन येवा... आणि टिन मधल्या फणसाची भाजी नको असेल तर तो ही घेऊन येवा.. ;) दोन्ही भाज्या करुन मिळतील..( सोबत इतर काही केकृच्या कलाकृती ही मिळतील..) यशो.......... आता इथे कुठे आलेत ग ओले काजू...? आता कधी खायला मिळणार काय माहित..:( टारुच्या भाषेत पाकृ वाचून तोंड लाळावले..:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सखी Fri, 01/28/2011 - 16:15 नवीन
मीही खूप ऐकलं आहे ह्या उसळीबद्दल. पण इथेही ओले काजू इथे मिळत नाहीत :( त्यामुळे यशो पुण्यात आले की मीही तुला नक्की कळवतेच गं - कसे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:22 नवीन
कधीही ये सखी, स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
व
विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 06:42 नवीन
स्वाती तै......... तिकडे येताना नाना काखेत कच्चा फणस आणि काठीला बांधलेल्या गठुड्यात ओले काजू घेउन इमानात मुन्डासे घालून बसलाय . तो फणस शेजारच्या शूमाखर ला टोचतोय हे चित्र डोळ्यापुढे आले. ( "म्हैस "कथा थोडी मॉदीफाईड करून बघा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ज
ज्योति प्रकाश Fri, 01/28/2011 - 16:53 नवीन
मार्च एप्रिलच्या दरम्यान कोकणात या म्हणजे सर्व प्रकार खायला घालण्याची सोय करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
कच्ची कैरी Fri, 01/28/2011 - 12:34 नवीन
मला हीच पाकृ हवी होती.आता ओले काजु बाजारात येण्याची वाट पहावी लागेल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/28/2011 - 12:44 नवीन
अरे वा!! ऐकून होते या उसळीबद्दल. छनच यशो! फोटू न दिल्याबद्दल धन्यवाद!;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 12:56 नवीन
रेवती, तिकडे ब्लॉगावर फोटो आहे. इथे देता येत नाही मला. मागे एकदा दिले होते, पण आता विसरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 01/28/2011 - 12:58 नवीन
बरे झाले फोटू चढवले नाहीस ते! इनो तरी कितीवेळा घ्यायचा?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
स्वाती दिनेश Fri, 01/28/2011 - 15:02 नवीन
अगदी खरं ग रेवती...ओल्या काजूच्या उसळीच्या फोटोला इनोची बाटली पुरली नसती... खूप मस्त लागते ही उसळ... ओले खोबरे + कोथिंबिर भरपूर हवे.. आम्ही अळूच्या भाजीत पण ओले काजू घालतो.. झक्कास लागत. काय ग यशो, एका काजूच्या उसळीवरुन तू अजून किती पदार्थांची आठवण करवलीस...:( स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:10 नवीन
स्वातीताई, हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ज
ज्योति प्रकाश Fri, 01/28/2011 - 17:02 नवीन
मसाल्याचे वान्गे पण ओले काजू घालून छान लागते.तसेच गोव्यात याच काजुचे म्हवल म्हणून गोड पदार्थ करतात त्याची पाककृती नन्तर टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
प्राजु Fri, 01/28/2011 - 15:17 नवीन
यशो.. कोंकणी गो ही पाकृ.!! फोटू नसल्यान... प्रतिक्रिया काय देणार?? या उसळीमध्ये काळे वाटाणे घालतात ना. कारण तशी मी सावंतवाडीला खाल्ली आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:09 नवीन
प्राजू, काळे वाटाण्यांची जागा केळफुलांच्या भाजीत.मी तरी नाही पाहिले काजूच्या उसळीत घातलेले. भाजी वाढवायला घातले असतील कदाचित, वा घालतही असतील हां,मला कल्पना नाही. करु तितके प्रकार गं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
असुर Fri, 01/28/2011 - 16:02 नवीन
रेवतीतैशी अगदी जोरात सहमत! असली जीवघेणी पाकृ दिल्याबद्दल यशोआत्येचा झाईर णीसेद! :-) आणि फटू न टाकल्याबद्दल हार्दिक्क अभिनंदन!!! वाचलो आत्मिक जळजळीतून!! पोटाच्या जळजळीवर इनो घेता येऊ शकेल एक वेळ, पण आत्मिक जळजळीवर उपाय नाही! =)) =)) यशोआत्या, मी पुण्यास आलो की हा बेत नक्की कर हो! ओल्या काजूची उसळ, ही हा हा हा हा हा हा!!! -- (हावरट) असुर
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 01/28/2011 - 16:21 नवीन
ओले काजु नसले तर काय करावे ग??????????
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 01/28/2011 - 16:34 नवीन
शेवयांची खीर करायची असली आणि शेवया नसल्या तर काय करता? गव्हाची/तांदळाची/कसलीही खीर करता ना? तसंच. मुगाची/मटकीची/वाटाण्याची/कसलीही उसळ करायची! शिंपल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:40 नवीन
बाजारातून आणायचे. मुंबैला मिळतात. ताजे नव्हे, सुकवलेले ओले. किंवा नुसतेच चरफडायचे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
प
पैसा Fri, 01/28/2011 - 16:25 नवीन
आमच्या बागेत काजू व्हायला अजून २ महिने अवकाश आहे, आणि आता पाकृ देतेस काय?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:41 नवीन
होतात का तुमच्या बागेत? बरं झालं, मला हवेत हां थोडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/28/2011 - 16:45 नवीन
पण तेव्हा मला पुण्यात यायला जमलं नाही तर तुला रत्नागिरीला यायला लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 16:48 नवीन
नक्की येईन. तुला इथून काही हवे असले तर आणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मेघवेडा Fri, 01/28/2011 - 16:49 नवीन
तुमची रत्नांग्रीला काजूची बाग आहे होय! वा वा! :D आंबे, फणस, नारळीपोफळी नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रेवती Fri, 01/28/2011 - 17:25 नवीन
पांढरे काजू भिजत घालून ही उसळ होवू शकेल काय? तसं असेल तर मी लग्गेच भिजायला टाकते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 17:42 नवीन
नाही, नाही गं रेवती. इथे पहा फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 01/28/2011 - 17:46 नवीन
शेवटी फोटू बघायला लावलासच ना!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 01/28/2011 - 17:57 नवीन
अगं तुला कल्पना यावी म्हणूनच केव़ळ, फक्त तुझ्या भल्यासाठी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पिवळा डांबिस Fri, 01/28/2011 - 18:28 नवीन
चला! पुढल्या खेपेच्या भेटीतला एक वार लागला!!!!:) बाकी फोटो बघायचीसुद्धा जरूरी पडली नाही, यशो! तुझी रेसेपी वाचतांना आजीच्या हातची काजूची उसळ मनःपटलावर उमटली. आणि त्या उसळीबरोबर आजीचीही आठवण दाटून आली....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/28/2011 - 18:52 नवीन
मन मे काजु फुटे :) लै भारी ... वर सगळ्या पोरी प्रतिसादांतुन मस्त धमाल करत आहे .. मज्जाय बॉ :) - काजुभाऊ उसळवाले
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 01/28/2011 - 21:47 नवीन
उसळ आवडली. :) आता काजू नाहीत तेव्हा काय भिजत टाकू, असा विचार करते आहे.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 01/29/2011 - 00:36 नवीन
झकास!!!
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sat, 01/29/2011 - 05:11 नवीन
सुपर्ब...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/29/2011 - 05:39 नवीन
फोटो? :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 01/29/2011 - 07:15 नवीन
अरे तिच्या ब्लॉगची लिंक वर दिल्येय ना, तिथे बघ की!! कमाल आहे बुवा या नव्या मिपाकरांची!!!;) सगळं कसं रेडिमेड इथ्थेच पाहिजे!!!!;) आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!! साधी काजूची उसळ डोळ्यापुढे येत नाही!!!! तुझे पूर्वज रडत असतील स्वर्गात!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टारझन Sat, 01/29/2011 - 08:31 नवीन
ह्या दोन पोरांना नको तिथे अवांतरपणा करण्याचा कसला णाद लागलाय अलिकडे ... संपादक मंडळातल्या पोरी खपवुन घेतात म्हणुन काहीही करतात हे :) हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 01/29/2011 - 08:37 नवीन
ए, तू चूप बस रे!! या काजूच्या उसळीच्या चर्चेत हा वाटाणा का वळवळतोय अधेमधे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 01/29/2011 - 09:15 नवीन
णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे .. काळा मिरु आहे मी :) एकदा दाताखाली आला की समजतं मी कोण ते .. खि खि खि ... काजु च्या उसळीच्या चर्चे चा मान फक्त विजु आणि प्राजु ह्या मुला-मुली ला आहे .. कारण फक्त हे दोघेच वृत्तात बसतात. बाकी सगळे वालाच्या आणि शेवग्याच्या शेंगा .. -(ओढुन ताणुन वृत्तात बसलेला) टार्जु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
य
यशोधरा Sat, 01/29/2011 - 09:39 नवीन
काळा मिरु :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 09:54 नवीन
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!! डाम्बीसकाका त्या देवगड वाल्याना फार डिवचू नका चिडलेबिडले तर एकदम रागावून "हापूसच्या ओल्या कोयीचा कुर्मा" असली पाककृती हाणायचे टकुर्‍यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
S
sneharani Sat, 01/29/2011 - 08:42 नवीन
मस्त! फोटो पाहिला! मस्त रेसिपी. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/29/2011 - 11:58 नवीन
धन्यवाद लोकहो. :-) सगळ्यांना लवकरात लवकर ओले काजू उपलब्ध होवोत आणि उसळ खायचा योग येवो. :-)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 01/30/2011 - 09:47 नवीन
मस्त... मागे एक्दा तोंडली आणि ओल्या काजूची भाजी खाल्ली होती...मस्त लागत होती. ब्लॉग मस्तच आहे, अजून कोकणी पाकृत्या टाका की...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा