Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राहुल गांधी

अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 01/29/2011 - 14:30
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4557 वाचन

💬 प्रतिसाद (22)
य
युयुत्सु Sat, 01/29/2011 - 14:35 नवीन
सध्या मला त्याच्या फक्त लग्नाची काळजी आहे... :)
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 01/29/2011 - 14:45 नवीन
सध्या मला त्याच्या फक्त लग्नाची काळजी आहे... हा युयुत्सुंचा प्रतिसाद आहे म्हणून विचारावेसे वाटले. ;) नक्की काळजी कशाबद्दल? लग्न करणार म्हणून का अजून करत नाहीत म्हणून? बाकी मूळ चर्चेसंदर्भात : राहुल गांधी म्हणतात म्हणून नाही पण नक्कीच प्रत्येकाने काहीतरी समाजासाठी करावेसे वाटते. आजकाल पब्लीकसर्व्हीस मधे लोकं कमी येत आहेत म्हणून अमेरिकेतपण प्रोत्साहन दिले जाते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
ट
टारझन Sat, 01/29/2011 - 14:52 नवीन
लग्नासाठी पत्रिका जुळवायला युयुत्सुंकडे येतील असा आशावाद युयुत्सुंना वाटतो काय ? - टारुत्सु
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/29/2011 - 15:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni Sat, 01/29/2011 - 15:27 नवीन
बहुतेक बागवेगिरी करायला लोक कमी पडत असावेत , चप्पल उचलायला , सतरंज्या उचलायला लोक हवे असतील , राहुल बाळ ला म्हणव employment News मध्ये जाहिरात दे " कार्यकर्ते हवेत , सेवा करायला , सतरंजी , खुर्च्या , जोडे उचलण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य " कृपया नेते मंडळींच्या नातेवाईकांनी किंवा मुलांनी अर्ज करू नये त्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ....मंत्रिमंडळात .........
  • Log in or register to post comments
श
शरद Sun, 01/30/2011 - 02:41 नवीन
बागवे गेले म्हणून काही मंत्र्यांची कमतरता पडलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळी कामे सोडून औरंगाबादपासून महाडपर्यंत मागोमाग हिंडत आहेतच की ! शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaydip.kulkarni
क
कापूसकोन्ड्या Sat, 01/29/2011 - 16:15 नवीन
युवराज महारष्ट्रातील नेत्याना मार्गदर्शन देण्यासाठी आले आहेत. त्यांनी केलेले खालचे स्टेटमेन्ट त्यांची प्रगल्भता दिसून येते. त्यानी सरकारला चक्क सुचना केली आहे की सोनावणे जळीत हत्या प्रकरणात कडक कारवाई करावी.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sat, 01/29/2011 - 16:32 नवीन
राजकारण हे मला दलदलीसारखे वाटते ,शक्य तितके राजकारणापासुन दूर राहण्याचा प्रयत्न करेल्.आणी समाजासाठी काहीतरी करायचेच असेल तर ते राजकारणापासुन दूर राहुनही करता येईल .
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sat, 01/29/2011 - 18:13 नवीन
संधी मिळाल्यास सोने करीन...
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 01/29/2011 - 18:35 नवीन
माझे बाबा नेहमी सांगायचे - राजकारण हा नालायक लोकांचा शेवटचा धंदा असतो, त्यामुळे आम्ही नालायक असलो तरी हा धंदा करणार नाही हां आता दहा वर्षे फिक्स पगारावर घेणार असतील राहुल गांधी तर चालेल मला. एकुण सिटिसि च्या ५% देउ कि रेफरलचे, आपली ना नाही त्याला.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sat, 01/29/2011 - 19:24 नवीन
महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणायचे. राजकारणी माणसेच देश बदलु शकतात असे राहुल गांधींना वाटत असावे. एकही काळा पैसा न वापरता लोकसभेची निवडणूक कशी जि़ंकायची ह्यावर राहूल गांधी मार्गदर्शन करु शकतील का? जात्,धर्म,पैशाचा विचार न करता राहुल गांधी उमेदवार उभे करु शकतील काय? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळाली तर बघुया!नायतर नोकरी जय हो.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 01/29/2011 - 19:37 नवीन
जीवनातली १० वर्षे योगदान द्यावे असे त्यांचे विचार आहेत.. त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना खाउ/पिउ कोण घालणार अविनाशकाका? आपल्या समुहातील तरुण याचा विचार करणार का? तुम्ही तुमच्या नातात्यला किती युवकांना हे सांगीतले आहे?? (उत्तर द्यायला परत या. नेहमीप्रमाणे २-३ ओळींचा एक विषय टाकायचा sorry फेकायचा. आणि मग सगळे कसे भांडतात हे बघत बसायचे हे सोडा.)
  • Log in or register to post comments
द
दैत्य Sun, 01/30/2011 - 00:51 नवीन
राहुल गांधी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे... काय रं राव्हल्या, पोरं कमी पडत्यात काय? २ ट्रक भरूण पोरं पाठवतो की! नाहीतरी काय करत्यात ती, आय.टी. मधी ज्वाब करत्यात आनि राच्च्याला जेवन खाउण झोपत्यात....कदी मस्ती नाय ना पोरीची छेड नाय....!!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 01/30/2011 - 05:55 नवीन
२००० पोलिस बंदोबस्तात तो २०० शाळेच्या पोरांसमोर भाषण करतो.आणि त्यात तरुणाना राजकारणात यायला सांगतो.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 01/30/2011 - 08:21 नवीन
या सोनियापुत्रावर मिपा सदस्यांचे एवढे प्रेम का ? सारखा त्याच्या विषयी धागा निघतो. त्याच्या विषयी सारखे बोलायचे म्हणजे त्याला महत्व द्यायचे. म्हणजेच आपणच घराणेशाही मान्य करायची.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sun, 01/30/2011 - 17:32 नवीन
युवराज व त्यांचे अक्कलशुन्य गुरुदेव असल्या टिनपाट व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडलेल्या बालिश विधानांच्यासंदर्भात धागे काढून (पक्षी-पुड्या सोडून)फुकटच्या चर्चेच्या फैरी झडवण्यात व तथाकथित वैचारीक मंथन करण्यात सदस्यांचा अमुल्य वेळ व क्रयशक्ती खर्ची घालवावी या उद्देशापोटीच धागाप्रवर्तक असले अर्थहिन धागे काढत सुटले आहेत..... रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी 'हा असाच एकुण प्रकार दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सुधीर काळे Sun, 01/30/2011 - 12:47 नवीन
चोरून-चोरून परदेशी नेऊन स्विस बँकेत ठेवलेला पैसा गरीब भारतीयांचा आहे आणि यूपीए सरकारने तो त्वरित परत आणण्याची व्यवस्था करावी असे अतीशय मोलाचे मुक्ताफळ परवाच महाराष्ट्रात आलेला असताना राहुलबाळाच्या तोंडून (चुकून) बाहेर पडले. चुकून अशासाठी कीं जे दिल्लीत आपल्या घरी (हळूच) सांगायचे ते महाराष्ट्रात येऊन त्याने मोठ्याने सांगितले! म्हणूनच म्हणतात, "परी तू जागा चुकलासी"! पण कांहींही म्हणा पण 'इतरां'ना उपदेश करून स्वतः मात्र "कोरडे पाषाण" रहाण्यात या दोघांचा हात इतर कुणी धरू शकणार नाहीं! 'लोकसत्ते'त आलेला लेख वाचा व वाचकांच्या ३ प्रतिक्रियाही! http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128114%3A2011-01-09-15-32-42&catid=212%3A2009-08-18-16-27-53&Itemid=210
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 01/30/2011 - 17:44 नवीन
राहूल गांधी म्हणल्यावर मला स्वीस पेक्षा बॉस्टन आठवते... Boston Airport issue
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 01/30/2011 - 17:29 नवीन
त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना खाउ/पिउ कोण घालणार अविनाशकाका? ------------------------ आई शप्पत..पतांना कावेरीचे तिर्थ दिलेच पाहिजे शांति साठी
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 01/31/2011 - 01:26 नवीन
दहा वर्षे? म्हणजे सत्तेचा काळ ठरला वाटते?
  • Log in or register to post comments
व
वडिल Fri, 02/04/2011 - 16:14 नवीन
आज भारताला राहुल जीं सारख्या युवक नेत्या ची गरज आहे. देश सेवेच्या पोटि त्यांनी अजुन लग्न हि केलं नाहि. आजच्या युवकां समोर ते एक आदर्श आहे. त्यांच्या विरुध्द काहि लिहिणं म्हणजे देशद्रोह.
  • Log in or register to post comments
प
प्रभावळ Sat, 03/05/2011 - 07:50 नवीन
http://www.hindustantimes.com/Court-notice-to-Rahul-Gandhi/Article1-668312.aspx या बातमीवर पण चर्चा करणार का? युवराजांना जाब विचारणारे कुणी नाही ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा