तेलुगु लोकांच काय चालू आहे ?
💬 प्रतिसाद
(71)
म
माझीही शॅम्पेन
Sun, 01/30/2011 - 08:31
नवीन
http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/services/travel/visa-power/immigration-fraud-hundreds-of-indian-students-may-be-deported-from-us/articleshow/7359653.cms
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sun, 01/30/2011 - 08:51
नवीन
गुल्टि/गुल्ट म्हणजे काय?
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sun, 01/30/2011 - 08:59
नवीन
गुल्टी = तेलगु (आंध्रा तील लोक) tel gu = gultee
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Sun, 01/30/2011 - 09:41
नवीन
अमेरिका या नावाचे जबरदस्त आकर्षण आंध्रात आहे हे त्या राज्यातून अमेरिकेत जाणारे विद्यार्थी आणि एच-वन वाले बघून नक्कीच लक्षात येते.जॉर्ज डब्ल्यू.बुश अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या भारत दौऱ्यात हैद्राबादला अमेरिकन कॉन्सुलेट काढायची घोषणा म्हणूनच केली असावा. तरीही प्रकरणात त्याच अमेरिकेचे जबरदस्त आकर्षण आणि त्यासाठी काहीही करायची तयारी आणि कदाचित फसवणुक या सगळ्या गोष्टींना हे विद्यार्थी बळी पडले आहेत हे लक्षात येतेच.अशा वेळी ते परक्या देशात अडचणीत सापडलेले असताना ते तेलुगु (किंवा तुमच्या भाषेत गुल्टी) की इतर कोणी याचा विचार न करता ते भारतीय नागरीक म्हणून निदान त्यांना या प्रसंगी आपण तरी हिणवू तरी नये असे वाटते.त्याचबरोबर त्यांनी त्या देशाचा कायदा मोडला असेल तर त्यांना हाकलून द्यायचा अमेरिका सरकारला पूर्ण अधिकार आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे.
अमेरिकेत असताना एक अनुभव अनेकदा येतो.आणि तो म्हणजे तुम्ही प्रामाणिक असाल, नियम आणि कायदे पाळणारे असाल तर सामान्य माणसाच्या पातळीला तरी सरकारचा त्रास नाही.पण काही उलटेसुलटे करायला गेलात तर मात्र तुम्हाला दयामाया नाही.अमेरिका या देशाचे आकर्षण ठेवण्याबरोबरच या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे असे वाटते.असो.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sun, 01/30/2011 - 10:14
नवीन
तुमच म्हणन बर्या पैकी पटताय , हिणवायचा उद्देश ह्या परिस्थितीत नाही , पण अस अमेरिकन सरकार अस करू शकेल ? आपलेच काही लोक (म्हणजे इथे आता गुल्ति) जर कायदा धाब्यावर बसवून हे करू शकतात तर त्याना कसा काय नैतिक पाठिंबा द्यायचा बुवा ? अश्याने भारतीय लोकांचेच नाव बदनाम होत ना काय ?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Sun, 01/30/2011 - 10:28
नवीन
झाले तर मग.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Sun, 01/30/2011 - 09:47
नवीन
व्हीजा बालाजीचा कोप, दुसरं काय ?
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sun, 01/30/2011 - 10:08
नवीन
क्लिंटन ह्यांच्याशी सहमत.अमेरिका या नावाचे जबरदस्त आकर्षण आंध्रात(शिवाय पंजाब्/दिल्ली) आहे . दहा वर्षांपूर्वी म्हणजे जो तो H1B वर जात असताना!!) एका मित्राला लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून एक पर्याय निवडयचा होता- १५ एकर जमीन्(पश्चिम गोदावरी जिल्ह्यात) किंवा H1B. सासर्याचे मित्र अमेरिकेत 'सेटल' करुन देणार होते.जमीनीची किंमत त्यावेळी २५/३० लाख तरी असावी.मित्राने दुसरा पर्याय निवडला आणि अर्थातच 'सेटल' झाला.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/30/2011 - 12:50
नवीन
>>>>ट्राय-वॅली नावाचे विद्यापीठ स्थापन करून वीसा नियमांचा दुरुपयोग बरेचसे गुल्ट विद्यार्थी अमेरिकेत आले
विद्यार्थ्यांची यात काय चूक आहे ? आत्ताच काही वाहिन्यांवरील बातमीवरुन ट्राय व्हॅली (वॅली) विद्यापीठाला मान्यता आहे वगैरे. माझा प्रश्न असा की, विद्यापीठ बोगस आहे. पण म्हणून विद्यार्थ्यांच्या पायात त्या जीपीएसच्या बेड्या कशासाठी घातल्या आहेत. हे प्रकरण काय आहे, कोणी समजावून सांगेल काय ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Sun, 01/30/2011 - 14:15
नवीन
http://www.mercurynews.com/top-stories/ci_17151508?nclick_check=1
या दुव्यावर माहिती मिळेल. ट्राय वॅलीला मान्यता होती. अमेरिकन सरकारने स्टुडंट विसे ही दिले होते. पण त्या व्हिसांचा वापर इथे शिक्षणासाठी न करता नोकरीसाठी जाणून बुजून केला गेला.
इथे मंदी असल्याने कंपन्या h1B व्हिसा करत नाहियेत. तेव्हा इथे नोकरी करण्यासाठी स्टुडंट व्हिसा आणि त्यातील ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग, करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंग या तरतुदींचा गैर वापर केला. बर्याच फोरमवर लोकं एकमेकांना हे असे करुन नोकरी करायचे सल्ले राजरोस देत होते. तेव्हा सो कॉल्ड विद्यार्थ्यांना आपण फ्रॉड करतोय याची पूर्ण जाणिव होती असेच म्हटले पाहिजे. जीपीएस च्या बेड्या ही इथली हाऊस अॅरेस्टसाठीची स्टॅडर्ड प्रोसेस आहे. त्यात काही विशेष नाही.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/30/2011 - 15:25
नवीन
शिक्षणासाठी असलेले व्हिसे नोकरीसाठी वापरले गेले हा त्यांचा मोठा गुन्हा आहे हे आत्ता आपल्या प्रतिसादामुळे लक्षात आले. प्रसारमाध्यमं मात्र, विद्यार्थी जिथे शिक्षण घेत आहेत ते विद्यापीठ बनावट आहे किंवा नाही यावर भर देऊन त्या कारणाने फसलेल्या विद्यार्थ्यांवर अमेरिकेतील सरकार उगाच कार्यवाही करत आहेत असे म्हणत होते. असो, करेक्ट माहिती बद्दल धन्स.
जीपीएस च्या बेड्या ही इथली हाऊस अॅरेस्टसाठीची स्टॅडर्ड प्रोसेस आहे.
अच्छा...! असं आहे होय. पण, विद्यार्थ्यांच्या पायात असलेल्या जीपीएसच्या बेड्यांची ती स्टँडर्ड प्रोसेस पाहतांना काय बरं नाय वाटलं बॉ..!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Mon, 01/31/2011 - 03:41
नवीन
Disturbia नावाच्या चित्रपटात ही जीपीएस बेडी पाहिली आहे. असो.
- Log in or register to post comments
P
Pain
Mon, 01/31/2011 - 03:57
नवीन
भारी.
तेच उदाहरण देणार होतो...शिया लाबफच्या हाउस अरेस्टचे
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Sun, 01/30/2011 - 14:16
नवीन
चर्चेत तेलगु लोकांना गुल्टी म्हणून हिणवणे अनावश्यक आहे हे प्रथमतः लिहिते.
सदर विद्यापिठात ज्यांनी अॅडमिशन घेतली त्यांना लवकरच तेथे काही शिकवले जात नाही याची कल्पना आली असावी. त्यापैकी कुणी तोंड उघडून तक्रार केलेली दिसत नाही. विद्यार्थीदशेत काही मर्यादित तास नोकरी करता येते असे वाटते परंतु ती नोकरी करण्यावर अनेक बंधने आहेत. जर येथे दाखल झालेले विद्यार्थी कॅलिफोर्निया सोडून मेरिलँड, वर्जिनियापर्यंत जाऊन काम करत होते तर या फ्रॉडमध्ये त्यांचा बरोबरीने हिस्सा आहे. कारण सोपे आहे. युनिवर्सिटीची पदवी/उच्चपदवी मिळाल्यावर इबी-२/इबी-१ वर ग्रीनकार्ड लवकर होते.
असो. ही गोष्ट इतकीच नाही. त्यांना इललिगली नोकर्या देणारे कोण होते? या युनिवर्सिटीतून पास होऊन बाहेर पडलेले, नोकर्या करणारे, ग्रीनकार्ड आणि नागरिकत्व मिळालेले अशा सर्व गुन्हेगारांना ताबडतोब डिपोर्ट करायला हवे.
राहिली गोष्ट, पायाला बँड बांधून मॉनिटरींगची. ती अयोग्य आणि अमानुष आहे. त्याबद्दल भारत सरकारने नाराजी व्यक्त करावी.
बाकी प्रश्न,
तेलगु लोकांचे हे असले उद्योग कधी चालत नव्हते ते तरी सांगा. ;)
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Sun, 01/30/2011 - 15:06
नवीन
ऐकीव माहितीनुसार, स्टुडंट व्हिजावर गेलेले लोक आठवड्याला २० तासापर्यंत कँपस जॉब करु शकतात.
बाकी, बाय अँड लार्ज, अमेरिकेत शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी, शिकण्याच्या ओढीपेक्षा अमेरिकेत शिरायचा सोपा मार्ग म्हणून २-३ वर्षे शिकण्याचा त्रास सहन करतात असे मत या ठिकाणी आम्ही नोंदवू इच्छितो !
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Sun, 01/30/2011 - 15:13
नवीन
अगदी असेच. या तथाकथित विद्यार्थ्यांनी कितीही कायदा मोडला असला तरी ’गुल्टी’ म्हणून एक समुदायदर्शक विशेषणाने हिणवू नये असे वाटते.असे प्रकार करण्यात अनेक तेलुगू लोक अनेक पुढे असले तरी सगळे तेलुगू लोक तसे असतात असे नक्कीच नाही.
अमेरिकेत नोकऱ्या मिळवताना कशा लांड्यालबाड्या चालतात याविषयी अधिक माहिती मी काही महिन्यांपूर्वी लिहिलेल्या या प्रतिसादात.हे चालते तितके दिवस ठिक असते पण पकडले गेले तर अजिबात दयामाया नाही आणि मग सध्या या विद्यार्थ्यांवर जी वेळ आली आहे तीच अशांवरही येणार हे नक्की.अमेरिकेत पहिल्यांदा तुमच्यावर विश्वास ठेवतात, पहिल्या मिनिटापासून संशयाने बघत नाहीत.पण असे काही करताना पकडले गेल्यास मात्र तुम्ही काहीही केलेत तरी त्यांचा तुमच्यावर विश्वास बसणे अशक्य.
- Log in or register to post comments
P
Pain
Mon, 01/31/2011 - 03:50
नवीन
असे प्रकार करण्यात अनेक तेलुगू लोक अनेक पुढे असले तरी सगळे तेलुगू लोक तसे असतात असे नक्कीच नाही.
ही शितावरून भाताची परिक्षा नव्हे. बहुसंख्य लोक तसे असल्याने जसे ४.८ ला ५ किंवा ३.१४१६ ला ३.१४२ असे राउंड ऑफ केले जाते, तसा तो प्रकार आहे. अशा वेळी जनरलायझेशन* योग्यच असते.
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Mon, 01/31/2011 - 01:20
नवीन
चर्चेत तेलगु लोकांना गुल्टी म्हणून हिणवणे अनावश्यक आहे हेच म्हणतो. लेख आवश्यक तेथे संपादित व्हावा!
- Log in or register to post comments
P
Pain
Mon, 01/31/2011 - 03:46
नवीन
चर्चेत तेलगु लोकांना गुल्टी म्हणून हिणवणे
तुम्ही मागे झालेल्या चर्चेत तो शब्द कसा आला होता ते पाहिले नाहीत का? कोणीतरी तेलुगु --> गुलते--> गुलटे --> गुलटी अशी व्युत्पत्ती दिली होती.
सदर विद्यापिठात ज्यांनी अॅडमिशन घेतली त्यांना लवकरच तेथे काही शिकवले जात नाही याची कल्पना आली असावी
तुम्हाला असे का वाटते की शिकण्यासाठी हे लोक प्रवेश घेतात ?
असो. ही गोष्ट इतकीच नाही. त्यांना इललिगली नोकर्या देणारे कोण होते?
तुम्ही अमेरिकेत असता, निदान तुम्हाला तरी कन्सल्टंट वगैरेची कल्पना असायला हवी.
राहिली गोष्ट, पायाला बँड बांधून मॉनिटरींगची. ती अयोग्य आणि अमानुष आहे.
जसा रोग तसा उपाय. याव्यतिरिक्तही बरेच उद्योग हे लोक करतात त्यामुळे त्यांच्या पापाचा घडा भरला हे चांगलेच झाले.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Mon, 01/31/2011 - 13:40
नवीन
व्युत्पत्ती माहित आहे आणि ही व्युत्पत्ती हिणवण्यासाठी वापरली जाते हे ही माहित आहे.
इथे प्रश्न मला माहित असण्याचा नाही. मला अनेक गोष्टी माहित आहेत पण इथे प्रश्न अमेरिकन सरकार आणि क्लायंट्सना माहित असण्याबद्दल आहे. त्यांना इललिगली नोकर्या कोण देते वगैरे प्रश्न सरकारसाठी आहेत. त्यांनी हे माहित करून घेणे आवश्यक आहे. अनेकदा रिक्रूटिंग कंपन्या कसे झोल करून लोक प्रोजेक्टवर आणतात हे क्लायंटलाही माहित नसते. सरकार दूर राहिले.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 01/31/2011 - 17:45
नवीन
राहिली गोष्ट, पायाला बँड बांधून मॉनिटरींगची. ती अयोग्य आणि अमानुष आहे. त्याबद्दल भारत सरकारने नाराजी व्यक्त करावी
निषेधाची सुरुवात तिथल्या भारतियानि जास्त प्रभवी होइल.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 01/31/2011 - 17:47
नवीन
राहिली गोष्ट, पायाला बँड बांधून मॉनिटरींगची. ती अयोग्य आणि अमानुष आहे. त्याबद्दल भारत सरकारने नाराजी व्यक्त करावी
निषेधाची सुरुवात तिथल्या भारतीयानि प्रथम करावी.
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Sun, 01/30/2011 - 14:19
नवीन
http://www.trackitt.com/usa-discussion-forums/h1b/512950847/tri-valley-university-cpt-opt
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 01/30/2011 - 14:34
नवीन
सहमत आहे.
- लांबुडी चँपेन
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Sun, 01/30/2011 - 15:14
नवीन
ह्या गुल्टी लोकांचे कारनामे नोकरीतही प्रसिद्ध आहेत. आयटी कन्सल्टींग कंपन्यांमधून ह्यांचे उद्योग सुरुच असतात. शेवटी एकाने कंटाळून गुल्टी.कॉम अशी साइटच काढली आहे, ज्यावर ह्या कन्सलटींग कंपन्यांची बिनपाण्याने केली जाते.
- Log in or register to post comments
अ
अजबराव
Sun, 01/30/2011 - 15:57
नवीन
ते लोक(गुलटी हो) आपल्याला मट्टू म्हणतात :)
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Sun, 01/30/2011 - 18:11
नवीन
तेलगु लोकच नव्हे तर इतर भारतीयही असे प्रकार करण्यात पटाईत आहेत. ह्या प्रकरणात तेलगु विद्यार्थ्यांनी केलेला गैर प्रकार उघडकीस आला एवढेच! डिसी जवळ व्हर्जीनियामधेही अशीच एक युनीव्हरसिटी आहे. माझ्या माहितीतल्या किमान तिघा मराठी विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश मिळवून असा प्रकार केला होता. मास्टर्स संपायला आल्यावर मिळणारी ओपीटी (ऑप्शनल प्रॅक्टीकल ट्रेनींग) तेव्हा १ वर्षाची होती (आता हाच काळ अडीच वर्षाचा आहे बहुतेक). या काळात एच्-१बी स्पॉन्सर करणार्या कंपनीत नोकरी न मिळाल्यास भारतात परत जावे लागते. अमेरिकेत टिकून राहण्याच्या मोहापायी मग असल्या कोणत्यातरी युनीव्हर्सिटीमधे प्रवेश घेतला जातो, आणि कश्याही प्रकारे सिपीटी (करीकुलर प्रॅक्टीकल ट्रेनींग) म्हणजे इंटर्न करायला लागतात. सिपीटीवर ऑफिशीयली तुम्ही विद्यार्थी असला तरी १ वर्षाकरता फुलटाईम नोकरी करता येते. म्हणजे एच्-१बी साठी अजून एक वर्ष मिळतं. त्यात तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात असला की अशी नोकरी मिळने अजून सोपे जाते.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 01/30/2011 - 21:43
नवीन
इतर देशातील लोकसुद्धा असे उद्योग करतात...अर्थात पाठींबा कोणालाच नाही.
पूर्वेकडील बायका/ मुली नागरिकत्व मिळावे म्हणून म्हातार्या गोर्या किंवा कोणीही नागरिक असलेल्या माणसाशी लग्न करतात...अगदी कालच एका २२-२४ वर्षाच्या एशिअन मुलीला ६०-६५ वर्षाच्या गोर्या म्हतार्याबरोबर पाहिलं. दोघेही खुश म्हंटल्यावर आपल्याला काय पण एक निरीक्षण.
बाकी चालु द्या.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Sun, 01/30/2011 - 23:08
नवीन
विधीनिषेधशून्यता हा काही तेलगु लोकांचा गुण नसावा :)
असे विधीनिषेधशून्य लोक मी तमिळ, बंगाली, मराठी, पंजाबी, इ. इ. बरेच पाहिले आहेत. पण कंपूबाजीत तेलगुंच्या मानाने कमी पडत असल्याने कदाचित त्यांचे एवढे लक्षात येत नसेल. :)
असो.
अमेरिकन कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा व्हावी, हे योग्य. आणि त्यांना अवास्तव त्रास होऊ नये यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे हेही जरूरीचे आहे. पायात जीपीएस च्या बेड्यांबद्दल मला फारसे दु:ख झाले नाही.
- Log in or register to post comments
द
दादा बापट
Mon, 01/31/2011 - 00:07
नवीन
गुल्टी ही जातीवाचक शिवी असल्याने क्रुपया हा धागा दाबून (अप्रकाशीत) करावा ही नम्र विनन्ती.
- Log in or register to post comments
P
Pain
Mon, 01/31/2011 - 03:36
नवीन
चूक.
ती शिवी नाही आणि तो शब्द जात नव्हे, भाषावाचक आहे, जसे पंजाबी, गुजराती, मराठी, बंगाली इ.
- Log in or register to post comments
द
दादा बापट
Mon, 01/31/2011 - 13:23
नवीन
ती जर शिवी नाही तर एखाद्या तेलगू माणसाला गूल्टी म्हणून बघा ना राव. कानफटात बसली नाही तर नशिब समजा.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 02/01/2011 - 00:27
नवीन
मला हा शब्दही माहित नव्हता. त्या लोकांकडूनच कळला. त्यामुळे जर्मन लोक जसे स्वतःला डॉईश, इंग्लिश - ब्रिटीश, भारतीय उपखंड- देशी/ देसी तसा तेलुगु बोलणारे ते गुलटी, असे माझे मत झाले.
तुम्हाला ते काय करतात याची काहीही कल्पना नाही, त्यामुळे इतकी सहानुभुती दाखवू नये. आधीच भारतीयांची प्रतिमा तितकीशी चांगली नाही आणि त्यात त्यांच्या करामती म्हणजे...
आणि वाईट म्हणजे इतरांना फरक करता येत नाही. त्यांची भारतीय लोक वाईट अशी समजूत होते.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/31/2011 - 02:59
नवीन
तेलुगु लोकांनी जे काही केले त्यास योग्य ती शिक्षा व्हायला हवी पण म्हणून सगळे तेलुगु लोक असे नसतात हे मात्र नक्की.
माझ्या काही चांगल्या मैत्रिणी आहेत तेलुगु. तमीळ मैत्रिणीही आहेत्.....हे लोक थोडे कट्टर वाटतात पण आपणही त्यांना असेच काहीतरी वाटत असू. जीपीएस बद्दल एवढे काय वाटायचे? शिक्षा होण्याजोगे काम करायचे आणि वर पळून जायला मोकळीक हवी......असे कसे चालेल?
- Log in or register to post comments
P
Pain
Mon, 01/31/2011 - 03:29
नवीन
सगळे नसतील, पण बहुसंख्य असतात. तमीळ किंवा भारतातील इतर कुठल्याही राज्यातील लोक इतके खराब नसतात. हे जे उघडकीला आले ते केवळ हिमनगाचे एक टोक आहे. संपूर्ण रॅकेट*, ज्याची सुरुवात भारतात होते, त्याची कल्पना आणि अनुभव इथे कोणालाच आलेले दिसत नाहीत. वरच्या प्रतिक्रिया म्हणजे हत्ती आणि सहा आंधळे असा प्रकार आहे.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/31/2011 - 17:23
नवीन
तसं नाही. बहुसंख्य असे असतीलही. मला हैद्राबादेत आणि अमेरिकेतही या लोकांचा अनुभव बरेचदा बेशिस्तीचा आला.
तमीळ लोक कट्टर असतील पण सर्रास अशी कामे करतीलसे वाटत नाही. तुमच्याशी थोडी सहमत नक्कीच आहे. पण सरसकट 'वाईट' म्हणणे बरोबर नाही असे वाटते. पंजाबातले लोकही बेकायदेशीर कामे करून व्हिसा मिळवून देणे (लग्न करून वगैरे) करतात. ते रॅकेट उघडकीला आले त्याची माहिती समजली आणि हसून बेजार झाले. वाईट वाटून संपल्यावर या प्रकारांचे हसूच येते.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 02/01/2011 - 00:41
नवीन
तुम्ही तुमच्या मैत्रिणींवरून या लोकांना जोखू शकत नाही. तुम्ही जर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये असता तर यांचे धंदे तुम्हाला प्रत्यक्ष बघता आले असते.
बाकी मिपाकर तर निव्वळ ते (तेलुगु) भारतीय असल्याने त्यांना सहानुभुती दाखवत आहेत आणि ते पट्टे अमानुष असल्याचा कांगावा करत आहेत.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Mon, 01/31/2011 - 07:38
नवीन
एकंदरीत चर्चेचा / प्रतिक्रियांचा रोख पाहता काही मुद्दे मला मांडले पाहिजेत. हिणवन्यचा उद्देश ह्या परिस्थितीत नाही हे वर स्पष्ट केले आहे
"गुल्टी ही जातीवाचक शिवी असल्याने क्रुपया हा धागा दाबून (अप्रकाशीत) करावा ही नम्र विनन्ती"
गुल्टी ही माझ्या मते शिवीच नाही , त्या मुळे जातीवचक / प्रांतिक परिणामे देऊन भीक नको पण कुत्रा आवर असा प्रकार करू नका , काही आवांतर मुद्दे
१). माझ्या बाबतीत हा शब्द माझ्या तेलगु रूम पार्टनर नेच गप्पा मारताना वापरलाय की जवळपास आंध्रत्ल्या लोकांसाठी तो एक समानआर्थि शब्द झालाया
२) नंतर गुगळुन पहिल्या वर काही दुवे सापडले
www.urbandictionary.com/define.php?term=gulti
A person that speaks 'Telugu' is called a 'Gulti'. People that speak Telugu come from a state in South-India called Andhra Pradesh
३) मिपा च्या खजिन्या ती मला काही दुवे सापडले ज्याच्या प्रतिक्रियेत हा शब्द वापरला आहे
http://www.misalpav.com/node/10517
http://www.misalpav.in/drupal6/node/2750
असो , पुढील माहिती एकदम नवीन आणि रोचक वाटली , स्वाती२ धन्यवाद !
"जीपीएस च्या बेड्या ही इथली हाऊस अॅरेस्टसाठीची स्टॅडर्ड प्रोसेस आहे. त्यात काही विशेष नाही"
अमेरिकन सरकार आणि त्यांचा कायदा आपले काम करील पण ह्या प्रकरणात नाक्कि काय चालू आहे हे सर्वाना कळले पाहिजे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 01/31/2011 - 08:04
नवीन
>>>जीपीएस च्या बेड्या ही इथली हाऊस अॅरेस्टसाठीची स्टॅडर्ड प्रोसेस आहे. त्यात काही विशेष नाही
रोचक. भलतेच रोचक.
तंत्रज्ञानाने भलतेच सोपे झाले आहे सगळे.
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Mon, 01/31/2011 - 15:27
नवीन
या लोकांना इमिग्रेशन वाल्यांनी त्यांच्या डिटेंशन सेंटरला अडकवून ठेवले असते तर त्यांचे जे काही हाल झाले असते त्या पेक्षा हे जीपीएस बेडी घालून हाऊस अरेस्ट मधे ठेवलेय ते खुपच चांगले आहे. हे जे काही झाले त्या रॅकेटमधल्या इतर लोकांना शिक्षा होण्यासाठी, केस करण्यासाठी या विद्यार्थ्यांची साक्ष वगैरे लागणार. हे विद्यार्थी जर का देश सोडून पळाले तर मूळ गुन्हेगार मोकळे सुटतील. त्यामुळे हे जीपीएस. इथे हे असे जीपीएस वाले हाऊस अॅरेस्ट मिळवायला लॉयरला केवढे व्याप पडतात. नॉन बेलेबल असाल आणि हाऊस अॅरेस्ट मिळाले की लगेच घेऊन टाकायचे असते. निशेध कसला नोंदवायचा?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 01/31/2011 - 19:55
नवीन
<<<नॉन बेलेबल असाल आणि हाऊस अॅरेस्ट मिळाले की लगेच घेऊन टाकायचे असते. निशेध कसला नोंदवायचा?
याला म्हणतात फर्स्ट ह्यांड इन्फॉरमेशन.. ;)
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 02/01/2011 - 01:36
नवीन
हे विद्यार्थी जर का देश सोडून पळाले तर मूळ गुन्हेगार मोकळे सुटतील
हे विद्यार्थीही (?) गुन्हेगारच आहेत. त्यांच्या उद्योगांपुढे ही शिक्षा काहीच नाही.
या सगळ्याबद्दल काहीही माहिती नसताना आणि त्यांच्या उद्योगांची झळ न बसलेले लोक केवळ ते गुन्हेगार भारतीय असल्याने त्यांच्या नावाने गळे काढत आहेत.
एरव्ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना आठवडा उलटला तरी उत्तरे न देणारे संपादक आता मात्र तत्परपणे असल्या मिपाकरांच्या हो ला हो करत आहेत. हा सर्व मिपाकरांचा कंपू गुन्हेगार तेलुगु कंपूची काळजी वाहत आहे, भले ते गुन्हेगार का असेनात. उत्तम!
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Tue, 02/01/2011 - 04:16
नवीन
हे विद्यार्थी गुन्हेगार आहेतच. पण त्यांच्यावर फक्त इल्लिगली नोकरीचा गुन्हा लावता येइल. शिक्षा डिपोर्टेशन. पण हे जे रॅकेट चालवणारे इथले ग्रीन कार्ड होल्डर्स, सिटिझन्स आहेत त्यांना मात्र फेडरल लॉ खाली शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे विद्यार्थी इथे ठेवणे गरजेचे आहे.
काही वर्षापूर्वी Lucky Reddy या साऊथ इंडियनने चालवलेले फ्लेश ट्रेडचे रॅकेट उघडकीस आले होते. त्यात अकुशल कामगार आणि त्यांचे कुटुंबीय म्हणून खोटे पासपोर्ट करुन मुली आणल्या होत्या. त्यात मुलींना विक्टिम्स म्हणून प्रोटेक्शन मिळाले. पण रॅकेट चालवणार्याला शिक्षा झाली. http://www.wassusa.com/ येथे त्या केस बद्दल माहिती मिळेल.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 02/01/2011 - 05:12
नवीन
फक्त इल्लिगल नोकरीच नव्हे तर खोटा रेस्युमे बनवणे, शून्य अनुभव असताना ५-७ वर्षे आहे असे सांगून फसवणे यासाठी ४२० सारखे एखादे कलम असले तर तेही लावले पाहिजे
कन्सल्टंटसचे परवाने रद्द करून त्यांनाही हाकलून लावले पाहिजे म्हणजे जरब बसेल.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 02/01/2011 - 05:25
नवीन
मीसुद्धा या प्रकाराबद्दल ऐकले होते...अशा वेळेस असा नराधम भारतीय असो वा नसो त्याच्या विरूद्धच राहायला हवे....त्याने १३-१५ वर्ष लहान मुली, पुरुष अन स्त्रिया यांना नागवले.
बाकी या लोकांची कंपूबाजी ओळखीची आहे....
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 01/31/2011 - 16:46
नवीन
भारतीय लोकांचेच नाव बदनाम होत ना काय ?
.....................................................
नेत्यांनीच मक्ता थोडाच घेतला आहे? नागरीक हि हातभार लावत आहेत...
- Log in or register to post comments
त
तिमा
Mon, 01/31/2011 - 17:44
नवीन
नियमबाह्य वर्तन करण्यात आपण सगळेच भारतीय आघाडीवर आहोत. तिथे असले प्रकार 'रेग्युलराइज' करुन घ्यायला तो काही भारत नाही. तेंव्हा जे कायद्यानुसार व्हायचे ते होणारच.
तिथे कायम रहायला मिळालेले भारतीयच बाकीच्या देशबांधवांना 'देसी' म्हणून हिणवत असतात.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/31/2011 - 19:32
नवीन
'देसी' म्हणून हिणवत असतात.
अगदी असहमत.
एखादा माणूस, दुकान, पदार्थ 'देसी' असणे म्हणजे आपले (भारतीय) असणे.
मी तरी आत्तापर्यंतच्या माझ्या वास्तव्यात देसी या शब्दाचा वापर फक्त चांगल्या अर्थानेच झालेला पाहिला आहे.
खरं सांगायचं तर परदेशी राहिल्यामुळे स्वदेशींना 'हिणवणे' तेही राजकारणी लोकांना असे करताना शक्यतो उत्तर भारतीयांना जास्त पाहिले आहे. सगळ्यांना आपापल्या नातेवाईकांची, मित्रमंडळींची प्रेमानेच आठवण येत असते.
भावनेच्या भरात कधीतरी वाईट म्हटले गेले तर ते खरे असते काय? मलाही आधी आमच्या काही मित्रमंडळींचा राग 'नावे ठेवणे' या कारणाने यायचा. पण त्यामागे कारण हे बहुतेकवेळा काळजीचे असते. आपल्या देशात काही वाईट घडताना अगदी सगळ्यांना वाईट वाटलेले पाहिले आहे. मराठी गाण्याच्या कार्यक्रमाला कितीतरी अमराठी लोक आवर्जून उपस्थित असतात. ते लोक जर त्या कार्यक्रमाला 'देसी' म्हणत असतील तर त्यात चूक काय?
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 01/31/2011 - 22:16
नवीन
देसी मध्ये आपलेपणा आहे.
देसी हा डेरोगेटरी (हिणकस) शब्द नाही.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Mon, 01/31/2011 - 19:55
नवीन
आँ?? देसी गर्ल हे गाणे प्रियंकाला हिणवण्यासाठी होते काय?
देसी हा शब्द हिणवण्यासाठी वापरला जातो असे वाटत नाही. (असतीलही काही महाभाग तसे समजणारे पण हा हिणवणारा शब्द नाही)
गंमत म्हणजे मी पाकिस्तान्यांनाही भारतीयांशी बोलताना 'अपना देसी बंदा है|' वगैरे वाक्ये बोलताना ऐकले आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »