गंमत म्हणजे मी पाकिस्तान्यांनाही भारतीयांशी बोलताना 'अपना देसी बंदा है|' वगैरे वाक्ये बोलताना ऐकले
आहे.
अगदी खरं आहे... मी माझ्या पाकीस्तानी मित्राकडून प्रथम 'देसी' शब्द ऐकला तेव्हा त्याला विचारलं की तो 'देसी' कसा? तर तो म्हणाला इथे इंडीयन, पाकीस्तानी, श्रीलंकन, बांग्लादेशी .. सगळे 'देसी' कॅटेगरीमधेच येतात!
देसी हा शब्द हिणवण्यासाठी वापरला जातो असे वाटत नाही
तिरशिंगराव,
या प्रकाराला अपवाद आहेत मेक्सिकोहून बेकायदा आलेले घुसखोर. ते इतक्या मोठ्या प्रमाणावर येतात (आपल्याकडे बांगलादेशी येतात तसे) कीं त्यांच्यावर खटले घालण्यापेक्षा त्याना regularise करणे सोपे झाले असावे.
या लोंढ्यामुळे लवकरच अमेरिकेत इंग्रजीबरोबर स्पॅनिश भाषासुद्धा जोड-राष्ट्रभाषा होण्याची शक्यता आजकाल बोलून दाखविली जाते.
थोडक्यात काय कीं कांहींही मोठ्या प्रमाणावर केले कीं त्यापुढे इलाज नसतो. लोकशाहीत संख्येला जे अनन्यसाधारण महत्व असते त्याची प्रचीती अशी येते! तिथेही हे बेकायदेशीर आलेले लोक 'वोट-बँक' म्हणून वापरले जातात असे वाचनात आलेले आहे.
माझ्या माहितीनुसार तेलगू विद्यार्थी आणि नोकरीत नव्याने लागलेले तेलगू लोक (जास्त करून सॉफ्टवेअरमधील) प्रचंड प्रमाणात कंपूगिरी करून तेलगू नसलेल्यांना 'नको जीव' करून सोडतात म्हणून ते इतर भारतीयांना आवडत नाहींत.
मला सुदैवाने असा अनुभव नाही. खूप तेलुगु लोक असूनही "नको जीव" झाला नाही. मात्र हे लोक मातृभाषेचा हट्ट धरतात आणि आपल्याला संभाषणातून खड्यासारखे वगळतात हे खरे आहे. पण कोणाकडून काही अपेक्षाच न ठेवल्याने म्हणा की काही का असेना विशेष समस्या आली नाही उलट एका मैत्रिणीकडून मी "सुंदर कांडमु" (एम एस राव यांनी अतिशय सुरेख गायलेले आणि विविध रागात गायलेले सुंदर कांड) मिळवून ऐकले.
सर्वांचा अनुभव असाच असावा असा आग्रह नाही.
तेलुगु लोकांनी कंपूबाजी आणि 'जीव नको' करणे हे माझ्या भावाला बरेचदा अनुभवाला आले.
शेवटी त्यानं काय युक्ती केली कोणास ठावूक पण सध्या बरे चालले असावे.
ज्येष्ठ कंपूकरी भावाकडे डीन्नरला ;) आले होते बहुतेक!
अरे बापरे.
तेलगु लोकांचा उच्छाद थेट अमेरिकेतही जाणवतोय म्हणजे कमालच झाली.
आपल्याला तर ह्यांच्या कंपुबाजीचा मोठा अनुभव आहे. हि मंडळि कुठेही गेली तरी आंध्रामध्ये असल्यासारखिच वावरतात.
२००७ साली दिल्लीला गेलो असतानाची गोष्ट. नॅशनल हायवेज ऑथॉरीटी ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये आमच्या कंपनीच्या प्रोजेक्टची रिव्ह्ऊ मिटिंग होती. टिम लिडर-बेल्जियम,सिनीयर इंजीनिअर- आयरीश व मी -मराठी सोडलो तर बाकीची सर्वच जनता तेलगुच होती. सुरुवातीचे दोनेक संवाद इंग्रजीत झाल्यावर गाडी एकदम तेलगुवरच आली. थेट प्रोजेक्ट डायरेक्टर पासून सर्वच जण तेलगुत सुरु झाले. आम्हा तिघांना काय बोलणे चालले आहे ते कळेचना. पण हि मंडळी काही थांबत नव्हती. आमच्या कामाशी संबधित काहि असले तरच तेव्हढ्यापुरते इंग्रजीत बोलणे व्हायचे. गाडी परत तेलगुवरच.
शेवटी टिम लिडर अन दुसरा गोरा वैतागून तावातावाने निघून गेले. परंतु ह्याचे ह्या मंडळींना काही अप्रुप वाटले नाहि. त्यांची चर्चा सुरुच होती. थोड्या वेळाने मी देखील काढता पाय घेतला अन थेट हॉटेलच गाठले.
अभिज्ञ.
तेलूगू लोकांचे वाईट अनुभव अनेकांना असतील. विशेषतः Pain यांनी लिहिल्या प्रमाणे खोटे रेस्युमे,खोटा अनुभव दाखवणे आणि प्रोजेक्ट मध्ये आल्यावर हात वर करणे हा अतिशय कॉमन प्रकार आहे. त्यात सुद्धा जर एखाद्या मोठ्या कंपनीने लोकल कन्सल्टंट कडून काँट्रॅक्ट वर घेतले असतील तर खूपच जास्त.
पण म्हणून सरसकट शिक्का मारणं अगदीच चुकीचं आहे. मी असंख्य अतिशय बुद्धिमान तेलूगू लोक पाहिले आहेत. सहकारी, बॉस, प्रॅक्टिस हेड इ.
जितका मराठी माणूस 'एकी' साठी प्रसिद्ध आहे तितकीच यांची दक्षिण भारतात प्रसिद्धी आहे की कायम पाय ओढतात. त्यामुळे तमीळ जनते पेक्षा हे बरेच कमी कंपूबाज आहेत. अनेकदा एकमेकांना मदत न करणे, पाय ओढणे यासाठी नाव कमावून आहेत. आणि हे मी स्वतः जवळून पाहिलं आहे.
त्यामुळे सरसकट विधानं करण्यात काही हशील नाही. एवढं मात्र खरं की अमेरिकेचं आकर्षण सगळ्यांनाच असलं - मराठी, कानडी, तमीळ, मल्याळी... तरी अमेरिका प्रेमात तेलूगू लोकांना कोणीच हरवू शकत नाही. मला असेही लोक माहीत आहेत की इतर काही ऑनसाईट मिळालं - यू के, सिंगापोर, ऑस्ट्रेलिया वगैरे तर त्यांना वाईट वाटतं की अमेरिकेला जायला मिळालं नाही.
पण मी चांगले मराठी मित्र पाहिले आहेत जे अत्यंत सुस्थितीत आहेत - दोन बंगले पुण्यात वगैरे.. तरी म्हणतात की भारतात ईंटेल साठी काम करण्या पेक्षा अमेरिकेत एक्सेल वर भलत्याच डोमेन वर करेन. मग या उदाहरणांवरून सरसकट मराठी तरूण असेच आहेत असा निष्कर्ष काढणे जितके अयोग्य तितकं तेलूगू जनतेला सरसकट नावं ठेवणं अयोग्य.
आणि कॉमन व्यवहाराची भाषा जसे इंग्लिश सोडून इतरांचा काहीही विचार न करता खुशाल मातृभाषेत मीटिंग घेणार्या लोकांमध्ये तमीळ लोकांना कोणीही हरवू शकणार नाहीत. तेलूगू नाहीच.
आमच्या कंपनीतले गुल्टी लोकं मात्र आमच्या बॉडीवर फिदा आहेत.. नेहमी बॉडी बिल्डिंग च्या टिप्स मागत असतात आणि दिवसातुन चार पाच वेळा तरी "हाऊ टू मेक बायसेप्स लाईक धिस ?" म्हणुन विणवण्या करत असतात.. हो आता त्यांना आपले वाक्य प्रश्नार्थक आहे की उद्गारवाचक , हेही कळत नाही तेंव्हा ते इरिटेट करतात :)
पण आपल्याला काय कोणत्या गुळ्टी कंपुकडुन ट्रास नाही बॉ .. :)
मात्र , दोन गुल्टी पोरी आहेत बघण्यालायक :) बाकींबद्दल णो कमेंट्स :)
संपादक : प्रस्तुत धाग्याच्या शीर्षकापासून त्यातल्या मजकूरातला जातिवाचक हीन मजकूर संपादित करण्यात येतो आहे. मिसळपाव वर जातिवाचक हीन मजकूराला आणि अशा विचारांना स्थान नाही याची नोंद घ्यावी अशी प्रस्तावकर्ते आणि प्रतिसादक या सर्वांनाच विनंती.
गुल्टि हा हीन आणि जातीवचक शब्द आहे हे समजवुन संगितल्याने मला आता मिसळपावच्या बोधी वृक्शाखाली मुक्ती मिळाली आहे :) थॅंक्स !
मात्र , दोन गुल्टी पोरी आहेत बघण्यालायक
हे वाचून "जोशी असो वा मोकाशी ...." अस काहीतरी आम्ही म्हणत असु पण ते इथे लिहिता येणार नाही !
बाकी तुम्ही तेच ना "जुदा होके भी तुम मुझमे कहि बाकी है" वाले गोडबोलेचा पुढचा भाग लवकर टाका र्राव (तेलगु राव नाही , मराठीच )
वाचला धागा, त्यांची बाजू घायची लायकी नाही एवढे घाणेरडे असतात हे लोक्स.
काही लोक थेट खेडेगावातून अमेरिकेत येतात, ते हैदराबादमध्ये एक दोनदा गेलेले असतात, त्यांना रस्त्यात उभे कसे राहायचे हेही माहीत नसते. बरं बाकीच्यांचे बघून शिकतही नाहीत.
एकदा एका स्पोर्ट्स दुकानात गेलो होतो तर तीन गुलटे आले काही समान घेऊन त्यांच्या अंगाला एवढा घाण वास येत होता की कौंटरवरच्या मुलीने नाकाला हात लावला. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले.
शेवटी तिने काचेचा दरवाजा उघडून मोकळी हवा आत येऊ दिली आणि कसेबसे त्यांचे बिल केले.
मी मुद्दामून तिथून निघून गेलो परत आत काहीतरी बघायच्या निमित्ताने.
पण त्या गुलट्याना ना सोयर ना सुतक.
हे लोक आपलाच माणूस प्रत्येक जागेवर कसा येईल हे पाहतात.
मीटिंग मध्ये आपल्याच भाषेत सुरू होतात.
प्रतिक्रिया