Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतातील मंदिरे-६ नागर व द्राविड शैली

श
शरद
Sat, 02/05/2011 - 08:43
🗣 8 प्रतिसाद

Book traversal links for भारतातील मंदिरे-६ नागर व द्राविड शैली

  • ‹ भारतातील मंदिरे-५ एकपाषाणी मंदिरे
  • Up

प्रतिक्रिया द्या
12456 वाचन

💬 प्रतिसाद (8)
आ
आपला आभि Sat, 02/05/2011 - 09:08 नवीन
खरच खूप छान .. हाही लेख आवडला .. आधीच्या लेखांच्या लिंक मिळाल्या तर बरे होईल .. तुम्ही थांबू नका लिहित रहा ... पुढचा लेख वाचण्यास उत्सुक आहोत .. इतिहास प्रेमी आपला आभी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 02/05/2011 - 12:45 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 02/05/2011 - 13:16 नवीन
अमूल्य माहितीचा खजिना दिन सार्थकी लागला .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/05/2011 - 14:20 नवीन
शरदराव, खूपच सुरेख आणि माहितीपर लेखमाला. पण याचा शेवट निदान हेमाडपंथी शैलीने व्हायलाच हवा. शेवटी आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांचा इतिहास हेमाडपंथी शैलीशिवाय पूर्ण होउच शकत नाही. तेव्हा अजून फक्त एक भाग जास्त टाकायचे मनावर घ्याच.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 02/05/2011 - 21:52 नवीन
+१ सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शरद Sun, 02/06/2011 - 02:45 नवीन
हेमाद्री वा हेमाडपंत हा देवगिरीकर यादवांच्या काळात ( १३ वे शतक) एक वरिष्ट अधिकारी होता. ह्या प्रकांड पंडिताच्या नावावर अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एका विशिष्ट घाटाच्या मंदिरांना हेमाडपंती म्हणावयाची पद्धत आहे. यात बांधणीकरिता चुन्याचा वापर केला जात नाही.ठराविक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा घेवून हे बांधकाम केले जाते. या पद्धतीत पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच आकाराची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक असते. पायाची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसवल्यामुळॆ लहान लहान शिखरे रचून मोठे शिखर तयार केले असे वाटते.ही शिखरे जागच्या जागी रहावीत म्हणून उपयोगात आणलेल्या दगडांवर नक्षीकाम करून उठाव आणतात.शिखरांमध्ये अनेक प्रकार असून अश्वथर, गजथर इत्यादी प्रकार प्रामुख्याने वापरतात. ही शिल्पपद्धती हेमाडपंताच्या नावाने प्रसिद्ध असली तरी अशा प्रकारची देवळे त्याच्या काळाच्या आधीपासून आढळतात. हेमाद्रीचे नाव देवळे बांधावयाच्या पद्धतीवरून पडले आहे. त्यामुळे अशी देवळे नागर वा द्राविड या दोनही शैलीत बांधता येणेशक्य आहे.आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या काळाच्या आधीही अशी देवळे बांधत होतेच. त्याचे स्वत:चे वास्तव देवगिरीला, महाराष्ट्रात असल्याने बरीच देवळे नागरी पद्धतीची आढळतात. विदर्भात, वर्‍हाडात, जयपुर-कोटली, अमदापूर,शिरपूर, मेहेकर,लोणार, धोत्रा, सातगाव (जि.बुलढाणा), निलंगे, नारायणपुर येथील देवळे बर्‍यापैकी स्थितीत आहेत. आंध्र प्रदेशातील देवळे या पद्धतीची आहेत पण त्यांचा संबंध हेमाद्रीशी जोडणे अवघड आहे. आपण जेंव्हा वेरुळ-घृष्णेश्वर बघावयाला औरंगाबादला जाता तेंव्हा एक दिवस काढून लोणारला अवष्य जा. उल्का निर्मीत सरोवर, देवळे, सिंदखेडराजा वगैरे एका दिवसात बघून होते. आज एका पुस्तकाचा परिचय करून द्यावयाचा आहे. श्री. के.आ.पाध्ये यांनी "हेमाद्रि उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र" नावाचे एक पुस्तक १९३१ साली प्रसिद्ध केले होते. वरदा प्रकाशनचे श्री.भावे यांनी २००८ ला त्याचे पुनर्मुद्रण करून एक महत्वाचे काम केले आहे. नानाविध माहितीचा खजिनाच या पुस्तकात आढळतो.हेमाद्रीचे चरित्र,त्याचे ग्रंथरचना,यादव घराण्याचा इतिहास,मोडीलिपी, महानुभाव वाङ्मय, हेमाडपंती देवळे,इत्यादी विविध भाग असून शिवाय ४ परिशिष्टेही आहेत. वाचनीय पुस्तक. जालावर अनेक फोटो पहावयास मिळतील शरद
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/06/2011 - 05:08 नवीन
शरदराव माहितीबद्दल आभारी आहे. हेमाडपंथी शैली यादवकाळापुर्वीपासूनच महाराष्ट्रात अस्तिवात आहे. फक्त नक्की माहीत नव्हते. कारण हेमाद्रीपंडिताचा आणि आधीच्या मंदिरांचा न जुळणारा काळ. पण तुमच्या स्पष्टीकरणामुळे समाधान झाले. महाराष्ट्रात विविध किल्ल्यांच्या पायथ्याला शिलाहारकालीन भोज राजांनी विशेषतः झंझ राजाने मंदिरे बांधली. त्यात हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, त्याच्या पायथ्याच्या खिरेश्वरजवळील नागेश्वर, कुकडीकाठचे कुकडेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर. ही सर्व ९/१० शतकातील हेमाडपंथी मंदिरे आहेत. काही प्रकाशचित्रे पाहा. रतनवाडीचा अमृतेश्वरः Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
अ
अवलिया Mon, 02/07/2011 - 04:11 नवीन
अतिशय सुरेख लेखमाला चालू आहे ... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा