चिंतातूर जंतू यांनी सुंदर परिक्षण केले आहे. चित्रपट पाहावासा वाटतो आहे.
मिळाला की नक्की पाहीन. चिंतातूर जंतू यांचे लेखन चित्रपट पाहण्याचा एक नवा आणि वेगळा दृष्टीकोन देते. थोडं अजून खोलातलं विश्लेषणात व्यक्तिरेखांचे तरल पदर उलगडून अजूनच बहार आणली आहे.
एका प्रतिसादातील टीप २: इतर कलाकृतींविषयीच्या आणि सरसकटपणे केलेल्या शेरेबाजीवजा टिप्पण्या धाग्यात उत्तर देण्यासारख्या वाटल्या नाहीत.
हे योग्य ते सांगून जातेच. चिंतातूर जंतूंनी अजून लिहित रहावे अशी विनंती.
वर नंदन आणि मुक्तसुनीत यांनीही नेमक्या शब्दात प्रतिसाद दिला आहे, तो आवडला.
पश्चिम जर्मनीतील निनाद म्हणतात, 'हे सिनेमे पाहताना काही गोष्टी जाणवल्या .
ह्यात रोमहर्षक /चित्तवेधक /आकर्षक ./अद्वितीय असे काहीच घडत नाही .
ह्यात घडते ती सरळ सोपी कथा व नैसर्गिक रित्या अभिनय करणारी (जो अभिनय वाटतच नाही ) पात्रे. मुळात हे सिनेमे इटली /स्पेन ह्या युरोपियन देशातील त्यावेळचे सामाजिक जीवन जसेश्या तसे उभे करायचे .
माल गुडी डेज ह्याच पठडीत मोडले जाईन.' हे अगदी माझ्या मनातले बोल! यामुळेच बहुदा युरोपीय चित्रपट पाहण्याची गोडी लागत गेली.
तसेच इंद्रराज पवार यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहेच.
भारतीय चित्रपट क्षेत्रात प्रमुख (मेनस्ट्रीम) अभिनेते घेऊन असे वेगळे प्रयोग होत आहेत हे पाहून खुप आनंद वाटतो आहे.
प्रतिक्रिया