Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चांगला चित्रपट / वाईट चित्रपट

छ
छोटा डॉन यांनी
Mon, 02/07/2011 - 08:01  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
12939 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 02/10/2011 - 06:21 नवीन
"...थोडक्यात - आपल्याला आवडेल तो चित्रपट चांगला ...." ~ हेच शेवटी खरं ! पण, या न्यायाने असेही म्हणता येईल की, ज्याला "अनुभव....." भावतो त्याने दुसर्‍याला "तुला अमर-अकबर-अ‍ॅन्थोनी कसा बुवा आवडतो?" असाही टोमणा लगावू नये....शेवटी या दुसर्‍यालाही त्याची स्वतःची अशी टेस्ट असणार, त्यामुळे हे त्याचे स्वातंत्र्य आपण मान्य करणे केव्हाही चांगले. श्री.शिरिष कणेकर यांच्या एका पुस्तकात शंकर-जयकिशन या जोडीतील जयकिशनविषयी एक किस्सा आहे. त्याना एकदा श्री.कणेकर यानी 'तुम्हाला स्वतःला लता मंगेशकर यांचे कुठले गाणे सर्वाधिक आवडते?" हा प्रश्न विचारला....आणि आता लताने त्यांच्यासाठी गायलेल्या हजारो गाण्यातील बहुधा नर्गिस वा मधुबाला वा नूतन यांच्यावर चित्रित झालेल्या एखाद्या गाण्याची जयकिशन आठवण काढणार असे वाटत असतानाच जयकिशन यानी झटकन "आज मै जवान हूं गयी हूं....ओ मिठ्ठूमियाँ..." हे लीना चंदावरकर यांच्यावर चित्रीत झालेले मै सुंदर हूं या चित्रपटातील गाणे" मी सर्वाधिक पसंत करतो...." असे सांगितल्यावर कणेकर हतबुद्धच झाले. पण...काय करणार? शेवटी जयकिशन हे संगीतकार आणि त्याना काय आवडावे हे दुसरे कसे सांगणार? श्री.धनंजय म्हणतात तो विचार ["'मला हे आवडलं, तुलाही आवडेल कदाचित'"] एक मध्यम मार्ग म्हणून स्वीकारण्यासारखा आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पंगा गुरुवार, 02/10/2011 - 06:51 नवीन
खायला अन्न, प्यायला पाणी मिळणं, श्वास घ्यायला हवा मिळणं चांगलं...
खायला अन्न कुठल्या प्रकारचं (शाकाहारी की मांसाहारी, कोंबडी की डुक्कर की गाय, उडपी, पंजाबी की मेक्सिकन) आणि कसं (ताजं की शिळं, गरम बटाटावडा आणि थंड आइस्क्रीम की वाइसे वर्सा), प्यायला पाणी कुठलं (विहिरीतलं, नळाचं की बिस्लेरीच्या बाटलीतलं - समुद्राच्या पाण्याचं तूर्तास नाव काढत नाही.) आणि श्वास घ्यायला हवा कुठली आणि कशी (डोंगरावरची स्वच्छ आणि आल्हाददायक, की तुमच्या मुंबईतल्या चेंबूरमधली प्रदूषित, की चर्चगेटच्या दिशेने जाणारी प्रत्येक लोकल वांद्रे आणि माहीम यांच्यामध्ये खाडीपाशी जिथे सिग्नलसाठी हमखास थांबतेच थांबते - जिथे ब्याकग्राउणमध्ये त्या पोलिसांच्या रंगीबेरंगी चाळी आहेत - त्या ठिकाणची, मुंबईतली सर्वाधिक दुर्गंधी मारणारी) यांवरून यातसुद्धा चांगल्यावाइटाची संकल्पना व्यक्तिसापेक्षतः वेगवेगळी असू शकतेशी वाटते.
याउलट उपाशीपोटी राहाणं, तहानेने व्याकूळ होणं, गुदमरणं वाईट याबाबत सर्वांचंच एकमत व्हावं.
कोणास ठाऊक, हे सर्व आवडणारे मॅसॉखिस्ट (उच्चार?) असतीलही जगात! किंवा कदाचित चेंबूरकरांना किंवा माहीमच्या 'त्या' चाळींत राहणार्‍यांना डोंगरावरच्या स्वच्छ हवेत गेल्यावर (कोण म्हणाला रे तो, "आल्टिट्यूड सिकनेस" म्हणून?) गुदमरायला होतही असेल, कोणी सांगावं? तेव्हा, जगात "अ‍ॅब्सोल्यूट" असं काहीही नसतं (तेवढी त्या नावाची ती एक वोडका सोडून), सर्व काही सापेक्ष असतं, हेच काय ते एक खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शाहरुख गुरुवार, 02/10/2011 - 18:22 नवीन
दुसर्‍यांची परिक्षणं वाचून पिच्चर बघायचा का नाही हे ठरवणं म्हणजे आम्हाला स्वतःच्या बुद्धिमत्ता आणि कलात्मकता या गुणांच्या संगमातून तयार होणार्‍या गुणाचा अपमान केल्यासारखा वाटतो.. धागा वरवर चाळला !
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 02/10/2011 - 18:40 नवीन
अन्यत्र मी या विषयाबद्दल मते मांडलेली आहेत : "सवंग लोकप्रियता" - एक सवंग लोकप्रिय टीका त्यातील सारांश असा :
माझ्या मते "सामान्य लोकांसारखा तू नाहीस (म्हणून तुझे मत ग्राह्य नाही)", आणि "तू वेगळा, मी वेगळा, आणि बाकीचे सामान्य लोक हीन आहेत" हे दोन टोकांचे मुद्दे सकारात्मक मैत्रीपूर्ण चर्चेतून बाद झाले पाहिजेत. प्रथम मुद्दा खरी प्रशंसा नाही, तर दुसरा मुद्दा केवळ माणूसघाणेपणा आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा