वर्हाडी खिचडी
💬 प्रतिसाद
(51)
न
नगरीनिरंजन
Wed, 02/09/2011 - 22:37
नवीन
कांद्याचं काय करायचं?
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 06:13
नवीन
वर्हाडी खिचडी एकदम जोरदार ...
फोटु काय नैवेद्या साठी काढलाय का ? आणा इकडे ;)
- Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश
गुरुवार, 02/10/2011 - 12:21
नवीन
कांद्यानं तुमचा वांदा केला ली काय्?.अहो तेल तापलं कि कांदा घालून मऊ होईपर्यंत परता कि राव.
बाकी मॄणालिनी खिचडी म्हणजे माझाही weak point.फोटो मस्तच्.रातच्याला चाललं द्या धाडून.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 02/09/2011 - 22:43
नवीन
कांदा तेलात परतायचा असेल कदाचित.
पाकृ अगदी छान!
खोबरे कच्चे घ्यायचे कि भाजून?
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Wed, 02/09/2011 - 22:45
नवीन
खोबरे कच्चेच घ्यायचे. कारण नंतर ते तेलात परतायचे आहे. :)
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Wed, 02/09/2011 - 22:44
नवीन
ओ ओ, सॉरी. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. :)
पातेल्यामधे तेल गरम झाल्यावर त्यात आधी कांदा परतुन घ्यावा व नंतर हळद आणि खोबरे, लसुण, लाल तिखट याचे वाटण टाकावे. बाकि कृती वरील प्रमाणे.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 02/09/2011 - 23:11
नवीन
छान दिसतेय खिचडी...करुन बघते.
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 02/09/2011 - 23:18
नवीन
सगळ्यानीं असली खिचडि सकाळि करुन बघणे जरुरीचे आहे.
तब्बेत चांगली रहाते त्यामुळे. त्याशिवाय नाश्ता ( breakfast) करु नये असे अमेरीकेतील अनेक विद्दापिठात वैद्दकिय संशोधन करुन सिध्द केलं आहे. आयुर्वेदातहि असे लिहिले आहे.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 02/10/2011 - 04:19
नवीन
नाश्ता ( breakfast) करु नये? लिंका द्या बरं..
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 02/10/2011 - 04:34
नवीन
...'त्याशिवाय' असाही एक शब्द लिहिलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.
(बाकी अमेरिकेतील विद्यापीठे खिचडीवर वैद्यकीय संशोधन कधीपासून करू लागली हा एक संशोधनाचाच विषय आहे म्हणा!)
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/10/2011 - 06:10
नवीन
आई कुठेय ? कधी येनारे?
- Log in or register to post comments
व
वेदनयन
Wed, 02/09/2011 - 23:56
नवीन
वर्हाडी की खानदेशी? जळगाव / चाळीसगाव चा संर्दभ दिसला म्हणुन विचारले...
खानदेशात ही खिचडी चुलीवर करतात त्यामुळे एक वेगळीच चव येते.
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 00:24
नवीन
वर्हाडी की खानदेशी? हे नक्की मला पण माहीत नाही. पण माझ्या मामीने तरी मला हेच नाव सांगितले होते आणि माझ्या मामाकडे सुद्धा ह्याला वर्हाडी खिचडीच म्हणतात. काही चुकले असल्यास माफ करावे. :)
- Log in or register to post comments
व
वेदनयन
गुरुवार, 02/10/2011 - 20:58
नवीन
एवढी छान रेसिपी टाकायची आणी वरुन माफी मागायची - बहुत नाइन्साफी है! इरसालने खाली दिलेले स्पष्टीकरण पटले...
मिपावर कोणी माफी मागत नाही आणि कोणी माफ करत नाही. आमच्यासारखे बरेच उगी काड्या टाकत हिंडत असतात. तुम्ही मिपावर त्यामानाने नविन आहात म्हणुन सांगितले.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 02/10/2011 - 00:33
नवीन
माझ्या चुलतबहिणीच्या सासरी खानदेशी खिचडी होते (नंदुरबार, धुळे येथील पद्धतीने). त्यात कापलेला टोमॅटो नि (बर्यापैकी!!) सुक्या लाल मिरच्या घालतात. ते वरील खिचडीत नसल्याने ती वर्हाडी असावी, असा अंदाज करतो आहे. चू.भू.द्या.घ्या.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
त्या खानदेशी खिचडीला सोनार खिचडी म्हणतात की वरील (बहुदा वर्हाडी) खिचडीला सोनार खिचडी म्हणतात?
(जिज्ञासू)बेसनलाडू
वरील खिचडी कधी करून पाहिली नाही किंवा खाल्ली नाही. आता नक्की करेन आणि खाईन :)
(खवय्या)बेसनलाडू
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 00:33
नवीन
धन्यवाद. खिचडी कशी झाली, ते नक्की कळवा. :)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 02/10/2011 - 04:21
नवीन
एकटेच खाउ नका , आम्हालापण बोलवा..
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 02/10/2011 - 04:12
नवीन
पुन्हा एकदा भात, इकडे बायको बोंब मारतेय माझ्या भात खाण्यावरुन आणि तुम्ही एका मागुन एक भाताचे प्रकार टाका, च्यायला अन्याव आहे नुसता, असो जातो आता नाहीतर फोडणीचा भात संपुन जाईल.
बाकी, आज रात्री करुन पाहेन व उद्या सांगेन.
हर्षद.
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
गुरुवार, 02/10/2011 - 04:57
नवीन
खिचडिचा हा प्रकार खान्देशी आहे या बरोबर घट्ट कढि असेल तर मजा येते, माझ्या महिति प्रमाने तसेच वरर्हाडात अमरावती कडे जी खिचडि करतात त्यात तिखट / मसाला नसतो व थोडि पातळसर असते...पन त्या बरोबर टमाट्या ची झनझनित रस्सा भाजि असते
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 02/10/2011 - 05:02
नवीन
हं?
नाही म्हणजे, 'झट् मँगनी, पट् ब्याह' वगैरेबद्दल ऐकले होते, पण हे म्हणजे जरा जास्तच झटपट झाले, नाही?
असो.
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 07:57
नवीन
हा हा हा.... खुप हसले मी तुमची ही comment वाचुन. आहो, मला ३ मामा आहेत. आणि आम्ही माझ्या सगळ्यात लहान मामाच्या लग्नाला गेलो होतो. तेव्हा बाकिच्या मामांच्या मुलां सोबत झेळत होतो. :)
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 02/10/2011 - 05:45
नवीन
व्वा झक्कास दिस्तेय :)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 02/10/2011 - 06:10
नवीन
हि आहे खान्देशीच खिचडी पण ती लग्न वऱ्हाडाला करतात म्हणून तिला वर्हाडी खिचडी असे म्हणतात.त्यामागे एक कारण हेही असू शकते कि एकत्रित आलेल्या इतक्या माणसांसाठी रात्री वेगवेगळे काय पक्वान्न बनवणार म्हणून खिचडी पण लागते जाम भारी.
तलोद्याकडे ह्याबरोबर कढी आणि चवळीची कोरडी भाजी करतात ती पण मस्त.
ह्यावर जर शेंगदाणा तेल कच्चे आणि चीकनीचा पापड भाजलेला.............ओफ्फो ओफ्फो ........... विचारूच नका
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
गुरुवार, 02/10/2011 - 06:14
नवीन
चिकनी चा पापड आणि कच्चे शेन्गदाने......वा
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 02/10/2011 - 06:50
नवीन
हे इरसाल मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल आणि चिकणि ,नागली किंवा उडद दाळीचा पापड व सोबत कढी वा मस्तच बेत. ही खिचडी तशी नेहमीच छान लागते पण लग्नात करतात ती खिचडी जरा जास्तच छान लागते आणि ती केळीच्या पानावर पंगतीत खायला तर अजुनच मजा येते.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 02/10/2011 - 21:38
नवीन
कैरी बाई.. हे चिकणी/नागली.. काय प्रकार आहेत? नाचणी चा पापड आवडतो.. पण चिकणीचा कसा असतो?
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 02/17/2011 - 07:41
नवीन
खान्देशीच खिचडी पण ती लग्न वऱ्हाडाला करतात म्हणून तिला वर्हाडी खिचडी असे म्हणतात.त्यामागे एक कारण हेही असू शकते
आपले तर्कशास्त्र आवडले. आणि पाकृसुद्धा.
बहुधा असेच असणार.
- Log in or register to post comments
म
मनराव
गुरुवार, 02/10/2011 - 06:17
नवीन
मस्त मेनू.........
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
गुरुवार, 02/10/2011 - 07:18
नवीन
चिकनी चा पापड.... व्वा....
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 07:54
नवीन
सगळ्यांचे मनापासुन आभार. :)
इरसाल यांनी म्हटल्या प्रमाणे, ही खिचडी वर्हाडा साठी करतात, म्हणुन पण हीला वर्हाडी खिचडी म्हणत असतील. आणि ही खिचडी कच्चे तेला सोबत खायला मला तर खुप आवडते.
- Log in or register to post comments
ध
धिन्गाना
गुरुवार, 02/10/2011 - 08:31
नवीन
म्हणजे काय?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 08:52
नवीन
मृणालिनी सुगरीणी जरा तुमचा पत्ता द्या हो.
आणि परदेशात राहात असाल तर ती स्वातीतै हवापालट करायला चालली आहे, तीच्यासोबत जाउन या चार दिवस.
कृपया पाककृती विभागाला यातनाघर असे नाव द्यावे हि विनंती.

- Log in or register to post comments
अ
असुर
गुरुवार, 02/10/2011 - 21:23
नवीन
एकवेळ जबर्या वर्णन असेल तरी चालून जाते हो मृणालतै, पण चांगला फटू असेल तर केवळ यातना हो, यातना!
फार चांगल्या पाकृ आणि त्याचे जीवघेणे फटू या कारणास्तव गणपा आणि जागुतै यांना काळ्यापाण्याची सजा व्हावी असे कोर्टात अपील करायच्या बेतात आहोत, त्यात तुमचा नंबर लावायचा काय?? एक स्वातीतै केकमध्ये बुडवून मारायच्या बेतात आहे, ती यशो तिकडे कसल्या कसल्या उसळी करते आहे, आणि आता त्यात तुमची भर!!!
पाकृचे धागे उघडायचेच नाहीत अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती त्या ओल्या काजूंच्या उसळीनंतर. आज मोडली! आता किमान भाजी पोळी तरी करुन खावीच लागेल स्वहस्ते, प्रायश्चित्त म्हणून!!
--असुर
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 02/10/2011 - 09:14
नवीन
लाल ज्वारीला चिकनी म्हणतात.त्यापासून हे पापड बनवतात खासकरून खानदेशातच मिळणारा हा पापडाचा प्रकार आहे.
तो खाण्याचा योग्य प्रकार म्हणजे चुलीत भाजून त्यावर कुटलेले तिखट (तीळ,मीठ,मिरच्या, शेंगदाणे मिश्रण) आणि थोडे तेल शिंपडून ..........मग काय मज्जा येते
अवांतर... काही तळीराम याचा चखना म्हणूनपण वापर करताना आढळतात
- Log in or register to post comments
व
वेदनयन
गुरुवार, 02/10/2011 - 21:06
नवीन
बिबडी नावाचा एक जिवघेणा प्रकार खानदेशात असतो. मिळाला तर जरुन खाऊन बघा.
बहुदा ज्वारी, गहु, काही डाळी आंबवुन करतात. नक्की काय काय असते सांगु शकत नाही पण चव खुप छान असते.
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 02/10/2011 - 09:36
नवीन
खिचडी म्हणजे माझा वीक पॉईंट.. बाकी खिचडी बनवणे म्हणजे उत्सव साजरा करणे हे मला तरी लागू पडतयं...
- (खिचडीवाला बल्लव) पिंगू
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 02/10/2011 - 12:29
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 02/10/2011 - 14:48
नवीन
ही खिचडी माझी लाडकी, पण कच्च्या तेलापेक्षाही ह्या खिचडीवर फोडणी घालून मला जास्त आवडते,
मी ही हिचे नाव वर्हाडी खिचडी असेच ऐकले आहे, आता वर्हाड प्रांतातील की वर्हाडासाठीची खिचडी हे शोधायला लागेल..
स्वाती
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 15:00
नवीन
हो ना. काय नक्की माहित नाही. पण लहानपणा पासुन हिचे नाव वर्हाडी खिचडी हेच ऐकले आहे.
:)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/10/2011 - 15:07
नवीन
मस्त दिसते आहे वर्हाडी खिचडी! :)
सुके खोबरे आधी परतून नाही का घ्यायचे?
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 15:45
नवीन
नाही, सुके खोबरे तसेच वाटायचे. नंतर ते वाटण तेलात परतायचे आहे. त्यामुळे कच्चे घेतले तरी चालते.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 02/10/2011 - 15:08
नवीन
ए खूप खूप मस्त ह . :)
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 15:46
नवीन
thank u :)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/10/2011 - 15:51
नवीन
खानदेशात याला फोडणीची खिचडी म्हणतात! कच्चे तेल, पापड अन् कांदा सोबतीला! :)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 16:15
नवीन
अरे वा .. याला वर्हाडी खिचडी बोलतात का?
आमच्याकडे याला मसाला भात बोलतात, १५ दिवसानी घरी गेल्यावर आईला गेल्यावर हा भात करायला सांगतोच सांगतो.
आणि
१ वर्षे शिरुर ला असताना घरी स्वयपाक करत होतो, तेंव्हा रोज आम्ही हाच मसाला भात करायचो.. काय धमाल होती तेंव्हा.
असो शब्द/नाव वेग़ळे असुद्या.. आस्वाद मात्र परिपुर्ण देतो हा भात.
आणि धन्यवाद
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 16:34
नवीन
आणखिन एक यात कच्चे शेंगदाने पण घाला, शिजल्यावर मस्त लागतात.
बटाटे पण टाका खुपच छान होते यामुळे .
लिंबु पिळुन छान लागते,
पण दह्या बरोबर क्या कहेना ,...
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 02/10/2011 - 16:53
नवीन
सोपा आणि रुचकर प्रकार दिसतो आहे.
करून बघायला पाहिजे.
आधी कांदा नंतर हळद परतल्यामुळे नक्कीच फरक पडत असावा. चरचरीत तळलेली हळद (माझा नेहमीचा प्रकार) आणि वाफेवर शिजलेली हळद यांच्यात नक्कीच स्वादाचा फरक आहे. मला दोन्ही आवडतात.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/10/2011 - 19:06
नवीन
सहमत.
तळलेली (फोडणीत घातलेली) आणि भाजीत वरून मिसळलेली हळद लगेच लक्षात येते.
मला फोडणीत घातलेली आवडते. :)
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
गुरुवार, 02/10/2011 - 23:19
नवीन
झणझणीत खान्देशी खिचडी हा माझाही अतीव आवडता प्रकार.
ही खिचडी उरली तर दुसर्या दिवशी खायला फार मस्त लागते.
शेंगदाणे तर हवेतच हवेत. हा प्रकार इडली प्रमाणेच मी सातही दिवस हादडू शकतो.
मला ही खिचडी करायलाही आवडते.
ही बहुदा वर्हाडासाठीची खिचडी आहे. अनेकदा वर्हाडाचा पाहुणचार (सायंकाळी) याचाच असत असे पण हल्ली दिसत नाही.
- अवांतर रंजन -
उन्हाळ्याचे दिवस असतांना, रात्रीच्या जेवणासाठी मस्त वाफाळत्या खिचडीवर चिरलेली कोथिंबीर घालावी, वर लिम्बू पिळावे.
सोबत हाताने फोडलेला आमचा लासलगावचा लाल, गोड,असा मस्त कांदा असावा.
मित्रमंडळी - भाऊ बहिणी वगैरे आलेली असावीत. हास्यविनोद, गाणी, कविता वगैरे म्हणून झालेल्या असाव्यात. मस्त कडकडीत भूक लागलेली असावी. खिचडीचा सुवास दरवळत असावा.
मुलांनी पटापट पाणी वगैरे घ्यावे. मोठ्यांनी खिचडीचे भले मोठे पातेले अंगणात आणावे. बसण्याची आसने (पट्ट्या) घालून कुणीतरी वाढण्याची सुरुवात करावी. अंगणात झकास पैकी गप्पा मारत जेवण करावे.
जेवण झाल्यावर मस्त आले कोथिंबीर आणि सैंधव घातलेला मठ्ठा प्यावा! हा मट्ठा तयार होइ पर्यंत कुणीतरी सतरंज्या घालाव्यात आणि पत्त्यांचा डाव सुरु व्हावा, सोबत प्यायला ताक!
दहा वाजले मुले पेंगू लागली की कुणीतरी हलक्या आवाजात रेडियोची गाणी लावावीत. पत्त्याच्या डावातून एक एक जण गळत दोनचार भिडू उरावेत. मग डाव संपल्यावर परत अंगणातच सतरंजीवर गार पडलेली सोलापुरी चादर पांघरून पसरावे. आकाशातले तारे पहात भावा-बहीणींसोबत हलक्या आवाजात लहानपणच्या आठवणी जागवाव्यात... चिल्ल्यापिल्ल्यांची पांघरुणे व्यवस्थित करावीत आणि हळू हळू झोपेच्या अधीन व्हावे!
अहाहा! गेले हो हे दिवस. काय पण मजा होती. आयुष्य साधं सोप होतं पण ही त्यातली खास मजा होती.
मजा आली!
तुमच्या एका पाककृतीने किती तरी मधूर आठवणी जाग्या केल्या.
शतशः: धन्यवाद!
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 23:42
नवीन
खरच. खुप खुप आभारी आहे. तुम्ही लिहलेले वाचुन मला पण लहानपणीच्या गोष्टी आठवल्या.
मोगँबो खुश हुआ. :) :) :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »