आज इतके तरूण संस्कृत लेखन करण्यात मग्न आहेत हे पाहून गहिवरले...
छान रे सहज...
तू संस्कृत मध्ये निबन्ध छान लिहिशील...
तुझी शंकरशेठ शिष्यवृत्ती कितीने हुकली तेही लिही...
संस्कृत ही एक अत्यंत कमी लोकांकडून वापरली जाणारी भाषा आहे हे मान्य. ती थोड्या फार प्रमाणात समजत असली तरी बोलता येत नाही. पण वाचता येते. त्यामुळे ती अवगत आहे कि नाही हे ठरवणं अवघड आहे. पण अनेक लोक ह्यावर काम करत आहे. (भाषातज्ञ ). जर आपण ही भाषा आपणास येते अशी नोंद केली नाही तर तिला अनुदान मिळणार नाही हा मुद्दा आहे.
थोडी तत्व बाजूला ठेवून "आपली " भाषा म्हणून आपण अशी नोंद करू शकत नाही का? आपली अशासाठी कारण स्कॉरिंग म्हणून ही भाषा मदतीला येते... तुम्ही देव मानत असाल नसाल पण ह्या भाषेतील स्तोत्रे तुमच्या कानावर परदेशी असताना पडली तर आपलीशी, ओळखीची वाटत नाहीत का?
मार्क्स मिळतात म्हणून संस्कृत हवी पण आज नोंद करायची वेळ आली तर कारण पुढ करायची ...
संस्कृत मरतेय हे खर असला तरी तिला वाचवण्याचे प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि अनेक लोक असे प्रयत्न करत आहेतच.. किमान त्यांना मदत तरी करू शकतो आपण..
>>संस्कृत मरतेय हे खर असला तरी तिला वाचवण्याचे प्रयत्न करायला काय हरकत आहे
संस्कृत मरतेय हे विधान धाडसाचे आहे. वापरात असलेली भाषा मरत असेल तर दु:ख करणे योग्य आहे. जी वापरात नाही ती भाषा मरत आहे म्हणजे काय हे समजले नाही. कर्नाटकातल्या कुठल्यातरी गावात लोक संस्कृत बोलतात ते लोक लिहितीलच की भाषा अवगत आहे असे.
आपल्याला अवगत नसेल तरी ती मरू नये म्हणून अवगत आहे असे लिहायचे?
(सोनिया गांधी रोमन लिपीत लिहिलेली हिंदी भाषणे - अर्थ न समजता- वाचतात असे म्हटले जाते. आपण श्लोक म्हणतो तसेच हे आहे. त्यांनी हिंदीभाषा अवगत आहे असे लिहायचे का?)
पाली आणि अर्धमागधी या भाषा अवगत आहेत असे किती लोक म्हणतील किंवा आजवर म्हणत असतील? तरी त्या भाषांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठे विभाग उघडून असतातच आणि संशोधनही होतच असते.
तेव्हा सदर ढकलपत्रातली भीती अनाठायी आहे असे वाटते.
ठीक आहे. हे मान्य की भाषा मारतेय ही भीती बाळगणे अनाठायी...
पण कित्येक शाळांमधली मुले ३-५ वर्ष संस्कृत भाषा घेतात. त्यावेळी ती त्या भाषेत छोटे निबंध सुद्धा लिहितात. पुढे जाऊन भाषेशी संपर्क न राहिल्याने आपल्याला ती बोलता येत नाही. (पण लिहिता वाचता येते! , आणि थोड्या प्रमाणात समजते सुद्धा...)
म्हणजे कागदोपत्री नगण्य लोक भाषा बोलतात ही नोंद होईल. आणि इथे मात्र मुले शिकातेत भाषा... न जाणो उद्या संस्कृत असणारच नाही पर्याय म्हणून..
संस्कृत मरतेय हे विधान धाडसाचे आहे. वापरात असलेली भाषा मरत असेल तर दु:ख करणे योग्य आहे. जी वापरात नाही ती भाषा मरत आहे म्हणजे काय हे समजले नाही.
काही तुरळक (आणि बहुधा बहुतांशी जाणूनबुजून घडवून आणलेले) अपवाद वगळता संस्कृत ही कोणाचीही मातृभाषा नाही आणि व्यवहारभाषा किंवा रोजवापरातली भाषाही नाही, कधी वापरली गेली तरी तिच्यात आता कालानुरूप नैसर्गिक बदल होत जात नाहीत म्हणजेच ती प्रवाही नाही किंवा अश्मीभूत आहे (असे वाटते; चूभूद्याघ्या.), कोठल्यातरी काळात ठरवून दिल्या गेलेल्या (कदाचित तत्कालीन चालू पण आता पुरातन झालेल्या) 'फॉर्म'ला अनुसरून ती आज (वापरली गेलीच तर) वापरली जाते, अशा काही निकषांच्या आधारावर ती मृत भाषा आहे असा दावा असल्यास त्यात निदान मला तरी फारसे काही वावगे दिसत नाही. ('मृत' याचा अर्थ 'नामशेष' असा होत नसावा असे वाटते.)
अर्थात याचा अर्थ तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होऊ नयेत, किंवा कोणी ती शिकू नये, किंवा तीत संभाषणकौशल्य अवगत करण्याचा प्रयत्न करू नये असा मुळीच होऊ नये. राष्ट्राच्या सर्वच वारशांप्रमाणे संस्कृतचे संवर्धन हे इष्ट आहे, आणि (स्वतःची मातृभाषा नसलेल्या कोणत्याही भाषेप्रमाणे) हौशीने कोणी संस्कृत शिकल्यास आणि विशेषतः तीत संभाषण करता येण्याइतकी प्रगती केल्यास ते स्तुत्यच आहे. आणि त्यातूनही पुढे जर अशा संस्कृतात संभाषणप्रभुत्व असलेल्या हौशी मंडळींची वीण वाढत गेली, तर संस्कृत पुन्हा प्रवाही बनणेही अगदीच अशक्य नाही. (हिब्रू या मृतभाषेचे इस्राएलमध्ये अशाच प्रकारे प्रयत्नपूर्वक आणि यशस्वी पुनरुज्जीवन होऊन ती आता केवळ राष्ट्रभाषाच नव्हे, तर पुढील पिढीतील बहुतांची मातृभाषाही झाली आहे, आणि व्यवहारभाषा तर आहेच आहे, असे ऐकलेले आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नसावे. अर्थात इस्राएलने केले म्हणून हे संस्कृताच्या बाबतीच घडलेच पाहिजे किंवा घडवून आणलेच पाहिजे असे म्हणण्याचा कोणताही उद्देश नाही; केवळ ही अशक्यकोटीतली गोष्ट नाही एवढेच म्हणायचे आहे. अर्थात हिब्रूचे पुनरुज्जीवन म्हणजे यिडिशसारख्या युरोपीय ज्यूंच्या पारंपरिक, जिवंत आणि समृद्ध भाषेचे मरण ठरले या तोट्याकडेही त्याचबरोबर दुर्लक्ष करून चालणार नाही.)
हे सर्व जर स्वेच्छेने घडू शकले, तर त्यात काही गैर नाही. (तेवढे संवर्धन सोडून. राष्ट्रीय पातळीवर ते होणे गरजेचे आहेच. जनांमधील प्रसार हाच भाग काय तो स्वेच्छेचा भाग आहे.) आणि लोकांच्या हौशीतून या भाषेचा प्रसार होऊन पुन्हा तिच्यात प्रवाहित्व येऊ शकले, तर ते स्तुत्यच ठरेल. पण हे सर्व होण्यासाठी आपण नेमके काय, कशाकरिता आणि कसे करीत आहोत याचे प्रत्येक संबंधिताने भान ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा संस्कृतचे तथाकथित प्रचारकच जनतेतील संस्कृतविषयी अनास्थेला (आणि कधीकधी उघड द्वेषालाही) कारणीभूत ठरतात असे दिसून येते. संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रचारकांची नव्हे तर चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे असे वाटते. संस्कृत शिकणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य मुळीच नाही, आणि संस्कृतचा प्रचार करणे हे तर नाहीच नाही. दिसतील त्या दहा जणांना पकडून कंटाळा येईस्तोवर 'संस्कृत का शिकली पाहिजे' हे (काहीबाही कारणांसहित) ऐकवून 'संस्कृतचे महत्त्व पटवून देणे' (थोडक्यातः पकवणे) याइतके मूर्खपणाचे दुसरे काही नसावे. हे तर लोकांवर संस्कृत लादणे झाले. ते उपयोगाचेही नाही आणि योग्य तर नाहीच नाही. मात्र ज्याला कोणाला संस्कृत शिकण्याची मनापासून इच्छा असेल, त्याला ती शिकण्याची सुविधा आणि ती उत्तम प्रकारे आणि जीव लावून शिकवू शकणाराच नव्हे, तर तिच्याबद्दल गोडीही निर्माण करू शकणारा शिक्षक उपलब्ध होऊ शकल्यास ते लाखमोलाचे ठरेल. येथे आयडियॉलॉजी नाही तर भाषेविषयी तळमळ कामाची आहे.
दुसरे म्हणजे, 'संस्कृत शिकणे' किंवा 'संस्कृत अवगत असणे' म्हणजे काय, हेही ती शिकण्यास उत्सुक असणारास स्पष्ट असणे गरजेचे आहे. चारदोन संस्कृत सुभाषिते (अगदी अर्थासहसुद्धा!) मुखोद्गत असणे आणि ती पंक्तीत म्हणून दाखवता येणे म्हणजे संस्कृत अवगत असणे नव्हे. किंवा संस्कृत व्याकरणाचे नियम, धातूंचे गण आणि धातुरुपावली, विभक्तिप्रत्यय ('राम', 'देव', 'वन' किंवा 'माला' - 'खानेवाली या पहननेवाली' हा मुद्दा येथे गौण आहे - चालवता येणे वगैरे) हे पाठ असणे म्हणजेही संस्कृत अवगत असणे नव्हे. व्याकरण हे भाषा कशी आहे याचा अभ्यास करण्याकरिता ('भाषेचे वर्णन करण्याकरिता') उत्तम साधन असले, तरी व्याकरण म्हणजे भाषा नव्हे. 'भाषा अवगत आहे' हे अगदी प्राथमिक पातळीवरसुद्धा म्हणता यायला त्या भाषेतला अगदी सोपा का होईना, पण असाच एखादा उतारा कानावर पडल्यास त्याचा अर्थ विशेष प्रयत्नांशिवाय समजणे आणि प्रसंगी अगदी जुजबी का होईना, पण वेळ निभावण्याइतकी चारदोन वाक्ये अंतःस्फूर्तीने बोलता येणे एवढे तरी किमान आवश्यक आहे, असे निदान मला तरी वाटते. ती चारदोन वाक्ये शक्य तितकी अचूकपणे म्हणता येण्यासाठी नवशिक्यास अर्थातच व्याकरणाची मदत होऊ शकते, पण ते व्याकरणाचे नियम न आठवतासुद्धा अंतःस्फूर्तीने आणि आत्मविश्वासाने आतून येणारे शब्द हे आपोआप त्या नियमांच्या लायनीस लागणे, हे खरे भाषा येणे! या निकषाने मला नाही वाटत आपल्यापैकी खूप जणांना संस्कृत येत असेल म्हणून. अगदी तीन वर्षे शाळेत शिकलो असलो तरीही. निदान मला तरी नाही येत.
अशा परिस्थितीत, संस्कृत येत नसताना 'संस्कृत येते' असे म्हणण्यात काहीच हशील नाही. एक तर ती स्वतःचीच फसवणूक आहे, आणि त्यातून संस्कृत 'वाचणे' (हे जे काही असेल ते) हेही शक्य नाही. असे करण्याला 'निव्वळ एक मूर्ख गिमिकबाजी' यापलीकडे काहीही अर्थ नाही.
कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातलं मत्तूर हे सुमारे २००० लोकवस्तीचं गाव आहे. या गावात लहान थोर सगळेजण बोलीभाषा म्हणून संस्कृत वापरतात, त्यात कोणत्याही जातीचा अपवाद नाही. विशेष म्हणजे या लहानशा गावातून सुमारे १५० सॉफ्टवेअर इंजिनिअर्स तयार झालेत. मला आश्चर्य वाटतं कोणालाच बजाज डिस्कव्हरच्या या गावाबद्दलच्या जाहिरातीची आठवण झाली नाही!
संस्कृत भाषा हा आपला पुरातन ठेवा आहे तो नष्ट होऊ नये असे मनापासून वाटते. मात्र अवगत नसूनही अवगत असल्याचे लिहिल्यास भाषा संवर्धनासाठी सरकारकडून कदाचित पुरेसे प्रयत्न होणार नाहीत असेही वाटते.
सहमत.
आपल्या सर्वच अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांप्रमाणे संस्कृतचे संवर्धन हे एक इष्ट ध्येय आहे याबद्दल वाद नाही. मात्र त्यासाठी असली गिमिक्स वापरली जाऊ नयेत - ते योग्यही नाही, इष्टही नाही आणि त्याचा फायदाही नाही - असे मनापासून वाटते.
"ह्या प्रश्नाखाली दोन पेक्षा जास्त भाषा नोंदवू नयेत.त्या व्यक्तीच्या मातृभाशे व्यतिरिक्त इतर दोन च भाषा नोंदवायच्या आहेत. त्या अशा रीतीने नोंदवायच्या आहेत कि सर्वात चांगली बोलता येणारी व समजू शकणारी भाषा तसेच दुसर्याशी चांगल्या प्रकारे बोलता येणारी भाषा नोंदवावी. त्या व्यक्तीला त्या भाषा लिहिता अगर वाचता आल्या पाहिजेत असे नाही. त्या भाषे मध्ये ती समजुतीने आणि सहजतेने संभाषण करू शकला तरी पुरेसे आहे."
हे प्रगाणाकांच्या सूचना पुस्तिकेत लिहिले आहे........
त्या व्यक्तीच्या मातृभाशे व्यतिरिक्त इतर दोन च भाषा नोंदवायच्या आहेत.
हा अन्याय आहे.
मला आणि माझ्या लहान मुलाना देखील किमान चार भाषा लिहिता बोलता वाचता येतात. ( मराठी , गुजराथी , इंग्लीश , हिंदी ) उर्दू समजते/बोलता येते.
बांगला , मारवाडी , हरयानवी , पंजाबी , या भाषा बोलता येतात समजतात .
माझ्या पत्नीला कच्छा , सिम्धी भाषा समजतात बोलता येतात.
वरील सर्व भारतीय भाषा आहेत.
भारतात अरबी कुठे बोलली जाते हे कोणी सांगेल का?
अर्धमागधी पाली प्राकृत या भाषा मृत समजल्या गेल्या आहेत.
संस्कृत मॄत घोषीत झाली म्हणून असा किती फरक पडेल?
भारताच्या घटनेप्रमाणे संस्कृत हीदेखिल एक राष्ट्रभाषा आहे. तेव्हा जर तिचे हे स्थान काढायचे असेल तर, घटनादुरुस्ती करावी लागेल, शिरगणतीच्या निष्कर्षावर हे अवलंबून नाही! तेव्हा शिरगणतीत उगाच कैच्या काहीच सांगायची गरज नाही.
बाकी सहजरावांचे संस्कृत आवडले!
धन्यवाद, महेश-जी!
मला आणि माझ्या वयाच्या अनेक लोकांना शाळेत शिकलेली खूप संस्कृत सुभाषिते आठवतात आणि त्यांचा प्रसंगानुरूप केलेला उपयोग संभाषणात खूप मजा आणतो.
मी सध्या जिथे काम करतो त्या देशाची आणि मलेशियाची भाषा जवळ-जवळ २० टक्के संस्कृत शब्दांनी सजली-नटली आहे. त्यावर मी इथे एक धागाही लिहिला होता. (त्यात भर घालण्यासाठी आणखी आठवलेले शब्दही आहेत, पण स्वसंपादनाची सोय बरखास्त केल्याने ते माझ्याकडे पडून आहेत!)
असो. मला तर या 'गीर्वाणवाणी'चा (देवांच्या भाषेचा) अभिमान आहे आणि मी माझ्या सार्या मित्रांना याबद्दल नक्कीच सांगेन.
परदेशस्थ लोकांना ही सोय आहे काय? मी इथल्या दूतावासात विचारून पहातो. आपल्यापैकी कुणाला माहिती असल्यास जरूर द्यावी.
माझे आणखी एक आडनावबंधू (आपण महेश काळे) इथे आले याचा आनंद आहे. सुस्वागतम्.
इतर किंवा हिंदी भाषिक मित्र मंडळींना पाठवण्यासाठी हे हिंदी आवाहन वापरा.
त्या खालीच ऋचाने दिलेले संस्कृत आवाहनही चिकटवले आहे.
त्याखाली चुका काढलेले मराठीतले आवाहन आहे.
तुम्हाला माहिती असलेल्या इतर भाषिकांना आपापल्या भाषेत याचे भाषांतर करण्यासाठी उद्युक्त करा!
सर्व भाषेतील आवाहने पाठवू शकता!
-------
एक अत्यधिक महत्त्वपूर्ण बात पर आपका ध्यान लाना चाहता हूं|
भारतकी जनगणना आज महत्त्वपूर्ण अंतिम घड़ी मे आ चूकि है|
कुछ्ही दिनों मे जनगणना स्वयंसेवक आपके पास आकर आपकी और आपके कुटूंब की जानकारी लेने के लिए पधारेंगे|
आपकी मातृभाषा आपको इसमे दर्ज करानी होगी. यह तो आप कराएँगे.
किंतु अवगत भाषाएं इस तालिकामे 'संस्कृत' लिखना न भुलाए|
हम सब यह भाषा किसी न किसी रूप मे उपयोग मे लाते है| सुबह की पूजा हो या संध्याक़ालीन स्तोत्र पाठ. आप संस्कृत भाषा उपयोग करते है| आप किसी व्यक्तिसे मिलने पर जब 'नमस्ते' कहते हो तब आप संस्कृत का उपयोग करते हो|
हर शादी और अन्य सारे पूजा-पाठोंमे इसी से व्यवहार होता है| भारत की सभी भाषाओं मे इसी से शब्द आते है| इन सब मे हम सहयोगी, है इसीलिए हमे संस्कृत अवगत है|
इस भाषा को जीवित रखना अब आपके हातों मे है| पिछली जनगणना मे इसे अवगत रखने वाले सिर्फ चंद लोग ही थे| इसलिए उसे इस जनगणना मे 'मृत भाषा' घोषीत किया जा सकता है|
संस्कृत मृत घोषित होने के बाद इस भाषा के उत्कर्षके लिये किसी सरकारी निधि का उपयोग नही होगा| अगली पीढ़ी के लिए ना ये प्राचीन भाषा होगी ना इसे प्राप्त करने के कोई साधन बचेंगे|
इस पवित्र भाषा की आज की स्थिति हम ही ने बनाई है. आईये हम सब मिलकर इसे सुधारे|
अगर यह आवाहन आपके सही लगता है तो कृपया आपके मित्रोंको भी भेजिए|
---
अगर आप खुद आपके बच्चों को संस्कृत कथा पढ़कर सुनाना चाहते हो, तो यह देखिये
http://seit.unsw.adfa.edu.au/staff/sites/hrp/personal/sanskrit/
यहां आपको संस्कृत शब्दकोश सहित संस्कृत 'वेतालपञ्चविंशति' मिलेगी|
पढने लगेंगे तो जान जाओगे आपको संस्कृत अवगत है|
----
संस्कृत आवाहन
एके अतीव महत्वपूर्णविषये युवानां लक्षवेधं कर्तुं इच्छामि।
भारतस्य जनगणनाकार्यस्य अंतिमचरणं एते मासे अस्ति।
तथा स्वयंसेवका: पुनः तव द्वारं आगमिष्यन्ति।
युवानां एवं युवानां परिवारजनानां विज्ञप्ति पुनश्च एकवारं याचितव्या न्यसितव्या च।
तदा यूयं विज्ञप्तिदानसमये युवानां मातृभाषा लिखध्वं किन्तु "अवगत भाषा" स्थाने संस्कृत भाषा अवश्य लिखध्वं।
वयं अद्य अपि तां भाषां प्रयोज्यामः न पूर्णरूपमपि तु।
सायंकाले पठितानि स्तोत्राणि वा गणेशोत्सवे वर्तितानि सहस्रावर्तनानि तथा विवाहेषु उक्तानि मंगलश्लोकानि वयं जानामः क्वचित कण्ठस्थानि अपि सन्ति।
अस्या: भाषाया: अवस्थानं अस्माकं हस्ते एव अस्ति।
गत सर्वेक्षणे संस्कृतज्ञानां संख्या केवलं क्वचित्सहस्रा अस्ति स्म। अतः एता भाषा मृता इति घोषितव्या।
विपरिते, अरबी, फारसी ज्ञातानां सन्ख्या विपुलास्ति। अस्य कारणं इति अस्ति भारतदेशे केषु राज्येषु निर्णयपूर्वकं ता: भाषा: न्यसिता:।
यदि एका भाषा मृता इति घोषिता तर्हि तस्या: उत्कर्षार्थं क्वापि निधी न देयं। तदा अस्माकं एता पुराभाषा कालपटले लुप्ता भविष्यति।
युवानां निर्णयपूर्वकानि प्रयत्नानि एतां भाषां जीवयितुं शक्नुवन्ति।
- ॠचा
---
मराठी आवाहन
एक महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे
भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक
पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील
तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा.
पूर्ण जरी नाही, तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला
म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र
आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक
सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
तुम्ही कुणी भेटल्यावर 'नमस्ते' म्हणता तेव्हा संस्कृत वापरता.
ही भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात
संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.
उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही
राज्यात अगदी ठरवून ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. भाषा मृत घोषित झाली
की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली
ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज
आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली
नाही.
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा!
---
जर तुमच्या मुलांच्या कानावर संस्कृत पडावे असे वाटत असेल तर हे पाहा
http://seit.unsw.adfa.edu.au/staff/sites/hrp/personal/sanskrit/
येथे संस्कृत शब्दकोशा सहीत संस्कृत 'वेतालपञ्चविंशति' मिळेल.
वाचू लागा, तुमच्या लक्षात येईलच की तुम्हाला संस्कृत येते!
एका दिवशी फक्त एकच गोष्ट.
नुस्ती ढकलपत्रे पाठवण्यापेक्षा, त्यातील भावनांशी किमान प्रामाणीक राहून मनापासुन प्रयत्न करणे चांगले.
अर्थात जाणकारांकडून ही पत्रे तपासणे महत्चाचे आहे.
तरीही अवगत भाषांच्या माहीतीवरुन संस्कृत भाषेला सरकार अडगळीत टाकणार आहे हे पटत नाही. तसे असेल तर संस्कृत भाषा संबधी सरकारी विभाग व इतर संस्थांनी याबाबत कायदेशीर प्रक्रिया करावी.
असो हे पत्र, अजुनही टाईमपास ढकलपत्र वाटते आहे. ह्या धाग्यातुन संस्कृत भाषा थोड्या लोकांपर्यत अजुनही आहे, मृत नाही हेही कळले. शालेय शिक्षणामधे संस्कृत विषय बाद अजुन झाल्याचे कळले नाही त्यामुळे आता हा विषय (निदान माझ्यापुरता) पुरे.
तरीही अवगत भाषांच्या माहीतीवरुन संस्कृत भाषेला सरकार अडगळीत टाकणार आहे हे पटत नाही. सहमत आहे. मलाही पटत नाहीये.
तसेच या ढकलपत्रातून फार काही साध्य होईल असेही वाटत नाही. :(
संस्कृत येण्यासाठी -
वाचल्याने येत आहे रे आधी वाचलेची पाहिजे!!
असे वाटते.
संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
सध्या एक-दोन आठवडे घाईत आहे, पुढील उत्तराचे मराठी भाषांतर दिले नाही. येथील कित्येक सदस्यांना संस्कृत भाषा अवगत आहे, त्यांनी मराठीत भाषांतर करून येथेच द्यावे, ही विनंती. म्हणजे येथील थोड्या सदस्यांना अरबी-फारसी वगैरे अवगत असून संस्कृत अवगत नाही, त्यांना मराठीत वाचायला सोयीचे जाईल.
(नाहीतरी यात मराठी शब्दांची भरणा आहे. संस्कृत-स्वभाषकाने लिहिलेली ही वाक्ये नव्हेत, मराठीभाषकाने "सम्प्रतिवार्ता: श्रूयन्ताम्" धर्तीवर लिहिलेले परिच्छेद आहेत. मराठीभाषक नसेल, भारतातल्या दुसर्या कुठल्या मातृभाषेचा संस्कृत जाणकार असेल, त्याला समजायला जडच जाईल.)
- - -
न मर्यादितुम् इच्छामि कस्यचिदपि वाक्स्वातंत्र्यम् । तथापि ।
जनगणनाप्रसङ्गे उत्तराणि सत्यानि एव ददातु, तानि रम्याणि भवेयु: न वा
भवेयु: |
अवगच्छामि यावदहं "[प्रथमभाषाभिन्ने] के भाषे अन्यतरे सुतरां ज्ञाते?"
इति पृच्छन्ति । ये के ते भाषे, ते एव लिखितव्ये, इति प्रार्थना मे भवतश्
चरणयो: ।
भारतशासनं करोति जनगणनां, तस्या अभिप्रायः सत्यपरिस्थितिज्ञानम् -
ध्येयानि न । यानि ध्येयानि शिरोधार्याणि, न तु वर्तमानानि, तानि
लिखितव्यानि ध्येयकल्प-आलेखेषु, गन्तव्यमार्गदर्शक-आलेखेषु ।
संस्कृतभाषाया: पठनपाठने भूयेयाताम् इत्येव धारणा मे । तथापि ज्ञातुम्
इच्छामि "_अधुना_ सा भाषा सुतरां कतिपयानि जनानि जानन्ति?" इति ।
यथा : कुटुम्बेषु बालका: सुनियंत्रिता: सुदृढाश् च इति मम दृढा कामना ।
तथापि प्रार्थये - "सर्वम् व्यवस्थितं कुशलं कुटुम्बे" इति न लिखितव्यं
ईप्सिततमम् । लिखितव्यं सत्यं यथा कथं वा भवेद् भवतः कुटुम्बम् _अधुना_ ।
ईमेल-पत्राणि पठामि कानि कानि दिने दिने - तत्र रुदन्ति केऽपि - न
कुर्यात् चेत् तत्र संस्कृतभाषाया: उपसंख्यानम्, "मृता संस्कृतभाषा" इति
घोषणां कुर्येयु: । अस्ति भो: कोऽपि भारतस्य शासने "मृतभाषाघोषणाविभागः"
नामा?
सविनयो,
धनञ्जयः ।
- - -
अतिशय सुरेख, टू-द-पॉइंट आणि साध्यासोप्या, सहज समजण्यासारख्या संस्कृतातील प्रतिसाद. आवडला.
महाशय,
आपले मराठीतले - आपल्या आणि माझ्याही स्वभाषेतले - लेखन बहुतप्रसंगी डोक्यावरून जाते, असा अनुभव आहे.
मात्र यावेळचा आपला संस्कृतातील प्रत्युत्तरवजा प्रतिसाद - मला शालेय संस्कृत विसरून य वर्षे होऊन गेली असूनही - चटकन समजला.
सबब, यापुढे आपण आपले लेखन संस्कृतातच करावे आणि संस्कृतापुरतेच मर्यादित ठेवावे, तसेच मराठीतून लेखन करण्याचे कटाक्षाने टाळावे, जेणेकरून आपण काय लिहिता ते समजणे सुकर होईल, अशी आपणांस कळकळीची विनंती.
कृपाभिलाषी,
प्रतिक्रिया