Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

क
क्लिंटन
Sat, 02/12/2011 - 15:38
🗣 82 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
25375 वाचन

💬 प्रतिसाद (82)
न
नितिन थत्ते Sat, 02/12/2011 - 15:56 नवीन
झकास सुरुवात.
  • Log in or register to post comments
प
पंगा Sat, 02/12/2011 - 17:14 नवीन
'झकास सुरुवात' याबद्दल सहमत. छडीच्या किमतीबद्दल बोलायचे, तर चांगला प्रश्न आहे. छडीच्या उत्पादनाकरिता आलेला खर्च हा मुद्दा गौण आहे. अर्थात छडीची किंमत ही किमान तेवढी तरी असावी, नाहीतर रामकरिता निश्चित घाट्याचा सौदा आहे, हे ओघाने आले, पण तरीही. त्यापेक्षा किंचित जास्त मूल्य जरी लावले, तरी तो सौदा रामला फायद्याचा होईलच, असेही सांगता येत नाही. कारण रामने ती काठी विकली नाही, तर त्याचा किती फायदा होऊ शकतो, ज्याच्यावर ती विकून तो पाणी सोडणार आहे, त्याचाही हिशेब कोठेतरी येणे रामच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यापुढे मग राम अशा कितीपर्यंत भावी फायद्यावर पाणी सोडण्यास तयार आहे, त्याविरुद्ध विकत घेणार्‍याला त्याचे मूल्य किती आहे, असे जास्तीत जास्त मूल्य किती, रामची ती काठी विकण्याची गरज जास्त आहे की गिर्‍हाइकाची ती विकत घेण्याची गरज जास्त आहे, या सर्व बाबींवर सौद्याची किंमत ठरेल. (गिर्‍हाइक अर्थात कमीत कमी किमतीत ती घ्यायला बघणार, आणि राम ती जास्तीत जास्त किमतीला विकण्याचा प्रयत्न करणार.) शिवाय, गिर्‍हाइक ती पुढे आणखी कोणाला आजमितीस किंवा भविष्यात कितीपर्यंतला विकू शकतो, आणि त्याकरिता आपले वार्षिक शंभराचे उत्पन्नावर पाणी सोडून कितीपर्यंत विकायला तयार आहे, आणि कितीपर्यंतला त्याला बाजारात गिर्‍हाइके मिळू शकतील असे वाटते, यावरही बरेच अवलंबून राहीन. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मी फुकटात अशा दहा काठ्या विकत घ्यायला तयार आहे. (शिवाय हे उत्तर सांगितल्याबद्दल राम मला एक काठी मोफत द्यायला तयार आहे, म्हणजे अकरा!) पटत असेल, तर रामने सांगावे. (तसेही वर्षाला शंभर रुपये म्हणजे माझा लाभ जास्त नाही. शंभर रुपये काय, आजकाल रिक्षावरसुद्धा उडतात. त्यामुळे ही काठी विकत घ्यायला मी इतका काही डेस्परेट नाही.) नसेल पटत, आणि आपली किंमत रामने सांगितली, तर विचार करेन, मला त्यात रस आहे की नाही ते. पण एक मिनीट! ज्या अर्थी राम स्वतः किंमत न ठरवता प्रॉस्पेक्टिव (याला मराठी शब्द काय? 'होऊ घातलेला'?) गिर्‍हाइकाला किमतीबद्दल सल्ला विचारतोय, त्या अर्थी तो विकायला डेस्परेट (याला मराठी शब्द काय? 'अगतिक'?) आहे - काहीतरी गडबड आहे! ठीक आहे. रामकडून शंभर काठ्या मी विकत घेईन, त्याबद्दल रामनेच मला शंभर रुपये द्यावेत, आणि वर उत्तराबद्दल प्रॉमिस केलेली एकशेएकावी छडी फुकट द्यावी, या किमतीवर मी सौदा पक्का करायला तयार आहे! आहे कबूल? (अतिशयोक्त असला, तरी हा प्रतिसाद अतिशय गंभीरपणे दिलेला आहे. तरी कृपया तो गंभीरपणेच घेतला जावा, ही विनंती.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 17:24 नवीन
या सर्व बाबींवर सौद्याची किंमत ठरेल. (गिर्‍हाइक अर्थात कमीत कमी किमतीत ती घ्यायला बघणार, आणि राम ती जास्तीत जास्त किमतीला विकण्याचा प्रयत्न करणार.)
छडीची नक्की किंमत किती या प्रश्नाला एक बरोबर उत्तर नाही.कारण गृहितकांप्रमाणे उत्तर बदलू शकते.या प्रश्नाचे उत्तर काढताना मी गृहितक धरले होते की सर्व ग्राहकांना अर्थकारणातील सर्व प्रकारची माहिती आहे म्हणजे शेअरबाजारात काय चालू आहे,परकीय चलनाच्या बाजारातील दर किती, कोणती बॅंक मुदत ठेवीवर किती व्याज देत आहे,कोणती कंपनी बॉंडवर किती व्याज देत आहे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती ग्राहकांना आहे.आणि दुसरे गृहितक म्हणजे ग्राहक या सगळ्या गोष्टींचा विचार करता छडीसाठीची योग्य किंमत असेल तेवढीच देतील. तेव्हा प्रत्येक ग्राहकासाठी आपण धरलेल्या गृहितकांच्या पार्श्वभूमीवर किंमत सारखीच असेल. अजूनही काही गृहितके आहेत.पण त्याविषयी पुढील भागात. अशा प्रकारची गृहितके घेऊन छडीची नक्की किंमत किती या प्रश्नाचे उत्तर काढता येईल का?तुमची गृहितके वेगळी असतील तर तुमचे उत्तरही वेगळे असेल.तेव्हा कोणतेही उत्तर नक्की काय गृहितक आहे यावर अवलंबून आहे.
त्याकरिता आपले वार्षिक शंभराचे उत्पन्नावर पाणी सोडून कितीपर्यंत विकायला तयार आहे
तुम्ही योग्य मार्गावर आहात एवढेच सध्या सांगतो.
काहीतरी गडबड आहे!
नाही हो काही गडबड नाही.पुढील भागापर्यंत वाट बघा म्हणजे हा प्रश्न वाटतो तितका कठिण नाही हे लक्षात येईल. एक मोठी हिंट मी वर गृहितक सांगून दिली आहे.त्याचा उपयोग करता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Sat, 02/12/2011 - 17:38 नवीन
मी गृहितक धरले होते की सर्व ग्राहकांना अर्थकारणातील सर्व प्रकारची माहिती आहे म्हणजे शेअरबाजारात काय चालू आहे
नाही हो, हे गृहीतक (वरील प्रतिसादातल्या, आणि प्रत्यक्षातल्याही) माझ्या बाबतीत बरोबर वाटत नाही. या बाजारात मी तसा नवीन आहे हो, आणि अर्थकारणातले मला काहीही कळत नाही, हे माझे गृहीतक आहे. फक्त कॉमनसेन्सच्या आधारावर स्वतःचा पटकन आणि जमेल तितपत फायदा करून घेता आला तर पहावा, आणि मग पैसे खिशात घालून, काठ्या फुकून टाकून सटकावे, इतकाच माझा मर्यादित दृष्टिकोन आहे. (असेही इन्वेस्टर्स असतीलच की खर्‍या बाजारात.)
तुमची गृहितके वेगळी असतील तर तुमचे उत्तरही वेगळे असेल.तेव्हा कोणतेही उत्तर नक्की काय गृहितक आहे यावर अवलंबून आहे.
हे तर ओघानेच आले. पण सगळ्यांचे दृष्टिकोन, सगळ्यांची गृहीतके सारखी असतीलच का, हाच तर प्रश्न आहे. गृहीतके भिन्न असण्याचे कारण अर्थातच (१) अज्ञान किंवा (२) भिन्न दृष्टिकोन अथवा उद्देश, यांपैकी काहीही असू शकते म्हणा, पण ते असो. पुढील भागाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 17:56 नवीन
आपण शास्त्रात कोणतेही गणित सोडवताना सुरवातीला सर्वात ideal अशी गृहितके धरून ती सोडवतो. म्हणजे घर्षण शून्य आहे हे ideal गृहितक भौतिकशास्त्रातील उदाहरण सोडवताना आपण घेतोच ना? त्याचप्रमाणे फायनान्समध्येही सुरवातीला सर्वात ideal गृहितके धरून गणित सोडवले जाते.मग एकेक करत ideal गृहितके relax करून उत्तर कसे बदलते ते बघितले जाते. फायनान्समधील असे ideal गृहितक म्हणजे Perfect market hypothesis. म्हणजे बाजार (Financial market) या अर्थी दोषरहित आहे हे एक गृहितक असते. त्याविषयी पुढील कोणत्यातरी भागात.पण या Perfect market hypothesis मधील एक महत्वाचे गृहितक म्हणजे सर्वांना सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे.म्हणजे कोणतीही information asymmetry नाही.त्यामुळे (१) अज्ञान किंवा (२) भिन्न दृष्टिकोन अथवा उद्देश ही कारणे उद्भवणार नाहीत. अवांतर: Perfect market hypothesis हा प्रत्यक्षात नाही हे समोर दिसतेच.पण markets ही perfect नाहीत म्हणूनच शेअर बाजारातील मोठ्या उलाढाली, रिस्क मॅनेजमेन्ट या सगळ्यांना वाव मिळाला आहे. काही प्रमाणात financial markets मधील उलाढाली या information asymmetry आहे म्हणूनच शक्य होतात.त्याविषयी पुढील कोणत्यातरी भागात. हा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Sat, 02/12/2011 - 18:04 नवीन
हेच सर्व तर समजून घेणे हे असे लेख वाचण्यामागचे प्रयोजन! आधी म्हटल्याप्रमाणे, पुढील भागाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/12/2011 - 16:31 नवीन
मस्तच मेजवानी मिळनार आता. फायणान्स इशय सोपा करुन सांगितल्यावरच समजतो.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 02/12/2011 - 16:37 नवीन
ओ, आमच्यालेखी बालवाडीच्या धड्यातच आम्हाला एमएचा प्रश्न का टाकताय? लेखमाला पूर्ण झाल्यावर फायनान्स, इकॉनॉमिक्स कळू लागेल, मग तुमच्या या प्रश्नाचे उत्तर कदाचित देता येईल. (हे अर्थातच मी माझ्यापुरते लिहिले आहे. सर्वांवर अज्ञानी असण्याचा आरोप करत नाहीये.) :) वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Sun, 02/13/2011 - 07:25 नवीन
ओ, आमच्यालेखी बालवाडीच्या धड्यातच आम्हाला एमएचा प्रश्न का टाकताय? सहमत +१०० अहो क्लिंटन गुरुजी सगळे विद्यार्थी तुमच्या एवढे हुश्शार नाय वो...जर सबुरीने घ्या की ... असो, रोल नंबर 2555, हजर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
आ
आनंद Sat, 02/12/2011 - 17:18 नवीन
ठीक वाटते.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 17:25 नवीन
५०० रुपये किंमत कशी आली याची कारणमिमांसा सांगता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
आ
आनंद Sat, 02/12/2011 - 17:59 नवीन
दर वर्षी १०० रु च मिळत असल्या मुळे. वर्षानी मिळालेल्या १०० रु मुल्य कमी झालेले असेल, १० वर्षानी आणखी कमी, आणि काही वर्षानी तर ती रक्कम अगदीच मामुली वाटणार, त्या मुळे जगाच्या अंता पर्यंत ला अर्थ नाही. कुठे त री थांबायला हवे.म्हणुन मी ५ वर्ष पे बैक पिरीयड व पुढ्ची ५ वर्ष कमाइची असा हिशोब धरुन , ५०० रु ठीक वाटते असे लिहले आहे. बाकी फायनान्स बियनान्स मला फारस कळ्त नाही, फ्क्त कॉमन सेन्स वापर्ला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 18:11 नवीन
तुम्ही योग्य मार्गावर आहात.याच कल्पनेचा थोडा अधिक विस्तार केलात की उत्तर नक्कीच येईल.उत्तर आल्यास व्य.नि वर कळवावे ही विनंती कारण तुमचे उत्तर वाचून इतरांच्या विचारप्रक्रियेवर परिणाम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
स
सुनील Sat, 02/12/2011 - 17:31 नवीन
छडीच्या मालकाच्या मृत्यूनंतर बॅ़क खात्यात पैसे जमा होत राहणार की थांबणार? जर थांबणार असेल, तर रामचे सध्या वय काय? असो, सुरुवात छान झाली आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 17:39 नवीन
छडीला प्रत्येक क्षणी कोणीतरी मालक असेलच.मूळ मालकाचे निधन झाल्यास त्या मालकाचा वारस या छडीचा नवा मालक होईल.आणि छडी त्या मालकाच्या खात्यात पैसे भरू लागेल. तसेच मालकाने वैधपणे दुसऱ्या कोणाला ती छडी विकली तरच छडी नव्या मालकाच्या खात्यात पैसे जमा करू लागेल अन्यथा जुन्याच मालकाच्या खात्यात पैसे जमा करत राहिल.म्हणजे छडी चोरून काहीच उपयोग नाही हे लक्षात घेऊन कोणीही छडी चोरायच्या भानगडीत पडणार नाही.तसेच प्रत्येक व्यक्ती त्या छडीची योग्य किंमत असेल त्याच किंमतीला ती इतरांना विकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sat, 02/12/2011 - 17:54 नवीन
गृहितके - १) मालकाच्या मृत्यूनंतरही त्याच्या वारसाला पैसे मिळतील. २) तात्विक दृष्टीने जरी पैसे जगाच्या अंतापर्यंत मिळणार असले तरी, छडीलाही आयुष्य असेलच. ती तुटू, गंजू, मोडू, जळू शकते. थोडक्यात १०० वर्षांनंतर छडी नष्ट होईल हे गृहितक ठेवले आहे. ३) बँक ६ टक्के व्याज जगाच्या अंतापर्यंत देईल. हा हिषोब केला तर, प्रत्येक छडी १०० वर्षांत सुमारे ६ लाखाचे उत्पन्न देऊ शकेल. मला विकायची असेल तर, माझी विक्रीची किंमत ६ लाख असेल. मात्र मी ६ लाखाला विकत घेणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 18:08 नवीन
छडीचे आयुष्य १०० वर्षे धरले तरी काही हरकत नाही.या गृहितकाच्या पार्श्वभूमीवर उत्तरही थोडे (खूप जास्त नाही) बदलेल.पण सहा लाख रूपये हे उत्तर काढताना काहीतरी गडबड होत आहे हे निश्चित.समजा तुम्ही सहा लाख रूपये बॅंकेत ठेवलेत तर त्यावर बॅंकेने दरवर्षी शंभरच रूपये व्याज दिलेले तुम्हाला (किंवा इतर कोणालाही) चालेल का? म्हणजेच बॅंका इतके कमी व्याज देतात का?यातून थोडी हिंट द्यायचा प्रयत्न केला आहे.त्याचा उपयोग करता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sat, 02/12/2011 - 18:15 नवीन
मला विकायची असेल तर, माझी विक्रीची किंमत ६ लाख असेल. मात्र मी ६ लाखाला विकत घेणार नाही! म्हणजे माझी भूमिका विक्रेत्याची आहे की ग्राहकाची यावर माझ्या मते किंमत बदलेल. मला विकायची असेल तर माझी भूमिका छडी १०० वर्षात किती उत्त्पन्न देऊ शकेल हे संभावित ग्राहकाला पटवून देण्याची असेल. मात्र मी जर ग्राहक असेन तर मात्र माझ्या मते योग्य किंमत फार वेगळी असेल (जी व्यनीने पाठवली आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पंगा Sat, 02/12/2011 - 18:09 नवीन
तात्विक दृष्टीने जरी पैसे जगाच्या अंतापर्यंत मिळणार असले तरी, छडीलाही आयुष्य असेलच. ती तुटू, गंजू, मोडू, जळू शकते. थोडक्यात १०० वर्षांनंतर छडी नष्ट होईल हे गृहितक ठेवले आहे.
शेअर सर्टिफिकेट छापलेल्या कागदालाही काही आयुष्य असतेच. पण तो कागद फाटला की शेअर किंवा त्यावरील डिविडंड (बर)बाद होत नाही. डुप्लिकेट सर्टिफिकेट मागवता येतेच. ज्या कंपनीचा शेअर, ती कंपनीच (पक्षी: या उदाहरणातली दरसाल शंभर रुपयांची स्कीम) जर बुडाली, तर मात्र सारे ठप्प होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पंगा Sat, 02/12/2011 - 18:23 नवीन
माझ्या कल्पनेप्रमाणे छडी हे येथे शेअरकरिता (किंवा खरे तर बाँडसारख्या ठराविक रकमी गुंतवणुकीकरिता) रूपक असावे. अर्थात मालकाच्या मृत्यूने फरक पडू नये. (छडीच्या स्कीमच्या संभाव्य मृत्यूने पडू शकावा.) म्हणजेच, छडीच्या उत्पादनमूल्याचे महत्त्व छडीची किंमत ठरवताना साधारणतः शेअर सर्टिफिकिट छापलेल्या कागदाच्या किमतीच्या महत्त्वाएवढे (पक्षी: शून्य) ठरावे. छडीचे सुरुवातीचे दर्शनी मूल्य हे सुरुवातीला किती भांडवल गोळा करणे अपेक्षित आहे, त्याच्या समभागाच्या प्रमाणात ठरावे. (याबद्दल या उदाहरणात काहीही माहिती नाही.) पुढे ती विकताना त्यातून मिळणारा फायदा किती, तसेच काही कारणाने ही योजना जर का बंद पडली (कोणतीही गुंतवणूक ही ऐतिहासिकदृष्ट्या कितीही निर्धोक आणि भरवशाची गुंतवणूक म्हटली, तरीही अनंतकाळपर्यंत 'जिल्ट-एजेड सेक्युरिटी' राहीलच, याची शाश्वती कधीही नसते.), तर तिचे अ‍ॅसेट्स विकून, त्यातून इतर देणेकर्‍यांची देणी चुकवून त्यानंतर मग सर्वात शेवटी उरलेल्या पैशाच्या समभागात गुंतवणूकदारांना त्यातून किती पैसे प्रतिछडी मिळू शकतील, या सर्वांवरही किंमत अवलंबून रहावी. या बाबीबद्दलही काही माहिती या उदाहरणात वरकरणी दिसत नाही. (चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 18:40 नवीन
माझ्या कल्पनेप्रमाणे छडी हे येथे शेअरकरिता (किंवा खरे तर बाँडसारख्या ठराविक रकमी गुंतवणुकीकरिता) रूपक असावे.
इथे छडी हे बॉंडसाठीचे रूपक आहे.कारण दरवर्षी १०० रूपये इतकी रक्कम देणार असे आश्वासन दिले आहे.तसे आश्वासन शेअरच्या बाबतीत देता येऊ शकत नाही (Preference shares सोडून). शेअरधारकांना मिळणारी रक्कम बिझनेसला किती नफा झाला त्या प्रमाणात बदलेल.एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर शेअरधारकाला काही मिळणार नाही पण बॉंड धारकाला मात्र त्याला आश्वासन दिलेली रक्कम द्यायला लागेल.
छडीचे सुरुवातीचे दर्शनी मूल्य हे सुरुवातीला किती भांडवल गोळा करणे अपेक्षित आहे, त्याच्या समभागाच्या प्रमाणात ठरावे. (याबद्दल या उदाहरणात काहीही माहिती नाही.) पुढे ती विकताना त्यातून मिळणारा फायदा किती, तसेच काही कारणाने ही योजना जर का बंद पडली (कोणतीही गुंतवणूक ही ऐतिहासिकदृष्ट्या कितीही निर्धोक आणि भरवशाची गुंतवणूक म्हटली, तरीही अनंतकाळपर्यंत 'जिल्ट-एजेड सेक्युरिटी' राहीलच, याची शाश्वती कधीही नसते.), तर तिचे अ‍ॅसेट्स विकून, त्यातून इतर देणेकर्‍यांची देणी चुकवून त्यानंतर मग सर्वात शेवटी उरलेल्या पैशाच्या समभागात गुंतवणूकदारांना त्यातून किती पैसे प्रतिछडी मिळू शकतील, या सर्वांवरही किंमत अवलंबून रहावी.
इथे परत एकदा शेअर आणि बॉंड यात थोडा घोळ होत आहे असे वाटते.छडी हा शेअर नसून बॉंड आहे तेव्हा सुरवातीला किती भांडवल गोळा करायचे त्याच्या समभागाच्या प्रमाणात ठरवणे, दिवाळखोरीच्या परिस्थितीत अ‍ॅसेट्स विकून, त्यातून इतर देणेकर्‍यांची देणी चुकवून त्यानंतर मग सर्वात शेवटी उरलेली रक्कम मिळणे या सगळ्या शेअरधारकांच्या साठी लागू होत असलेल्या बाबी इथे लागू होणार नाहीत. तेव्हा परत एकदा छडीला बॉंड समजून तिची नक्की किंमत किती हे काढता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
उ
उदय Sat, 02/12/2011 - 22:05 नवीन
इथे छडी हे बॉंडसाठीचे रूपक आहे.
माझ्यामते हे अन्यूईटी (annuity, मराठी ?) चे रूपक म्हणणे योग्य होईल कारण लेखात लिहिले आहे की छडी खरेदी करणार्‍याला मूळ रक्कम कधीच परत मिळणार नाही. असो, व्य.नि. पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sun, 02/13/2011 - 03:42 नवीन
माझ्यामते हे अन्यूईटी (annuity, मराठी ?) चे रूपक म्हणणे योग्य होईल कारण लेखात लिहिले आहे की छडी खरेदी करणार्‍याला मूळ रक्कम कधीच परत मिळणार नाही.
annuity सारखीच एक दुसरी समकक्ष संकल्पना आहे त्याचे छडी हे रूपक आहे असे म्हटले पाहिजे.आणि ती संकल्पना प्रत्यक्षात आणणारे बॉंड असतात त्याचा उल्लेख याच चर्चेत झाला आहे.
व्य.नि. पाठवतो
हो नक्की पाठवा. वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
प
पंगा Sun, 02/13/2011 - 03:19 नवीन
बाजारात गुंतवणुकीचे इतर पर्याय काय आहेत? आणि त्यावर परताव्यांचे पॅटर्न काय आहेत? चलनवाढ, रुपयाचे अवमूल्यन वगैरे घटक या सर्वच पर्यायांवर सारखेच फरक पाडतील, तेव्हा (हा प्रश्न सोडवण्यापुरते तरी) ते सेटेरिस पारिबसमध्ये टाकून देऊन त्यावर दुर्लक्ष करायला हरकत नसावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) आता बाजारात वेगवेगळे कोणते पर्याय आहेत? शेअर आहे, परंतु त्यात या छडीयोजनेसारखे हमीपूर्वक ठराविक उत्पन्न नाही. थोडक्यात जोखमीचा दर वेगळा आहे. म्हणून त्यांच्याशी तुलना करण्यात अर्थ नसावा. मग समतुल्य पर्याय कोणते आहेत? तर (१) सेविंग्ज़ बँक किंवा (२) फिक्स्ड डिपॉझिट किंवा (३) बाँड वगैरे. पैकी फिक्स्ड डिपॉझिट बाद कारण त्यात पैसे मुदत संपेपर्यंत अडकून राहतात आणि ते विकता येत नाही. सेविंग्ज़ खाते विकता येत नाही पण त्यातले सर्व पैसे काढून ते बंद करता येते या अर्थी ते काहीसे समतुल्य मानता यावे. तर अशा इतर सर्व पर्यायांपैकी जास्तीत जास्त व्याजदर कोणत्या पर्यायात मिळतो? त्या पर्यायात वार्षिक शंभर रुपये परताव्याकरिता किती पैसे गुंतवावे लागतात? छडीसाठी बहुधा जास्तीत जास्त तेवढी किंमत देण्याची माझी तयारी असेल. (हा माझा उत्तराचा शेवटचा प्रयत्न. हा माझा अप्रोच चुकीचा असल्यास उत्तरासाठी पुढील भागाची वाट पाहत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sun, 02/13/2011 - 03:48 नवीन
पंडित गागाभट्ट, you are almost there. अजून थोडा कल्पनाशक्तीला ताण दिलात की तुम्हाला उत्तर आलेच.पुढचा भाग मंगळवारी किंवा बुधवारी टाकणार आहे.तोपर्यंत तुम्हाला उत्तर येईलच.विशेषत: इतर गुंतवणुकीवरचा जोखमीचा दर,वार्षिक शंभर रुपये परताव्याकरिता किती पैसे गुंतवावे लागतील तेवढी जास्तीत जास्त किंमत देण्याची माझी तयारी या दोन गोष्टी म्हणजे अगदीच बुल-आय.उत्तर आल्यावर व्य.नि. करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
ख
खुसपट Sun, 02/13/2011 - 19:21 नवीन
छडीपासून मिळणारे उत्पन्न रु. १००/- वार्षिक व निरंतर आहे ( मालकाला व खरेदी करणार्‍याला ).अशा छडीसाठी वेगवेगळ्या प्रकारांची माणसे वेगवेगळ्या रकमांची बोली देतील. १. वयानुसार--तरुण, प्रौढ, ज्येष्ठ नागरीक .यामध्ये अज्ञान, भ्रमिष्ट,कफल्लक यांचा समावेश नाही.यांच्यापैकी ज्याला आयुष्यमान अपेक्षांक ज्यास्त म्हणजे तरुण माणूस हा भविष्यातील नियमित उत्पन्नाचे आजचे एकत्रित मूल्य ( ठराविक जोखीमरहीत व्याजदर/ तुलनात्मक मिळणारा व्याजदर हा भाजक अंक धरून काढलेले ) एवढी बोली देइल, जी ईतरांपेक्षा जास्त असेल. २.अपेक्षित जोखीमरहीत व्याजदर--नेहमीसाठी सरकारी रोख्यांवर १० वर्षे मुदतीसाठी देवू केलेला व्याजदर. पण व्यक्तिसापेक्ष हा कमीजास्त असतो. सद्ध्याचा साधारणपणे ८ टक्के वार्षिक.सोईसाठी हा दर आयुष्यभर एकच धरता येईल. ३.करयोग्य उत्पन्न गट--शून्य कर, १०%/ २०%/ ३० % ईत्यादी. करवजावट धरून येणारा व्याजदर भविष्यातील उत्पन्नाचे आजचे मूल्य काढण्यासाठी वापरला जाईल. जो अर्थातच साध्यादरापेक्षा जास्त असेल व म्हणूनच बोलीची रक्कम कमी होईल. ह्या तीन्हीची वेगवेगळी रकान्यांची तालीका ( टेबल्स) बनविल्यास , मिपाकर वाचक ज्या प्रकारात बसेल त्यानुसार व त्याच्या / तिच्या आर्थिक क्षमतेनुसार एक किंवा अनेक छड्यांसाठी बोली देतील. बँका व विमा कंपन्या याप्रमाणेच सरकारी रोख्यांचे आर्थिक व्यवहार आखतात/करतात. अजून काही मुद्दे आहेत ,पण ते नंतर लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नगरीनिरंजन Sat, 02/12/2011 - 17:49 नवीन
चांगली सुरुवात! पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. रामची छडी परपेच्युअल बाँड सारखी वाटतेय. चलनवाढीचा दर हा किमान अपेक्षित परताव्याचा दर धरला तर त्या दराने वर्षाला शंभर रुपये मिळतील अशी रक्कम म्हणजे त्या छडीची किंमत असेल असे वाटते. (दीर्घकालीन गुंतवणूकीवरच्या अपेक्षित परताव्याच्या दराची माहिती रामकडे नाही असे गृहीत धरले आहे. ) म्हणजे चलनवाढीचा दर ५% असेल तर छडीची कमाल किंमत २००० असेल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 18:04 नवीन
तुम्ही योग्य मार्गावर आहात एवढेच आता सांगतो. दोन हजार रूपये किंमत कशी आली याची थोडक्यात आकडेमोड व्य.नि. वर कळवू शकाल का? (म्हणजे पुढील भागात प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल तुमच्या नावाचा उल्लेख करता येईल). उत्तर व्य.नि वर अशासाठी की तुमचे उत्तर वाचून इतरांच्या विचारप्रक्रियेवर परिणाम होऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 02/12/2011 - 18:40 नवीन
महागाई दर १०% धरला; मंजे आज जी किम्मत १०० रु ला आहे ती पुढच्या वर्षी ९० रु ला .समजा २०००० हजारांना १० ग्राम सोने आज तर पुढच्या वर्षी २००००-०.१*२०००० रु ला १० ग्रामच ! छडी चे १०० रु वाढणार नाहीत असे धरतोय . आज विकत घेणारा २० वर्षाचा आहे आणि आयुर्मान ७० वर्षे तर मग ५० वेळा छडी १०० रु देणार मंजे ५०*१०० = ५० हजार................(face value ) आणि त्याची(१०० रु ची)value दर वर्षी १/१.१० पटीने कमी होईल . १० व्या वर्षा नंतर मिळणारी किंमत १०० रु मंजे ३४ रु ;२० व्या वर्षानंतर १२ रु .................. मालकाची किंमत ७ वर्षात वसूल होईल असे म्हणू मंजे ७ वर्षांचा फायदा हि खरेदी किंमत (आज पासूनच्या पहिल्या मालकासाठी ) १००+९०+८१+७२.९+६५.६१+५९.०४९+५३.१४ =५२१.६९९ हि खरेदी किंमत ठिक्क आहे
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 18:43 नवीन
तुम्हीपण योग्य मार्गावर आहात.महागाई हा एक मुद्दा झाला.त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या मुद्द्यांमुळे किंमत बदलू शकेल का?सात वर्षांऐवजी शंभर वर्षांत आधी भरलेली रक्कम वसूल होईल असे धरले तर किंमतीत काही फरक पडेल का? उत्तर व्य.नि वर पाठवावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 02/12/2011 - 18:48 नवीन
100 रु वरचे बँकेचे व्याज नगण्य आहे ---assumption
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
उ
उदय Sat, 02/12/2011 - 20:02 नवीन
FV = PV ( 1 + i ) ^t PV = FV/( 1 + i )^ t FV = Future value भविष्यातील किंमत PV = Present Value सध्याची किंमत i = Discount rate (interest rate) वार्षिक व्याजदर t = वेळ वरील तत्व वापरून आजची किंमत ठरवता येईल. यामध्ये व्याजदर आणी वेळ महत्वाची. DCF = Discounted Cash Flow मध्ये हे तत्व वापरतात.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 02/12/2011 - 20:09 नवीन
१००% बरोबर. पण यात काही महत्वाचे मुद्दे आहेत. यात discount rate काय धरावा?त्यासाठी आधार कोणता? आणि दुसरे म्हणजे तुम्ही दिलेली PV आणि FV ची सूत्रे एका कॅशफ्लो साठी आहेत.दरवर्षी कॅशफ्लो येत असेल तर त्या सूत्रांमध्ये काय बदल करावा लागेल? उत्तर व्य.नि वर द्यावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
अ
अनामिक Sun, 02/13/2011 - 01:02 नवीन
विकत घेतल्या जाणारी छडी जरी अनंत काळापर्यंत दरवर्षी १००रु देणार असली तरी माझ्या करता मी फक्त माझ्या आयुष्यातल्या पुढील काही वर्षांसाठी (किंवा भवीष्यासाठी) करत असल्येल्या गुंतवनुकीचाच विचार करीन. सध्या समजा बँकेत बाँडवर ८% व्याज मिळत असेल तर, मुळ रकमेची दुप्पट व्हायला साधारणपणे ९ वर्षे लागतील. तसेच, अधीक गणितात न जाता, समजा मी ही छडी विकत घेतली तर पुढील ९ वर्षात ९०० रु मिळतील (इथे दरवर्षी मिळणार्‍या १००रुपयांवरील व्याज पकडले नाही). ९०० रु ही ९ वर्षात मिळणारी दुप्पट रक्कम धरली तर ही छडी मी ४५०रु किंवा कमी दरात घेईन. जरी ही छडी अनंत काळापर्यंत प्रतीवर्षी १००रु देत असली, तरी मला मी आत्ता केलेल्या गुंतवणुकीचा पुढील काही वर्षात योग्य मोबदला मिळणार नसेल तर मी ही गुंतवणूक तोट्याचीच समजेन. माझ्या उदाहरणात मी पुढच्या ९ वर्षाचा विचार केलाय. हा आकडा जसजसा बदलेल तसतशी ह्या छडीची किंमतही बदलेल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 02/13/2011 - 03:57 नवीन
मी ही छडी विकत घेतली तर पुढील ९ वर्षात ९०० रु मिळतील....तर ही छडी मी ४५०रु किंवा कमी दरात घेईन.
तुम्ही पुढील नऊ वर्षे (किंवा काही finite वर्षे) इतका काळ आणि ८% व्याज गृहित धरले असेल तर काही हरकत नाही.उत्तर त्याप्रमाणे बदलेल.तरीही पुढील ९ वर्षात ९०० रूपये मिळतील यात एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.ती गोष्ट ध्यानात घेतली आणि ८% व्याज आणि ९ वर्षे कालावधी गृहित धरला तर उत्तर बरोबर येईल.एक हिंट म्हणजे या गृहितकांच्या पार्श्वभूमीवर छडीची किंमत ४५० पेक्षा जास्त असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक Sun, 02/13/2011 - 05:09 नवीन
व्यनी केलाय, अजून काही गृहीत धरावे लागेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गोगोल Sun, 02/13/2011 - 01:57 नवीन
"money infinite inflation worth" ह्या टर्म्ज़ टाकून सर्च केल्यावर दुसरीच लिंक मिळाली http://en.wikipedia.org/wiki/Time_value_of_money धडाकेबाज सुरूवात. येऊ द्यात अजुन.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 02/13/2011 - 04:02 नवीन
अरे वा. गोगोल साहेब जबरदस्त दुवा दिला आहेत.त्यावरील अनेक सूत्रांपैकी एका सुत्राचा वापर करून छडीची किंमत काढता येईल.पण त्यातही "i" ची किंमत काय घ्यावी, ती कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कारणांमुळे बदलेल या प्रश्नांची उत्तरे देता आली म्हणजे उत्तर आलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
आ
आजानुकर्ण Sun, 02/13/2011 - 05:21 नवीन
सध्या बाजारात असलेल्या व्याजदराच्या आधारे दरवर्षी १०० रुपये व्याज मिळेल इतकी मुद्दल रक्कम म्हणजे छडीची किंमत असावी असे वाटते. लेखमाला झकास होणार असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 02/13/2011 - 05:33 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 02/13/2011 - 05:49 नवीन
लेख मालीका छान होईल यात शंका नाही. फायनान्स मधील मुलभुत तत्वे सोप्या भाषेत (आनी ते सुद्धा रामायनातील पात्रे वापरुन) स्पष्ट करत आहत, संकल्पना आवडलि. पुढिल लेखा साठि शुभेच्छा ! गमतीने : रावण कुमार चि एन्ट्री कधी ? मला वाट्टे तो या वेळेस सीता कुमारी ऐवजी सगळ्या छड्याच पळवुन नेईल अशी भिती वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 02/13/2011 - 06:27 नवीन
रोल नंबर ३२४ हजर. :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 02/13/2011 - 07:08 नवीन
उत्तर सांगा लवकर :-)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 02/13/2011 - 07:36 नवीन
रामकडे किती छड्या आहेत यावरही छडीची किंमत अवलंबून राहील.
  • Log in or register to post comments
प
पंगा Sun, 02/13/2011 - 07:43 नवीन
सुमारे दोनशे छड्या विकल्या जातील असा रामचा अंदाज होता.
असे एक वाक्य लेखात दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आजानुकर्ण Sun, 02/13/2011 - 07:44 नवीन
छड्यांची तुलना बाँडशी होत आहे, शेअर्सशी नाही. त्यामुळे छडीची किंमत फक्त टोकन व सद्यकालीन व्याजदर यावरच अवलंबून राहील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पिवळा डांबिस Sun, 02/13/2011 - 07:41 नवीन
आम्हाला ती छडी विकत घ्यायची नाही.... त्यापेक्षा आम्ही अन्यत्र गुंतवणुक करू!!!!! का ते जाणून घ्यायचे असल्यास श्री रामकुमारांनीच (किंवा श्री कलिंटन यांनी) आम्हाला व्यनि करावा!!!! :) :) :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 02/13/2011 - 08:42 नवीन
जबरदस्त सुरुवात, सध्या कुणातरी गुरुच्या शोधात होतोच. तुम्ही दुसरे गुरु, अर्थात अंगठा मिळणार नाही. असो, एका अतिशय छान लेखमालेला खुप खुप शुभेच्छा. हर्षद.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 02/13/2011 - 17:49 नवीन
नमस्कार मंडळी, प्रस्तावित लेखमालेचे स्वागत करून शून्याव्या भागात प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.मला व्य.नि वर सुनील,नगरीनिरंजन,अनामिक आणि मंद्या यांची उत्तरे आली.इथे पंगा,आनंद,आजानुकर्ण,उदय यांनीही त्यांचा approach सांगितला.या सगळ्यांत छडीची किंमत कोणत्या परिस्थितीत (एकूण परिस्थितीमध्ये होणारे बदल) बदलेल याचा समावेश नव्हता.तेव्हा ती उत्तरे काही अंशी बरोबर असली तरी त्यात आणखी वावही आहे. रामच्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या भागात जाहिर करणार आहे. अजून काही आठवडे तरी आठवड्याला जास्तीतजास्त दोन (किंवा कधी तीन) अशा वेगाने हे लेख इथे लिहायचा मानस आहे.याचे कारण म्हणजे हा विषय नवीन असेल त्यांच्यावर एकदम ओव्हरलोड नको. तसेच एखादा भाग टाकल्यावर त्याला आलेल्या प्रतिसादांना उत्तरे द्यायचा माझा प्रयत्न असेल.तसेच एकाच वेळी २-३ भाग active असतील तर सगळ्या प्रतिसांदांकडे लक्ष द्यायला मलाही वेळ मिळणार नाही.म्हणून घाईने सगळे भाग लिहिणार नाही. तसेच मे-जूनपासून लेख लिहिण्यात कदाचित अनियमितता येऊ शकेल. सर्वांनी पुढील लेखनास शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच एकूणच अपेक्षाही जास्त आहेत.तसे अनेक सन्माननीय सभासदांनी म्हटलेही आहे.आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा मोठा प्रकल्प यशस्वी होऊ शकेल.आणि मग कोणाला बालवाडीमध्ये आहोत असे वाटणार नाही. :) जर कोणाला एखादा मुद्दा समजला नाही, एखाद्या मुद्द्याविषयी अजून स्पष्टीकरण हवे असेल तर जरूर सांगावे ही विनंती. लेखमालेच्या पुढील भागात विशेषत: अकाऊंटिंगचा भाग सुरू झाला की तो विषय नवीन असलेल्यांना काही संकल्पना कळायला कठिण जाऊ शकते.अशा प्रश्नांना सी.ए, कॉस्ट अकाऊंटंट अशा पेशातील मिपाकर अधिक चांगले मार्गदर्शन करू शकतील.अर्थातच मी प्रश्नाला बगल नक्कीच देणार नाही पण जर कोणा मिपाकराला ती गोष्ट अधिक चांगल्या पध्दतीने समजावून सांगता आली तर त्याचे स्वागतच आहे. क्लिंटन
  • Log in or register to post comments
उ
उदय Mon, 02/14/2011 - 03:22 नवीन
क्लिंटन, तुमचा उद्देश एकदम सुंदर आहे. माझ्या शुभेच्छा. १ सांगावेसे वाटते. एका लेखात १ च गोष्ट सांगावी, जसे इथे NPV (Net Present Value) बद्दल. छडी हे स्टॉकचे रूपक आहे की बाँडचे की अन्यूईटीचे, असे विषयांतर झाले तर मग गोंधळ उडण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा