Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

क
क्लिंटन यांनी
Sat, 02/12/2011 - 15:38  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
25375 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

क
क्लिंटन Mon, 02/14/2011 - 05:05 नवीन
सर्वप्रथम आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. लवकरच रामच्या प्रश्नाचे उत्तर जाहिर करणार आहे.तेव्हा या प्रतिसादात थोडी जास्तच हिंट देतो.
छडी हे स्टॉकचे रूपक आहे की बाँडचे की अन्यूईटीचे
एकदा घेतलेले पैसे राम कधीच परत करणार नाही यावरून छडी हे स्टॉकचे रूपक आहे असे वाटायची शक्यता आहे.शेअर विकत घेताना गुंतवणूकदाराने भरलेले पैसे सामान्यत: कंपनी कधीच परत करत नाही.सामान्यत: असे म्हटले कारण कंपनी शेअर बायबॅक करू शकते तेव्हा पैसे शेअरधारकाला परत करते.पण शेअर बायबॅक अगदी सर्रास चालत नाहीत आणि बाजारात असलेले सगळे शेअर परत विकत घेऊन एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड ची प्रायव्हेट लिमिटेड झाली असे प्रकार अगदी होतच नाहीत असे नाहीत पण ते फारच कमी प्रमाणात होतात.तेव्हा सारांश: छडी हे स्टॉकचे रूपक आहे असे या कारणामुळे वाटायची शक्यता आहे. पण वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दरवर्षी १०० रूपये देऊ असे आश्वासन स्टॉकच्या बाबतीत देता येत नाही.ते केवळ बॉंडच्या बाबतीतच देता येते.तेव्हा छडी हा बॉंड आहे.सामान्यत: बॉंड हे ठराविक कालावधीसाठी (१० वर्षे, ३० वर्षे वगैरे) असतात.त्या कालावधीनंतर मूळ मुद्दल परत केले जाते.पण इथे मूळ मुद्दल परत केले जाणार नाही.तेव्हा मुद्दल कधीच परत करणार नाही अशा प्रकारचा कोणता बॉंड आहे का? तुमचे उत्तर व्य.नि वर मिळाले.त्याविषयी भा.प्र.वे संध्याकाळपर्यंत अधिक लिहिता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
म
मन१ Mon, 02/14/2011 - 06:41 नवीन
"पैशाची कहाणी " सुद्धा आवडाले होतेच. आता मूळ मुद्द्याकडे:- छडीची किंमत ठरवत बसण्यापेक्षा लिलाव/auction नाही करता येणार का? पुढील भागांच्या प्रतीक्षेत, आपलाच मनोबा.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 02/14/2011 - 06:44 नवीन
रामपूर बाजारात लांब पल्ल्याचा व्याजदर काय आहे? त्यावर छडीची किंमत ठरेल. या ठिकाणी चक्रीवाढ क्षणभर बाजूला ठेवूया. (चक्रीवाढ मानली तरी उत्तरात फरक नाही. लोकांना उगाच चक्रीवाढ "कठिण" वाटते, म्हणून बाजूला ठेवली आहे.) जर रुपयावर वार्षिक क्ष पैसे व्याजदर (म्हणजे क्ष %) रामपूरच्या बाजारात उपलब्ध असेल तर १०० रुपये व्याज किती मुदलावर मिळेल? उत्तर : १०,०००/क्ष रुपये उदाहरणार्थ समजा : रामपूरच्या बाजारात वार्षिक ५% व्याजदर उपलब्ध असेल, तर जो व्यक्ती १०,०००/५ = २००० रुपये गुंतवेल त्याला दर वर्षी १०० रुपये मिळतील. छडी ठेवून=गुंतवून वार्षिक १०० रुपये मिळतील, आणि २००० रुपये गुंतवून वार्षिक १०० रुपये मिळतील; हे समांतर असल्यामुळे छडीची किंमत रुपये २०००/- अशी येईल. या छडीचे "धनदात्री" यापेक्षा वेगळे कुठलेही कार्य नाही, असे गृहीत धरलेले आहे. (छडी याशिवाय शोभिवंत असेल, किंवा शिवाय गुरे हाकायला उपयोगी पडत असेल, किंवा ढोल वाजवायला उपयोगी पडत असेल, तर तिची किंमत अधिक असेल.)
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 02/14/2011 - 16:35 नवीन
चलनवाढीचा दर ६% धरला तर हे २००० रु कधीच वसूल होणार नाहीत. पैसे व्याजावर दिले तर मुद्दल परत मिळते, इथे नाही मिळणार, हा मुद्दा आपल्या चटकन लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
क
क्लिंटन Mon, 02/14/2011 - 18:14 नवीन
धनंजय, तुमचा approach बरोबर आहे.केवळ कळीचा मुद्दा म्हणजे वार्षिक ५% व्याजदर हा नक्की कोणत्या गृहितकांवर आधारीत आहे?त्यात कोणत्या परिस्थितीत बदल होऊ शकतील?विश्वनाथ मेहंदळे यांनी त्यातील एक कारण सांगितले आहे.त्याव्यतिरिक्त आणखी काही कारणे असू शकतील का?म्हणजे आपल्याला काय झाले की व्याजदर वाढेल आणि त्याप्रमाणे छड्यांची किंमत कशी कमीजास्त होईल हे सांगता येईल. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ध
धनंजय Mon, 02/14/2011 - 20:25 नवीन
"५%" हे माझे उत्तर नाही. "१००००/क्ष" ही किंमत असे माझे उत्तर आहे. "५%" हे फक्त विवरणात्मक उदाहरण. ज्या प्रकारे तुमच्या प्रश्नात "१०० रुपये वार्षिक" हे सांगण्यासाठी गृहीतक कुठले?" हा प्रश्न कोणी विचारणे योग्य नाही. तुमचा प्रश्न "वार्षिक 'य' रुपये देणार्‍या छडीची किंमत" याबद्दल आहे, पण विवरणाच्या सोयीसाठी तुम्ही "१०० रुपये" असा आकडा सांगितलेला आहे. व्याजदर काढण्यासाठी कुठलेही गृहीतक चालायचे नाही. निरीक्षणच हवे. किंवा निरीक्षणाधिष्ठित कल्पनाशक्ती. भविष्यातील व्याजदर म्हणजे विगमनात्मक (एक्स्ट्रापोलेशन). वाटल्यास गृहीतक असे मानावे : लांब पल्ल्याच्या इतिहास बघून लांब पल्ल्याच्या भविष्याबद्दल काही सांगता येते. व्याजदर आणि चलनवाढ यांचा संबंध इतका घनिष्ट आहे, की तो विशद करणे म्हणजे तुमची भावी मालिकाच आहे! श्री. विश्वनाथ मेहंदळे म्हणतात, तसा त्या बाजारात लांब पल्ल्याची चलनवाढ ६% असेल, पण त्या बाजारातला लांब पल्ल्याचा व्याजदर ५% असेल, तर तो बाजार नष्ट होणार, हे निश्चित. "कल्पांतापर्यंत दरवर्षी रु १००" ही संकल्पनाच गैरलागू आहे. कारण कल्पांतापेक्षा खूपखूप आधी नष्ट पावेल. खरे तर व्याजदर (म्हणजे कुठल्या बँकेच्या सेव्हिंग्स अकाउंटच्या गोंडस जाहिरातीतला नव्हे, तर त्या बाजारात कर्ज घेण्यासाठी काय दर द्यावा खरोखर लागतो, तो दर) हा चलनवाढीच्या दरापेक्षा कमी कसा असू शकतो, हे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. या कथानकात काही तत्त्वे विशद करण्यासाठी "कल्पांतापर्यंत व्याज" वगैरे काल्पनिक पण सुलभीकृत तत्त्वे सांगितलेली आहेत. हे ठीकच आहे. त्याच प्रमाणे बाजारात चलनवाढीचा दर घटवून "साल २०११चे रुपये" हे गणिताचे एकक मानायला हरकत नाही. शिवाय व्यक्तीला मोठ्या संस्थेपेक्षा नेहमीच कमी व्याज मिळते - माझे सेव्हिंग्स खात्यातील पैसे मी खुद्द गरजू व्यक्तीपर्यंत पोचवत नाही, पोचवू शकत नाही. बँक कर्जदार शोधते, कर्जाचे व्यवहार करते, आणि त्या सर्व सेवांचे चांगले गब्बर शुल्क घेऊन मला कमी व्याज देते. पण या सुलभीकृत उदाहरणासाठी "लहान-मोठ्या सर्व गुंतवणूकदारांसाठी एकच कुठला सरासरी व्याजदर असतो" असे सुलभीकरण केलेले आहे. चक्रीवाढीबद्दल सुलभीकरण मी वर सांगितलेलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 02/14/2011 - 20:34 नवीन
धन्यवाद धनंजय.तुमचा approach बरोबरच आहे.
व्याजदर काढण्यासाठी कुठलेही गृहीतक चालायचे नाही. निरीक्षणच हवे.
बरोबर.प्रत्यक्ष मार्केटमध्ये गुंतवणुक करताना गृहितक चालायचे नाही.तरीही प्रत्यक्ष गुंतवणुक करताना व्याजाचे दर या महत्वाच्या variable ची किंमत बदलणारे काही महत्वाचे घटक असतात.त्या घटकांचे निरीक्षण असणे गरजेचे आहे.पण या काल्पनिक उदाहरणात तसे निरीक्षण अर्थातच करता येणार नाही.म्हणूनच नक्की काय गृहित धरले आहे हा प्रश्न उद्भवतो.म्हणजे प्रत्यक्ष मार्केटमध्ये व्याजाच्या दरावर परिणाम करणारे समजा अ,ब आणि क हे तीन घटक असतील तर असे काल्पनिक उदाहरण सोडवायला अ,ब आणि क ची किंमत वेगळ्या वाचकांनी वेगळी धरली तर त्याप्रमाणे उत्तर बदलू शकेल.असो. तसेच बाजारात लांब पल्ल्याची चलनवाढ ६% आणि लांब पल्ल्याचा व्याज दर ५% हे होऊ शकणार नाही हे अगदी पूर्णपणे मान्य. आता या उत्कंठावर्धक प्रश्नाचे उत्तर बुधवारी सकाळी पोस्ट करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ड
डीलर Mon, 02/14/2011 - 07:11 नवीन
हे नॉन पर्टीसिपेटींग प्रेफरड स्टॉक आहेत काय? किंवा स्ट्र्क्ट्चड डेट? छडीची किंमत किती छ्ड्या विकणार त्यावर अवलंबून असेल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 02/14/2011 - 08:15 नवीन
छडी ची म्यान्युफॅक्चरिम्ग कॉस्ट + तिची उपयुक्तता ( वर्षाला रु.१००/-) + रामकुमारला त्या छडीची भविष्यात गरज भासू नये अशी काही रक्कम.( रॉयल्टी) वगैरे + काठीची लोकाना पटलेली उपयुक्तता ( या बाबत थोडे साशंकता आहे कारण रामने त्याबाबत गुप्तता राखलेली होती ) असे मिलुन एकुण साधारणतः रु.१०००० /- ( वार्षीक उत्पन्नाच्या १०० पट ) किम्मत यायला हरकत नाही
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/14/2011 - 18:35 नवीन
छडीची किंमत १० हजार रूपये असेल तर त्यावर वर्षाला १०० रूपये म्हणजे १% व्याज येईल.काही अपवादात्मक परिस्थितीत व्याजाचा दर इतका कमी असू शकतो पण तो बहुतांश वेळा त्यापेक्षा जास्त असतो.तेव्हा १% इतका कमी व्याजदर असेल तर त्यामागचे गृहितक कोणते?तेव्हा दहा हजार रूपये ही किंमत बरीच जास्त आहे.धनंजय यांनी म्हणल्याप्रमाणे छडी ही मुख्यत: धनदात्री आहे. राम कुमारला रॉयल्टी हे छडी विकत घेणारे देणार नाहीत तर समजा इतर कोणाला राम कुमारचे टेक्निक वापरून छड्या बनवायचा आणि विकायचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यक्तीला रामला रॉयल्टी द्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
शैलेन्द्र Mon, 02/14/2011 - 08:43 नवीन
तिन चार गोष्टींवरुन किंमत ठरेल, * रामकुमारच्या राज्यातील चलन्वाढ, *बैंकीतील व्याजाचा दर, *छडी घेणार्‍याकडील आर्थीक तरलता, व त्याच्याकडे असलेल्या गुंतवणुकीच्या संधी. *जर राम्कुमार आजच्या भारतात असता तर ही छडी मी ५०-७५ दरम्ह्यान घेतली असती.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 02/14/2011 - 08:43 नवीन
या व्यवहारात कोणतीही रिस्क नसल्याने अनंतकालीन (मुदत) ठेव अशी या व्यवहाराची व्याख्या करता येईल. मुद्दल परत मिळणार नाही. म्हणजे वर्षाला मिळणारे १०० रु. हे निव्वळ व्याज + मुद्दलाचा एक भाग दोन्ही आहे. समजा बाजारातील व्याजदर १०% धरला तर अंदाजे ७ वर्षात मुद्दल दुप्पट होते. समजा बाजारातील व्याजदर ६% धरला तर अंदाजे ११ वर्षात मुद्दल दुप्पट होते. यांची सरासरी ९ वर्षे येते. रामकुमारला तोटा होता कामा नये. या हिशेबाने किंमत अशी हवी की रक्कम दुप्पट होण्याच्या कालखंडात रामला मिळणारी एकूण रक्कम ही मुद्दल (काठीची विक्री किंमत) आणि त्यावरील चक्रवाढव्याज (६ ते १०% दराने)यांच्या बेरजेइतकी हवी. ६% दराने ही रक्कम ५७९ रु. येते. १०% दराने ही रक्कम ३५९ रु. येते. सरासरी केली तर ही रक्कम अंदाजे रु. ४६९ होते. (९ वर्षात दुप्पट) म्हणून छडीचा खरा फायदा विकत घेणार्‍यास अंदाजे ७ ते ११ वर्षांनंतर सुरू होणार.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/14/2011 - 18:45 नवीन
परफेक्ट मार्केटचा याच चर्चेत एका प्रतिसादात उल्लेख केला आहे.परफेक्ट मार्केटमध्ये कोणत्याही फायनान्शियल इन्स्ट्रुमेन्ट हे त्याच्या योग्य किंमतीलाच विकले जाते.म्हणजेच छडी विकताना रामला नफा-तोटा हा प्रश्न उद्भवणार नाही.तरीही छडी विकत घेणाऱ्याच्या दृष्टीने छडी विकत घेऊन ठेवली तर नक्की फायदा काय?याचे उत्तर मिळण्यासाठी वाट बघावी लागेल दुसऱ्या भागाची. दुसरा भाग सध्याच्या प्लॅनप्रमाणे शनीवार १९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करायचा मानस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
न
नितिन थत्ते Tue, 02/15/2011 - 05:39 नवीन
योग्य किंमतीलाच विकले गेले तर नफा होणार नाही हे बरोबर नाही. नफा=प्राइस - कॉस्ट म्हणून नफा (किंवा तोटा) होईलच. लोक जी किंमत द्यायला तयार असतील ती कॉस्टशी काही ताळमेळ ठेवून असेलच असे नाही. ती बहुतेक वेळा उपयुक्तता (येथे दरवर्षी १०० रु देणे) बघून ठरवली जाईल. भले काठीची बनवण्याची किंमत २ रु असो की २ लाख रु असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 02/15/2011 - 09:04 नवीन
परफेक्ट मार्केटमध्ये कोणतेही फायनान्शियल एक्स्ट्रुमेन्ट त्याच्या योग्य किंमतीलाच विकले जाईल.योग्य किंमत म्हणजे भविष्यात अपेक्षित असलेल्या कॅश फ्लो ची Present Value. तीच गुंतवणूकदारांचीही त्या फायनान्शियल एन्स्ट्रुमेन्टची Perceived value असेल कारण परफेक्ट मार्केटमध्ये सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित असल्यामुळे सगळ्यांची Perceived value पण सारखीच असेल. म्हणजेच त्या किंमतीला कोणतेही फायनान्शियल एन्स्ट्रुमेन्ट विकले गेले तर संबंधित कंपनीला एकरकमी आज जितके पैसे मिळतील तितकीच Present Value असलेले कॅश फ्लो गुंतवणूकदारांना भविष्यात दिले जातील.त्यामुळे परफेक्ट मार्केटमध्ये ज्यावेळी कोणतेही फायनान्शियल एन्स्ट्रुमेन्ट विकले जाते तेव्हा त्या क्षणी कोणताही नफा-तोटा होणार नाही. अर्थातच मार्केट परफेक्ट नसतातच त्यामुळे इम्परफेक्ट मार्केटमध्येही सुरवातीलाच आणि परफेक्ट मार्केटमध्ये इतर काही परिस्थितीतही भविष्यकाळात असा फायदा संबंधित कंपनीला होऊ शकतो.या सगळ्यांविषयी लिहिणार आहे दुसऱ्या भागात.त्यासाठी थांबायला हवे शनीवार १९ फेब्रुवारी पर्यंत. रामच्या particular case मध्ये फरक असा की राम केवळ छड्या विकणार आहे आणि त्याचे पैसे घेणार आहे.पण भविष्यकाळात त्याला दरवर्षी १०० रूपये द्यावे लागणार नाहीत.ते पैसे आपोआप (जादूने) गुंतवणूकदाराच्या बॅंक खात्यात भरले जातील आणि ते रामला भरावे लागणार नाहीत.त्यामुळे रामकडून भविष्यातील कॅश आऊटफ्लोची Present Value शून्य आहे.अशा परिस्थितीत रामने छड्यांच्या निर्मितीसाठी झालेल्या खर्चापेक्षा जास्त किंमतीला छड्या विकल्या तर त्याला फायदा होणार आहे.तेव्हा त्याचा बिझनेस हा इतर कोणत्याही बिझनेसपेक्षा वेगळा नसेल. तेव्हा छडी विकताना नफा-तोटा होणार नाही यावरून थोडा संदेह व्हायची शक्यता आहे म्हणून हे स्पष्टीकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विजुभाऊ Mon, 02/14/2011 - 11:08 नवीन
छडीचा खरा फायदा विकत घेणार्‍यास अंदाजे ७ ते ११ वर्षांनंतर सुरू होणार. रामकुमार तो फायदा स्वतःला व्हावा म्हणून विकत आहे. अवांतरः बाजारात नवे शेअर्स लाँच करतात तेंव्हा प्रीमीयम कशासाठी आकारतात? ( हे सिनेमाचे रु १० चे तिकीट रु ४०० ला विकण्यासारखे नाही का? )
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 02/14/2011 - 11:24 नवीन
खरेदी-विक्री हा विनिमय आहे. यात विक्रेता आणि ग्राहक दोघांच्याही फायद्या-तोट्याचा विचार होऊन जेव्हा ताळमेळ होतो तेव्हाच व्यवहार होतो. केवळ रामकुमारचा फायदा व्हावा असे गृहितक चालणार नाही. शिवाय रक्कम दुप्पट झाल्यानंतरच्या काळातही मुद्दल रामकुमारचेच रहाणार असल्याने त्याला त्यावरचे व्याज मिळत रहाणार आहे हा त्याचा फायदाच नव्हे का? (विन-विन) शेअर बाजारातील आयपीओ प्रिमियम हा वेगळा विषय आहे. तिथे नफ्या-तोट्याची अनिश्चितता आहे तसेच नेहमीची ठेव-व्याज स्वरूपाची समीकरणे लागू होत नाहीत. आपले पैसे शेअर बाजारात गुंतवायची ज्याची तयारी आहे तो रामकुमारची छडी विकत घेण्याच्या भानगडीतच पडणार नाही. अर्थात माझा या विषयावर काहीच अभ्यास नाही. तेव्हा चु.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
क्लिंटन Mon, 02/14/2011 - 18:52 नवीन
बाजारात नवे शेअर्स लाँच करतात तेंव्हा प्रीमीयम कशासाठी आकारतात?
एखाद्या कंपनीला शेअरबाजारात उतरायचे असेल तर नक्की काय करावे लागते यासाठी एक स्वतंत्र भाग राखून ठेवलेला आहे.त्याचा नक्की क्रमांक कितवा असेल हे आता सांगत नाही.पण त्या भागात शेअरबाजारात कंपनी लिस्ट कशी करायची, त्यासाठी काय प्रक्रिया आहेत, असा प्रीमीयम का आकारतात वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती असेल. तेव्हा please stay tuned
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्वाती२ Mon, 02/14/2011 - 13:51 नवीन
हे ते परपेच्युटी सारखे वाटते.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 02/14/2011 - 21:59 नवीन
डोक्याला त्रास करून न घेता फायनान्सच्य कन्सेप्ट्स नीट समजल्या तर बरं ह्या उद्देशाने लेखमाला वाचायला घेतोय :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 02/15/2011 - 04:51 नवीन
दरवर्षी शंभर रुपये मिळणार. मी म्हणेन की आत्ता मला इतरत्र तेवढे पैसे मिळवण्यासाठी किती गुंतवावे लागतील? म्हणजे सद्यपरिस्थितीत पैशाचा बाजारभाव किती आहे? दुसरा विचार असा करायला हवा, की हा रामकुमार सांगतो खरं की ही छडी काम करेल, पण त्यावर माझा किती विश्वास आहे? थोडक्यात माझी रिस्क किती आहे. समजा पुढची अनेक वर्षं मला दीर्घमुदतीच्या अतिसुरक्षित गुंतवणुकींतून (सरकारी बॉंड्स, सीडी इ.) ४ टक्के उत्पन्न मिळतं व दीर्घमुदतीच्या अतीव रिस्की गुंतवणुकींतून वर्षाला ८ टक्के उत्पन्न मिळतं. पैशाचा बाजारभाव व मला वाटणारा धोका या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर या छडीची किंमत सुमारे २५०० रुपये (छडी सुरक्षित आहे - ४ टक्के = १००) ते सुमारे १२५० रुपये (छडी धोकादायक आहे - ८ टक्के = १००) यामध्ये कुठेतरी यावी. छडीच्या सुरक्षिततेविषयी कल्पना बदलल्या किंवा ती १०० रुपयांऐवजी कमी अथवा जास्त पैसे जमा व्हायला लागले तर छडीची किंमत बदलेल. किंमत = १०० * (१००/ अपेक्षित रिटर्न्सची टक्केवारी) (हे अ‍ॅप्रॉक्झिमेशन आहे, कारण आपण टक्केवारी ही मर्यादित काळच्या गुंतवणुकींवरून काढतो, जिथे त्या काळानंतर मुद्दल परत मिळतं)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 02/15/2011 - 05:54 नवीन
क्लिटंन भाउ.. तुमच्या लेखमालेची सुरुवात वाचुन रिचेस्ट मॅन ऑफ बॅबिलॉन या पुस्तकाची आठवण झाली. पुढचे भाग वाचुन प्रतिसाद देत राहीनच
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/15/2011 - 07:35 नवीन
केवळ सोपे होण्यासाठी उदाहरण म्हणूनच जादूची छडी. प्रत्यक्षात जादूने काहीच होत नाही हे गृहीत आहे. दरवर्षी १०० रुपयेच काय, पण १ पैश्याची सुद्धा भर निर्माण करण्यासाठी रामकुमारला (तोंडावर जादू असली तरी, पडद्यामागची हातचलाखी म्हणून) काहीना काही सव्यापसव्ये करावी लागतील आणि त्यात पैसे खर्चावेच लागतील. शून्यातून पैसे उभे करणारी छडी आणि ती विकली की मूळ मालकाशी कोणताच संबंध नसताना आणि कोणी काही न करता ती पैसे अ‍ॅड करतच राहते हे उदाहरण कन्सेप्ट शिकण्यापुरतेही मला तरी योग्य वाटत नाही..
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/15/2011 - 09:14 नवीन
शून्यातून पैसे उभे करणारी छडी आणि ती विकली की मूळ मालकाशी कोणताच संबंध नसताना आणि कोणी काही न करता ती पैसे अ‍ॅड करतच राहते हे उदाहरण कन्सेप्ट शिकण्यापुरतेही मला तरी योग्य वाटत नाही..
बरं. मी माझ्या परिने या सगळ्या वरकरणी किचकट वाटणाऱ्या संकल्पना सोप्या करून सांगता याव्यात या उद्देशाने हे गोष्टीरूपात लिहिले आहे.ते त्याहून कसे सोपे कसे करता येईल याबद्दल आपले मत काय?चर्चेत आपल्याला सहभाग घ्यायचाच असेल तर अशा स्वरूपाचा रचनात्मक सहभाग घ्यावा ही विनंती. अवांतर: तुम्ही लहानपणी पंचतंत्र किंवा इसापनिती कधीच वाचले नाहीत का?त्यात सिंह, कोल्हा असे प्राणी माणसासारखे बोलतात असे म्हटले आहे याची कल्पना तुम्हाला असावी.आणि हे प्राणी प्रत्यक्षात बोलत नाहीत हे पण तुम्हाला माहित असावे.तरीही त्या गोष्टीतून काहीतरी वेगळे तात्पर्य सांगितलेले असते. आता ते तात्पर्य घ्यायचे की अरे सिंह बोललाच कसा असे म्हणून पहिल्यांदाच शंका उत्पन्न करायची हा ज्याचात्याचा प्रश्न.तसेच काहीसे याविषयीही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/15/2011 - 09:37 नवीन
संकल्पना सोप्या करून सांगता याव्यात या उद्देशाने तुम्ही लिहिलंय हे मी आधीच म्हटलं. त्यामुळे वादासाठी वाद नव्हेच हा. मीही तुमच्या लेखविषयात तो वाचताक्षणापासूनच इंटरेस्ट घेऊ लागलो..अनेक मते वाचून आणि खूपदा परत परत विचार करुनही अजून कॉमेंट टाकली नाही कारण उगीच एक पिंक टाकण्याचा उद्देश नव्हता. पण आता जे वाटलं ते लिहीलं. मी सांगतो उदाहरण काय असावे याबद्दल माझे मत. राम एक खास हायब्रीड केलेलं रोप आपल्याला लावून देतो आणि दरवर्षी १००० आंब्यांची खात्री देतो. त्या झाडाच्या वाढीसाठी खते वगैरे आणि निगा यांची जबाबदारी रामची आहे. (याचा अर्थ सोपेकरणाच्या भरात कुठे मूळतत्व हे की "सतत उत्पन्न देत राहणार्‍या साधनात सतत काहीतरी इन्पुट सदृश करावे लागते, देऊन टाकून नामानिराळे राहून चालत नाही. रनिंग कॉस्ट असतेच आणि ती रामलाच बेअर करावी लागेल" तेच बाजूला पडू नये म्हणून सजेशन..) इसापनीती वगैरेमधे वेगळे असते. त्यात प्राणी वगैरे उपमा असतात पण मूळ तत्व टिकवलेले असते. सिंह बोलला कसा ही आचरट शंका इथे उपस्थित केलेली नसून, समजा एखाद्या गोष्टीत सिंह बोलता बोलता असं म्हणतोय की तो गेली दहा वर्षे काही न खाता पिता उपाशी जिवंत राहिला... तर असा कसा जिवंत राहिला बुवा?? .. अशा स्वरुपाचा हा रिलेव्हंट प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने उत्तर अपेक्षित होते. अगदी स्पष्ट म्हणजे पुनःपुन्हा रामला काहीच गुंतवणूक / कष्ट / हस्तक्षेप लागू नये अशी "गिव्ह अवे" टाईपची छडी हे उदाहरण काल्पनिक म्हणूनही सुयोग्य वाटले नाही. असो..मुख्य उद्देश हे सांगण्याचा की काहीतरी मुद्दा काढून ताशेरे ओढण्याचा माझा हेतू नव्हता आणि कधीच नसतो. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गवि Tue, 02/15/2011 - 09:42 नवीन
बाँड किंवा इतर कोणत्याही रोख्याचे प्रतीक म्हणून जरी ही छडी असेल तरी त्या रोख्याच्या प्रवर्तकाला तो विकून नामानिराळे होता येत नाही..जर दरवर्षी १०० देतो असं वचन त्यात दिलेलं असेल तर रोख्याचा प्रवर्तक पक्षी राम, याला लाँग टाईम रनिंग कॉस्ट सतत लावून १०० प्रतिरोखा निर्मिती करत रहावी लागेल. तुम्ही मात्र छडीची कॅपेक्स, ओपेक्स सगळीच शून्य करून टाकलीत. आणि नियमित उत्पन्न मात्र कायमचे. प्रतीक म्हणूनही त्या छडीला काही मेंटेनन्स, पॉलिश पाणी करावे लागते, ती टिकवून ठेवण्यासाठी ठराविक खर्च करुन प्रक्रिया करावी लागते असं तरी दाखवायचं ही सजेशन होती. .. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
क्लिंटन Tue, 02/15/2011 - 10:20 नवीन
बरं तुमच्या समाधानासाठी असं समजा की राम कुमारचा डायरेक्ट कुबेराकडे वशीला आहे आणि कुबेर राम कुमारवर अत्यंत प्रसन्न असल्यामुळे (का ते विचारू नका) तो स्वत: छडीच्या मालकाच्या खात्यात दरवर्षी शंभर रूपये जमा करणार आहे. या भागातून जे तत्व सांगायचे आहे त्यात ते पैसे कोणीही भरले (कुबेर,बिल गेट्स, रॉकफेलर,मित्तल,अंबानी) तरीही त्या तत्वात काहीही फरक पडणार नाही.ते तत्व कोणते हे पुढील भागात सांगणार आहे. आणि बाकी fixed costs, variable costs या सगळ्यांची काळजी सध्या करू नका.अजून ३-४ भाग वाट बघा.त्यात हे सगळे सांगणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
क्लिंटन Tue, 02/15/2011 - 10:20 नवीन
बरं तुमच्या समाधानासाठी असं समजा की राम कुमारचा डायरेक्ट कुबेराकडे वशीला आहे आणि कुबेर राम कुमारवर अत्यंत प्रसन्न असल्यामुळे (का ते विचारू नका) तो स्वत: छडीच्या मालकाच्या खात्यात दरवर्षी शंभर रूपये जमा करणार आहे. या भागातून जे तत्व सांगायचे आहे त्यात ते पैसे कोणीही भरले (कुबेर,बिल गेट्स, रॉकफेलर,मित्तल,अंबानी) तरीही त्या तत्वात काहीही फरक पडणार नाही.ते तत्व कोणते हे पुढील भागात सांगणार आहे. आणि बाकी fixed costs, variable costs या सगळ्यांची काळजी सध्या करू नका.अजून ३-४ भाग वाट बघा.त्यात हे सगळे सांगणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 02/15/2011 - 10:22 नवीन
धरतो.. लवकर लिहा पण.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा Tue, 02/15/2011 - 13:40 नवीन
माझी ही असव्था असीच आहे .. लवकर लिहा .. क्लिंटनः फायनान्स आम्हाला कळतच नाही, आपल्या या लेखमालेमुळे नक्कीच आवड निर्मान होयील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गणेशा Tue, 02/15/2011 - 14:44 नवीन
फायनान्स चा 'फ' ही कळत नसताना ५५० रु किंमत असेल त्या छडीची असे वाटते. १०० रु प्रमाणे १० वर्षामध्ये १००० रुपये रामभाउंना मिळणार असतात, परंतु प्रत्येक वर्षामध्ये त्या शंभर रुपयाचे मुल्य कमी होत जाईन .. समजा दुसर्या वर्ष्यासाठी ९०, तिसर्‍या वर्ष्यासाठी ८० .. शेवटी १० असे राहिन .. म्हणजे त्यांना १० वर्शाच्या वॅल्यु नुसार त्यांना एकुन ४५० रुपये कमी येतील.. म्हनजे जर आताच्या ५५० रुपये या भावा मध्ये त्यांनी छडी विकली तर ती दहा वर्षाच्या १००० रुपये येव्हद्या किमतीची असेन. आणि विकत घेणार्या माणसाने ही २-३ वर्षे समजा ती छडी आपल्या कडे ठेवली तरी नंतर तो विकताना ही त्याची किंमत त्या ५५० च्या आसपासच असेन.( माझ्या गणितानुसार ३ वर्षाने ५२० रुपये असेन त्या छडीची किंमत बाजारात)म्हणजे ३०० रुपये कमवुन ५२० रुपये मिळतील त्या व्यक्तीस ती छडी विकल्यास. त्याने ती निर्मिलेली नव्हती त्यामुळे ना नफा ना तोटा यामध्ये त्याने २७० रुपये ३ वर्षात कमवलेले असतील. म्हणुन राम ना नफा ना तोड बेस वर ५५० ला व्यवहार डन करतील असे वाटते. रामला १० वर्षांची किंमत आताच मिळते आहे म्हणुन तो ही खुष आणि कस्टमर ला ना निर्मीती ना काही.. १०० रुपये चालु आणि पुन्हा ती छडी विकल्यावर मुळ किंमत मिळतेच आहे म्हणुन तो ही खुष.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/15/2011 - 17:53 नवीन
चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचा आभारी आहे.मी आताच पुढच्या भागाला फिनिशिंग टच दिले आहेत आणि उद्या सकाळी तो भाग अपलोड करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा