Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो

च
चिंतातुर जंतू
Sat, 02/12/2011 - 22:04
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10861 वाचन

💬 प्रतिसाद (19)
श
शुचि Sun, 02/13/2011 - 00:08 नवीन
पुस्तक आवडण्याची मला आवडलेली कारणमीमांसा माझ्या आवडत्या लेखिकेने खूप सुंदर शब्दात मांडली आहे - A passionate woman I like my men and books to knock my socks off. It's got to be love at first sight. I need to be bowled over by an author's insight to wonder how I lived before the book explained it all to me, or how the author knew me so well. - Sarah Ban Breathnach ही लेखिका माझी अवडती आहेच पण ज्या इन्टेन्सिटीने तिने पुस्तकांबद्दलचा हा सुंदर विचार मांडला आहे की मी तिची पंखाच झाले आहे. _________________________________________ >> अभिजात पुस्तकांचं अजून एक लक्षण म्हणजे ती आपल्या विविध अर्थबोधनांना (इंटरप्रिटेशन्स) मिरवत येतात. >> खरं आहे. असे एक पुस्तक मला सांगता येईल - "अ‍ॅलीस इन वंडरलँड" (जाईची नवलकहाणी). याचे स्पष्टीकरण मी जालावर वाचलेले २ प्रकारचे - (१) या पुस्तकात अध्यात्मिक , गूढ दुनिया लेखकाने साकार केली आहे (२) ड्रग्ज घेऊन सायकेडेलिक असे अनुभव या गोष्टीमध्ये मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 02/13/2011 - 00:39 नवीन
उत्तम लेख. सविस्तर प्रतिसाद जेव्हा जमेल तेव्हा आणि झेपेल तितपत देता यावा म्हणून ही जागा राखून ठेवत आहे. माझा प्रस्तुत प्रतिसाद अत्यंत संकीर्ण आहे. प्रस्तुत धाग्यातल्या प्रस्तावाच्या अभ्यासपूर्ण विवेचनाशी सांधा राखणारा नाही. वाचन किंवा कुठल्याही आस्वाद्यमान कृतीस सामोरे जाताना विंदा करंदीकरांची दोन वचने नेहमी मनात रुंजी घालत असतात : १. "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" बस्स. पूर्वग्रहांचे , पूर्वसंस्कारांचे चष्मे जमतील तसे बाजूला ठेवून सामोरे जाणे. हे नेहमी जमत नाही. परंतु "काशीस जावें नित्य वदावें". २. "रक्तामधल्या प्रश्नांकरता पृथ्वीकडून होकार घ्यावे". ज्या कृती/अनुभवामधे उकळते रक्त असेल - मग ती अभिजात असो, आधुनिक असो, (समजणार्‍या भाषांपैकी ) कुठल्याही भाषेतली असो, कुठल्याही सांस्कृतिक पार्श्वभूमीतली असो - तिच्यातून काही नवे उमजणार असेल तिला सामोरे जावे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 02/13/2011 - 00:43 नवीन
लेख आवडला. अनुवादित केलेला भाग वाचताना पटत गेला. एकंदरीत कितीही नाही म्हटलं, तरी प्रत्येकाच्याच मनात पूर्वग्रह असतात. वेळोवेळी ते तपासून, प्रसंगी त्यांना आव्हान देत परिचित वाटांचा सुखद, ओळखीचा आसरा सोडून नवीन काही वाचण्याचा/पाहण्याचा प्रयत्न (ज्याला इच्छा असेल त्याने) केल्यास बर्‍याचदा अकल्पित, वेगळ्या गोष्टी कळतात. अर्थात यातही अनेक गट आहेत. आपल्यालाच नवीन गोष्टीचा शोध लागला आहे असा दरवेळी दावा करणारे, राजाने कपडे घातलेले नाहीत हे सांगण्यास कचरणारे नि त्याउलट दरवेळी आपण दुसर्‍यांचं दंभ उपहासाने उघडकीला आणतो असा दावा करून त्याच धुंदीत मश्गुल असणारे, 'आम्ही काय बॉ सामान्य माणसं' असा खोट्या विनयाचा मुखवटा चढवणारे असे अनेक प्रकार. असो.
अभिजात पुस्तकांतून काही हेतू साध्य होतो का यावर भर देण्यापेक्षा मी असं म्हणेन की अभिजात साहित्य वाचणं हे ते न वाचण्यापेक्षा चांगलं असतं.
हे वाचून सॉमरसेट मॉमच्या 'बुक बॅग'मधलं आवडीचं वाक्य आठवलं (....ऑफ दॅट लॅमेन्टेबल कंपनी अ‍ॅम आय)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 02/13/2011 - 07:13 नवीन
अंबरिश मिश्र यांच्याकडून थोडं उधार घेत - धूसर काही जीवघेणे! हे लेखन या प्रकारातले आहे. म्हटलं तर बरंच काही कळल्यासारखं वाटलं. जे कळलंय असं वाटतंय ते तितक्यातच हातून निसटलं आहे हेही लगेचच कळतं आणि तेच फक्त टिकतं. उदाहरणार्थ -
हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे. उदा: आज शेक्सपिअर किंवा तुकाराम किती लोकप्रिय आहे यापेक्षा कळत-नकळत तो आपल्या रोजच्या भाषेत किंवा संस्कृतीत किती आहे याला इथे महत्त्व आहे. त्या बरोबरच वेगवेगळे अर्थ ज्यातून काढता येतील किंवा वेगवेगळ्या अंगांनी ज्याचा अभ्यास करता येईल अशा गोष्टींना इथे महत्त्व आहे.
दूरगामी आणि बहुपेडित्वावरचा भर समजू शकतो. पण लोकप्रियतेत असा दूरगामी परिणाम साध्य होत नसतो, असे काही आहे का? हां, आता बहुपेडी आणि दूरगामी असते ते अभिजात हे एकदा मान्य केलं की बाकी सारे प्रश्न झूट ठरतात. पण मग पुढे, यातली भाषा आणि संस्कृती कोणी आणि कशी ठरवायची. "'नव्हतं' चालतं तर 'व्हतं' का चालत नाही," या प्रश्नापाशी हा अभिजाततेचा मुद्दा काटेकोरपणे किमान दोन भागांत विभागला जाऊ शकतो. "'नव्हतं' हेच उचित, 'व्हतं' हे अनुचित" असं म्हणणारा अभिजातता वगैरेंची जी अभ्यासपूर्ण चौकट मांडण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी मांडणी "'व्हतं' हेही उचितच, कारण ती आमची भाषा आहे" असं म्हणणारा करू शकत नसावा. अशावेळी ही अभिजातता इतकी व्यामिश्र होत जाते की, त्यातून एक वेगळाच 'वर्ग'संघर्ष उभा राहतो. मग "तुमचं ते भारीच, आम्ही काय..." वगैरे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होत जातं. वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या अंगानी अभ्यास या दोन्ही गोष्टी करणाऱ्याच्याच हाती असतात. त्याने ते करायचे नाकारलेच तर तिथं त्याच्या एकारलेपणामुळे अभिजातता नाही, असा निष्कर्ष निघण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी काय करायचे?
या विवेचनातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एका ठिकाणी कॅल्विनो असंही मान्य करतो की रसिकमान्यतेद्वारे एक प्रकारचं बाळकडू म्हणून आपल्याला अभिजात अशी जी काही यादी मिळते त्यातून (आणि त्या व्यतिरिक्तही) आपल्याजवळ जाणारं असं अभिजात साहित्य आपण धुंडाळायचं असतं.
हे सर्वात खरं. बाकी सारा व्याप म्हणजे चौकटी मांडण्याचा, व्याख्यांचा आणि त्यातून काही साध्य करण्याच्या खटाटोपांचा सोस. एकदा का व्यक्तिसापेक्षता मान्य केली की मग पुन्हा चौकट मांडण्याचा खटाटोप का करावा? एकाने तयार करून मांडलेली चौकट दुसऱ्याला मंजूर होणारच असे काही नाहीच. कारण व्यक्तिसापेक्षता. उद्या एखादा "सुशिंची दुनियादारी अभिजातच आहे, कारण त्यात माझं त्या वयाच्या कालखंडातलं बहुपेडी जगणं दिसतं, ते अधिक खोलवर कळतं, त्यातूनच मला पुढं जगण्यासंदर्भातील माझेच काही संदर्भ अधिक नीट करून घेता आले," असं काही म्हणेल. ते म्हणणे दुसऱ्या एखाद्याला (इथं मलाच) मान्य होणार नाही. पण म्हणून त्याची आ/निवड ही कमअस्सल (इथं 'अभिजात ते भारी आणि लोकप्रिय ते कमअस्सल' असा अनेकदा या क्षेत्रातील मंडळींचा जो पवित्रा असतो, तो मुळाशी गृहीत धरला आहे) ठरते का? एवढे सगळे लिहिल्यानंतर पुन्हा हे सांगावेच लागेल की, या लेखनातून काही हाती गवसले आणि निसटले अशी भावना झाली आहे. कारण मी स्वतः अनेकदा अनेक प्रकारचे लोकप्रिय असणारे साहित्य दुय्यम मानतो. ते वाचणाऱ्याला दुय्यम किंवा कमअस्सल मानत नाही. पण ते साहित्य दुय्यम मानतोच. म्हणजे, मला 'आऊटसायडर' भिडते. तेच 'दुनियादारी'चे होईल असे नाही. पण मीच कॉलेजलाईफ ज्याला म्हणतात ते अनुभवलेले नाही, त्यामुळं असं होत असेलही. आता हे ध्यानी घेतले तर व्यक्तिसापेक्षतेचा मुद्दाच महत्त्वाचा ठरत जातो. मग प्रश्न येतो, एखादी गोष्ट अभिजात असे नुसतेच मानता येणार नाही का? ते मानल्यानंतर जे अभिजात नाही ते कमअस्सल असा सूर लावण्याची गरज असतेच का? (हाच प्रतिसाद तिकडेही दिला आहे).
  • Log in or register to post comments
र
रमताराम Sun, 02/13/2011 - 07:25 नवीन
अरे आणखी एक कॅल्विनोप्रेमी! या लेखाचे भाषांतर करायचे असे बरेच दिवस म्हणत होतो, आता फुकटात मिळाले. मंडळ आभारी आहे आपले. आम्ही कॅल्विनोच्या 'द ब्लॅक शीप' चा अनुवाद केला होता तो इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Sun, 02/13/2011 - 11:11 नवीन
दूरगामी आणि बहुपेडित्वावरचा भर समजू शकतो. पण लोकप्रियतेत असा दूरगामी परिणाम साध्य होत नसतो, असे काही आहे का?
माझ्या मते 'लोकप्रियता' या संकल्पनेमध्ये दोन गोष्टींचा विचार होतो. १. आज मराठीवर थोडंबहुत प्रभुत्व असणार्‍या कुणाच्याही तोंडी कळत-नकळत तुकारामानं घडवलेले किंवा पानिपताच्या बखरीतले वाक्प्रचार येतात. ही लोकप्रियता अभिजाततेच्या वरच्या विवेचनात समाविष्ट आहे. २. विश्वास पाटलांच्या 'पानिपता'च्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या ही दुसर्‍या प्रकारची (आणि मला वाटतं अशा वादात लोकांना अभिप्रेत असणारी) लोकप्रियता आहे. कॅल्विनोचं विवेचन याबद्दल बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अभिजाततेला लोकप्रियतेचं वावडं आहे. अशी लोकप्रियता ही अभिजाततेसाठी आवश्यक नाही आणि पुरेशीही नाही एवढाच निष्कर्ष कॅल्विनोच्या विवेचनावरून काढता येईल असं मला वाटतं. पण याचा अर्थ एखादी कलाकृती लोकप्रिय असली तर ती अभिजात नसेलच असा होत नाही.
"'नव्हतं' हेच उचित, 'व्हतं' हे अनुचित" असं म्हणणारा अभिजातता वगैरेंची जी अभ्यासपूर्ण चौकट मांडण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी मांडणी "'व्हतं' हेही उचितच, कारण ती आमची भाषा आहे" असं म्हणणारा करू शकत नसावा. अशावेळी ही अभिजातता इतकी व्यामिश्र होत जाते की, त्यातून एक वेगळाच 'वर्ग'संघर्ष उभा राहतो. मग "तुमचं ते भारीच, आम्ही काय..." वगैरे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होत जातं. वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या अंगानी अभ्यास या दोन्ही गोष्टी करणाऱ्याच्याच हाती असतात. त्याने ते करायचे नाकारलेच तर तिथं त्याच्या एकारलेपणामुळे अभिजातता नाही, असा निष्कर्ष निघण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी काय करायचे?
हा प्रश्न वेळोवेळी येत रहाणार. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती ही की प्रस्थापितांविरोधात बंडखोरी ही अभिजाततेला वर्ज्य नाही. म्हणून मी मुद्दामच उदाहरणं देताना 'तुकाराम', 'कोसला' आणि 'राडा'ची दिली. हे तिन्ही लेखक आपापल्या काळच्या अभिजाततेच्या कल्पनेला छेदून लिहीत होते. त्या काळच्या प्रस्थापितांनी त्यांना त्रासही दिला. इथे मुद्दा उरतो तो बुद्धिवाद्यांच्या जबाबदारीचा. नेमाड्यांना आणि भाऊ पाध्यांना पु.लं., अशोक शहाणे, दिलीप चित्रे अशा अनेकांनी तेव्हा उचलून धरलं आणि त्यांचं लिखाण महत्त्वाचं आणि पथदर्शी का आणि कसं आहे हे सांगून आपल्यावरची ही जबाबदारी सांभाळली. ज्या समाजात असे लोक नसतील त्या समाजात कदाचित अभिजात होण्याच्या आधीच कलाकृती दडपली किंवा दुर्लक्षिली जाईल. त्यांचे परिणाम तो समाज भोगेल. किंबहुना त्यातच त्या समाजाच्या बौद्धिक र्‍हासाची मुळंसुद्धा असू शकतील. म्हणूनच असा उहापोह वेळोवेळी होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी खुलं वातावरण निर्माण करणं आणि ते टिकवून ठेवणं हीदेखील त्या बुद्धिवाद्यांची (आणि ते ज्या समाजाचा भाग असतात त्या समाजाचीसुद्धा) जबाबदारी असते. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कळीचा ठरतो. अत्र्यांच्या दमदाटीपुढे भाऊ पाध्यांची तळी उचलून धरता यावी; यासाठीचा अवकाश समाजात हवा. व्यक्तिसापेक्षता: या बाबतीत हे लक्षात घ्यायला हवं की वरच्या विवेचनात अभिप्रेत असणारी व्यक्तिसापेक्षता ही इतर मुद्द्यांच्या अनुषंगानं आहे. ते सर्व मुद्दे दुर्लक्षून 'मला आवडतं म्हणून ते चांगलं' इतकीच व्यक्तिसापेक्षता त्यात अभिप्रेत नाही. अशी व्यक्तिसापेक्षता ही काहीशी स्वमग्न (आणि म्हणून आंधळी) ठरेल. अर्थात, त्याउलट 'अभिजन म्हणतात म्हणून ते अभिजात' इतकंही ते व्यक्तिनिरपेक्ष नसावं आणि स्वानंदाशी त्याची कुठेतरी नाळ जुळावी एवढीच त्यात अपेक्षा आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 02/13/2011 - 12:46 नवीन
चर्चा करूया. प्रत्यक्ष भेटीत. काही गोष्टी कळताहेत, काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
च
चिंतातुर जंतू Mon, 02/14/2011 - 13:53 नवीन
चर्चा करूया. प्रत्यक्ष भेटीत. काही गोष्टी कळताहेत, काही नाही.
नक्कीच. कॅल्विनोच्या विवेचनाने काही संकल्पना सुस्पष्ट होतील असं मला वाटलं होतं, पण बहुधा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला असावा असं मला एकंदरीत वाटू लागलं आहे. असो. प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Mon, 02/14/2011 - 15:56 नवीन
बहुधा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला असावा असं मला एकंदरीत वाटू लागलं आहे.
असे नका वाटून घेऊ. बऱ्याच गोष्टी ग्राहकाच्या बाजूलाही असतात ना राव... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/14/2011 - 16:21 नवीन
सहमत. रेडीओ दुर्बिणीतून साधे तारे बघायला गेलं की काहीही दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
आ
आळश्यांचा राजा Mon, 02/14/2011 - 17:15 नवीन
ज्याला आवडेल तो रेडिओ दुर्बिणीतून बघेल. तारे हे तारेच. ते बघताना आश्वर्य आणि आनंद वाटण्यासाठी सगळ्यांनाच रेडिओ दुर्बिणीची काय गरज आहे? जंतूंनी कॅल्विनोच्या रेडिओ दुर्बिणीतून तारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अयशस्वी झालाय असं वाटत नाही. अभिजात अभिजात म्हणजे काय हे आमच्यासारख्या साहित्यातल्या अर्धसाक्षर लोकांना डोक्यात प्रश्न निर्माण करण्याइतकं जरी शिरलं तरी हा लेख पोचला म्हणायचा! पुनि पुनि कितनी ही सुनी सुनाय दिलकी प्यास बुझत ना बुझाय एवढीच आमची अभिजाततेची व्याख्या! (डोळ्यांनी दिसणारे साधे तारे!) ( कुणीतरी (बहुदा पं भीमसेन) म्हणून गेलेच आहेत - जे आवडण्यासाठी कोणतेही शास्त्र समजण्याची आवश्यकता नाही, ते शास्त्रीय संगीत!) आमच्या आवडीचं रामायण आणि महाभारत कॅल्विनोच्या कसोट्यांवर उतरतं एवढं समजलं. बाकी साहित्यातलं काही कळत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सहज Tue, 02/15/2011 - 06:03 नवीन
>पण बहुधा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला असावा असं मला एकंदरीत वाटू लागलं आहे. केवळ प्रतिसाद न आल्याने लेख अयशस्वी ठरला असे वाटू नये म्हणुन हा प्रतिसाद. आकलन करुन घेत आहे असेच म्हणतो. लेख चांगला आहे पण नेमके लिहायला शब्द सापडत नाहीत. अपोलो यान चंद्रावर उतरले. आर्मस्ट्राँग म्हणाला "That's one small step for man; one giant leap for mankind" आता हे वाक्य कोण्या मोठ्या लेखकाचे नाही की ठरवून लिहले गेले नसावे. पण मानवी इतिहासात इंग्रजी भाषेत मोठा ठसा उमटवून गेले आहे. अन्य भाषेतही रुपांतरीत होउन गाजले असेल. वर लिहल्याप्रमाणे तुकारामांनी लिहले अभंग, वाक्प्रचार आजही टिकून आहेत. स्वातंत्र्याची प्रतिमा ठरणारे राष्ट्रगीत हे त्या कवीच्या इतर कवितांच्या तुलनेत वर खाली असेलही पण कालौघात हेच गीत अजरामर होते. प्यासा, मेरा नाम जोकर असे चित्रपट त्या त्या दिग्दर्शकाकरता त्यांच्या स्वताच्या मते सर्वोकृष्ट काम असु शकते पण इतिहासात त्याची नोंद फारसे नावाजले न गेलेली त्याच कलाकाराची निर्मीती असु शकते. काही काही कलाकृतींना त्या कलाकृतीच्या जन्माच्या काळात जितके मोल येत नाही तितके मोल त्या कलाकाराच्या मृत्युनंतर, काही कालावधीनंतर येते. वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या संदर्भाच्या दृष्टीने काही कलाकृती इतिहासात नावाजल्या, नोंदल्या जातात. माईल स्टोन बनत असाव्यात. हे सगळे समजुन आस्वाद घेणे बहुतेक अभिजात संस्कृतीचे लक्षण असावे. त्याचे महत्व ओळखणे, त्याची जोपासना करणे प्रगल्भ असणे मानले जात असावे. खात्रीने इतकेच म्हणावेसे वाटते की हे सगळे मानवाने स्वताला, आपल्या इतिहासाला समजुन घेण्याचा प्रयत्न असणार. कधी काय कुठले अभिजात कसे कोणाला भावेल वाटेल कुठल्या काळात त्या त्या कलेला भाव येईल हे किचकट गुंतागुंतीचे आहे. शब्दात / व्याखेत बसवणे मला तरी कठीण आहे. श्री चिंतातूर जंतू यांनी असेच वरचेवर लेखन करत आम्हाला प्रगल्भ करत रहावे (होउ का नाही माहीत नाही पण प्रयत्न करत रहावा ) हि विनंती विशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
अ
अडगळ Mon, 02/14/2011 - 17:39 नवीन
नेहमीप्रमाणेच विचाराला चालना देणारे लेखन. अवांतरः आज चारीबाजूनी इतक्या अभिव्यक्ती (रोजचे जगणे + साहित्य , चित्र-फोटो-सिनेमा-गाणी-खे़ळ)येऊन आदळत असतात की त्यांची संगतवार आठवण ठेवणे हेच मुळी जिकीरीचे झाले आहे. जुने जे अभिजात म्हणून ओळखले जाते त्यातले मला रुचणारे तितके आपलेसे करणे आवश्यक असले तरी हा बॅकलॉग पण बराच मोठा आहे . तेव्हा जुन्या अभिजाततेचा आनंद घेणे आणि आजूबाजूच्या ताज्या निर्मिती मधून अभिजाततेचे अंश शोधणे यात वेळेच्या हिशोबात डेंजर कुतरओढ होते. शिवाय कलाकृतीचं 'आयुष्य 'कमी कमी होतंय की काय अशी पण शंका वाटते. म्हणजे मॅक्बेथ टिकून आहे , मक्बूल ची आठवण किती वर्षे राहील ? सार्वजनिक स्मृतीमध्ये टिकून राहणे हे अभिजाततेचे लक्षण असावे का ?
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Mon, 02/14/2011 - 20:34 नवीन
जुन्या अभिजाततेचा आनंद घेणे आणि आजूबाजूच्या ताज्या निर्मिती मधून अभिजाततेचे अंश शोधणे यात वेळेच्या हिशोबात डेंजर कुतरओढ होते.
ते अपरिहार्य आहे. जुनी अभिजात कलाकृती कालबाह्य होते का हेही पहावं लागतं. ताज्या निर्मितीला अभिजातता सहसा लगेच चिकटत नाही. थोडा काळ तरी जाऊ द्यावा लागतो. म्हणूनच मौजेचे श्री.पु. भागवत एकदा म्हणाले होते की 'कोसला' प्रकाशनासाठी त्यांच्याकडे आली असता ती नाकारणं ही त्यांची घोडचूक होती. स्वतःच्या अभिरुचीचा तोरा न मिरवता हे कबूल करणं हा त्यांचा मोठेपणा झालाच, पण 'कोसला' ताजी असताना तिचं महत्त्व त्यांनाही कळलं नव्हतं ही अंतर्मुख करणारी गोष्ट वाटते.
शिवाय कलाकृतीचं 'आयुष्य 'कमी कमी होतंय की काय अशी पण शंका वाटते. म्हणजे मॅक्बेथ टिकून आहे , मक्बूल ची आठवण किती वर्षे राहील ? सार्वजनिक स्मृतीमध्ये टिकून राहणे हे अभिजाततेचे लक्षण असावे का ?
मूळ विवेचनात सार्वजनिक स्मृतीत टिकून रहाणं याला व्यापक अर्थ आहे. कदाचित उदाहरणं देताना माझ्याकडून ते फसलं असेल. 'बॉबी', 'एक दूजे के लिए' किंवा 'कयामत से कयामत तक' पाहणार्‍या बहुसंख्य भारतीयांना 'रोमिओ-ज्युलिएट' माहीत नसेल, पण त्यांना बांधून ठेवणारं काहीतरी त्या गोष्टीत ४०० वर्षांनंतर शिल्लक असणं ही गमतीशीर बाब आहे. त्यांच्या स्मृतीत शेक्सपिअर नसतानाही त्यांची त्याच्याशी अशी अप्रत्यक्ष आणि नकळत नाळ जुळते. त्याचे स्टार-क्रॉस्ड लव्हर्स अभिजात आहेत हे त्यामागचं कारण आहे. मकबूल कदाचित शेक्सपिअरची अभिजातता दाखवतो, पण खुद्द मकबूल अभिजात म्हणता येणार नाही असं वाटतं. त्यामुळे मकबूलची आठवण टिकणार नाही हे सुसंगत आहे. (अर्थात, कलाकृतीचं आयुष्य कमी होत आहे हा मुद्दा कदाचित बरोबर असेलही.)
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Tue, 02/15/2011 - 02:49 नवीन
स्वतःच्या अभिरुचीचा तोरा न मिरवता हे कबूल करणं हा त्यांचा मोठेपणा झालाच, पण 'कोसला' ताजी असताना तिचं महत्त्व त्यांनाही कळलं नव्हतं ही अंतर्मुख करणारी गोष्ट वाटते >> नक्कीच , पण त्यापेक्षा नेमाडेंच्या काही समकालीन लिहित्या लोकांना तिचे थोरपण कळले होते हे मला जास्त धीर देणारे वाटते. धीर देणारे या अर्थाने की अभिजातता ही माझ्या आजूबा़जूलाही असू शकते. ती जर का टिकली तर तिचा यादीत समावेश होतो इतकेच. त्यांना बांधून ठेवणारं काहीतरी त्या गोष्टीत ४०० वर्षांनंतर शिल्लक असणं ही गमतीशीर बाब आहे>> समाजमनात रुतुन बसलेले जे काही आदिबंध असतात त्यांचा यात काही हात असावा. कलेक्टिव अनकॉन्शस याबाबत वाचले होते पण अभ्यास नसल्याने फक्त एक फुटकळ अंदाज. मकबूल कदाचित शेक्सपिअरची अभिजातता दाखवतो, पण खुद्द मकबूल अभिजात म्हणता येणार नाही असं वाटतं>> ह्म्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
ध
धनंजय Mon, 02/14/2011 - 20:57 नवीन
इतालो काल्विनोचे विश्लेषण सांगितल्याबद्दल धन्यवाद. अनेक कलाकृतींचा आस्वाद घेणारे, आणि त्याच कलाकृतीचा पुन्हापुन्हा आस्वाद घेणारे कधी ना कधी या "अभिजात ते कुठले" या प्रश्नापाशी धडकतातच. त्यांची विश्लेषणे मननीय असतात.
  • Log in or register to post comments
न
निशदे Mon, 02/14/2011 - 21:45 नवीन
उत्तम विश्लेषण. अभिजात साहित्यनिवड निश्चितच कमालीची व्यक्तीसापेक्ष होऊ शकते पण त्याचबरोबर एक मुद्दा विचारात घ्यायला हवा की अशी साहित्यनिर्मिती ही तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवरदेखील अवलंबून असते. किंबहुना केवळ साहित्यच नव्हे तर इतरही कलाप्रकार सामाजिक परिस्थितीनुसार ठरतात. <<हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे.>> हे पटले. अभिजात साहित्य ठरवण्याची जबाबदारी ही चालू पिढीवर नसून पुढच्या २ पिढ्यांवर असते. कारण केवळ साहित्यप्रेम अथवा केवळ उत्तम कलानिर्मिती यापलीकडे जाउन पुढच्या पिढीतील लोक कोणत्याही साहित्याचा सखोल विचार करू शकतात. <<म्हणजे रसिकमान्य अशा एखाद्या अभिजात पुस्तकाविषयी मला विशेष काही वाटत नाही हे मला पुन्हा पुन्हा अधोरेखित करायला लागणं हेदेखील एक अभिजाततेचं लक्षण असणं हे मला रोचक वाटलं.>> रसिकमान्य अशा पुस्तकाबद्दल मला काही वाटत नाही हे मत सदर लेखन आपल्या वाचनक्षमतेच्या आणि समजुतीच्या कक्षात बसवायच्या अपयशी प्रयत्नानंतर येते असे मला वाटते. पुन्हा एकदा हा नियम सर्वच कलाप्रकारांना लागू असतो. असंख्य पुस्तकांची नावे या ठिकाणी देता येतील. पण या ठिकाणी हेदेखील नमूद करावेसे वाटते की एखाद्या रसिकप्रिय लेखकाच्या भावी लेखनाला बऱ्याचदा अभिजातता आपोआपच मिळते आणि त्यातूनही वरील मत तयार होऊ शकते.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 10/31/2015 - 04:03 नवीन
मिपा क्लासिक -५
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 10/31/2015 - 04:03 नवीन
मिपा क्लासिक -५
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा