जे न देखे रवी...
जहाल नेत्याचे अंतरंग
Primary tabs
जहाल नेते भाषणे करुन लोकांची माथी भडकवत असतात. पण त्यांच्या मनांत वेगळेच असते. बाकी कवितेतच वाचा.
समतेचा टिळा
लावून सर्वांशी खेळा
स्वतःला मात्र वगळा ॥
आश्वासने मोहात मिसळा
स्वप्नांचा फुलवा मळा
प्रत्यक्ष मदत मात्र टाळा
नुसताच वाजवा खुळखुळा ॥
शिव्यांनी जाळा
टीकेने डागाळा
स्वतःला मात्र संभाळा ॥
जातपात उगाळा
काढा बाहेर कोथळा
भावनांशी खेळा
वाहू द्या जखम भळभळा ॥
पण काढला जर कोणी गळा
तर म्हणावे बाळा ऽ ऽ
तुझ्यासाठीच सोसतोय या कळा ॥