"परराष्ट्र" मंत्री श्री. एस एम कृष्णा
💬 प्रतिसाद
(47)
प
पंगा
Sun, 02/13/2011 - 19:10
नवीन
वर्तमानपत्रात वाचल्याप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष श्री. ओबामा यांनीही अशी गफलत (अवांतर: 'गफलत' आणि gaffe या शब्दांतील साधर्म्य हा निव्वळ योगायोग असावा का?) केल्याचे कळते.
म्हणजे, टेलेप्रॉम्प्टरच्या गडबडीमुळे भाषणावलीतील भलत्याच कोणाचे तरी भाषण वाचावयास घेतले, परंतु सुरुवातीच्या आभारप्रदर्शनात 'अमेरिकेच्या अध्यक्षांचे' (पक्षी: स्वतःचेच) आभार मानताना चूक लक्षात आली म्हणे.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Sun, 02/13/2011 - 19:34
नवीन
# खरेच काही बिग डील नाही का?
त्यांना वाटत नाही ना तसे. मग कशाला आपण बोलायचे त्या बद्दल.
# आपले मंत्री बोलण्याच्य आधी स्वतःला सचिवांकडून अपडेट करून घेतात का?
# महत्वाच्या ठिकाणी बोलण्याआधी भाषण नजरेखालून घालतात का? सराव करतात का?
असा अभ्यास करून कामे करायला लागले तर देशाचे चित्र वेगळे दिसेल.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Sun, 02/13/2011 - 19:47
नवीन
"....ठरू शकतो हे अनावधानाने दाखवून दिले...."
~ लेखातील हे वाक्य मला संतुलीत वाटले तसेच लेखही तुम्ही 'विनोद' गटात प्रवेशित केला तेही चांगले. थोडा विचार केला तर लक्षात येईल की, अशी (जरी Grave Mistake म्हणता येत नसली तरी...) चूक जाणूनबुजून परराष्ट्रच काय पण कुणीही मंत्री करणार नाही. झाले असे की, श्री.कृष्णा यांच्या अगोदर काहीच मिनिटे पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्याचे "पोर्तुगीज' भाषेत भाषण झाले होते आणि नित्याच्या रितीनुसार त्यांच्या भाषणाची इंग्रजीमधील कॉपी चटकन सर्वांच्या डेस्कवर्/फोल्डरमध्ये गेली. हे काम शेजारीच असलेले सचिव करत असतात (इथे ते काम हरदीप पुरी यानी केले) आणि त्याचवेळी भारताच्या भाषणाचा क्रम जाहीर झाल्यावर काहीशा गडबडीत श्री.कृष्णा याना फोल्डरमध्ये जो कागद दिसला तोच "आपले" भाषण म्हणून वाचण्यास सुरूवात केली (असणार). तुम्हाआम्हाला अशा भाषणांची पद्धत माहीत असतेच की सुरूवातीला "अध्यक्ष महाशय...आज माझ्या देशाच्यावतीने मी जे काही म्हणणे मांडत आहे...." इ.इ....पोर्तुगिज मंत्र्याच्या भाषणातील इंग्लिशमध्ये अनुवाद झालेला अशाच धर्तीचा भाग वाचताना ना कृष्णा अडखळले ना शेजारी बसलेले हरदीप पुरी...पण एकदोन मिनिटानंतर मात्र मंत्र्याची गाडी घसरली असल्याची श्री.पुरी यांच्या लक्षात आले....[मला 'तीन मिनिटे' हा कालावधी खूप वाटतो...असंबद्धतेची चूक लक्षात येण्यास...कदाचित दीडदोन मिनिटातही पुरी यानी कृष्णा याना थांबविले असणार....आपण जाणतोच की भारतातील मिडीया पराचा कावळा करण्यात किती वाकबगार आहे.]
वृत्तात "Faux Pas" या फ्रेजचा उल्लेख आहे....याचा अर्थ 'सार्वजनिक स्थळी अनवधानाने होणारी चूक.." जी कुणी गांभीर्याने घेत नाही...तिला खेळकरपणानेच घ्यावे असा संकेत आहे. पण आपल्या देशात परराष्ट्र मंत्री अशी चूक करतो म्हणून विरोधी पक्षाला एक कोलीतच मिळाले असाच याचा अर्थ....! [इथे एस.एम.कृष्णा यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही....फक्त त्यामुळे भारताचे 'हसे' वगैरे झाले असे कुणी मनात आणू नये. या बाबी अशा बैठकीत सर्वसामान्य चूक अशा सदरात येतात.]
"...असे किमान मंत्र्याचे हसे होणे हे जगातले पहीले अथवा शेवटचे उदाहरण नसावे. ..."
~ नक्कीच पहिले नाही, नव्हते....आणि यापुढेही होणार नाही असेही नाही. आपल्याच इथे २६ जानेवारीला 'स्वातंत्र्यदीन चिरायू होवो..." असे जाहीर फलक लागलेले दिसतात (मला वाटते मिपावर तसे बोर्ड धाग्याच्या निमित्ताने झळकलेही होते....) हेही Faux Pas चे उदाहरण.
इतकेच काय याच बातमी संदर्भात खुद्द बराक ओबामा यांच्याकडून गेल्याच वर्षी अशी 'चूक' झाली होती असा उल्लेख आहे. आयर्लन्ड्च्या पंतप्रधानाच्या भाषणाचा कागद त्यांच्याकडे [गडबडीत] आला आणि त्यानी ते आपलेच भाषण म्हणून वाचायला सुरूवात केली. पण तिथे 'मी प्रे.ओबामा यांचा खूप आभारी आहे...' हे वाक्य आल्यावर ते थबकले...आणि हसतहसत दुसरा कागद घेऊन जणू काही झालेच नाही अशी पोझ घेऊन पुढील कार्यक्रम पूर्णही केला. लोकही एकदोन मिनिटे हसले आणि मग त्यानी तो विषय डोक्यातून काढूनही टाकला.
मुंबईत शोकसभेत तर मंत्रीमहोदय उद्गगारले होते, "सध्या मरण पावलेले आपले सहकारी....". उपस्थिताना 'सध्या मरण पावलेले..' या वाक्याचा अर्थ काय हे कळेना. मग समजले त्या वक्त्याला 'नुकतेच मरण पावलेले....' असे अभिप्रेत होते.
इन्द्रा
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/14/2011 - 03:56
नवीन
आपल्याच इथे २६ जानेवारीला 'स्वातंत्र्यदीन चिरायू होवो..." असे जाहीर फलक लागलेले दिसतात
मला वाटते पंतप्रधान झाल्यावर राजीव गांधी यांनी असाच बोलताना गोंधळ केला होता.
- Log in or register to post comments
न
नंदन
Sun, 02/13/2011 - 21:41
नवीन
'टू टेक अ लीफ आऊट ऑफ समवन्स बुक' हा वाक्प्रचार अगदी शब्दशः मनावर घेतलेला दिसतोय :)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/14/2011 - 01:17
नवीन
मला आत्ता नाव आठवत नाही. पण रिपब्लीकन पक्षातून परराष्ट्र समितीचे मुख्य असलेले पॉवरफूल सिनेटर, आता ते हयात नाहीत, पण बेनझीर भुत्तोंची अमेरिकन काँग्रेसला ओळख करून देताना "भारताच्या पंतप्रधान" अशी करून दिली. चूक सांगितल्यावर म्हणाले, "तेच ते...!"
एकदा बूशच्या बाबतीत आणि एकदा केरीच्या बाबतीत मायक्रोफोन चालू राहीला आणि ते काय बोलत होते ते सर्वांना ऐकू गेले. अशीच ऐकीव गोष्ट मी मला वाटते येथे सांगितलेली आहे, "तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे भारत भेटीत तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या बद्दल म्हातारा ऐकतच नाही की असेच काहीसे मोरारजी आणि इतरांना ऐकायला गेले. अर्थात मोरारजींनी ओळख दिली नाही." :-)
ओबामांची वर पंगा आणि पवारांनी सांगितलेली गोष्ट माहीत नव्हती. मात्र त्यांची तयार जबरदस्त असते असे वाटते. विशेष करून शपथविधीनंतर पहीले राष्ट्राध्यक्ष म्हणून भाषण ऐकताना टेलीप्राँप्टर अर्थातच असेल पण ते अक्षरशः स्वल्पविराम देखील विसरत नव्हते. (ते एकीकडे वॉलस्ट्रीटवर उपलब्ध होते ते बघत होतो म्हणून तुलना करता आली).
तसेच शपथ घेत असताना प्रमुख न्यायमुर्तीनी शपथेत गफलत केली ती ओबामांनी लक्षात आणून दिली होती...
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 02/14/2011 - 01:56
नवीन
बिडेनचा माईक चालु असतानाचे फ*ग डील माहित असेलच? :-)
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 02/14/2011 - 01:54
नवीन
त्यांच्यावर उगाचच टिका होत आहे, पोर्तुगालच्या मंत्र्याने आपले भाषण ह्या बंगलोरीअनला आउटसोर्स केले होते हे कुणाच्याच लक्षात आलेले दिसत नाही. *
*कल्पना एका गमतीशीर ट्वीटवरुन.
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 02/14/2011 - 02:11
नवीन
बडे बडे अधिवेशनोंमे ऐसी छोटी छोटी चूकें होती है!
'परराष्ट्र' वरची कोटी व आद्य कोटीभास्करनंदनाचार्य यांची कोटी आवडली.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/14/2011 - 02:38
नवीन
बडे बडे अधिवेशनोंमे ऐसी छोटी छोटी चूकें होती है!
अजून अशा डेंजर हिंदीचा एक विनोद येथील कुंदन साहेबांनी सांगितला होता: शरद पवारांची संसदेतील पहीलीच बॅटींग. हिंदीत बोलण्यासाठी उभे राहीले आणि लोकसभाध्यक्षांना आदर दाखवत, "अध्यक्ष महाराज" म्हणाले. (हिंदी मधे आचार्यास महाराज म्हणतात ;) )
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 02/14/2011 - 02:09
नवीन
चूक सांगितल्यावर म्हणाले, "तेच ते...!"
हे जरा अक्षम्यच म्हणायला हवं.
म्हातारा ऐकतच नाही
मान जनात असतोच, अपमान मात्र मनात ठेवावा लागतो.
अर्थातच हा प्रकार आवडला नाही.
ओबामांबद्दल सहमत.
ख्रिसमस नाईटला फर्स्ट लेडीने लहान मुलांना गोष्ट वाचून दाखवताना (थंडीत हातमोजे घातल्याने) चुकून पुस्तकाची दोन पाने उलटली आणि गोष्ट वाचायला सुरुवात केली. थोड्या वेळात लक्षात आले आणि गोष्ट व्यवस्थित सुरु झाली.;)
बाकी कृषणा साहेबांनी चूक मान्य करायला हरकत नव्हती. आजकाल चूक मान्य केल्यावरही पट््कन झालेले विसरून पुढे कितीजण जातात्.....बातमी कितीजण करतात आणि झाल्या गोष्टीचा गैरफायदा कितीजण घेतात हेही बघायला हवे.
- Log in or register to post comments
प
पंगा
Mon, 02/14/2011 - 02:23
नवीन
कोणाच्याच लक्षात आले नसते तर अधिक बहार येती... ;)
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 02/14/2011 - 05:34
नवीन
"...म्हातारा ऐकतच नाही ..."
~ रेवतीताई तसेच श्री.विकास यानी वरील प्रतिसादात हा मुद्दा छेडला आहे. त्याबाबत ("म्हातारा" विशेषनामामुळे) काहीतरी गैरसमज होतो आहे असे वाटते.
मराठीतील 'म्हातारा' याला काहीसे हिणवण्यासारखा वास येतो....उदा. "म्हातारा लई आगावू हाया...!", "म्हातारा हल्ली बोंबलत्योयच माझ्या नावानं रातदिन...!" ~ तत्सम कोल्हापुरी मराठी भाषेतील उदाहरणात 'म्हातारा' एकप्रकारे 'स्लॅन्ग' ने उच्चारल्याचे दिसते. पण इंग्लिशमध्ये 'Old Man' ला एक विशेष वजन आहे....काईंड ऑफ स्कॉलर....एक आदरणीय व्यक्तिमत्व. Old man still carries great influence....I know that old man pretty well and his capabilities too....Don't try to argue with old man, he seems well prepared. इथे वयाविषयी आदर स्पष्ट दिसतोच...हेटाळणी नव्हे.
हेमिंग्वेच्या एका जगप्रसिद्ध कादंबरीचे नाव "Old Man and The Sea" आहे. त्या कादंबरीचा मराठीत अर्थ 'म्हातारा आणि समुद्र' असा केला तर तो पचू शकणार नाही अशी भूमिका तिचे अनुवादक श्री.पु.ल.देशपांडे यानीच घेतली होती व तिचे नाव 'एका कोळीयाने..' असे केले ते याच विचाराने.
त्यामुळे मोरारजी देसाई याना 'Old Man' असे संबोधिले म्हणजे मराठी भावानुसार ते अपमानस्पद मानू नये, इतकेच.
इन्द्रा
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 02/14/2011 - 06:04
नवीन
The Godfather is the sum of all wisdom. --- You Have Got Mail.
"Tom, don't let anybody kid you. It's all personal, every bit of business. Every piece of shit every man has to eat every day of his life is personal. They call it business. OK. But it's personal as hell. You know where I learned that from? The Don. My old man. The Godfather. If a bolt of lightning hit a friend of his the old man would take it personal. He took my going into the Marines personal. That's what makes him great. The Great Don. He takes everything personal Like God. He knows every feather that falls from the tail of a sparrow or however the hell it goes? Right? And you know something? Accidents don't happen to people who take accidents as a personal insult."---The Godfather.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Tue, 02/15/2011 - 09:30
नवीन
पण मोरारजींचा कीस्सा नक्की काय आहे ते समजून घ्यावा लागेल. एकूणच वींग्रजी माणसाने भारतीयाला "Old Man" असं आदरने म्हटलं असेल का त्राग्याने याची शंका वाटते ? कारण की ती लोकंच मूळात महा ऊर्मट हो, त्यांचे प्रमूख व्यावसायीक चीत्रपट पहा नाहीतर बहूतांश कादंबर्या बघा कीव्हां एकूणच लोकांची देहबोली अभ्यासा, जीत-तीथं ऊर्मटपणालाच ग्लॅमर जणू काही तो राश्ट्रीय धर्मच.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 02/15/2011 - 09:48
नवीन
"..."Old Man" असं आदरने म्हटलं असेल का त्राग्याने याची शंका वाटते ?...."
~ बरोबर आहे. हे नक्कीच की जो कुणी डिक टॉम हॅरी असेल त्याने आदराने तो शब्द उच्चारला नसणार, तर त्राग्यानेच 'ओल्ड मॅन ऐकत नाही'... अशा हताश सूरात पुटपुटला असणार. पण असे असले तरी ते संबोधन 'अपमानस्पद' वा 'उर्मटपणा'चे मानू नये एवढाच उद्देश.
~ अमेरिकेचे 'वॉटरगेट फेम' प्रेसि.निक्सन यानी इंदिरा गांधी यांना Clever Fox असे उद्देशून आपल्यासमोर उदगार काढले होते असे त्यांचे निकटचे सहकारी आणि परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यानी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. आता इथे 'क्लेव्हर फॉक्स' ही एकप्रकारची सौम्य शिवी म्हणायची की इंदिराजींच्या राजनितीचे निक्सनकृत विश्लेषण असा प्रश्न उभा राहतो.....हेदेखील मानण्यावरच आहे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 02/15/2011 - 10:06
नवीन
हॅ हॅ हॅ. इंद्रा कधीकधी तु विनोदही चांगला करतोस. तो निक्सन इंदिरा गांधींना उद्देशुन "बिच" असे म्हटल्याचेही स्मरते. ते देखील राजकीय विश्लेषण होते काय? निक्सनचे विचार इंदिरा गांधींबद्दल काय होते एवढे सांगण्यासाठी फक्त उदाहरण दिले. याचा अर्थ निक्सनने खाजगीमध्ये त्यांची कधी स्तुती केली नसेल असे नाही. तरीपण.....
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 02/15/2011 - 10:27
नवीन
"...."बिच"...."
~ "बिच" ? यू शुअर ?
आता ते पुस्तक माझ्याजवळ नाही....पण तरीही 'विच' = Witch असा उल्लेख असावा.
इन्द्रा
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/14/2011 - 02:12
नवीन
पार्वतीबाई परीहार नामक कॉंग्रेस आमदार ह्या शिक्षण मंत्री होत्या. एका समारंभात त्यांना तत्कालीन साहीत्यसंमेलनाध्यक्ष शंकरराव खरातांची आठवण करून देयची होती. ऐनवेळेस त्यांना काहीकेल्या नाव आठवेना... मग अर्थातच सांगितले वगैरे.. पण एका मराठी वृत्तपत्रात मथळा आला, "पार्वतीबाई शंकररावांना विसरल्या!" ;)
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 02/14/2011 - 03:20
नवीन
अंमळ मजेशीर किस्सा (आणि इतर किस्सेदेखिल).
बाकी "देशभक्तांचे" प्रतिसाद वाचण्यास उत्सुक!
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Mon, 02/14/2011 - 10:34
नवीन
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Mon, 02/14/2011 - 10:37
नवीन
"देशभक्तांचे" आणि (मिपावरील) विचारवंतांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 02/14/2011 - 03:33
नवीन
जाऊ द्या हो ! होतात कधी कधी अशा चूका !
किमान बेळगाव महाराष्ट्राला काही केल्या मिळणारच नाही हे कर्नाटक विधानसभा निवडणूकांमधले कन्नड भाषण वाचून दाखवले नाही हे भाग्य समजा आणि जय हो बोला !!
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Mon, 02/14/2011 - 04:37
नवीन
त्यात काय इतके?
चालायचेच.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Mon, 02/14/2011 - 07:01
नवीन
बीग डील आहेच. शौचालयाच्या उद्घाटनात अशी ते चूक करते तर ठीक होते पण क्रुष्णा महत्वाच्या यु.एन्.मध्ये असे बोलल्याने ते बीग डील आहेच. एक तर कृष्णा आहेत ७८ वर्षाचे. खरोखरच त्यांना आंतरराष्ट्रीय बाबीत किती रस आहे माहित नाही. त्यात परराष्ट्र खाते म्हणजे राजेशाही थाट असतो.आधीचे परराष्ट्र मंत्री पाहिलेत तर अनेक जण रंगेल गडीच असल्याचे दिसून येईल(नटवर सिंग/शशी थरूर्,एन्.डी. तिवारी[होय, हे पण परराष्ट्रमंत्री होते!!]).ह्या खात्याचे अधिकारी/मंत्री ह्यांच्या सुरस कहाण्या अधून मधून प्रसिद्ध होत असतात.
भाषणे लिहून देणार्या best and brightest आय.एफ्.एस. अधिकार्यांनी थोडा अधिक गृहपाठ करायला हवा होता असे वाटते.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 02/14/2011 - 08:04
नवीन
या आणि अश्या प्रकारच्या चुका होणे स्वाभाविकच आहे. परराष्ट्रमंत्री अनेक ठिकाणी भाषणे करत असतील आणि अनेक उदघाटनांना जात असतील. सगळीच भाषणे स्वत: लिहिणे त्यांना अर्थात शक्य नाही. शिवाय त्यांना इतरही महत्वाची कामे असतात. एवढ्या मोठ्या राष्ट्राचे परराष्ट्रमंत्री म्हटल्यावर काम खुप असणार. रात्रंदिवस जागुन कामे करायची म्हणजे थोडी झोप कधीकधी कमी पडते. त्यामुळे अश्या छोट्या मोठ्या गंमतीजमती होत राहतात. शिवाय युनायटेड नेशन्स च्या मीटिंग्स अश्याही फारश्या गंभीरपणे घ्यायची गरज नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणावर उगाच "गावगप्पा" होतात झाले. त्यापेक्षा भारतात सोनियाजींचे काय चालु आहे याची वित्तंबातमी असली म्हणजे झाले.
शिवाय कोणीतरी ओबामांचे उदाहरणही दिले आहे. त्यांच्याकडुनही अशी चुक झालेली आहेच. ती त्यांच्या देशातली कुठलीतरी सभा असावी. युनायटेड नेशन्स च्या मीटिंग्स त्याहुन जास्त मोठ्या प्लॅटफॉर्म वरच्या आहेत असे मानायला काही जागा नाही. आता भाजपावाले विचारजंत बोंबा मारतील. मारतीलच. त्यांचे कामच आहे ते. आयर्लन्ड्च्या पंतप्रधानाच्या भाषणाचा कागद त्यांच्याकडे [गडबडीत] आला आणि त्यानी ते आपलेच भाषण म्हणून वाचायला सुरूवात केली. पण तिथे 'मी प्रे.ओबामा यांचा खूप आभारी आहे...' हे वाक्य आल्यावर ते थबकले.... म्हणजे बघा ओबामांनी पण किमान ३ ओळी चुकीच्या वाचल्या असाव्यात. कॄष्णांनी पण ३ ची लिगसी कायम ठेवली. फक्त ३ ओळींऐवजी ३ मिनिटे झाली म्हणजे साधारण ३ परिच्छेद किंवा किमान ३०० शब्द. नॉट अ बिग डील. कदाचित पोर्तुगीज परराष्ट्रमंत्र्यांना आणि कृष्णांना एकच मुद्दा मांडायचा असेल. त्यामुळे ३ मिनिटे आपण काहीतरी वेगळेच बरळतो आहे हे कॄष्णांना कळाले नसावे.
कधीकधी पक्षां'तर्गत स्नेही सुद्धा अश्या गोष्टींचा राजकीय फायदा घेऊ बघतात. आता त्यांच्या पक्षातले के नटवर सिंगच काय म्हणाले बघा ""He has been a friend for 30 years and I would not like to comment" . म्हणजे मित्र नसले असते तर मी बोललो असतो काय बोलायचे ते असा अर्थ हे हरामखोर भगवे दहशतवादी या शब्दातुन काढणार. काढु देत त्यांना काय काढायचे ते.
या एकुणच प्रकारामुळे क्रूष्णांबद्दलचा आदर दुणावला आहे. मी शेंगा खाल्ल्या नाही आणि टरफले उचलणार नाही याच धर्तीवर कॄष्णांनी देखील भारतातल्या प्रचंड माजलेल्या मिडीयाल्या ठणकावून सांगितले की "There was nothing wrong in it." बरोबर आहे ना. चुक त्यांच्या हाताखालच्या नौकरशहांची आहे त्यांनी योग्य तो कागद हातात ठेवला नाही. प्रत्येकवेळेस आपण काय बोलतो आहोत, त्याचा अर्थ काय. ३-३ परिच्छेद झोपेत असल्यासारखे भलतेच बोलतो आहोत याकडे काय परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष द्यावे काय? त्यांना अजुन काही कामे नाहीत? ही कामे नौकरशहांची.
जाउद्यात यावर अजुन काही बोलण्यासारखे नाही. आंधळी नौकरशाही आणि बहिरी जनता असताना कृष्णांच्या या छोट्यामोठ्या चुका उगाच आउट ऑफ प्रपोर्शन ब्लॉ आउट केल्या जात आहेत.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 02/14/2011 - 09:57
नवीन
>>शिवाय युनायटेड नेशन्स च्या मीटिंग्स अश्याही फारश्या गंभीरपणे घ्यायची गरज नाही.
सहमत आहे. युनायटेड नेशन्सला गंभीरपणे घेतल्याने बरेच/सगळेच प्रॉब्लेम झाले असे म्हणतात
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Mon, 02/14/2011 - 10:41
नवीन
युनायटेड नेशन्सला गंभीरपणे घेतल्याने बरेच/सगळेच प्रॉब्लेम झाले असे म्हणतात
थत्तेजी "काश्मीर सार्वमताचा" प्रकार युनोला गंभीरपणे घेतल्यामुळेच झाला आहे ना?? :(
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 02/14/2011 - 10:50
नवीन
प्रॉब्लेम झाले असे म्हणतात
जाऊ द्या....
परत परत काय तेच तेच......
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 02/15/2011 - 11:31
नवीन
आपले सुदैव इतकेच कीं त्यांनी पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्र्यांचेच भाषण वाचायला घेतले! उद्या त्यांचा हा weak point कळल्यावर कुणी वाह्यात पाकिस्तानी/चिनी त्यांच्या पुढे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण सारून द्यायचा आणि "It's not a big deal" असे म्हणत "कृष्णाजीपंत" ते वाचून मो़कळेही व्हायचे!
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 02/14/2011 - 08:22
नवीन
माणिकराव गावित सलग नऊ वेळा लोकसभेत निवडुन गेले आहेत. सध्या खासदार आहेत, त्यांचा मागील वर्शीचा किस्सा.
व्यासपिठावर सन्माननिय मॅड्म, ममोसिन्ग इ इ बडे धेंडं. आणि माणिकरावांनी बोलण्यास सुरुवात केली...
"सन्माननिय व्यासपिठ आणि आज आपल्यात उपस्थित असलेल्या स्वर्गिय मा. सोनिया गांधी....." =))
सोनियाबाई आणि स्टेजवरील क्षणभर अवाक...
आणि त्यानंतर प्रचंड हास्यकल्लोळ.... त्यात मॅडमही सामील झाल्या.. :)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 02/14/2011 - 09:52
नवीन
>>स्वर्गिय मा. सोनिया गांधी.
सोनियाबाई आणि स्टेजवरील क्षणभर अवाक...
मॅडमना हा गूफ अप कळला म्हणता?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 02/14/2011 - 10:20
नवीन
त्यांना काही समजत नाही असे तुम्ही म्हणता?
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 02/14/2011 - 11:02
नवीन
मॅडमना हा गूफ अप कळला म्हणता?
>>>>>>
=)) =))
सुरुवातीला त्या अवाक झाल्या आणि नंतर हास्यरसात बुडाल्या ह्यावरुन त्यांना समजले असेल असा अन्दाज बान्धू शकतो.
तसेही त्यांचे वास्तव्याला अनेक वर्षे झाली आहेत एव्हाना. ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/14/2011 - 12:38
नवीन
मॅडमना हा गूफ अप कळला म्हणता?
सोप्पे आहे! सगळे हसले या अर्थी काहीतरी जनरल (आपल्यावर नसलेला) विनोद असणार इतके मॅडमना नक्कीच कळते. त्यामुळे त्या हसल्या असतील. ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/14/2011 - 12:43
नवीन
राजकारण्यांचा नाही पण...
ठाण्यातील घंटाळी नवरात्रौत्सव खूप प्रसिद्ध होता (आताही असेल अशी आशा करतो). भिमसेनांसकट अनेक दिग्गज तेथे मोकळ्या मैदानावर रसिकांसाठी येऊन गेले आहेत. तर अशाच एका मोठ्या कलाकाराचे आभारप्रदर्शन करण्यासाठी शेवटी नव्याने तयार होत असलेल्या कार्यकर्त्यास सांगितले. तो स्टेजवर गेला पण पहील्यांदाच गेला असल्याने जरा टेन्शनमध्ये होता. गडबडीत, "आजच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत मी," असे काहीसे म्हणत पुढे म्हणाला, "मी त्यांना पुच्छगुच्छ देतो!" :-)
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 02/14/2011 - 13:21
नवीन
>>> आणि त्यानंतर प्रचंड हास्यकल्लोळ.... त्यात मॅडमही सामील झाल्या.. :)
--- अरे वा, मॅडमही हसल्या म्हणजे ह्या किश्श्याला रोम-हर्षक म्हणायला हरकत नसावी ;)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 02/14/2011 - 08:31
नवीन
ते एस एम कृष्णा होते. त्यांच्या जागी देवेगौडा असते तर त्यानी बंगलूर म्युनीसीपल कॉर्पोरेशनच्या एखाद्या वार्डातील भाष्न वाचून दाखवले असते
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 02/14/2011 - 13:24
नवीन
"आजच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत मी," असे काहीसे म्हणत पुढे म्हणाला, "मी त्यांना पुच्छगुच्छ देतो!" >>> =)) =))
इथे कदाचित अवांतर होईल. सुशिलकुमार शिन्दे पहिल्यांदा निवडुन दिल्लीला गेले त्यावेळेस पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच दुर बसलेल्या पत्रकारांना उद्देश्युन. " आप लोग इतने लंबे क्यु बैठे है, जरा पास आवो". :)
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 02/14/2011 - 15:40
नवीन
अमेरिकेचे (निक्सननंतर आलेले) ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी एकदा अन्वर सादत यांना त्यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीत त्यांचा उल्लेख "Leader of the great people of Israel" असा केल्याचे 'टाईम' नियतकालिकात वाचल्याचे स्मरते.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 02/14/2011 - 16:22
नवीन
च्यायला महिन्याला ४ लाखाचे प्यकेज घेतो...निदान खाल्या पगाराला तरी जागाव..खाजगी नोकरीत असता तर चुट्टी झाली असति..कधिच..पगार कापा
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 02/15/2011 - 04:00
नवीन
आता गुफ-अपचीच चर्चा चालु असेल तर हा गुफ-अप इतिहासाच्या पानांत (पक्षी विकिपीडीयावर) विशेष स्थानावर असेलच!
संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Dewey_Defeats_Truman
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 02/15/2011 - 04:14
नवीन
जयप्रकाश नारायण, जे ऑक्टोबर १९७९ ला निधन पावले त्यांना तत्कालीन जनता पक्ष सरकारने मार्च १९७९ ला मृत घोषित करून संसदेत श्रद्धांजलीदेखिल वाहिली होती!!!
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 02/15/2011 - 13:04
नवीन
हो! हे आठवत आहे!!
मोरारजींचा अगदीच 'वडा' झाला त्या दिवशी!
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 02/15/2011 - 10:47
नवीन
ट्रूमनचे हे माहीत नव्हते. जपानने शरणागती पत्करली तेंव्हाचा त्यांचा फोटो देखील असाच बघितल्याचे आठवले...
जयप्रकाश नारायणांचे चांगले लक्षात आहे. ऐकलेल्या माहीतीप्रमाणे मुंबई हॉस्पीटलच्या ज्या कुठल्या मजल्यावर होते तेथून कुणाला तरी खाली नेताना कोणी तरी बघितले आणि असे गृहीत केले की ते जयप्रकाशच आणि चक्क सर्वांनी कुठलेही कन्फर्मेशन करून न घेता तेच गृहीत पुढे रेटले... :(
- Log in or register to post comments
प
पंगा
Tue, 02/15/2011 - 12:41
नवीन
आम्हाला तर (बातमी आल्यानंतर) शाळेतून (उरलेल्या दिवसाकरिता सुट्टी देऊन) घरी पण सोडण्यात आले होते, असे आठवते.
नंतर जेव्हा खरा प्रकार कळला, त्यानंतर मग लोकसभेचा उल्लेख 'शोकसभा' असा आणि जसलोकचा (ज्या रुग्णालयात जयप्रकाश तेव्हा उपचारांस्तव दाखल झालेले होते) उल्लेख 'स्वर्गलोक' किंवा 'मृत्युलोक' असा करणार्यांस उधाण आले होते, असेही आठवते.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/15/2011 - 13:01
नवीन
एकदा महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर विमानातून प्रवास करताना एक नेपाळी माणूस त्यांच्या शेजारी येऊन बसला. नवलकरांनी ओळख करून देताना 'महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री' अशी करून दिली. त्यावर त्या नेपाळी माणसाने 'नेपाळच्या नेव्हीचा अधिकारी' अशी ओळख करुन दिली. नवलकर जात्याच चौकस असल्याने त्यांनी ताबडतोब, नेपाळला समुद्रच नाही तर नेव्ही कुठून आली असा प्रश्न विचारला. त्यावर नेपाळी अधिकाऱ्याने हॅ हॅ हॅ करून, 'जर महाराष्ट्राला सांस्कृतिक मंत्री असू शकतो तर नेपाळला नेव्ही अधिकारी का असू शकत नाही' असे चोख प्रत्युत्तर दिले.
शिवसैणिकांणी अंमळ हलकेच घ्यावे.
- Log in or register to post comments