मराठि पाऊल पडते पुढे
💬 प्रतिसाद
(22)
प
प्रचेतस
Mon, 02/14/2011 - 06:43
नवीन
मराठि पाऊल पडते पुढे
शुद्धलेखनात का पडते मागे?
- Log in or register to post comments
म
महेश-मया
Mon, 02/14/2011 - 12:37
नवीन
काय करनार मराठी टंकलेखन अजुन शिकलो नाहि, पन लवकरच ते शिकण्याचा प्रयत्न करेल
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/15/2011 - 11:27
नवीन
मात्र ह्या कार्यक्रमातले जज म्हणजे कोण तो कुरुळ्या केसांचं झुडुप डोक्यावर वाढवलेला मकरंद .. आणि ती दुसरी हिरवीन .. मुग्धा गोडसे का कोण .. काय पाण्चट कमेंट्स देत असतात ते .. त्यापेक्षा पाऊल पुढे न पडलेलं बरं .. असं म्हणायची पाळी येते :)
असो ..
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
Tue, 02/15/2011 - 11:32
नवीन
मराठी टंकलेखनचा क्लासेस घेनारे बरेच जण अहेत इथे मिपावर
मला खरड करा मी सांगते. कोनत्या एरीआत आहेत आनि फी वगैरे.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Mon, 02/14/2011 - 07:29
नवीन
मुग्धा ताई एवढ्या चांगल्या कमेंट्स पास करतात.. काय सांगू ??
मराठी येत का त्यांना ?
असो पण , मा. नितीन देसाईंना माझा मानाचा मुजरा...
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Mon, 02/14/2011 - 07:41
नवीन
सुंदर कार्यक्रम . फक्त ती परिक्षक बाई - इंग्रजीत बोलते ते खटकते . असो. एक एक कलाकार अप्रतिम कौशल्य सादर करत आहेत.
अमोल केळकर
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Mon, 02/14/2011 - 08:13
नवीन
मला मुळात एका गोष्टीच आश्चर्य वाटत मुग्धा बाईना परिक्षक म्हणुन नेमायचा उद्देश काय किंवा त्याची पात्रता काय ?
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 02/14/2011 - 08:17
नवीन
मला मुळात एका गोष्टीच आश्चर्य वाटत मुग्धा बाईना परिक्षक म्हणुन नेमायचा उद्देश काय किंवा त्याची पात्रता काय ?
त्या म्हणे खूप मादक आहेत, पुरुष प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्याची हि नवीन पद्धत असावी
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Mon, 02/14/2011 - 14:41
नवीन
मला फक्त मोदक माहीत होते.....
-सूर्यपुत्र.
- Log in or register to post comments
न
निशदे
Mon, 02/14/2011 - 17:08
नवीन
मोदकांनी जिव्हातृप्ती होते; मादकता इतरही अनेक अवयवांना तृप्त करते असे ऐकिवात आहे!!!!!!
बाकी सदर कार्यक्रमात मकरंद देशपांडे मुग्धाताईंपेक्षा अधिक मादक आहेत अशी चावट चर्चा फेसबूकावर कोठेतरी चालू होती हेही ऐकिवात आहे........:)
(ता.क. सदर चर्चेच्या लिन्क दया वगैरे विद्वत्तापूर्ण प्रतिसाद देउ नयेत. आम्ही ऐकिवात असलेल्या महितीच्या लिन्क जवळ बाळगत नाही. ;) )
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Tue, 02/15/2011 - 18:32
नवीन
लोक कसली चर्चा करतील सांगता येत नाही ! :)
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 02/16/2011 - 06:20
नवीन
मकरंद देशपांडे मादक?
व्याडेश्वर..! व्याडेश्वर...!!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/15/2011 - 11:29
नवीन
तुला मुग्धा गोडसे से मोदक ही मादक वाटत नाहीत ? कमाल आहे तुझी ? !!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/15/2011 - 12:38
नवीन
चे च्या ऐवजी से पडला का रे टार्या?
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Mon, 02/21/2011 - 05:12
नवीन
=)) =)) =))
असेच वाटतंय.... ;)
-सूर्यपुत्र.
- Log in or register to post comments
र
रमताराम
Mon, 02/14/2011 - 19:32
नवीन
पुरुष प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्याची हि नवीन पद्धत असावी
नवीन? स्पावड्या महाशय आपण ताम्रपाषाण युगात झोपलात ते आज जागे झालात काय? (ह. घ्या हे. वे. सां. न. ल.)
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 02/14/2011 - 13:24
नवीन
उर्वरीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकाराना संधी मीळताना पाहुन फार आनंद झाला
- Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर
Mon, 02/14/2011 - 16:47
नवीन
फ़ेसबुकमधल्या नोट्समधून डकवतोय.
-------------------------------
"मराठी पाऊल पडते पुढे" नावाचा रिऍलिटी शो लवकरच सुरू होणार आहे असं एक-दोन दिवसांपूर्वी टीव्ही पाहताना समजलं तेव्हा हा विचार माझ्या डोक्यात आला. तुम्हालाही कधी असं वाटलं का?
सारेगमप असो किंवा फूबाईफू किंवा एकापेक्षा एक किंवा हा नवीन होऊ घालण्यात आलेला "मराठी पाऊल पडते पुढे" का कार्यक्रम. याप्रकारचे कार्यक्रम हिंदी वाहिन्यांवर पूर्वीच लोकप्रिय झालेले आहेत. चांगल्या कार्यक्रमांचे अनुकरण करू नये असं माझं म्हणणं नाही. तसंच, वर उल्लेख केलेल्या कार्यक्रमांचा दर्जादेखील चांगला आहे यात वाद नाही. पण या कार्यक्रमांची कल्पना मराठी माणसाला नेहमी "उशीरा" का सुचते?
उदा. "कॉमेडी सर्कस" या रिऍलिटी शोच्या आधी "फू बाई फू"हा कार्यक्रम का अस्तित्वात येऊ शकला नाही?
वरील कार्यक्रमांखेरीज पूर्वी सह्याद्रीवर प्रक्षेपित होणाऱ्या "ताक् धिना धिन्" किंवा "दम् दमा दम्" वगैरे कार्यक्रमांचंही तेच. हे कार्यक्रम म्हणजे झी टीव्हीवरील अंताक्षरी (अन्नू कपूर वाली) किंवा सोनी टीव्हीवरील "बुगीवुगी" यांचीच कॉपी.
धडाकेबाज या महेश कोठारे यांच्या चित्रपटातसुद्धा "शोले"वरून काहीतरी सुचलं असणार असं वाटतं.(अर्थात शोले च्या १% सुद्धा मजा त्यात नाही हे वेगळं सांगायला नको.)
मराठी मालिकांच्या दिग्दर्शनातसुद्धा हिंदी मालिकांसारखा तोचतोपणा आजच्या तारखेला न पटणारा/पचणारा आदर्शवाद, पराकोटीचा "खल"पणा, इ. दाखवताना सर्वांमध्ये "एकता" दिसते. ;)
दादासाहेब फाळके, लतादीदींपासून अगदी माधुरी दीक्षितपर्यंत पाहिल्यास "ललितकला" या क्षेत्रामध्ये मराठी माणूस आपला वेगळा ठसा उमटवत आला आहे. मग हे असं का होतं मराठीच्या बाबतीत?
नव्या वर्षात मराठीच्या लहान पडद्यावर काहीतरी नाविन्यपूर्ण पहायला मिळेल का?
- Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni
Mon, 02/14/2011 - 18:59
नवीन
गोड्श्यांच्या मुग्धेपेक्षा मातोंड्कारांची उर्मिला , कुलकर्ण्यांची सोनाली व जोश्यांची पल्लवी पण चांगली वाटली असती .. या पोरीकडे शब्द कमी असल्यासारखे जाणवते प्रत्येक performance नंतर ......... आणि मकरंद पेक्षा पण नाना सारखा माणूस असता तर चांगले वाटले असते ........
इथं पोर हुशार आणि मास्तर गार असला प्रकार वाटतो ................
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/15/2011 - 11:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
द
दादा बापट
Tue, 02/15/2011 - 16:41
नवीन
पूर्वीचे घाटी लोक मराठी बोलत असत. गोडसेबाईंसारखे आधुनिक लोक मिन्ग्लिश बोलतात. अबब केवढी ही प्रगती. डोळे फिरले.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 02/16/2011 - 05:09
नवीन
ह्म्म्म... हा कार्यक्रम अजुन तरी चांगला वाटतोय. काल कठपुतळ्यांचा नाच पहायला मिळाला,काही तरी वेगळं पाहण्याच नक्कीच समाधान मिळतय.
व्यभिचारी नात्यांच्या मालिका पाहण्यापेक्षा हे असे कार्यक्रम पाहणे जास्त उत्तम...
बाकी मुग्धा म्हणजे मुग्धाच आहे... ;)
- Log in or register to post comments