भितीदायक आहे हे :( रोड तेवढेच रहाणार , गाड्या मात्र वाढणार , पेट्रोल साठे कमी होणार पर्यायाने किमती वाढणार :)
जगदंब जगदंब :(
बाकी बीएमडब्लु ७३० डी बुक करणार होतो काल . मित्र म्हणाला २० किलो तांदुळ आणि २०० रुपये कॅशबॅक अशी अफलातुन ऑफर आहे ह्या गाडी वर :) पण च्यायला मी गेलो आणि ऑफर खल्लास :( म्हणुन णाही घेतली गाडी !!
अवांतर : फोक्सवॅगन च्या जट्टा आणि पसाट हे मॉडल्स सद्ध्या विक्रीस उपलब्ध नाहीत , तरीही कशी काय बॉ बुक झालीयेत ? म्हणुन आकडेवारीबाबद साशंक :)
आधीच रस्त्यावर चालताना नाकावर रुमाल ठेवावा लागत आहे! वरील आकडे पाहुन अस वाटत आहे, कि घरातुन बाहेर पडायलाच नको! कारण पुढील काही वर्षात हे आकडे कित्येक पटींनी वाढतील!
मला ४ ते ६ लाखांच्या मधली एक कार घ्यायची आहे. कंपनी लीज किंवा लोनवर.
म्हटलं तर वैयक्तिक अशा बाबीसाठी वेगळा धागा काढणं बरोबर वाटत नाही म्हणून इथे औचित्य / संधी साधतो.
माझी आत्ताची दहा वर्षे जुनी झाल्याने तातडीची गरज आली आहे. माझा आकार स्थूल आहे आणि उंची सुमारे सहा फूट. अर्थात ड्रायव्हर सीट पोझिशन उंचावर आणि हेड स्पेस बरी असावी. एकूण गाडी प्रशस्त असावी. पाच लोक तरी बसू शकावेत. कारमधे फार वाकून शिरावे लागू नये. (सँट्रो या बाबतीत उत्तम, पण सध्या तीच वापरतो आणि आता चेंज हवाय.)
मायलेज १५ पेक्षा कमी नसावे. दिवसाला १०० किमी रनिंग आणि वीकेंडला ४०० पर्यंत.
शेवरोलेची बीट टेस्ट ड्राईव्ह केली, त्यात पाय बसत नाहीत. बाकी अजून काही एक्स्प्लोअर केले नाही. फिगो नुसतीच बघितली पण खूप बुटकी वाटली.
टेक्निकली कारमधले काही कळत नाही म्हणून कृपया गाडी सुचवावी. टेस्ट ड्राईव्ह करु जातो म्हटलं तरी रुटीनमधे सर्वच कार चालवून पाहत बसता येणार नाहीत. त्यासाठी मुळात एक शॉर्टलिस्ट असणं गरजेचं आहे.
सुचवल्यास खूप आभारी राहीन.
मायलेज १५ पेक्षा कमी नसावे. दिवसाला १०० किमी रनिंग आणि वीकेंडला ४०० पर्यंत
पुढील दोन संकेत स्थळांवर असलेल्या फोरम वर अतिशय चांगली माहिती मिळेल
www.carwale.com
www.team-bhp.com/
तुमच्या गरजे अनुसार मला टाटा इंडीका विस्टा (डिझेल) योग्य वाटतेय , मारुती फॅन असाल तर रिट्ज़ चा पर्याय आहे
थोडे थांबणार असाल तर टोयोटा (एटिओस) हॅच बॅक आणि होंडा ५/६ लाखाच्या रेंज २०११ उत्तरार्धात लॉंच होईल.
दिवसाला 100 किमी रनिंग असेल तर डिझेल गाडी घेतलेली उत्तम. मारूती स्विफ्ट डिझेल हा चांगला पर्याय आहे. थोडे वाट पाहण्याची (व बजेट ताणण्याची) तयारी असेल तर निस्सान किंवा फॉक्सवॅगनच्या गाड्याही चांगल्या आहेत.
पेट्रोल गाड्यांमध्ये i10 बेष्ट आहे.
सहमत आहे ...
जर एस यु व्ही घेणार असाल तर ऑडी क्यु७ किंवा बिएमडब्लु एक्स६ वस्ताद गाड्या आहेत . डिस्काऊंट देखील चालु आहे अलिकडे ! थोडं बजेट ताणता येत असेल तर हम्मर एच ३ येतेय इंडियात .. एखादा पेट्रोल पंप विकत घ्यावा लागेल इतकंच :)
या पै़की काही नाही तर मग मारुती८०० ला पर्याय नाही :) पद्मिनी प्रिमियर पण भेटेल शेकंड हँड
सुचवण्याबद्दल खूप थँक्स. स्विफ्टला सर्वांचीच पसंती दिसते आहे. आणि डिझेलमधेही आहे. त्यामुळे तीच आधी ट्रायतो..
विस्टासुद्धा..मला वाटते जिचे इन्जिन फियाटचे आहे तीच का ही?
ह्म्म्म... यात काय नवल !!! ;)
हे आकडे सुद्धा कमी असतील असं वाटतया... ;)
बाकी या ५०० बद्धल पण वाचा बरं का... ;)
च्यामारी कोन म्हनतोय हिंदुस्थानी लोकांकडे पैका न्हाय ते ? ;)
(दुचाकी चालवणारा) ;)
रोचक माहिती आहे.
अल्टोने (नेहमीप्रमाणे) खपाच्या बाबतीत बाकी गाड्यांवर मात केलेली दिसते. आय १०सुद्धा जोरात आहे. टोयोटा प्रायस, मारुती ग्रॅन्ड व्हिटारा आणि फॉल्क्सवॅगन फेटनला या महिन्यात एकेकेच ग्राहक मिळाला. :) स्पार्कपेक्षा बीट जास्त खपल्या हे विशेष आहे !
मारूतीने एकट्याने एक लाखापेक्षा जास्त कार विकत खपाच्या बाबतीत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
एकंदर जानेवारी महिन्यात भारतात २ लाख २४ हजार नव्या कार्स रस्त्यावर आल्या. तरी यात ट्रक, टेम्पो, रिक्षा, बसेस आणि दुचाकी वाहनांची मोजदाद केलेली नाही. त्या तुलनेत रस्ते किती वाढले हे बघायला पाहिजे.
ही आकडेवारी खरी असेल तर भविष्यात भारतीय रस्त्यांवर हाहा:कार माजणार आहे.
(अवांतर- Ritz : 6046 पैकी एक ग्राहक मी असून ही आकडेवारी फुगवण्यात हातभार लावला आहे. :( )
गप्प बैस!
जसा काही भारतातून तू बाहेर पाऊल टाकायला नाही म्हणतोय्स.
केसाला लावायचं तेलही तू परदेशातून मागवणार आणि म्हणे दुसर्यांनी डाव केलाय.
भारतातल्या लोकांना परदेशी वस्तू न खरेदी करण्याचा ऑप्शन आहे तो वापरावा.
रोडची अवस्था व पेट्रोलचे भाव बघता गाडी घरातल्या घरात चालवायला घेत असावेत.
आपल्याकडे खरं तर इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या.. पण जिथे चार ते आठ तास लोड शेडिंग चालंत तिथे कसलं इलेक्त्रिक अन कस्लं काय!
प्रतिक्रिया