ब्लॅकबेरीचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदत करण्याचा नकार ?
णमस्कार्स ,
http://www.esakal.com/esakal/20100804/4795822777043890252.htm
आज ऑनलाईन बातम्या वाचताना ह्या बातमीवर नजर पडली .. ब्लॅकबेरी नामक कंपनी ने ब्लॅकबेरी थ्रु जाणार्या एसेमेस आणि इमेल्स वर पाळत ठेवण्याची गृहखात्याची मागणी धुडकावुन लावली आहे , ह्याचे आश्चर्य वाटले .
ह्यात नक्की काय खाचाखोचा आहेत , झोल आहेत हे जाणुन घेण्यासाठी हा काथ्याकुट आहे.
ब्लॅकबेरी म्हणते आमच्या कडुन ह्या प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही त्याला तांत्रिक अडचणी आहेत ( आणि हेच सर्वांत हस्यास्पद विधान आहे ) जर मेसेज इन्क्रिप्ट करता येतो तर तो डिक्रिप्ट करता येतोच येतो . त्याशिवाय समोरचा त्याला वाचुच शकणार नाही. इनक्रिप्षन च्या फँड्या नुसार , जर ब्लॅकबेरी ग्राहकाकडे प्रायव्हेट की असेल तर त्याची पब्लिक की ब्लॅकबेरी कडे आहे ह्यात तिळमात्र शंका घेण्यास जागा नाही.
एखादी परराष्ट्रीय कंपनी आपल्या सरकार ला असं शेंबड्या पोराला झटकावं तसं उत्तर कसं देऊ शकते ? राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाला एवढ्या सहजतेने घेता येऊ शकते काय ? न्युज चॅनल्स वर तरी ह्या बातमीचा अजुन गाजावाजा दिसत नाही.
जाणकार काही प्रकाश टाकु शकतील काय
प्रतिक्रिया