Welcome to misalpav.com
लेखक: अवलिया | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मुसुंनी बरेच दिवस विश्रांती घेतलेली आहे, आता मात्र वाट पाहत आहे.. नानांचा आदरसत्कार मान्य करुन मुसुंनी लवकर लिहिते व्हावे.. स्वाती

मुसु अजुन आहे होय? मी तर असं ऐकलंय की मुसुने संजीवन समाधी घेतली आणि त्याच्या गुहेशी नंदनने शिळा लोटली.. त्यानंतर दोघांनीही काही लिहिलेलं ठाऊक नाही बा. :D

काय सांगताय काय धमालराव पण आता चानुस घावलाय तर दोन ओव्या गाऊन घेऊ . धमा म्हणे दिनकर , पावलासे अस्त , बाप मुसेश्वर , समाधिस्त. ठोब्बा रख्माय.

मुसुंनी लेखनसंन्यास का घेतला असावा यावर स्वतंत्र काथ्याकूट टाकायचा विचार आहे. अवांतरः शालीचा फटू पाहून 'वार्‍यावरची वरात' मधल्या पुलंच्या हार घालून केलेल्या भरघोस स्वागताची आठवण येऊन र्‍हायली ना भौ. ;)

मुसुंचा वहाणा हा लेख खूप आवडला होता. कारण त्या लेखाने वाचकाला विचारप्रवृत्त केले आणि मन मोकळे करायची संधी दिली. मुसुंनी स्वतःचे लिखाण तर करावेच पण प्रतिक्रिया तरी किमान प्लीज जरूर जरूर द्याव्यात. अतिशय उत्तम प्रतिक्रिया आम्हाला सदैव वाचायला मिळाव्यात. त्यांच्या प्रतिक्रिया यासुद्धा लेखाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात मग त्या - कोपरखळ्या मारणार्‍या (= या वाक्यातील कर्ता , कर्म, क्रियापदं जत्रेत हरवलेल्या मुलामाणसांप्रमाने हरवली आहेत - सौजन्य पुलं) असोत की चिंतनीय = ("कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" बस्स. पूर्वग्रहांचे , पूर्वसंस्कारांचे चष्मे जमतील तसे बाजूला ठेवून सामोरे जाणे. हे नेहमी जमत नाही. परंतु "काशीस जावें नित्य वदावें".) असोत. आम्ही त्यातून खूप आनंद लुटतो.

नाना ने आत्तापर्यंत निवडलेले एक सोडून सर्व मिपाकर डोक्यात जाणारे पटले बुवा... मुसुंनी आता काहीतरी लवकरच लिहावे हीच इच्छा!!!

मुक्तसुनीतसाहेबांच्या लिखाणाचा मी फ़ॅन आहे. सॉफ़्ट आणि संयत लयीतील नेमक्या शब्दांची त्यांची लिखाण शैली कुणालाही प्रभावीत करेल अशीच आहे. त्यांनी भरपूर लिहावे.

मुसु आणि नंदन ह्यांचा मीही मोठ्ठा फॅन आहे, मुसु - पुन्हा लिहा काहीतरी! :-)