Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुला कसली रे एवढी घाई ?

व — विश्वेश, Wed, 02/23/2011 - 07:58
आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ... तुला कसली रे एवढी घाई ? निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... आयुष्याची पाने मला उलटायची घाई हसायची घाई, मला रडायची घाई ... चार पावले चालताच मला पडायची घाई खायची घाई, मला पिण्याची घाई ... कोणी काही देवो, मला घेण्याची घाई जिंकायची घाई, मला हरायची घाई ... कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई भेटीची घाई, मला गाठीची घाई ... ऐन तारुण्यातच मला साठीची घाई सवयीची घाई, मला सवयीची घाई ... मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...

प्रतिक्रिया द्या
1364 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नरेशकुमार Wed, 02/23/2011 - 08:04 नवीन
घाई घाईत एक प्रतिक्रिया देउनच टाकतो. आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/23/2011 - 09:11 नवीन
निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... आयुष्याची पाने मला उलटायची घाई जिंकायची घाई, मला हरायची घाई ... कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई ह्या दोन कडव्यातुन जीवनाप्रतीची माणसांची स्थीती एकदम जबरदस्त सांगितली आहे.. एकदम आवडले .. --- हसायची घाई, मला रडायची घाई ... चार पावले चालताच मला पडायची घाई खायची घाई, मला पिण्याची घाई ... कोणी काही देवो, मला घेण्याची घाई या ओळी छान असल्या तरी वरील दोन कडव्याचा , अर्थाच्या प्रवाहात वेगळ्या वाटल्या...
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 02/23/2011 - 09:15 नवीन
दीसत नाही.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 02/23/2011 - 09:44 नवीन
घाई घाईत कविता वाचली काय प्रतिसाद द्यावा सुचत नव्हते पण मलाही प्रतिसाद देण्याची घाई तेव्हा घाई घाईत देऊनच टाकला .
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 02/24/2011 - 08:38 नवीन
.... अजिबात घाई न करता वाचले... मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा