Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी शब्द हवा

अ
अविनाश ओगले यांनी
Wed, 02/23/2011 - 17:29  ·  लेख
लेख
पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता?

प्रतिक्रिया द्या
12780 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

न
नारयन लेले गुरुवार, 02/24/2011 - 05:34 नवीन
त्याला पोथीचा पाट म्हणाव्हे. विनित
  • Log in or register to post comments
न
नारयन लेले गुरुवार, 02/24/2011 - 05:38 नवीन
त्याला पोथीचा पाट म्हणाव्हे. विनित
  • Log in or register to post comments
प
प्रास गुरुवार, 02/24/2011 - 08:57 नवीन
पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता? त्याला "ग्रंथपीठ" असं म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात गुरुवार, 02/24/2011 - 09:39 नवीन
रयाळ येथील तज्ञ / जाणकार मंडळी आणखी प्रतिशब्द सुचवतील / यात दुरुस्ती करतील / या शब्दाचा अर्थ - व्युत्पत्ती यावर अधिक प्रकाश टाकतीलच.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 02/24/2011 - 09:55 नवीन
हिन्दीत 'रियाल' म्हणतात. आताच एका मुस्लिम कलिगला विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 02/24/2011 - 09:43 नवीन
पायदान ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/24/2011 - 10:01 नवीन
पायदान ? ए पर्‍या..... झोपेत आहेस का. पायदान म्हणजे पायरी. बीनाका गीतमालेत अमीन सयानी नेहमी वापरायचा हा शब्द. पोथी ठेवायच्या घडीच्या टेबलासाठी ग्रंथपीठ हा शब्द योग्य ठरेल. आमच्या घरी त्याला "पोथी ठेवायचे" असाच उल्लेख व्हाय्चा. स्वतन्त्र नाव कधीच मिळाले नाही
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 02/24/2011 - 10:03 नवीन
शब्दापुढे प्रश्नचीन्ह त्यासाठीच दिले आहे इजुभौ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मस्त कलंदर गुरुवार, 02/24/2011 - 20:05 नवीन
पायखाना का म्हणून विचारलं नाहीस ते!!!! ग्रंथ, आसन, पोथी, पाट..... असल्या सगळ्या पोथ्या आणि त्या स्टँडच्या संदर्भात येणार्‍या शब्दांत तुला नेमका हा पाय कसा आणि कुठे दिसला जरा प्रकाश टाकता का हो जाणकार???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गवि गुरुवार, 02/24/2011 - 10:16 नवीन
म्हणजे हेच का? की कोणत्याही बैठकीला घडवंची म्हणतात. "घडी"चा काही संबंध नसावा बहुतेक. बाय द वे: त्या फोल्डिंग स्टँडला पोथीचे "आसन"ही म्हणतात. चिं.विं.च्या "चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात" मधे चौरंग असाही उल्लेख आहे. पण तो खरा मोठा चौरंग की हे घडीचे छोटे पोथ्यासन काय माहीत..
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 02/25/2011 - 00:50 नवीन
घडवंची.. बरोब्बर.. आजी म्हणायची.. कालपासून आठवायचा प्रयत्न करत होतो शब्द आठवत नव्हता पण.. घडवंची म्हणतात खरं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नगरीनिरंजन Fri, 02/25/2011 - 04:17 नवीन
पोथीस्टँडला घडवंची म्हणत नाहीत. घडवंचीचा संबंध घडीशी नसून घड्याशी आहे. कोणताही घडा ठेवण्याचे आसन म्हणजे घडवंची. पोथीस्टँडला रयाळ हाच शब्द योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
N
Nile Fri, 02/25/2011 - 04:30 नवीन
असेच वाटते. आमच्या कडे असलेल्या धातुच्या तीन पायी स्टँडला घडवंची म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/25/2011 - 04:44 नवीन
आमच्याकडे त्या तीन पायी स्टँडला तिवई म्हणतात. पोथीची मांडणी असे म्हटल्याचेही आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ग
गवि Fri, 02/25/2011 - 04:50 नवीन
"पोथीची मांडणी" असे म्हटल्याचेही आठवते. "पोथीची मांडणी" Seems right...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
N
Nile Fri, 02/25/2011 - 04:55 नवीन
तिवई सहसा घडवंची पेक्षा उंच असते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
J
jaydip.kulkarni Wed, 03/09/2011 - 18:33 नवीन
तिवई वर माठ किंवा पिंप ठेवतात , पोथी नव्हे .........घडवंची किंवा ग्रंथपीठ , पोथीपाट योग्य वाटते ........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विजुभाऊ गुरुवार, 02/24/2011 - 19:23 नवीन
त्याला जुन्या मराठीत "घडवंची" असादेखील शब्द आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/25/2011 - 04:23 नवीन
शब्दाच्या शोधात मीही खूप विचारपूस केली पण शब्द काही सापडला नाही. काही उगाच डोळ्यासमोर शब्द आहे म्हणत होते. ओठावर आहे असे म्हणत आहेत. पण अजून काही शब्द काही कोणाला सांगता आला नाही. :( ”व्यासपीठ’ [वारकरी लोक हा शब्द वापरतात] ’आडणी’ ”घोडी’* असे शब्द मिळाले पण वरीजनल त्यासाठी काय शब्द आहे, तो काही सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे. *[घोडी हा शब्द किर्तनाच्या वेळेस मृदंग उभे राहून वाजवतांना ज्या लाकडी स्टँडवर ठेवतात त्यासाठी वापरतात] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/25/2011 - 04:46 नवीन
घोडी हा शब्द ४ पाय असणार्‍या शीडीसाठी पण वापरतात. आणि हो घोड्याच्या बायडीला पण घोडी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मुलूखावेगळी Fri, 02/25/2011 - 08:49 नवीन
ह्यासाठी व्यासपीठ हाच शब्द मला सांगितला गेला.
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Fri, 02/25/2011 - 10:06 नवीन
मित्रांनो, धर्मग्रंथ ठेवायच्या स्टँडला समर्पक शब्द नसेल तर अडून बसू नका. चांगलासा शब्द तयार करा आणि वापरायला सुरवात करा. मला 'आधारिणी' हा शब्द वापरावासा वाटतोय. म्हणजे जी फळी/आसन/घडवंची ग्रंथाला आधार देते ती. पण संस्कृत शब्दच वापरायचा असा आग्रह नाही. बोली भाषेत अजुन सोपा शब्द तयार करता आला तर उत्तम.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/25/2011 - 10:42 नवीन
ग्रंथासन सुचवलाच आहे. शिवाय, पोथीधर ग्रंथपाट ग्रंथाधार -बोलीभाषेत मिटफळी पोथीफळी पोथ्यासन पोथीपाट चौकडी घडीचा चौरंग पुस्तकपाट फुली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
प
प्रास Wed, 03/09/2011 - 17:53 नवीन
कृपया माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नजरेखालून घालावा. त्याला "ग्रंथपीठ" असे म्हणतात आणि हा शब्द किमान गेली २० वर्षे तरी माझ्या वापरात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुनील Tue, 10/02/2012 - 23:04 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16646980.cms हे तेच अविनाश ओगले काय? श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/03/2012 - 05:21 नवीन
बातमी वाचून खूपच दु:ख होतंय.. अविनाश ओगले यांची माझी ओळख मिपावरच झाली. आम्ही कधी एक-दोन वेळा बोललोही होतो. संदर्भ कविताच. दिवाळी अंकात की कोणत्या मासिकात त्यांच्या एका कवितेचा उल्लेख होता तेव्हा त्यांनी मला तो संदर्भ पाठवायचा सांगितला होता. मी पाठवलाही. महिनाभरापूर्वी मी त्यांना क्षणभरासाठी मिपावर ऑनलाईन आलेलं पाहिलं. सुनिल यांनी आता ही बातमी दिल्यावर आता त्यांच्याबद्दल कळतंय, खूपच दु:ख होतंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ज
जेनी... Wed, 10/03/2012 - 05:38 नवीन
श्रद्धांजली .!
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 10/03/2012 - 05:40 नवीन
ही अपेक्षा .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा