Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्याच्या पासपोर्ट साईझ फोटोचा नकाशा ..!!

प — प्रकाश१११, गुरुवार, 02/24/2011 - 02:33
त्याने फेस बुकावर त्याचे नाव दाखल केले आहे पण फोटो नाही टाकला पासपोर्ट साईझ ..!! एकतर त्याच्याकडे फोटोच नाही असला तरी तो खूप जून वाटतोय खराब चेहरा थोडासा चकणा डोळा डोक्यावरचे उडालेले केस मस्त टक्कल पण तरीही नेटवर एक आकृती छापलीय गेलीय एक नकाशा उमटलाय शरीर अववयाचां ...!! बिन चेहर्याचा तो खूष आहे त्या फोटोवर बिन चेहर्याचा फोटो त्याला खरेच मस्त वाटतोय त्याचे सुख त्याचे दुख तो शब्दातून मांडू लागलाय एक निरागस कोवळेपण आभाळातील उधळलेल्या मुठभर चांदण्या नि चंद्राचा पिवळा प्रकाश मनात काहूर माजवतात तुमचे नाव पण नाही, नि फोटोचां नकाशा ..? नकाशाचा फोटो बघायला बरे वाटते बघा त्याने असाच नकाशाचा फोटो टांगून ठेवायला लिहून ठेवलय त्याच्या पश्चात त्याच्या पोराना नकाशा बघून मित्र म्हणतील हे तुमचे बाबा कां ..? बाबाचे चित्र तुम्ही रंगवू शकता तुम्हाला हवे तसे तशी सवलत दिलीय तुम्हाला ....!!

प्रतिक्रिया द्या
1813 वाचन

💬 प्रतिसाद (9)
न
नरेशकुमार गुरुवार, 02/24/2011 - 03:30 नवीन
व्वा, नविन अकाउंट ओपन केले कि काय चेपु वर ? कविता आवडली बरंका !
बाबाचे चित्र तुम्ही रंगवू शकता तुम्हाला हवे तसे तशी सवलत दिलीय तुम्हाला ....!!
सवलतीचा किति बच्चे वापर करतील, अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 02/24/2011 - 03:53 नवीन
बिन चेहर्‍याचा तो खूष आहे त्या फोटोवर बिन चेहर्‍याचा फोटो त्याला खरेच मस्त वाटतोय छान कविता. पण यात करूण काहीही नाही असे वाटते. उलट या अफाट रेतीसारख्या पसरलेल्या विश्वात आपल्या टिचभर फोटोने आणि थेंबभर कर्तृत्वाने वाळूवर टिकाऊ रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करणारे करूण वाटतात.
  • Log in or register to post comments
न
निवांत पोपट गुरुवार, 02/24/2011 - 03:58 नवीन
कविता एकदम मस्त! आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/24/2011 - 04:02 नवीन
छान कविता...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 02/24/2011 - 05:24 नवीन
मस्त :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 02/24/2011 - 07:15 नवीन
मस्त नकाशा आहे आय मीन मस्त कविता आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/24/2011 - 14:41 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
अ
अशोक७०७ Mon, 02/28/2011 - 09:17 नवीन
प्रकाशजी, तुमचा फोटो बघू की. तरूण पणचा .
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 02/28/2011 - 09:44 नवीन
छान आहे कविता, आवडली. आता तुमच्या आधीच्या कविता काढुन त्या पण वाचतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा