Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रेशमाच्या गाठी

प — पूनम १, गुरुवार, 02/24/2011 - 08:35
नजर वळे पुन्हा-पुन्हा, यमुनेच्या काठी कशा तोडू सांग कान्हा, रेशमाच्या गाठी साद दिली वेणूने, धावत मी आले तोडून पाश सारे, तुझीच मी झाले थरारली काया सारी, घालता तू मिठी!! निळावल्या सांजेला, करून सोळा साज उंबर्‍याशी सोडून आले, मी सारी लाज प्रीत अबोली आहे, राधेच्या ओठी!! द्वारकेला गेला राणा, राहिली विराणी संपला रास आता, संपली कहाणी राधेची प्रीत आज, ठरली रे खोटी!!

प्रतिक्रिया द्या
1323 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पूनम १ गुरुवार, 02/24/2011 - 10:39 नवीन
मी मिपा वर नवीन आहे आपल्या प्रतिसादानेच पुढच्या लेखनास प्रेरणा मिळणार आहे :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/24/2011 - 11:10 नवीन
लिहा हो ताई बिंधास्त लिहा. लोक थट्टा करतील ती फाराशी मनावर घेऊ नका. लिहीत रहा मौका सभी को मिलता है
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ गुरुवार, 02/24/2011 - 11:15 नवीन
पूनम - नजर वळे पुन्हा-पुन्हा, यमुनेच्या काठी कशा तोडू सांग कान्हा, रेशमाच्या गाठी छान लिहिता. लिहित रहा. खूप शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/24/2011 - 14:21 नवीन
कविता सुंदर आहे एकदम .. येवुद्या आनखिन अश्याच कविता.. विशेषता : "निळावलेली सांज" हा शब्द आवडला, पहिल्यांदाच वाचणात आला आहे माझ्या. मस्त. ----------- राणा हा शब्द कृष्णा बद्दल मी पहिल्यांदाच ऐकला आहे , मला माहित नव्हता हा शब्द कृष्णा प्रती आहे तो . ------- लिहित रहा ... वाचत आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा