पाखंडी लोकांच्या प्रश्नांचे उत्तरे
मित्र हो,
आज अनेक दिवसांनी मिपावर चक्कर टाकता पुर्वीचे लेखन वाचले. हैयोंहैयैयोनी प्रकाशकाका घाटपांड्यांना उद्देशून केलेले खालील आवाहन पुन्हा जागृत करून त्यावर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या धाग्याला उपसून काढायला कूटन लिपीच्या बेसनलाडूंचा धागा हे कारण. आणखी एक कारण असे की उपक्रमवर दिवाळी२०१० अंकात नाडीग्रंथ अभ्यासकार्यावर जन्मदिनांक व नवग्रहांची नाडीताडपट्यातील मांडणीवरील हैयोंचा प्रकाशित लेख. त्यावर प्रकाशकाकांच्या नाडीवरील प्रकाशित पुस्तकातील माहिती लेखांशिवाय त्यांनी नाडीताडपट्यांची त्यांच्या तमिळजाणकारांकडून कसून तपासणीकरून हैयोंचे म्हणणे साधार खोडून काढला असावा व त्यावर अधिक अभ्यासपुर्ण लेखन करण्यास ते विचारमग्न होत असावेत असा कयास बांधून वाट पाहिली गेली. अद्याप नाडीग्रंथांवरील त्यांचे आणि अन्य विचारवंतांचे वेळ, गरज, पैसे व पुस्तक न मिळणे आदि कारणांनी मौन संपले नाही असे वाटून या धाग्याने त्यांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा आहे.
मी अशी विनंती करू इच्छितो की खालील - पाखंडी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे प्रकाशकाका व अन्य पाखंडींनी आमच्यासाठी शोधून आम्हा नाडी ग्रंथप्रेमींना सादर करावीत कारण त्यामुळे आमचे मतपरिवर्तन व्हायला आधार मिळेल.शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.
हैयो या ध्याग्यावरील प्रतिक्रियेत म्हणतात,
एक विचार मांडण्याचे स्वातंत्र्य घेतो. इ.स. २००८ मे महिन्यामध्ये काही मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली फलज्योतिष्याच्या सत्यासत्यतेविषयक एक ’परिक्षणयोजना’ करण्यात आली होती आणि तिचा अहवाल आला होता असे मला येथेच समजले होते. इतरांना देखील ह्याबाबत माहिती असावी असे मी गृहीत धरू इच्छितो. सदरील प्रकल्पात श्री. घाटपांडे सरांचा मुख्यत्वेकरून सहभाग होता असेही वाचनात आले आहे. ह्या पार्श्वभूमीवर नाडिज्योतिषावर जे काही लेखन करण्यात आले आहे, त्याची सत्यासत्यता तपासून वरीलप्रमाणे एक अहवाल सादर केला जावा असे सुचवू इच्छितो. तरी श्री. घाटपांडे सरांनी स्वत: अथवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा; श्री. ओक सर आणि त्यांच्याप्रमाणे मते बाळगणारी इतर मंडळी ह्यांस नाडिकेंद्रात घेऊन जावे आणि नाडिज्योतिषाचे खरे स्वरूप उघड करून ह्या मंडळींची सर्वांची दिशाभूल झाली असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करावे. पूर्वीप्रमाणेच अहवाल सादर करावा. इतरही कोणा व्यक्ति अथवा संस्थेस नाडिज्योतिषाच्या सत्यासत्यतेबद्दल शंकाकुशंका असतील तर त्यांनी ते श्री. घाटपांडे सरांचेकडे सादर करावेत. असे केल्याने ह्या कार्यास एक सामुहिक प्रतिनिधित्व प्राप्त होईल. सदरील शोधाभ्यासात नाडिज्योतिषाप्रमाणे जातकास सांगण्यात आलेले भविष्य हे खरोखरच कथनाप्रमाणे सत्य ठरते काय? ह्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा: १. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय; २. लेखन केले असल्यास अ. ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते, ब. त्या भाषेस काही व्याकरण आहे काय, क. व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा; ३. लेखनामध्ये खरोखरच भविष्यकथन केलेले असते काय, ४. त्यायोगे जर कां नाडिपट्टीमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या गोष्टीचा शोध घेण्यात यावा. असे विषय ह्या शोधाभ्यासानिमित्ते चर्चिल्या जावेत. हे मुद्दे सिद्ध झालेच तर तेथून पुढे ’भविष्यकथन बरोबर येते की नाही’ हा विषय चर्चिल्या जाऊ शकतो. श्री. घाटपांडे सरांनी तथा इतर मिपाकरांनी माझ्या सूचनेबाबत आपले विचार व्यक्त करावेत. शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा. नाडी भविष्य - एक चिकित्सा प्रेषक प्रकाश घाटपांडे दिनांक Sat, 20/09/2008 - 12:46 ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ? यात आपण आपला वेळ पैसा श्रम किती खर्च करावा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.नाडी केंद्र जेव्हा पुण्यात फोफावली तेव्हा आम्ही नाडी केंद्राचा अनुभव स्वतः घेतला आहे. नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष..... ...... पाखंडी लोकांचे प्रश्न आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे हैयोंचे म्हणणे... (प्रकाशकाका) आपण म्हणतां तसे ह्या पाखंडी प्रश्नांची उत्तरे नाडिवाचक लोक अधिकारवाणीने देऊ शकतीलही. परंतु मी येथे आधीच म्हटल्याप्रमाणे; एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व चिकित्सकांस मान्य नसल्यास 'ती तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे चिकित्सकाचे उत्तरदायित्त्व ठरते. नाडिग्रंथांच्याबाबतीत 'अस्तित्त्व दाखवा' असे आपण म्हणाल, तर नाडिवादी मंडळी अस्तित्त्व दाखविण्यास सिद्ध आहेतच. परंतु मग ती चिकित्सा कशी होणार? थोडक्यात काय, तर सदरील प्रश्नांची उत्तरे नाडिग्रंथवादींनी दिली, तर त्यावर तुमचा विश्वास बसणार आहे काय? आणि जर तुमचा तसा विश्वास बसणार असेल, तर मग चिकित्सकांचे आणि त्यांच्या तथाकथित चिकित्साकांडाचे महत्त्व ते काय?
प्रतिक्रिया