Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समजत नाही..

ग — गवि, गुरुवार, 02/24/2011 - 15:28
जांभुळ संध्या गडद निळाई.. कुपात बूर्ज्वा मंडूक राही.. वरील काही समजत नाही.. चक्षु मुमुक्षु आर्त प्रवाही.. सुके धुके परि वखवख काही.. वरील काही समजत नाही.. प्रसव वसव किती वेणा साही.. पार्थिव देही गांडीव वाही.. वरील काही समजत नाही.. जूनून बोसा इश्क तबाही.. शब्द घोळ अन काही बाही.. वरील काही समजत नाही..

प्रतिक्रिया द्या
2712 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
स्पंदना गुरुवार, 02/24/2011 - 15:35 नवीन
गवी गेले कामातुन. तुम्ही विमानातच बरे होतात हो! खाली उतरल्या बरोबर जालंदर बाबांनी दिली ना दिक्षा? अवांतरः शब्द बंबाळ काव्य अतिशय सुरेख जमलय.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 02/24/2011 - 16:03 नवीन
आयच्यान १००१% वेळा सहमत गं अपर्णा! आता काही खरं नाही गविंचं! आता दिसला शब्द की फिरव चरकातून, दिसला शब्द की फिरव चरकातून.... नुसतं भुस्काट पाडणार हे सुध्दा! अवांतरः शरदिनी, अगं आहेस कुठं? बघ तुला कांपिटिशन आली..आता तुझ्या व्यग्रतेतून थोडा वेळ काढून दर्शन दे भक्तांना. ;) ओ नानबाऽऽ.. ह्या शरदिनीलाही घ्या बरं जरा डोक्यात तिडीक आणणारे मिपाकरमध्ये. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पैसा गुरुवार, 02/24/2011 - 15:41 नवीन
शरदिनीबै सारखं एखादं फक्कड नाव तरी घ्यायचं होतं! गगनविहारिणी वगैरे....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/24/2011 - 15:46 नवीन
बरेच शब्द खरेच कळत नाहिये ... आता कवीनेच वरील कळत नाहि म्हंटल्यावर .. बिच्चार्‍या वाचकाने गप्पच बसावे .. अवांतर : गगनविहारी यांची कविता म्हंटल्यावर पहिलीच की काय असे वाटुन आता पाहिले, क्लिक करते पर्यंत असे वाटत होते की ... विमान प्रवासावर तर नाहि ना विमानाचे मनोगत : (असेच टाईमपास) जांभुळ संध्या गडद निळाई.. (मस्त शब्द आहेत हे तुमचे ) विमानाची या मस्त सफारी .. कुणा कसे हे समजत नाही हवा निराळी मस्त प्रवाही ढगांचे धुके मस्त लहरी कुणा कसे हे समजत नाही इकडुन तिकडे कीती उडावे इंजीनाचा धुराडा होई कुणा कसे हे समजत नाही बसलेत सारे .. मस्त विमानी धावपट्टीची वेगळीच कहाणी कुणा कसे हे समजत नाही --- गगनविहारींचे विमान
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 02/24/2011 - 15:53 नवीन
ओ हो! गणेशा? विडंबनावर काव्य? उलटा प्रवास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मदनबाण गुरुवार, 02/24/2011 - 16:12 नवीन
इमान किंवा हवाई अड्डा या पैकी नक्की काय गंडल ? ;) कॄ.ह.घे. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ गुरुवार, 02/24/2011 - 16:14 नवीन
गगनविहारी -खूप मस्त वाटले .छान. खूप जुनी आठवण झाली . लहान होतो.बाबा सरकारी कचेरीत त्यांचे ईंग्रजी अक्षर बघून मी त्यांनीच आणलेल्या कागदाची छान वही करून तसेच काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला काम करणारा रामाने ती वही बघितली .दादाचे कामाचे असेल म्हणून बाजूला ठेऊ लागला मला मोठी गमत वाटली हमभी कुछ कामके आपले वाचून जुनी आठवण चालवली. मजा आली. आपण मात्र खूप छान लिहिले. वाटले. जुन्या आथ्व्निबद्दल खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 02/24/2011 - 21:21 नवीन
शरदीनीतैंना घेउन गेल्ता का काय इमानातुन फिरवायला?
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 02/25/2011 - 06:39 नवीन
सुरेख शब्दखेळ ... शब्दकळा !!! ..... कविता थोडीफार समजते आहे असे वाटते . क्रमशः आहे का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा