Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"*जग साल्या जग"

ज — जगप्रवासी, Fri, 02/25/2011 - 11:01
कधी कधी आयुष्य असच रेटत असताना अगदी थकायला होतं. आपलं aim , ambition असच राहून जातं नि मग आतून एक आवाज येतो, तो कुणाला गुरु सारखा येतो, कुणाला मार्गदर्शाकासारखा तर कुणाला अगदी मित्रा सारखा कि "*जग साल्या जग".* जग साल्या जग, अंगात रग असेल तोवर जग. पाठीवरती घेऊन आभाळ, पुन्हा आभाळालाच बघ....., जग साल्या जग. धावत जाऊन सुर्यापाशी मुठभर त्याचे तेज आण, आणि मग जीवनाच्या ज्योतीला सांग,हवे तसे तग...., इतका प्रचंड वेग आण नि वादळाहून तेज हो, तुला आडवणाऱ्या पर्वतांची राख, क्षणात होईल मग.... कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना, कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग...., इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल, उरलेल्या निखार्यांचीही हि आगेलाच लागेल धग....., काबीज कर एक एक तर नि अंतरीक्ष सारा, डोईवर तू असशील त्यांच्या नि तुझ्या पायाखाली ढग...., जग इतक अर्थपूर्ण कि वेदांच्या ओवीतून तू उमग, विशाल हो इतक कि सागराच्या तहानेलाही लागेल तुझी तगमग... जग असा होऊन निडर कि आदर्श होशील जगण्याचा, नंतर देवही येऊन सांगेल हाच माझा खरा जिवलग....., जग साल्या जग... अंगात रग असेल तोवर जग..... आंतरजालावरून साभार जगप्रवासी

प्रतिक्रिया द्या
1150 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 02/25/2011 - 11:05 नवीन
कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना, कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग...., इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल, उरलेल्या निखार्यांचीही हि आगेलाच लागेल धग....., फार सुंदर आहेत या ओळी...... आवडली कविता.... कविचे नाव कळले असते तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा