Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समुद्र किनारा आणि मी..

न — निनाव, Fri, 02/25/2011 - 18:37
सकाळी सकाळी समुद्र किनार्या वर उघड्या पायांनी चालतांना उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतांना आणि डुलणार्या होडी पाहतांना तुझीच आठवण येते दूर नभात उजाड्तांना थंड लाटा भिजवतांना पायात शिंपले टोचतांना तुझीच आठवण येते किनाऱ्याची मिठी मारतांना लाटांचे फेस जवळ येतांना सुसाट वारा केस उडवतांना तुझीच आठवण येते एका हातात चपला धरूनी चालतो आहे मी काही शोधत खाली बघत पण खंर तर काहीच दिसत नाही मला आणिक काहीच ऐकू येत नाही सगळे जसे थांबले आहे ...आणि ... भासते अचानक मला... त्या लाटा आत्ता पाण्या च्या नाहीत त्या तुझ्या बरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या आहेत जे आदळत आहेत मना वर माझ्या .. एक एक करूनी असे वाटते किनारा कधी संपूच नये लाटा ह्या थांबूच नये अन मग अचानक शिंपले टोचते पाया अन मी पुन्हा येतो .. समुद्र किनार्या वर ओल्या लाटांमध्ये अन ..जाणवते किती लांब आलो मी निघून.. मग...मागे वळून बघतांना तुझीच आठवण येते....

प्रतिक्रिया द्या
13945 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रकाश१११ Sat, 02/26/2011 - 04:56 नवीन
निनाव - समुद्र किनार्या वर ओल्या लाटांमध्ये अन ..जाणवते किती लांब आलो मी निघून.. मग...मागे वळून बघतांना तुझीच आठवण येते... छान लिहिले आहे
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sat, 02/26/2011 - 05:02 नवीन
असे वाटते किनारा कधी संपूच नये लाटा ह्या थांबूच नये
कविता छान आहे. आवडली मनापासुन. समुद्र किनारी गेल्यावर नेमके असेच भाव मनात येतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा