उजाडलेच नाही आज...
उजाडलेच नाही आज
दिवस होते झोपून
रात्री ने सोडले नाही हात
तिच्या गोड कुशीतून
मी राहिलो पाहत वाट
होते तिला भेटायचे
दिवस कुठे उजाडे
कधी त्यास कळायचे
जेंव्हा होते प्रेम
होतात दिवस छोटे
विरह भेदते मनाला
सरता न रात्र सरते
शोधू लागलो वाटा
अंधारातच तिच्या ओढी
कुठे होते ठाऊक वाट ही
थेट स्वप्नात तिच्या पोहोचते
उजाडलेच नाही आज
दिवस होते झोपून
रात्री ने सोडले नाही हात
तिच्या गोड कुशीतून
💬 प्रतिसाद
(2)
P
pramanik
Fri, 02/25/2011 - 19:09
नवीन
प्रेम म्हणजे वासनाच नाही,प्रेम जरा साफ मनाने करावे म्हणजे रात्र हात नाही सोडत.
- Log in or register to post comments
न
निनाव
Fri, 02/25/2011 - 19:14
नवीन
:)
|मामक चेष्टालु प्रकृत्ति,मामक क्रोध,मामक स्नेह|
|सर्व शुभ,सर्व क्षोभकर|
--- आपल्या "प्रामाणिक" सल्ल्याची नोंद घेण्यात आली आहे .. ! ;)
- Log in or register to post comments