Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.

न
नीलकांत यांनी
Fri, 02/25/2011 - 19:31  ·  लेख
लेख
नमस्कार, मिसळपाववरील नवीन सदस्यांसाठी उपयोगास येतील अशी मदत पाने सध्या मी बनवतोय. याच वेळी नवीन सदस्यांना जुणे सदस्यं जे लघुरूपे वापरतात त्याची एका जागी माहिती दिली तर योग्यं होईल अशी कल्पना आली. मात्र माझ्याजवळ अशी यादी तयार नाही. मला येथे तुम्हाला माहिती असेल ती मराठी आंतरजालावर वापरली जाणारी मराठी लघुरूपे द्यावीत ही विनंती. माझे योगदान :- प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे. पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा कलोअ - कळावे लोभ असावा. मग तुम्ही काय सुचवताय? :) - नीलकांत

प्रतिक्रिया द्या
159542 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

इ
इन्द्र्राज पवार Fri, 02/25/2011 - 20:18 नवीन
चांगले मार्गदर्शन. पण मी इथे सदस्य झाल्यापासून एकदाही (मग ते स्वतंत्र लिखाणात असो वा प्रतिसादात असो) लघुरूप वापरलेले नाही. तथापि याचा अर्थ असा नव्हे की तसे रूप कुणीच कधी वापरू नये. शासन आणि मराठी साहित्य महामंडळाने 'शुद्ध' लिखाणासाठी (व्याकरणदृष्ट्याही आणि अचूकतेनेदेखील) लिहिण्यासाठी एक स्वतंत्र अशी नियमावलीही प्रसिद्ध केली आहे. जर संपादक मंडळाची इच्छा असेल तर ते नियम कधीतरी येथे धागारूपानेही देता येतील, जेणेकरून नवीन सदस्यांना 'सुंदर' मराठी लिहिण्यास (म्हणजेत इथे टंकण्यास) ते फार उपयुक्त ठरतील. मी नोंद केले आहे वेळोवेळी की, बरेच सदस्य (त्यातल्या त्यात नूतन) फार चुकीचे मराठी टंकलेखन करतात. ते त्यांच्याकडून होते की, मुद्दाम केले जाते या संशोधनाचा विषय नसला तरी विचार करण्यासारखा आहे. कारण एखाद्या सदस्याने इथे मांडलेल्या धाग्यातील विषय जरी अभ्यासपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या चर्चा योग्य वाटला तरी त्या लिखाणातील अशुद्धतेमुळे तिकडे दुर्लक्ष केले जाते. (इतकेच काय गंभीर विषयाचीही त्यामुळे टवाळकी होत जाते). सबब, 'सवयी' नेच मराठी टंकलेखनात सफाई येऊ शकेल इतकेच म्हणू शकतो. दरम्यान टंकनाचा बोजा वाटू नये म्हणून वर श्री.नीलकांत यानी म्हटल्याप्रमाणे लिखाणात काही लघुरूपे वापरल्यास गैर नाही, पण तो नित्याच्या सवयीचा भाग बनू देऊ नका इतकीच मराठी भाषाप्रेमी म्हणून विनंती करतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
द
दिलीप कुडतरकर ठाणे Wed, 03/06/2019 - 16:17 नवीन
इन्द्र्राज पवार यांनी सुचवल्या प्रमाणे आपल्याला लिहावयाचा मजकूर शक्य तो शुद्ध मराठीत लिहावा. कोणत्याही कामात सवाईने (किंवा सरावाने ) सफाई येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ब
बबलु Fri, 02/25/2011 - 20:24 नवीन
ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. --- ह्याचे प्रमाण किती ते माहित नसेल तर आपण स्वयंपाकघरात पाय ठेवायच्या लायकीचे नाही असे समजावे. उदाहरणार्थः- चवीपुरते मीठ घाला, फोडणीसाठी तेल (ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स.)
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 02/25/2011 - 20:24 नवीन
चांगला आणि उपयुक्त प्रकल्प! यामध्ये एक महत्वाचे विसरू नका: "ह.घ्या." अर्थात "हलकेच घ्या" / Take it easy! :-) आणि त्याचे मोठे भावंड: "ह.घ्या.हे.वे.सां.न.ल." - हलकेच घ्या हे वेगळे सांगणे न लगे आणि हो: मिपा म्हणजे मिसळपाव ;)
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Fri, 02/25/2011 - 20:27 नवीन
मला वाटायच की पु. ल. देशपांडेंसारख लिहिलय म्हणून पुलेशु... रच्याकने म्हणजे काय? हे मी मायबोलीवर बर्याच वेळेला पाहिल आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 02/26/2011 - 06:12 नवीन
रस्त्याच्या कडेने by the way
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
आ
आनंदयात्री Fri, 02/25/2011 - 21:00 नवीन
हे घ्या मग ;) चहा = चड्डीत रहा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/25/2011 - 21:01 नवीन
वा वा : म्हणजे वाह वाह , स्तुती करणे वगैरे या अर्थी !
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 02/25/2011 - 23:43 नवीन
छान कल्पना आहे. बाडीस! आयो- परा(१), परा(२), धमु, पिडां........ आणखी पर्वा सुका पण वाचले होते. . तटी- आयो- आमचेही योगदान बाडीस- बाय डिफाल्ट सहमत तटी- तळटीप
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 02/26/2011 - 00:35 नवीन
मला असं वाटतं की नुसती लघुरूपंच नाही, तर इथे वापरली जाणारी भाषा, शब्दप्रयोग हेही अंतर्भूत करावेत. मराठी भाषेला ही नवीन तंत्रज्ञानाने दिलेली देणगी आहे. उदाहरणार्थ - इनो घेणे - ह्यापी बड्डे . . . राजेश
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 02/26/2011 - 04:49 नवीन
प्रगल्भ व्हा, हा एक हल्लीच कळलेला एक वाक्प्रचार.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 02/26/2011 - 05:26 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा.... एखाद्याने पर्सनल टीका वगैरे केली असता त्यावर द्यायचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 02/26/2011 - 05:27 नवीन
ही & हि = हीन आणि हिणकस
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sat, 02/26/2011 - 06:16 नवीन
हीण आनी हिणकस असं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गवि Sat, 02/26/2011 - 05:58 नवीन
तीनचार महिन्यांत ब-याच शंका दूर झाल्या पण मी तसा नवीन असल्याने माझ्या काही उर्वरित शंका. कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत? विदा म्हणजे काय? रिक्षा फिरवणे,बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय? डायरीचा अर्थ समझींग्ड पण सत्कार म्हणजे काय? ..अज्ञपणाबद्दल माफ़ी..
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sat, 02/26/2011 - 06:20 नवीन
कोदा हे कुणाचे असे सम्बोधन नाही. पण हे एक आन्तर जालीय रोगचे नाव आहे. म्हणजे एखादा उगाचच माझा लेख वाचा, मला प्रतिक्रिया द्या, किंवा शायनिंग मारत असेल तर त्याला कोदा झाला असं म्हणण्यात येते. थोडक्यात, तो एक वाकप्रचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मस्त कलंदर Sat, 02/26/2011 - 06:24 नवीन
कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत?
पूर्वी मिपावर सदस्याला स्वतःच सदस्यनाम बदलण्याची मुभा होती. काही नांवे त्यातून प्रचलित झाली आहेत.. कोदा=कोल्हापुरी दादा=विनायक पाचलग, मास्तर्=प्रभु मास्तर्=विनायक प्रभु गुरूजी नव्हे हो.. गुर्जी... तर, ओरिजिनल गुर्जी/गुर्जी नं१ : राजेश घासकडवी, गुर्जी नं२: चिंतातूर जंतू.. टीपः हे ड्युप्लिकेट गुर्जी नाहीत... आता त्यांना गुर्जी का म्हणतात याचा अभ्यास स्वतःच करा...
विदा म्हणजे काय?
इंग्रजी शब्दास मराठी प्रतिशब्दः डेटा. यावरून विदागारःडेटाबेस असाही शब्द आहे.
रिक्षा फिरवणे,बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय?
मिपावरची जुनी पाने चाळून पाहिलीत तर काही अपशब्द दिसतील. त्यांची ही आधी टारझनने आणि मग त्याच्या पावलावर पाऊल टाकून इतरांनी केलेली + त्या अपशब्दांच्या जागी वापरली जाणारी ही विडंबनं आहेत. भावना पोचल्याशी मतलब... हाकानाका...
डायरीचा अर्थ समझींग्ड पण सत्कार म्हणजे काय?
सरकारनामा मध्ये करतात तोच.. फक्त इथे लेखणीने करतात.... आणि हो....रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने=बाय द वे... तिथे बर्‍याचशा शब्दांचे शब्द्शः भाषांतर पाहिलेय. पण कहर म्हणजे एके ठिकाणी (हे बहुधा मनोगत असावे) लॅपटॉपसाठी 'मांडीवर'(!!!) असा शब्दप्रयोग केलेला वाचलाय.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sat, 02/26/2011 - 09:36 नवीन
सरकारनामा मध्ये करतात तोच.. फक्त इथे लेखणीने करतात.... काय सांगता..? हे व्याडेश्वरा...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
ग
गोगोल Sat, 02/26/2011 - 06:27 नवीन
म्हणजे एखादा फक्त त्यालाच द्वयअर्थी सन्वाद समजतात किंवा करता येतात अशा भ्रमात राहीला लागला, किंवा फक्त आपण आहोत म्हणूनच जग चाललय, किंवा आपल्याला एखाद्या ओब्स्कुअर विषयाबद्द्ल (जसे की स्वतः ईन्जिनियर असताना कोम्बडी पालन ई ई) पुर्वानुभव नसताना देखील आपण त्या क्षेत्रातील तज्ञ माणसचे प्रोब्लेम्स फिक्स केले, किन्वा आपण कूलेस्ट डॅड असल्याची स्वप्ने पडू लागली कि म्हणतात .. सम्भाळ रे बाबा तुझा आज काल मास्तर होत चालला आहे.. हा ही एक वाकप्रचार असून, कुणाचेही सम्बोधन नाहे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
इ
इन्द्र्राज पवार Sat, 02/26/2011 - 06:26 नवीन
श्री.गगनविहारी....मी स्वतः इथे नवीन होतो त्यावेळी मलाही नेमके हेच प्रश्न पडले होते, पण वेळोवेळी झालेल्या चर्चा, संवाद यातून या लघुरुपांचे 'गूढ' इथल्याच सदस्यांनी उलगडले होते : कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत? ~ कोदा = कोल्हापुरी दादा.....हा 'मान' श्री.विनायक पाचलग या सदस्यास त्यांच्या मिपामित्रांनी बहाल केला आहे. [श्री.पाचलग हे कोल्हापूरचे असल्याने.....मात्र ते 'दादा' कसे वा का झाले याचा विदा नाही]. मास्तर = बहुधा श्री.भडकमकर मास्तर याना उद्देश्यून असावे. गुरुजी (किंवा प्रेमाने गुर्जी) = श्री.राजेश घासकडवी याना म्हटले जाते (माझी माहिती चुकीचीही असू शकेल, पण कित्येक वेळा श्री.घासकडवी यांचा असा उल्लेख झालेला वाचला आहे.) विदा म्हणजे काय? = याचा अर्थ "Data".... विदा हे लघुरूप नसून संगणक भाषेत वापरण्यात येणारे नाम झाले आहे. बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय? ~ यातील 'बसवला टेंपोत' हा इथला वाक्यप्रचार असावा असे वाटत नाही. राजकीय धुमश्चक्रीत (विशेषतः साखर कारखान्याच्या निवडणूक काळात त्यावेळेपुरते एखाद्या गटाला "किडनॅप" केले जाते) धोकादायक मतदाराला आमीष दाखवून जर तो बधत नाही असे दिसले की त्याला मतदान तारखेपर्यंत 'आत' घातले जाते....याला पश्चिम महाराष्ट्रात 'बसवला टेंपोत आणि डाळला...' असे कुजबूजत म्हटले जाते. राहिलेल्या अन्य संज्ञाबद्दलचे अर्थ जाणून घेण्यास मीही उत्सुक आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sat, 02/26/2011 - 09:39 नवीन
>>श्री.पाचलग हे कोल्हापूरचे असल्याने.....मात्र ते 'दादा' कसे वा का झाले याचा विदा नाही कमाल आहे , विदा नाही म्हणजे ? विकीवर अजुन कोणी टाकले कसे नाही हे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
व
विकास Sat, 02/26/2011 - 21:41 नवीन
>>>विकीवर अजुन कोणी टाकले कसे नाही हे?<< मिपाजगतात, विकी हे देखील एका जुन्याजाणत्या सदस्याचे नाव आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
ग
गवि Sat, 02/26/2011 - 09:44 नवीन
विदा म्हणजे डेटा.. हे ठीक.. पण विदा असा मूळ शब्द आहे का? जेनेसिस काय असावा या दोन अक्षरांचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
N
Nile Sat, 02/26/2011 - 10:01 नवीन
आमचे एक काका होते, (म्हणजे इथे होते, आता नसतात(म्हणे)) त्यांच एक वाक्य सांगतो. "विदा हा शब्द वापरणारा म्हणजे फारतर तिघातला एक" .. अर्थात जुनी गोष्ट आहे पण तुम्हाला भलत्या शब्दांच्या जन्माचे डोहाळे लागलेत म्हणुन आपली एक चिंच दीली तुम्हाला. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पक्या Sat, 02/26/2011 - 20:43 नवीन
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बसवला टेंपोत हा इतका सरळ अर्थावरून आलेला शब्द नाहिये. पूर्वी येथे 'बाझवला भेंXX ' (XX च्या जागी च आणी त ची रूपे घालावीत ) हा शिवी कम वाक्प्रचार सर्रास वापरात असे. त्याचे श्री . मा. टारझन यांनी सौम्य भाषेत बसवला टेंपोत हे रुप आणले. अजून एक इथे रूळलेला वाक्प्रचार - बाजार उठला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Sun, 02/27/2011 - 07:53 नवीन
वेल....तुम्ही म्हणता तेही (उग्र) रूप असू शकेल टेंपोचे. पण कोल्हापूर भागात साखर कारखाना परिसरात भरत असलेल्या साप्ताहिक बाजारात टेंपोतून कोंबड्यांची आवक-जावक मोठ्या प्रमाणावर होते. व्यवहार होताना-ठरताना कित्येकदा विक्रेते, घेवारी आणि दलाल यांच्यात हाणामारीचे (कित्येकदा दिखावूदेखील) प्रसंग येतात. मग दोन कमी, दोन जास्त असे करत तो दहावीस कोंबड्यांचा पेटारा (इकडे "डालगे" म्हणतात) उचलायचे आणि आपल्या टेम्पोत टाकायचे....याला "डाळणे" म्हटले जाते. "डालगे डाळले एक्दासे, लई टिवटिवत होता लेकाचा..." अशी फुशारकीदेखील घेवारी मारतो....म्हणजे देणार्‍याच्या मनात नव्हते पण घेणार्‍याने "ट्रिक" लढवून तो व्यवहार केलाच असा याचा अर्थ. हाच वाक्यप्रचार पुढे निवडणुकींच्या गदारोळातदेखील परफेक्ट फिट बसला....म्हणजे 'अमुक एक गट बडेजाव मारत होता, पण उचलला बसवला टेम्पोत आणि डाळला...!" इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
म
मी_ओंकार Sat, 02/26/2011 - 09:24 नवीन
केसुगुर्जींना विसरून कसे चालेल. प्रतिसाद अवांतर होऊ नये म्हणून आमची भर आंजा / अंजा - आंतरजाल
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 02/26/2011 - 09:26 नवीन
~ कोदा = कोल्हापुरी दादा.....हा 'मान' श्री.विनायक पाचलग या सदस्यास त्यांच्या मिपामित्रांनी बहाल केला आहे. [श्री.पाचलग हे कोल्हापूरचे असल्याने.....मात्र ते 'दादा' कसे वा का झाले याचा विदा नाही]. माझ्या माहितिनुसार कोल्हापुरी दादा हा त्यान्चा आधी आयडी होता. सो कोल्हापुरी दादा = कोदा =)) =))
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 02/26/2011 - 10:37 नवीन
हाकानाका = आहे काsssssय आन नाही काय
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 02/26/2011 - 20:44 नवीन
हाकानाका - हाय काय नाय काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
प
प्रास Sat, 02/26/2011 - 11:04 नवीन
हे बाकी छान झालं. मी देखिल अनेक दिवस चक्रावल्यासारखे हे कोदा, विदा, पुलेशु, मास्तर, गुर्जी इ. इ. शब्द नि रिक्षा फिरवण्यासारखे भाषाप्रयोग वाचत होतो. आता बरंच काही समजायला लागल्यागत वाटतंय. नीलकांत, गगनविहारी, मस्त कलंदर, इन्द्रा, गोगोल आदि दोस्तांना धन्यवाद! आणखीही अशा प्रकारचे मिपा-ष्टाईल ज्ञान असेल तर मिळवण्यास उत्सुक......
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 02/26/2011 - 11:18 नवीन
आमलेट घ्या आमलेट !! काढा शोधुन ;) मला झोपाळ्यावाली ;) (चुचु) चा संपुर्ण विदा पाहिजे आहे ..कोणी मदत करणार का ?
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 02/27/2011 - 10:17 नवीन
प्यार्टी = पार्टी पण विशिष्ट ठिकाणी केलेल्या पार्टीलाच 'प्यार्टी' म्हणतात. जाणकार लोक ती जागा सांगतील. श्री श्री छो. डान्रावांना हा प्रतिसाद समर्पीत!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 02/28/2011 - 02:44 नवीन
राको म्हणजे काय ते कळू शकेल काय?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 02/28/2011 - 05:37 नवीन
राको = राजकिय कोलॅबोरेटर बाकी जास्त स्पष्टीकरण देणे आमच्या पक्षशिस्तीच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकण्याची शक्यता असल्याने आम्ही इथेच पुर्णविराम देतो. ;) - ( आद्य राको ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 02/28/2011 - 07:13 नवीन
धन्यवाद डॉनराव! जास्त स्पष्टीकरण देणे शक्य नसले तरी हरकत नाही, उगाच पक्षशिस्तीचा भंग होऊन छोटा डॉन चा छोटा अमर नको व्हायला. आम्हीच दिलेल्या दिशेने अभ्यास वाढवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
परिकथेतील राजकुमार Mon, 02/28/2011 - 09:29 नवीन
ह्या सगळ्या गदारोळात 'चोप्य पस्ते' शब्द राहिला की ;) चोप्य पस्ते = copy paste
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/28/2011 - 09:33 नवीन
अच्र्त ब्व्लत हे स्त्रीसुलभ शब्द राहिले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मैत्र Wed, 03/23/2011 - 06:27 नवीन
काय परा... 'चोप्य पस्ते' बरोबर चोता दोन कसा काय विसरलास ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/28/2011 - 15:16 नवीन
WPTA = Wise People Think Alike ... जेव्हा दोन माणसे एकाच वेळी सारखेच मत मांडतात
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 02/28/2011 - 18:19 नवीन
आंजा - आंतरजाल (विस्तृत रूपं सुचत असली तरी गांजा हे लघुरूप मी वाचलेलं नाही) मोठे व्हा - बऱ्यापैकी शब्दशः अर्थ, पण बुद्धीने मोठे व्हा असा प्रेमळ सल्ला. त्यामागे एक ठसका आहे. त्यासाठी आजकाल 'प्रगल्भ व्हा' हा शब्दप्रयोगही वापरता येईल तुमचा अभ्यास अपुरा पडतोय - पुन्हा बऱ्यापैकी शब्दशः अर्थ पण ठसक्यासहित. अमुकतमुक गोष्टींचे संदर्भ तुम्हाला ठाऊक नाहीत. विरोप - इमेलसाठी प्रतिशब्द वाचलेला आहे. कितपत प्रचलित आहे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/02/2011 - 07:39 नवीन
ई-मेल = इलेक्ट्रॉनिक मेल = विद्युत पत्र = विपत्र किंवा विद्युत निरोप = विरोप (माहीतगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ज
ज्ञानेश... Wed, 03/02/2011 - 08:20 नवीन
चपला घालून चालू पडणे= सदस्यत्व रद्द करणे. मागे ते चांदण्या देणे वगैरेपण जोरात होते. तसेच ड्व्लोले पानावले, वाढदिवसाच्या शुभेच्छा इत्यादि आहेतच.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Wed, 03/02/2011 - 12:40 नवीन
खवउपा = खरडवही उचकपाचक: इतर सदस्यांच्या खरडवह्यांमध्ये चाललेले सुखसंवाद वाचणे व त्यातून रंजन, ज्ञान, गॉसिप आदी धनप्राप्ती करून घेणे. शक्यतो अशा मौलिक गोष्टींचा (लगेचच किंवा नंतर कधीतरी) यथायोग्य वापर करणे व त्याद्वारे आपले ज्ञान पाजळणे, इतरांना 'आमचे तुमच्यावर लक्ष आहे!' असे लक्षात आणून देणे किंवा इतरांचे रंजन करणे हेही यात बर्‍याचदा अभिप्रेत असते. थोडक्यात, वाटून घेतल्याने ज्ञान, रंजन, व गॉसिप वृध्दिंगत होते याचा पडताळा देणे. टीपः या दुव्यावर आज कुणाकुणाच्या खरडवह्या तेजीत आहेत ते कळते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/23/2011 - 05:53 नवीन
डायरी देणे म्हणजे काय? आणि प्र.का.टा.आ .......... का? कोण काधुन टाकत?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Wed, 03/23/2011 - 09:12 नवीन
हाच प्रश्न मी बर्‍याच जणांना विचारला होता.... त्याचे निरसन झाल्यावर मला कळालेले असे की.... कोणी उगाच काहीही धागे काढत असतील तर त्यांना ते सर्व इथे (मिपावर) न लिहिता इतरत्र कुठेही लिहिण्याचे आवाहन/तंबी /विनंती .(ज्या सदस्याने केलेली आहे त्यावर ह्यांचे स्वरुप अवलंबुन असते.) तर हे इतरत्र म्हंजे डायरी. तसेच एकच प्रतिसाद २ वेळा चुकुन तंकल्या गेला असल्यास तसे आपण (सदस्य) स्वत:च संपादित करुन टाकता येण्याची सुविधा म्हंजे प्र.का.टा.आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
महेश काळे Fri, 03/25/2011 - 13:51 नवीन
हा मझ्या मीत्राचा ब्लॉग वाचा... येथे खुप आहेत.. http://snvivi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/31/2015 - 13:48 नवीन
सुंदर माहीती ! !
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 05/12/2015 - 20:54 नवीन
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी "कट्टोत्सुक" हा आणखी एक मिपा-स्पेशल शब्द जन्माला घातला आहे :-)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 05/12/2015 - 23:29 नवीन
आणि बहुतेक "कट्ट्याला येणार, येणार" म्हणून अखेरीस न येणार्‍यांना उद्देशून असावा असा 'टांगारू' हा शब्द यशोधरा यांनी वापरलेला असावा असं दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा