Welcome to misalpav.com
लेखक: अवलिया | प्रसिद्ध:
विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेकांचे योगदान लाभले त्यातील एक अग्रणी नाव. या नावाचा उल्लेख केल्याखेरीज भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची कथा पूर्ण सांगितली जाणार नाही. राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी जवळपास सर्वच क्षेत्रात सावरकरांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला आहे यात शंका नाही. दूरदृष्टी असलेला द्रष्टा नेता हे बिरुद ज्या थोड्या लोकांना शोभुन दिसते अशांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांच्या मतांचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ती मते मानता किंवा मानत नाही पण तुम्ही त्यांच्याकडे दूर्लक्ष करुच शकत नाही, तुम्हाला दखल घ्यावीच लागते. सावरकरांचे जीवन म्हणजे एका चिवट माणसाची यशोगाथा आहे. जन्मठेपेची शिक्षा मिळूनही ज्याचा उत्साह आटला नाही असा हा नरवीर पुन्हा होणे नाही. आज २६ फेब्रुवारी. सावरकरांची पूण्यतिथी !! भारतमातेच्या या महापुरुषास विनम्र अभिवादन !!


प्रतिक्रिया

लेखक, कवी, फर्डा वक्ता, भाषाशुद्धी, समाजकारण आणि स्वातंत्र संग्रामातील धडाडीचा नेता. स्वा. वि.दा.सावरकर यांच्या ४५व्या पुण्यस्मरण दिनी त्यांना सादर प्रणाम.

महान विचारवंत, साहसी योद्धा आणि द्रष्टा नेता असलेल्या या नररत्नाच्या स्मृतीस अभिवादन! लक्षात ठेवून हा धागा काढल्याबद्दल अवलियांना धन्यवाद!

"....वेद-गीता-उपनिषदे आदी ग्रंथ पूज्य आहेत. आदरणीय आहेत. तेवढेच पुरे. ते परमप्रमाण नसावेतच. या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करावयाची ती, प्रत्यक्ष ऐहिक नि विज्ञाननिष्ठ तत्त्वावरच केली पाहिजे....". ...आज विज्ञानाच्या नावावर भरार्‍या मारणार्‍यांना हे समजले तर आश्चर्य वाटेल की "विनायक दामोदर सावरकर" नावाच्या आपल्यातीलच एका व्यक्तीने सुमारे शंभर वर्षापूर्वी विज्ञानाची महती सांगणारा हा विचार मांडला होता. ज्यांचे नाव समोर येताच 'हिमालया' समोर उभे राहिल्याचा भास होतो त्या 'वि.दा.सावरकर' यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! इन्द्रा

त्यांच्या रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरासमोरच माझी शाळा होती. आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमधली त्यांची कोठडी पाहण्याचं भाग्य लाभलं. आयुष्यात एकदाच उत्स्फूर्तपणे साष्टांग नमस्कार घातला होता तो तेव्हा. आज त्यांच्या स्मरणार्थ / गौरवार्थ तिथे पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमधे समारंभ आयोजित केला आहे. ही विशेष आनंदाची गोष्ट आहे.

ह्या महान क्रांतिकारी द्र्ष्ट्या पुरुषाला शतशः अभिवादन. बालवाडीत शिकणार्या एका लहानग्या मुलीने सावरकरांची गोष्ट इथे खूपच ठसक्यात सांगीतली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर नावाची दिव्य ज्योत सदैव प्रखर राष्ट्राभिमानाचा व ज्वलंत राष्ट्रनिष्ठेचा अलौकिक संदेश देत आहे.व राहिल.. असीम त्यागाचे प्रतिक असलेल्या या अमर युगपुरुषाला विनम्र अभिवादन!

सावरकर हे एकूण आदरणीय आहेतच, पण विशेषतः राजकारणात असून स्पष्टवक्तेपणा व विज्ञाननिष्ठ या गुणांसाठी खासच आदरणीय. विनम्र अभिवादन.

स्वातंत्रवीरांना विनम्र अभिवादन.. त्यांच्या कोठडीचे दर्शन करण्याचे भाग्य लाभलेय मला.. अंगावर आलेला शहारा आणि दाटून आलेला कंठ.. आभाळाएवढा माणूस...

फार मोठा माणूस...फार फार मोठा! आपली साली लायकी नाही अश्या माणसाबद्दल दोन शब्दही बोलायची. तात्यारावांना साष्टांग प्रणिपात!

विशाव्या शतकाताच्या प्रारंभी स्वातंत्र्यप्राप्त्यर्थ सशस्त्र संग्रामाचा पाया घालणार्‍या या स्वातंत्र्यवीरास विनम्र अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर या युगपुरुषाला विनम्र अभिवादन.

वाचा सावरकरांची गांधी गोंधळ आणि इतर सर्व पुस्तके स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट च्या वेब साईट वर...