Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उल्का

स — सोनल कर्णिक वायकुळ, Sat, 02/26/2011 - 08:01
अंधाराच्या निसरड्या कातळावरून निसटून अवकाशाच्या खोल दरीत असहाय कोसळताना निर्वाणीची मदत मागणारे त्याचे दोन हात तुला दिसले नसणारच… त्याच काळ्या कभिन्न पोकळीत होरपळत अदृश्य झालेल्या त्याचं पुढे काय झालं असेल ही काळजी अस्फुटशी सुद्धा तुला शिवली नसेल याचीही खात्री आहेच पाहिलं मी तुला त्या रात्री स्वप्नांची झापड ओढलेल्या अनिमिष नेत्रांनी निखळणा-या ता-याकडे स्वतःसाठी अजून एक मागण मागताना

प्रतिक्रिया द्या
1706 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ग
गवि Sat, 02/26/2011 - 08:34 नवीन
क्या बात .. क्या बात्..क्या बात.. मिपावर मनापासून हार्दिक स्वागत. अत्यंत उत्कृष्ट रचनांची मेजवानी मिपाकरांसाठी चालून आलेली आहे. सोनल, तुझ्या ब्लॉगचा फॅन आहेच. इथे पाहून आणखीनच आनंद झाला.
  • Log in or register to post comments
न
निनाव Sat, 02/26/2011 - 09:02 नवीन
सुंदरच लिहिले आहे. अभिनन्दन.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 02/27/2011 - 03:21 नवीन
वा! मस्त! "स्वप्नांची झापडं ओढलेले अनिमिष नेत्र" !! आवडलं फार!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 02/27/2011 - 01:32 नवीन
मिपावर स्वागत. मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/27/2011 - 03:07 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/31/2011 - 00:00 नवीन
वेगळीच कल्पना. कोंबडीचा जीव जातो, आणि खाणारा म्हणतो वातड.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 03/31/2011 - 06:46 नवीन
अप्रतिम........
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/18/2013 - 13:23 नवीन
ही सुंदर कविता वर आणते आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 02/18/2013 - 15:43 नवीन
एक्सलंट ! अप्रतिम काव्य ! वाह!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 02/18/2013 - 17:01 नवीन
विलक्षण!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा