Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साम्य

च — चित्रा, Sun, 02/27/2011 - 20:55
नॅशनल जिऑग्राफिकमधील (फेब्रुवारी २०११) 'अंडर पॅरिस' या लेखामुळे आणि त्यातील काही छायाचित्रांमुळे सुचलेले हे मुक्तक. जागतिक मराठी दिनानिमित्त माझे (काहीच्या काही) योगदान. लेख इथे आणि छायाचित्रे इथे - http://ngm.nationalgeographic.com/2011/02/paris-underground/alvarez-photography ----------- वरच्या कोलाहलाला कंटाळून जेव्हा म्हटले जरा शांत अंधारात उतरून जाऊ तेव्हा पाहिले - तिथेही दंगलच माजली होती उतरत्या दगडी वाटांमध्ये लावलेले प्रखर दिवे भिंतींचा ओलसरपणा झाकायला लावलेला चुना आणि रंगीत डायनॉसॉर भिंतींमध्ये असलेली मेंदूरहित डोकी आणि राबलेली हाडे, नीटस रचलेली, अंगावर न येणारी जुन्या अस्तित्वांमधून जन्मलेल्या नवीन संततीवर मारले जाणारे शिक्के बघणारे लोक - सगळे काही तसेच होते

प्रतिक्रिया द्या
2090 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सहज Mon, 02/28/2011 - 01:36 नवीन
आ.त.क.फा.क. ना.* पण छायाचित्रांवरुन प्रेरीत कविता भारी वाटली. पण नक्की आहे की नाही ते माहीत नाही. :-) *आ.त.क.फा.क. ना. (आपल्याला तसे कवितेतील फारसे कळत नाही)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 02/28/2011 - 02:02 नवीन
छायाचित्रांवरुन प्रेरीत कविता भारी वाटली. पण नक्की आहे की नाही ते माहीत नाही. हे भारी वाटले :) आ.त.क.फा.क. ना. हे माझ्याही बाबतीत खरे आहे. पण इतके लोक काहीबाही लिहीत असतात तेव्हा आपणही लिहीली तर काय फारसे बिघडते या विचाराने लिहीली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/28/2011 - 04:18 नवीन
भिंतींमध्ये असलेली मेंदूरहित डोकी आणि राबलेली हाडे, नीटस रचलेली, अंगावर न येणारी वरील ओळी मला लै भारी वाटल्या.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/28/2011 - 04:23 नवीन
कविता, आणि त्यावरच्या चित्रा आणि सहज यांच्या प्रतिक्रिया दोन्ही भारी वाटल्या! (स्वगतः शरदिनी बैना बरेच शिष्य मिळालेले दिसतायत!)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 02/28/2011 - 04:28 नवीन
मुक्तक आवडले .. सर्व काही तसेच होते .... आहे .
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 02/28/2011 - 07:08 नवीन
वा. कविता आवडली. नंतर ते चित्र पाहिले. तेव्हा वाटलं कविता कळतीये. अवांतर - हे वाचताना उगाच अलीकडच्या काळात मराठी आंतरजालावर झालेल्या काही 'दंगलीं'ची आणि मग त्या संस्थळांची नावे नजरेसमोर नाचून गेली आणि कवितेतील एकेक रुपक तिथं कसं लागू पडतं हे कळत गेलं. त्या, चित्राताईना अभिप्रेत नसलेल्या, अर्थानं कविता नक्कीच कळली. उगाचच, मी प्रगल्भ आहे, असा क्षणभर (आ)भास होऊन गेला. ;)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 02/28/2011 - 08:07 नवीन
कविता आवडली. बाकीचं जाऊदे पण अंतरातला थंड अंधार तरी शांत असावा ही माफक अपेक्षा जेव्हा भंगायला लागते तेव्हा आपल्या हाती काय रहातं... अवांतर - श्रामोंचे प्रतिसाद वाचायचे नाहीत असं मी ठरवलं आहे. भलते अर्थ (भले मग ते फिट्ट बसणारे का होईना...) काढतात. आणि मग ते डोक्यातनं जात नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 03/01/2011 - 00:39 नवीन
बाकीचं जाऊदे पण अंतरातला थंड अंधार तरी शांत असावा ही माफक अपेक्षा जेव्हा भंगायला लागते तेव्हा आपल्या हाती काय रहातं... असेच म्हणतो. कविता आवडली. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अवलिया Mon, 02/28/2011 - 08:16 नवीन
प्रगल्भ आणि अभिजात आधुनिकोत्तर कविता
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 03/01/2011 - 00:29 नवीन
श्रामो, हे लिखाण त्या अर्थाने नक्कीच नाही. अर्थ कदाचित अजून लागू शकतात पण संकेतस्थळांवरील दंगलींचा संबंध नाही, हे तुम्ही जाणले आहे ते खरे आहे. प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद. प्रगल्भ ही बहुदा न आवडल्याची सूचना आहे, पण असे असले तरी तेही कळवल्याबद्दल धन्यवाद. नुसतेच प्रगल्भ म्हणून सोडण्यापेक्षा कवितेत सुधारणा सुचवल्या तर आवडेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा