Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कां?

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 02/28/2011 - 08:18
मी संतान त्या अनादी अभोगी निर्मात्याचे कां असावे भय मजला कुणा भोगी मानवाचे ? मी चालतो धरुन कास सदा सत्याची कां बाळगावी भिड कुणा चित्रगुप्ताची ? मी प्रवासी त्या लखलखत्या मद्ध्यांनीचा कां असावा छंद मजला काळोख्या रात्रीचा ? जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ? जन्मजन्मांतरीचा दास त्या अनादी अनंताचा कां छळावा श्रावण मजला माझ्या गतजन्माचा ? आधार मज असे जगनियंत्याच्या शाश्वत वचनाचा कां असावा अविश्वास अंतरी या अफाट विश्वपसार्‍याचा ? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/१०/२०१०)

प्रतिक्रिया द्या
1669 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ट
टारझन Mon, 02/28/2011 - 08:29 नवीन
मी संतान त्या अनादी अभोगी निर्मात्याचे कां असावे भय मजला कुणा भोगी मानवाचे ?
पहिलाच लायनीत झोल आहे ... आता निर्माता "अभोगी" असेल तर निर्माती ऊप्स .. निर्मिती कशी होणार ? असो , कवीता एका वेगळ्याच "अंगाने" जाते आहे असे वाटले :) - राजपाटील राजा (और राजा को प्रजा धोका नही दे सकती)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 02/28/2011 - 08:32 नवीन
परत एकदा तुम्हाला कविता कळल्याचे पाहुन ड्वाळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रकाश१११ Mon, 02/28/2011 - 09:37 नवीन
परीकथेतील राजा - जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ? छान लिहिले आहे .पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 02/28/2011 - 10:24 नवीन
मस्त ह चालु द्या :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/01/2011 - 10:19 नवीन
कविता खुपच छान ... विशेषत: मी प्रवासी त्या लखलखत्या मद्ध्यांनीचा कां असावा छंद मजला काळोख्या रात्रीचा ? जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ?
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 03/01/2011 - 21:24 नवीन
सुंदर रचना. लय अपोआप लागते वाचतांना. शब्द निवड खूपच सुंदर आहे. -पु. ले. शु.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/02/2011 - 06:16 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/04/2011 - 08:49 नवीन
सर्वांचे धन्यु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा