वा लेख फार आवडला...
पहिला परिच्छेद आणि शेवटून ५ वा मुद्दा तर फारच छान
माननीय स्पावड्या साहेब,
एवढा मोठा अभ्यासपूर्ण लेख लिहीणे म्हणजे काय खाउ आहे होय?
अर्थमंत्र्यांनी मांडलेला पूर्ण प्रस्ताव, त्याच्या वर लेखकाचे सडेतोड आणि स्पष्ट विचार याची मांड्णी करायची, शिवाय हा सर्व डोलारा सांभळताना मराठी शुध्द लेखनाची धुरा सांभाळायची अशी कसरत करीत एवद्गा मोठा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्याची अशी संभवना करणे बरे नव्हे.
मला तर फक्त ५ वा च नव्हे तर सर्व मुद्दे मनापासून पटले. लेखकाच्या अभ्यासाची आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव तर पदोपदी होते.
सबब पुन्हा अशी टिंगल करू नये अशी नम्र विनंती.
मा. अर्थमंत्र्यांनी मराठी अशुद्धलेखनावर फार मोठा कर बसवला आहे असे कळते.
अतिशय दिशाभूल करणारे विधान.
भारताचे मा. अर्थमंत्री तसेच मा. संरक्षणमंत्री, मा. पंतप्रधान, सर्व पक्षांचे अध्यक्ष आणि बर्याचदा मा. बराक ओबामा हे त्यांच्या १०० निर्णयांपैकी ९९ निर्णय हे मिपा वाचुन आणि काही तज्ञ मिपाकरांची मते अभ्यासून मगच घेतात.
मिपावर शुद्धलेखनाला फाट्यावर मारलेले असल्याने असा कर बसणे शक्यच नाही हे इथे निदर्शनास आणुन देऊ इच्छितो.
पत्रे राहिले का रे...अर्रर्र... क्षमा करा...
मिपाकरांनी लिहिलेली पत्रं राहिली का रे परा ....????
बाकी १ निर्णय 'सकाळ'साठी राखलेला असतो ना????
शिला, शिला की जवानी वाला?
बाकी परा मा. हे अक्षर 'माननीय' या अर्थानेच वापरतो हे ठाऊक आहे हो....
(म.पो. म्हणजे काय सांगेल का कोणी?)
"गरिबांना अधिक गरीब तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा अर्थसंकल्प." कॉम्रेड.चिरोटा
"निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प." चिरोटा अडवाणी
"अतिशय प्रगल्भतेने जनतेचे हित लक्षात घेवून मांडलेला अर्थसंकल्प.खरे तर ह्याची सुरुवात नेहरूंच्या काळातच झाली होती" चिरोटा केतकर
"अत्यंत निराशाजनक जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प"चिरोटा जावडेकर
"मध्यमवर्गाला केवळ गाजरे दाखवणारा खिशात जास्त हात घालणारा अर्थसंकल्प" चिरोटा राऊत.
"काय फरक पडतो ,अर्थसंकल्प कसाही असला तरी? या आधी कधी फरक पडला का? भ्रष्टाचार आधी थांबवा."मध्यमवर्गिय चिरोटा.
अशा सर्वोतक्रुष्ट (!) लेखावरुन प्रेतित होऊन दमदार प्रतिक्रिया आलेल्या पाहुन आनंद झाला.. संबंधितांना विनंती की या लेखकास लेखकराव ऑफ द इयर चे पारितोषिक जाहीर व्हावे!
कसला अर्थसंकल्प?
काय येड बिड लागलंय का काय तुमाला? आँ?
अरे लेको, एव्हढा क्रिकेटाचा वर्ल्डकप चालू आहे, आणि तुम्हाला कसले हे दळिद्री चाळे सुचताहेत?
बरं, स्कोअर काय झाला सांगा रे जरा.
ते अर्थसंकल्प, तो देश, आणि सगळे मरुद्या..खड्ड्यात गेलं तरी चालेल. इट क्रिकेट, स्लिप क्रिकेट लिव्ह ओन्ली क्रिकेट्टा!
प्रतिक्रिया