Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नावं

स — सोनल कर्णिक वायकुळ, Mon, 02/28/2011 - 17:43
नात्यांची नावं शोधायची नसतात नात्यांना नावं ठेवायची नसतात नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे ‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे ‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधायचं? कस सांगायचं आतापासून पुढे असंच वागायचं? पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात? आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात? नाही दिली नावं म्हणून काही अडत का? आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का? नावांच्या परिघात कोंडतात नाती नियम तोडायला मग भांडतात नाती म्हणूनच सांगू का नात्यांची नावं शोधायची नसतात नात्यांना नावं ठेवायची नसतात

प्रतिक्रिया द्या
5612 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ग
गवि Tue, 03/01/2011 - 05:12 नवीन
नेहमीप्रमाणेच मस्त..
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ Sat, 03/05/2011 - 04:26 नवीन
आभार कीती वेळा मानु रे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नगरीनिरंजन Tue, 03/01/2011 - 05:18 नवीन
पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात? आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात? सुंदर!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 03/01/2011 - 06:26 नवीन
अप्रतिम!!!!! प्रत्येक शब्द भावला!:)
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 03/01/2011 - 06:45 नवीन
सुरेख कविता! :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Tue, 03/01/2011 - 07:19 नवीन
खूपच छान आवडली.!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/01/2011 - 07:52 नवीन
ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी सुंदर विरोधाभास साधलात !! खुप आवडली कविता........
  • Log in or register to post comments
अ
अशोक७०७ Tue, 03/01/2011 - 08:12 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
ग
गुड्डु Tue, 03/01/2011 - 09:25 नवीन
छान आणि मनाला भिडणारी
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 03/01/2011 - 09:43 नवीन
छान..
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 03/01/2011 - 14:15 नवीन
पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात? आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात? >>> कविता आवडली ..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/01/2011 - 15:22 नवीन
ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी बेस्ट
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 03/01/2011 - 16:14 नवीन
तसही ' नावात काय आहे ? ' असं म्हणतात पण तरीही ... नाही दिली नावं म्हणून काही अडत का? आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का? नावांच्या परिघात कोंडतात नाती नियम तोडायला मग भांडतात नाती सुंदर !
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 03/01/2011 - 16:22 नवीन
सुरेख कविता .
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 03/01/2011 - 21:28 नवीन
कविता खूपच आतून आलेली आहे असे प्रत्येक शब्दातून जाणवते आहे. छानच. - पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/01/2011 - 21:36 नवीन
पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात? आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात? अतिशय सुरेख कविता!! खूप आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/03/2011 - 18:06 नवीन
मनातलं अगदी छान मांडलंत. खूप सुंदर! येऊ देत अजून!! :) राघव
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 03/03/2011 - 19:40 नवीन
सुंदर...
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ Sat, 03/05/2011 - 04:32 नवीन
आभार सगळ्यांचेच. मी थे रोज येत नाही त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला वेळ होतो. म्हणून दिलगीर आहे. पण तुमच प्रोत्साहन असाच मिळू दे. त्याच बरोबर चुकाही दाखवा लिखाणातल्या. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा