लोकल ,दगड,आणि एक जीव
बऱ्याचदा बातमी ऐकतो नाही का की सायंकाळी रेल्वे ने घरी परत येणाऱ्या प्रवाश्यांवर दगड बसून गंभीर जखमी झाले,दवाखान्यात वेळीच न पोचल्यामुळे मृत्यू वा दवाखान्याचा हलगर्जीपणा,डॉक्टर ची दिरंगाई , कर्मचाऱ्यांची टंचाई इत्यादी मुद्दे त्याला जळूसारखे चिकटून येतात आपण ते निर्विकार चेहऱ्याने वाचतो ,चहा संपला की पेपर भिरकावून "कामाला जायला पाहिजे बाबा,टाईम काढून चालणार नाय " असं म्हणत इयरफोन्स कानात कोंबून निघून जातो..एवढा कोडगेपणा का अंगी रुतला ?हे रोजच झालं म्हणून?
बहुदा प्रत्येक मुंबईकर ही बातमी न बघता लिहून काढू शकतो ,फक्त जखमी व्यक्तीच नावं बदलेल ,आम्ही म्हणू "आयला हे सरकार आणि रेल्वे पोलीस चुतीया आहे ,आपण काय बोलणार भाई!!! ",बर तुमचं जाऊदेत ,हे जे चुतीया लोक वाचत असतीलच ना वृत्तपत्र ,त्यांच्या हातात असतो ना कायदा,मग ते कोणाची वाट पाहत आहेत???"बरोबर त्यांना काय घेण आहे ,त्यांचे पै पाहुणे थोडीच ट्रेन मधून भिरभिरतायेत ,मग आपल्याला काय करायचाय ,लोक मरेनात असे विचार करतात का हे?
त्या ट्रेन च्या खिडकीजवळ वा दारात कोणी स्त्री उभी असेल जिला आज घरी आई बाबा येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण करायचय,एखाद्या स्त्रीला प्रथमच मूल झालं असेल आणि आज maternity leave संपून ऑफिस चा पहिलाच दिवस आणि तो कधी एकदा संपून घरी आपल्या बाळाकडे जायचय,कुणाला फोन आला असेल की आई आज मला बक्षीस मिळालं तू लवकर ये ना घरी ,कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर कोणाचा गृहप्रवेश,कोणी नुकतंच मुंबापुरीत आपली गगनभरारी घेण्यासाठी आलं असेल,तर आज कुठला मुलगा त्याला हव्या त्या ठिकाणी प्रवेश मिळाला म्हणून लवकर घरी जात असेल की त्याची आई काहीतरी गोडधोड करून वाट बघतेय,तर कुण्या बाप्याला आपल्याला मिअलेल्या प्रमोशन ची आणि बॉस ने केलेल्या कौतुकाची बातमी कधी एकदा घरी जाऊन देतो असं झालं असेल तर कुठली मुलगी तिला कॉलेज मध्ये मिळालेल्या नृत्य स्पर्धेतलं बक्षीस बाबांना दाखवते असं झालं असेल ,कुणाला मुलाखत यशस्वी रित्या पार पडून नोकरी मिळाली असेल आणि आता आपल्या घरातल्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार अशी नाना प्रकारची उदाहरणे असतील त्या एका खिडकी पाशी,एका दरवाज्यापाशी.त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य इतक्या क्रूरतेने उध्वस्त करून टाकतो तो एक दगड.रेल्वे रुळावर निपचित पडलेला आणि अंधत्व ,पंगुत्व ,परावलंबित्व ही सत्व एकवटलेला दगड कोणाच्या भाळी रेखाटलेला असतो देव जाणे !
ही दगडफेकी जमात म्हणजे झोपड पट्टी तली गुंडागर्दी असून दिवसभर नको ते उद्योग करणे,मुलींची छेड काढणे,पेपर विकणे,मावा गुटखा खाणे,लोकल मध्ये दादागिरी करणे,रात्री हातभट्टीची मारणे,नशा पाणी करणे आणि मग एक "थ्रिल" म्हणून किंवा एक गम्मत म्हणून ट्रेन च्या डब्यांकडे दगड भिरकावणे,त्यांच्या थ्रिल ची फार मोठी किंमत चुकवावी लागते प्रवाश्यांना .हे कधी कळणार ह्या माकडीच्याना(चिक्कार शिव्या अभिप्रेत,भगिनी वर्गामुळे एवढ्यावरच निभावले)..
हे जखमी प्रवाशी जेव्हा वार जिव्हारी लागून वेगात जात असलेल्या ट्रेन मधून खाली कोसळतात तेव्हा त्यांची अवस्था काय होत असेल याचा विचार केलाय ?
हे सगळ झाल्यावर सुद्धा रेल्वे पोलीस तातडीने जबाबदारी घेतील तर ते नाही,बर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी करत एखाद्या हॉस्पिटल ला गेलेच तर तिथे डॉक्टर सुट्टीवर असतो किंवा जेवायला गेलेला असतो किंवा राउंड वर असतो,तो जागेवर असायला गुरुपुष्यामृत ,मणिकांचन हे सगळे योग एकत्र यावे लागतात ,नर्सेस ,कंपाउंडर ह्यांची मनमानी ,हजार प्रश्न ,काहीवेळा इंजेक्शन घ्यायचं असत पण पुरेश्या खोल्या उपलब्ध नसतात अश्या वेळी काहीतरी सोय करता येते तरीपण बाहेर चव्हाट्यावर हे उपचार उरकले जातात , आणि अश्यावेळी ती जखमी व्यक्ती स्त्री असेल तर सगळ्यांच्या नजर तिच्यावर असतात ,त्या बिचारीची काय अवस्था होत असेल ह्याची कोणी कल्पना केलीये ,बर ही पोलीस केस होत असल्यामुळे कायद्याच्या औपचारिकते पुढे माणुसकी आणि त्यापेक्षाही योग्य आणि त्वरित उपचार हे गौण ठरतात नाही का ? ,अश्या जखमी व्यक्तीला त्वरित उपचार देण्याऐवजी त्या व्यक्तीबरोबर आलेल्यांशी हुज्जत घालत बसणे आणि तोकडे उपचार करणे हे रुग्णालयीन कार्यक्षमतेवर(अ) प्रकाश टाकतंय.
hospital मध्ये hospitality च राहिली नाय दादा .....
इतकी संवेदनशीलता हरवत चालली आहे का त्यांची की समोर एक रक्ताळलेला आत्मा जगण्यासाठी केविलवाणी धडपड करतोय ,ह्यांच्या समोर हात जोडतोय तरी का नाही ह्याचं काळीज गलबलून उठत,का नाही लगेच आणि योग्य उपचार दिले जात ..सरकारी यंत्रणा एवढ्या हलगर्जी कश्या की ज्या जिवाशी खेळू शकतात ,खर तर ह्या गंभीर परिस्थिती वेळी रुग्णाला आणि त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना धीर देण्याच सोडून त्यांच्याशीच हुज्जत घालत बसतात तेव्हा ह्या लोकांच मानसिक खच्चीकरण होत!
हे कर्मचारी पगार घेतात एवढा मग ज्या कामा साठी एवढा पगार घेतात ते काम निष्ठेने का नाही करत?
रेल्वे पोलिसांना अजून काम काय असतात ?का नाही ते बंद करू शकत हे ...
सध्या मुंबईतली एकूण एक स्टेशन्स लोकांनी गजबजलेली आणि सुविधांनी परिपूर्ण नसलेली अशी आहेत.
मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारे आणि "साला,८.३५ ची लोकल काय पण करून पकडला पाहिजे,ह्याला मरायला आमचीच ट्रेन भेटते का" असं करून तुडवत जाणारे एकाच लोककल्याण पंथातले असतात. रेल्वेचे एवढ बजेट असत ते जात कुठे ?
एवढं औद्यसिन्य ??
प्रतिक्रिया