Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्रिवेणी - पहीला प्रयत्न

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 03/02/2011 - 08:17
त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती: तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते. १. आधी येतो पाऊस.. मग तुझी आठवण.. . . . अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच... २. तू, मि, पाऊस.. सगळेच वेडे.. दाटून आले कि बरसतो.. . . . या वर्षी दुष्काळ फार लांबलाय... ३. तुझी माझी भेट जणू.. ओढाळ लाटेवर चांदण्याचा स्पर्श.. . . . लाटा अन् चांदणे दोन्ही स्पर्शातीत.... ४. पौर्णिमेच्या रात्री चंद्रचिंब तू.. मि मात्र पूर्ण गोंधळलेला.. . . . धरती अन् नभ यातील फरक शोधतोय... ५. डोळ्यातील 'हो'कार अन् ओठातील 'न'कार.. दोघेही असे काही भांडतात.. . . . जणू काय जुळ्यांचे दुखणे... ६. तुझी स्वप्ने अशी ओळीने ऊभी असतात.. मि झोपत नाही.. तरी वाट पाहत राहतात.. . . . बहुदा त्यांनाही आता सवय झाली आहे.. जागरणाची.. ७. एक शांत सरोवर अन् त्यात उगवतीचा सुर्य.. हं.. किती शांत वाटतय आता.. . . . अगं थांब इतक्यात मिटू नकोस ते डोळे... ८. लाटांवर लाटा किनार्‍याशी.. सागर नाहीच दोषी.. . . . माझ्याच पायाचे बहुदा दगड झालेत.... |- परीकथेतील राजा -| (१५/०९/२०१०)

प्रतिक्रिया द्या
2270 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रकाश१११ Wed, 03/02/2011 - 08:20 नवीन
खूप छान प्रयत्न.मित्रा लिहित रहा. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/02/2011 - 08:36 नवीन
साध्या साध्या वाटणारा हा प्रकार अवघड असतो .. या प्रकाराला हायकु बोलतात कदाचीत असे वाटते . तुम्ही लिहिलेले सर्व आवडले .. विरोधाभासातुन परिस्तीथी सुंदर वर्तविलेली आहे .. लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/02/2011 - 08:48 नवीन
हायकू वेगळे असते. उदाहरण मिळाल्यास जरूर पाठविन आपल्याला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ट
टारझन Wed, 03/02/2011 - 08:45 नवीन
पहिलेच दोन्ही प्रतिसाद कविश्रेष्ठांचे आल्यावर आम्ही कवितेचे अफजुलखान काय बोलणार? =) -त्रीदेव कविता से शादी करुंगा
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/02/2011 - 09:19 नवीन
कसला कवीश्रेष्ठ .. हितं शब्द आठवायची मारामार .. जुण्याच देतो मध्ये आधे .. थोडेशे मनोगत : सगळ्याच जणांनी लेख ..कथा .. कविता लिहिल्या तर प्रतिसाद कोण देणार ते ही मनापासुन वाचुन .. म्हणुन मी कवी या संकल्पनेत न बसता वाचक यात बसतो बाबा .. निदान चांगले लिहिता येत नसले तर चांगला प्रतिसाद देवुन लिहिणार्‍याला प्रोत्साहन देने पाहिजेच .. विशेष करुन कविता कडे कोणीच लक्ष देत नाहि जास्त .. बाकी कविता शी लग्न करणार या विनोदी वाक्यावरुन ही .. कविता आणि तीच्या बापाचे म्हणने मांडावे असे वाटते ... पण जमल्यास ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
राघव गुरुवार, 03/03/2011 - 18:06 नवीन
सगळ्याच त्रिवेण्या आवडल्यात. एखादी वेगळी काढून खास तारीफ केली तर बाकींवर अन्याय होईल! येऊ देत अजून खूप खूप!! :) राघव
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 03/03/2011 - 18:31 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/03/2011 - 19:58 नवीन
त्रिवेणी आवडल्या. आणखी येऊदेत. (त्रिवेणीप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/04/2011 - 08:47 नवीन
नक्की प्रयत्न करीन...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 03/04/2011 - 09:29 नवीन
मस्त! त्रिवेणी वाचताना स्मित प्रकटले आणि डोळ्यात वेदना उमटली . . . . ओठ माझे फाटलेत थंडीने.... ;-)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 03/04/2011 - 09:33 नवीन
तू, मि, पाऊस.. सगळेच वेडे.. दाटून आले कि बरसतो.. . . . या वर्षी दुष्काळ फार लांबलाय... आवडले रे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 03/04/2011 - 09:37 नवीन
तू जोरात धावतेस.. मी जोरात धावतो... ..... .... .... आमी बास.... दम लागला ........घुसळलेला विजुभाऊ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा