सराईत
आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे..
सगळं कसं छान चालू आहे
हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस.
माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं.
हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग.
थुंकी झेलणारे झेलतायत..
असुयेच्या आठ्या सुखावून जातायत .
मित्रांचाही आहेच की घोळका...
सगळं कसं छान चालू आहे .
मारायला शिकतोय की नकोसे विचार,
हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात.
खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची..
जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची
सुखाच्या व्याख्या बदलतायत,
नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल.
जल्लोष होतोय धुंद..
दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय.
प्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त..
बुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त
नव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर
एक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण..
सराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना
💬 प्रतिसाद
(10)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 03/02/2011 - 12:08
नवीन
नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल.
जल्लोष होतोय धुंद..
दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय.
प्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त..
बुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त
नव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर
खुपच सुंदर...... आवडली.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 12:11
नवीन
मस्त रे अर्ध्या :)
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Wed, 03/02/2011 - 12:53
नवीन
अर्धवटरावांनी कविता मात्र पूर्ण केलीये हं !मस्त !
- Log in or register to post comments
अ
अमित देवधर
Wed, 03/02/2011 - 13:00
नवीन
छान कविता. 'वाईट' विषयावर 'चांगली' कविता करणे ही गोष्ट विशेष! :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 03/02/2011 - 14:29
नवीन
मस्त !
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 03/02/2011 - 22:16
नवीन
एक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण..
सराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना
हम्म!! आवडली कविता.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Wed, 03/02/2011 - 22:30
नवीन
खूप आवडली. शेवट तर अगदी अचूक, परिणामकारक.
(सराईत)बेसनलाडू
मिसळापाव वर प्रदीर्घ कालानंतर चांगल्या, वाचनीय कविता येताहेत, हे पाहून बरे वाटते आहे. अशाच उत्तमोत्तम कविता आणखी वाचायला मिळोत, ही सदिच्छा!
(सदिच्छुक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 03/03/2011 - 07:13
नवीन
मस्त !!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/03/2011 - 07:25
नवीन
मस्तं कविता आहे रे अर्ध्या. मस्तं मस्तं मस्तं.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 03/03/2011 - 12:50
नवीन
मी गाता गीत तुझे वाहवा मला मिळाली
आपुल्याच दु:खाला जणू दवा मिळाली
जे सूर उमटले त्यास मनस्थिती मिळाली
होता कैफ भावनांचा त्यात वाहवा मिळाली
- Log in or register to post comments