जे न देखे रवी...
(कधी)
Primary tabs
मिलिंद फणसे यांची कधी ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं "ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधीकाय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचाटाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधीसंपतो सोडा कधी ,संपते पाणी कधीचालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधीती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतोखूप येतो वास पण चालते फेणी कधीहा निरागस चेहरा, हासता मनमोकळेवाटते चढली कुठे, वाटते चढली कधीती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसतेफेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधीलाज सोडावी अधी लागते "केश्या"जरापाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?
ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी
हे दोन्ही शेर एकदम 'टुन्न' जमलेत! ;)
चतुरंग
सही यार!
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?
खी खी खी!
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी
खरयं.....कोरी पिण्यात जी मजा आहे ती भेसळमिश्रितमध्ये नाही!
असो, विडंबन नेहेमीप्रमाणे जब्राट!
अरे वा!
:) तन डोले.. मेरा मन डोले...
:))
पण एक प्रश्न...हा मनुष्य स्वतः दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, आणि काव्यरचना मात्र दारु, तीचे निरनिराळे रंग, परिणाम, नशा इ.इ. गोष्टींगर मोठ्या अधिकाराने करतो ! हे कसे बॉ?
(आता, "मृत्यूचं वर्णन करायला स्वतः गचकायलाच पाहिजे का?" असं 'पुणे-३०' छापाचा प्रश्न करुन कोणी आम्हाला तोंडावर आपटू नये ही 'णम्र इनंती')
X( सिहगड चढून जाणारे...इतके बेवडे @) आहेत इथे..
त्या साठी आपण कशाला प्यायला हवी.. 8>
(दुसर्याच्या आणभवातून लिहणारा)केशवसुमार :B
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी
ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी
तुम्ही खरच छान करता विडंबन पण असं वाट्ट की तुम्हाला फारच आवड्ते का ????
तुम्हाला फारच आवड्ते का ????
कोण?
(बुचकळ्यात) केशवसुमार
विडंबनाच्या विषयाची नायीका :)
शिव शिव..
काय बोलताय काय ऋचाताईईई.. :O छ्या छ्या...मी नाहि त्यातला... [(
(लिंबाच्या रसात पाणी घालून पिणारा) केशवसुमार :B
=))
लय भारी!
(बुचकळ्यात) हे मी 'बुचक' 'ळ्यात' असं वाचलं आणि हा काय नवा सबुद बॉ म्हणून मीच (बुचकळ्यात) पडलो :))
-(बुचक ळ्यात) ध मा ल.
मास्तर मस्तच कि राव!
मास्तर?
केसुशेठ..मास्तर? तद् माताय...ही काय भानगड आहे हो केसुशेठ?
मला काय विचारतो :W
त्या सत्या काम जबालीला विचार :-C .. मला कै ला मास्तर म्हणून राहिला बे? :?
(पुन्हा बुचकळ्यात) केशवसुमार :SS
कय नाय ल बाल्या.......!!! भानगड करायला तु कय बाय नाय....!!
काय मास्तर बुच कळ्यात सर्खे पडु नका!
म्हण्जे मास्तर हा एक शब्द हाय. तो आपल्याकडे आसाच वापरला जातो.!!
हात तेच्या....................
डाव विस्कटला...............
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी
लड बापू!!!!!!!!!!!!!!
पार 'आऊट' झालो आम्ही. मूळ रचना (म्हणजे विडंबन, फणसे यांची नव्हे. ती अद्याप वाचलेली नाही) व्हिस्कीची आणि प्रतिसाद चाखण्यासारखे.