Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयर्लंडला भारताचा पराभवाचा धक्का

ट
टारझन यांनी
Sun, 03/06/2011 - 17:55  ·  लेख
लेख
६ मार्च - आज वर्ल्ड कप मधला अजुन एक मोठा उलटफेर झाल्या आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्रेट अनसर्टंटीज असे म्हंटले जाते त्याचा आज बंगळुरु च्या ग्राऊंड मधल्या हजारो प्रेक्षकांनी प्रत्यक्षात तर करोडो लोकांनी टिव्ही वर आणि हजारो लोकांनी रेडिओ वर अनुभव घेतल्या आहे . आज आयर्लंड मैदानात उतरलं होतं ते भारताचा खुर्दा उडवण्याच्या उद्देशाने. परंतु सुरुवातीलाच दुबळ्या भारताला टॉस जिंकुन थोडंफार लक ची साथ मिळाली. भारताच्या बॉलर झहिर खान ह्याने आयर्लंड ची सलामीची जोडी पहिल्याच तीन षटकांतच तंबुत पाठवली तेंव्हा भारतभर फटाके फोडल्या गेले. परंतु आयर्लंड च्या मजबुत बॅटींग ने भारतीय गोलंजाजांचा हा आनंदाचा बुडबुडा बुळ्ळुक कन फोडला . अंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप मधे गणल्या गेलेल्या तिन आणि चार नंबर वर आलेल्या जॉइस आणि नेल ओब्रायन यांच्या कडून भारताच्या सुमार बॉलिंग चा छाण समाचार घेतल्या गेला. एका चुकीमुळे रन आउट होत ही जोडी फुटली. नंतर भारताच्या नवोदित बॉलर युवराज सिंग याने ५ विकेट घेत आयर्लंड चे मोठ्या धावांचे लक्ष धुळीस मिळवत २०७ मध्ये डाव आटोपला. २०७ धावांचं अशक्यप्राय वाटणारं लक्ष घेऊन भारताची अनुभवहीन जोडी म्हणजे विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात उतरले तेंव्हा भारतियांचे श्वास काही काळ रोखल्या गेले होते . आपल्या करियर मधे शिकण्याच्या पहिल्याच टप्प्यात असणार्‍या सेहवाग ने चौकाराने खाते उघडले तेंव्हा बरे वाटले. परंतु पुढच्याच चेंडु वर अँब्रोज , आक्रम आणि युनुस नंतर सर्वांत खरणाक समजल्या जाणार्‍या जॉन्स्टन ने त्याची विकेट घेतली. नंतर आलेल्या गंभिरला ही जॉनस्टन ने चलते केले . सुरुवातीच्या धक्यानंतर कोम्यात गेलेल्या भारतिय फलंदाजांनी ह्याचा एवढा धसका घेतला की जर चौकार मारल्या तर आयर्लंड चे बॉलर्स रागाच्या भरात शरीरवेधी बॉलिंग करुन त्यांच्या बरगड्या तर तोडणार नाही ना ? अशा भितीत खेळले , जे बरोबरंही होतं. आयर्लंड चे स्पिनर सुद्धा १६०-१७० किमी च्या वेगाने मारा करण्यास समर्थ आहेत. बॉलिंग चेंज नंतर आलेला जगद्विख्यात आणि आजवर कसोटी वन डे आणि २०-२० मधे १३,००० च्या वर विकेट्स घेतलेला डॉक्रेल बॉलींग ला आला तेंव्हा आपला पहिलाच सामना खेळणारा १६ वर्षिय खेळाडु सचिन तेंडुकर कसा बसा रन काढत होता. पण डॉक्रेल ला नवख्या सचिन ला चकवायला वेळ लागला नाही. त्याने एका सहज फेकलेल्या चेंडु वर सचिन चकला आणि अंपायर रिव्ह्यु ची वाट ही न पहाता चलता बनला. रिव्ह्यु घेतल्या आयर्लंड चे स्पिनर फायरबॉल्स टाकुन आपली पँटच जाळुन टाकणार नाहीत ना ? आणि पहिल्याच मॅच मधे आपला पोपट होणार नाही ना ? ही भिती सचिन च्या तोंडावर साफ झळकत होती. नंतर आलेले कॅप्टन धोणी बॉल खाऊन जेवढी प्रॅक्टिस मिळेल तेवढी घेत होते. पण आज नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ढोणी आउट झाल्यावर आलेला युसुफ पठाण येऊन असे काही शॉट खेळला की भारत स्ट्राँग टीम वाटावी , आणि आयर्लंड एखादी खटमल टिम वाटावी. त्याने आल्या आल्या मॅच चा संपुर्ण खेळंच पालटून टाकला. लक बाय चान्स ने ७६ बॉलांत ५० रन्स मिळवुन युवराज ने ही फिफ्टि साजरी केली. आयर्लंड चे खेळाडु स्तब्ध होते. त्यांना आपण मॅच हारल्यावर विश्वासंच बसत नव्हता. सगळे प्लेयर्स ग्राऊंड मधे च उभे होते. मॅच जिंकल्या नंतर मला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता . भारताने आयर्लंड ला खरोखर हरवलं ? मी ७-८ न्युज चॅणल बदलुन पाहिले . तरी देखील विश्वास बसत नव्हता. पण नंतर माझं सुन्न झालेलं चित्त थार्‍यावर आलं तेंव्हा मला बाहेरचा फटाक्यांचा आवाज ऐकु आला. ह्या ऐतिहासिक विजया मुळे भारतात क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल . भारत सरकार ने भारतिय टीम वर बक्षिसांची खैरात केल्याचे ही ऐकले आहे . टिम इंडीयाचे ह्या विजयाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच ! - कॅमेरामॅन मनिश के साथ मै पत्रकार टारझन चौरासिया पीटीआय , गाझियाबाद

प्रतिक्रिया द्या
7784 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

आ
आत्मशून्य Mon, 03/07/2011 - 08:02 नवीन
आयर्लंडचा पराभव हा रजनीकांट्ने फीक्क्स केला होता............
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 03/06/2011 - 17:58 नवीन
हा हा. विजयी भारतीय संगाला आमच्याकडून गणपाकृत चिकणचिली फ्री. :)
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sun, 03/06/2011 - 18:05 नवीन
"...भारत सरकार ने भारतिय टीम वर बक्षिसांची खैरात केल्याचे ही ऐकले आहे ..." ~ ग्रेट....आता दिल्लीत लोकसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन चालूच आहे, तिथेही "अशक्यप्राय विजय मिळविल्याबद्दल" हातासरशी उद्या धोनीच्या ब्ल्यू ब्रिगेडच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला जाणार असल्याची ब्रेकिंग न्यूज चौरासियांच्याच चॅनेलवर धडाक्यात दाखवत आहेत. इन्द्रा
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Sun, 03/06/2011 - 18:18 नवीन
ग्रेट, आवडले. मस्त करमणूक झाली वाचून !!!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sun, 03/06/2011 - 18:19 नवीन
मस्त रे टार्‍या चौरासिया त्या मॅच मधे न बघाय्ला मिळालेले तुझे चौकार - षटकार. अगदीच भिक्कार मॅच . दम नसल्यासारखे खेळत होते. मी पन नेट जाळन्यापेक्ष्क्षा बंद करुन बसले होते. आता अजुन वर्ल्ड कप ची वाट बघयाचीये म्हने .
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sun, 03/06/2011 - 18:21 नवीन
चुकुन २दा आला.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 03/06/2011 - 18:34 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 03/06/2011 - 18:34 नवीन
हणुमानचालीसा, साईभजन, माता दि आरती, रामरक्शा सगळ्या देवांचा धावा चालू होता म्हणून तर असा अभूतपूर्व विजय मिळालाय..
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/06/2011 - 18:37 नवीन
मॅचची चिरफाड आवडली!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 03/06/2011 - 19:29 नवीन
Image removed. लेखाबद्दल Image removed.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Sun, 03/06/2011 - 19:57 नवीन
अत्यंत गचाळ आणि बोअर झालेली मॅच केवळ तुझ्या वर्णनामुळे बहारदार झाली. पण गल्ली चुकला की हो. क्रिकेट ''विश्वचषक २०११'' सदर मध्ये असते. ( का.कू पेक्षा विश्वचषक प्रथम वाचले जाते.) बहारदार लेखनासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 03/06/2011 - 20:40 नवीन
किती. रिक्टर ( की रिश्चटर ) स्केल्च्या धक्क्या. दिल्या गेल्या. ते मोजले का?
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sun, 03/06/2011 - 21:46 नवीन
टारझन चौरासिया ......... अफलातून ! :) आयर्लंडवर लावलेले पैसे बुडले ना पण.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 03/07/2011 - 01:58 नवीन
टारझनदादा उर्फ टादा यांनी आपल्या लेखनाचे खाते खोलल्याबद्दल अभिनंदन. असेच लिहीत रहा. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/07/2011 - 02:37 नवीन
काथ्याकुट स्वसंपादन करता येत नाही , त्यामुळे लिहीताना राहिलेल्या त्रुटी नंतर बदलण्याचा प्लान फिसकटल्या गेला. वाचकांनी कृपया तेवढं सहन करुन घ्यावं :) संपादकांना जमल्यास खालील बदल केल्या जावा ही विनंती : गोलंजाजांचा = गोलंदाजांचा अंतरराष्ट्रीय = आंतरराष्ट्रीय मोठ्या धावांचे लक्ष = मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य खरणाक = खतरनाक / खतरणाक आपण मॅच जिंकल्याचा उत्साहंच एवढा होता की किती न काय लिहू असं झालं होतं ! माझा तर अजुन पण विश्वास बसत नाहीये :) आमच्या गल्ली क्रिकेट मंडळाने जिलब्या गणपतीसमोर केलेल्या राजभोग पुत्रप्राप्ती यज्ञामुळेच हा विजय मिळाला असे आमच्या गल्ली क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस तात्या कदम यांचे म्हणने आहे . धन्यवाद . (राजसुय पुत्रप्राप्ती यज्ञप्रेमी)टारझन आमचे येथे सगळ्या प्रकांरचे यज्ञविधी विधीपुर्वक केल्या जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अरुण मनोहर Mon, 03/07/2011 - 03:10 नवीन
टारझणला सुद्दलेक्नाची येवढी काल्जी! दोले पानावले. साय्न्स फीकशण मधे दाखवतात त्याप्रमाने टारझण बदलला तर नाही? (अटॅक ऑफ द नेट इनव्हेडर्स)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
५
५० फक्त Mon, 03/07/2011 - 03:33 नवीन
काहीतरी होउन मॅच जिंकली आणि सगळे गाडे सुरळित रस्त्यावर आले हे काय कमी आहे. असो लिहायची पद्धत अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/07/2011 - 04:51 नवीन
जॉइस आणि नेल ओब्रायन यांच्या कडून भारताच्या सुमार बॉलिंग चा छाण समाचार घेतल्या गेला
आमच्या माहितीप्रमाणे जॉईस हा विश्वविख्यात फलंदाज अगदी लवकरच बाद झाला होता. ड्रेसिंग रूम मध्ये जाउन त्याने टीव्ही फोडण्याचाही प्रयत्न केला म्हणे. पण टीव्ही फुटला किंवा कसे हे नीटसे कळले णाही. पण असा हा दमदार फलंदाज अगदी स्वस्तात गेल्यामुळे चिडून कर्णधार पॉर्टरफील्ड याणे आयुष्यातील सर्वोत्तम खेळी खेळली व हिंदुस्तानच्या कमजोर गोलंदाजांचे आधीच कमजोर असलेले पृथःकरण अजूनच बिघडवून टाकले म्हणे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 03/07/2011 - 04:57 नवीन
भारताची नवोदित टीम या विजयामुळे अत्यंत उत्साहित झाली असून बुधवारी होणार्‍या नेदरलँडबरोबरच्या अतिशय महत्त्त्त्त्त्त्व्व्व्वपूर्ण सामन्यासाठी सज्ज झाली आहे असे समजते. जरी नेदरलँडचे पारडे जड असले तरी वर म्हटल्याप्रमाणे 'क्रिकेट इज गेम ऑफ पियूष चा वला, मुनाफ पटेल न पटेल आणि विरु से हाग ' भारताच्या आशा अजून कायम आहेत.( भाषांतरीत) टारझन या णवोदितानी लिहिलेले लेखण पाहून क्रिडासमीक्षेचा पाया निव्वळ भुसभुशीत आहे याची खात्री पटली. - विश्लेषक प्यारंदन लेले
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 03/07/2011 - 05:06 नवीन
मस्तच :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Mon, 03/07/2011 - 05:53 नवीन
>>दुबळ्या भारताला टॉस जिंकुन थोडंफार लक ची साथ मिळाली >>२०७ धावांचं अशक्यप्राय वाटणारं लक्ष घेऊन भारताची अनुभवहीन जोडी म्हणजे विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात उतरले तेंव्हा भारतियांचे श्वास काही काळ रोखल्या गेले होते >>२०-२० मधे १३,००० च्या वर विकेट्स घेतलेला डॉक्रेल बॉलींग ला आला तेंव्हा आपला पहिलाच सामना खेळणारा १६ वर्षिय खेळाडु सचिन तेंडुकर कसा बसा रन काढत होता >>मी ७-८ न्युज चॅणल बदलुन पाहिले . तरी देखील विश्वास बसत नव्हता. अगगागागाग !फुटलो न भाऊ !!! लई भारी. फार छान लिखाण. सदर लेख इंडिअन टीम ला वाचयला दिला पाहिजे. एकेकाच्या xxxवर रट्टे दिले पाहिजेत त्या शिवाय सुधारणार नाहीत हे लोक.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 03/07/2011 - 06:06 नवीन
मी ७-८ न्युज चॅणल बदलुन पाहिले . तरी देखील विश्वास बसत नव्हता. >>> =)) =)) चांगलाच हाणलाय की टोल
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 03/07/2011 - 06:15 नवीन
मस्त! मजा आली वाचायला!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 03/07/2011 - 06:32 नवीन
भारत जिंकला! विषय संपला!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 03/07/2011 - 06:40 नवीन
भारत जिंकल्याचं कौतुकच नाही टार्‍याला !!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Mon, 03/07/2011 - 06:43 नवीन
मॅच आणि लेख दोन्ही छानच..... :)
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 03/07/2011 - 07:03 नवीन
बलाढ्य आयर्लंडला हरवणार्‍या भारताला उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडचे अभेद्य आणि अशक्यप्राय आव्हान असणार आहे. व्हेटोरीसारख्या जगविख्यात आणि unplayable फिरकी गोलंदाजापुढे भारताला टिकाव धरणे अवघड वाटते. पण गेल्या दोन स्पर्धांच्या तुलनेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे भारतीय चमू आनंदात आहे. जर उपांत्य पूर्व फेरी पर्यंत मजल मारली तर गेल्या दशकातली ती सर्वोत्तम कामगिरी ठरेल. त्यामुळे आत कसून सराव करण्याचा मनोदय कप्तान धोनी आणि संघाचा तारा युवराज सिंग यांनी व्यक्त केला आहे.
  • Log in or register to post comments
र
रमताराम Mon, 03/07/2011 - 07:31 नवीन
बोलिंग नि फील्डिंगचे आधीच आपण सर्वश्रेष्ठ होतो, बॅट्समन पण जागतिक दर्जाचे झालेले पाहून डोळे मिटायला मोकळा झालो आता. (टीव्ही बघायला नको म्हणून... तुम्हाला काय वाटलं... आले लगेच सेलेब्रेट करायला)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 03/07/2011 - 08:42 नवीन
काय रे विघ्नसंतोषी टार्‍या ? च्यायला एकतर पुढच्या वर्ल्डकपला फत १० संघ घेणार आहेत म्हणे. अशा वेळी एका बलाढ्य संघाला हरवुन भारताने जागतीक पातळीवर आपली दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले आहे ह्याचे विशेष कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 03/07/2011 - 10:41 नवीन
लेख आवडल्या
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/07/2011 - 14:30 नवीन
लेख आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 03/07/2011 - 15:14 नवीन
मस्त लेख ठोकलास टार्‍या. आता भारतीय संघाला वाचायला द्यावे हि विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अनुराग Tue, 03/08/2011 - 06:56 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
अ
अनुराग Tue, 03/08/2011 - 06:56 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
ट
टिलू Tue, 03/08/2011 - 12:44 नवीन
बदललेले pitch पाहून बरे वाटले. नाहीतर असल्या पाटा pitches वर काही दिवसांनी umpire सुद्धा सेन्चुरी मारतील.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 03/08/2011 - 13:41 नवीन
इतकं काय ते टोचून बोलायचं ! एका पीच तज्ञाने याचं स्पष्टीकरण दिलंय ना लोकसत्तामधे. आपल्या फलंदाजांना की नाही, ऑफ द पीच, बॉल लगेच बॅटीवर यावा लागतो म्हणे. तर त्या दिवशी सगळं अंगणच(पीच) वाकडं झाल्यामुळे बॉल बॅटीवर स्लो येत होता. मग आपल्या 'धुरंधरांनी' काय करावं बरं! त्या नतद्रष्ट युसुफने उगाचच टोलेबाजी करुन पीच नॉर्मल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला, आगाऊ कुठला!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 03/08/2011 - 15:00 नवीन
तिरकसपणा आवडला. लगे रहो टारझनभाय. आयर्लंडकडून थोडक्यात सुटलो, पण पुढची मॅच नेदरलंड्सबरोबर आहे. त्यांच्यापुढे कसा निभाव लागणार? या कल्पनेनेच जीव घाबरा होतो.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 03/08/2011 - 17:38 नवीन
टारझन यांचा हा लोकविलक्षण असा स्पेल ( कामगिरी) बघितल्यानंतर पैसे वसुल अशी भावना निर्माण झाली. त्या दिवशी आपले भाग्य खरोखरीच थोर, आर्यलंडने जर २५/३० धावा जास्त केल्या असत्या तर भारताला सामना निकालरहीत ( टाय) ठेवण्यासाठी परत घाई करावी लागली असती. शेवटी जय आणि पराजय हा महत्त्वाचा हेच खरे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 03/08/2011 - 23:54 नवीन
लेख कालच वाचला पण प्रतिसाद द्यायला जमला नव्हता. मनापासून हसत होतो. ता क : टारु टारु , बाळा अरे असां लिहित राह्यलास तर बालिष्टर की रे होशील. मग आम्हाला टारु कोण !? :)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 03/09/2011 - 03:35 नवीन
अतिशय उत्तम लेखन! ग्रेट!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा